वीस सात = सत्तावीस

पण जर थोडा बारकाईने विचार केला की असं दिसुन येईल की “सहा साठ” किंवा “साठ सहा” यांचा वेगात पुनरुच्चार केल्यास “सहाषठ” (आणि मराठीचे मूळ संस्कृत असल्याने Sixty six षट्षष्टिः) विसर्गाचे रुपांतर “सहाषष्ठ” मध्ये होत असावे.
तसेच “सहा पन्नास” किंवा “पन्नास सहा” यांचा वेगात मोठ्या आवाजात पुनरुच्चार केल्यास “छप्पन” चे उच्चारण होते.

दुसरीतले विद्यार्थी पाठांतर करताना वारंवार मोठ्याने उच्चार करतील अशी आशा आहे, म्हणून “पन्नास सहा” ने सुरवात करुन ते “छप्पन” पर्यंत पोहोचतील. पण कधी? (दुसरीतुन तिसरीत गेल्यानंतर की १० वर्षांनी की एका पीढीनंतर)? हा प्रश्न आहे. शिक्षकांना हे समजावणे सोपे जाईल अशी आशा आहे.

बहुतेक संस्कृत अनिवार्य केल्यास हा प्रश्न सुटेल. (एक शक्यता).
आणि तसंही समाजाला संस्कृत भाषेची आवश्यकता आहे.

राहिला प्रश्न “दोन” आणि “तीन” चा. “दोन” ला “बे” आणि “तीन” ला “त्र” हे शिक्षकांना शिकवता येईल असं वाटतं.

एक उणे नव्वद = एकोणनव्वद
एक उणे चाळीस = एकोणचाळीस
नव्वद नऊ = नव्याण्णव
इत्यादी..

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

असंच.
माझी मुलगी ३ वर्षांची आहे. तिला इंग्रजीत आकडे म्हणता येतात, पण त्यांचा नक्की अर्थ कळतच असेल असं नाही.
तर ती ३१-३२.. असं करत करत ३९ पर्यंत नीट जाते. आणि मग थर्टीटेन म्हणते.
म्हणजे तिला नाईन नंतर टेन येतात हा पॅटर्न माहिती आहे. आणि थर्टी वन नंतर थर्टी टू येतं हेही ठाऊक आहे.
हा इंग्रजीचा सरळ फायदा आहे. ३०+१ नंतर ३०+२ येतात हे माहिती नसतानाही केवळ अंक म्हणायची पद्धत सोपी असल्याने ती ही पोपटपंची करू शकते.
.
दुसरं उदाहरण - माझा एक तमिळ मित्र मुंबैपुण्यात बरीच वर्ष राहून उत्तम नाही, पण चांगलं मराठी बोलतो. त्याचं एक म्हणणं असं आहे की- मराठी आकडे हा प्रकार त्याला आयुष्यात झेपला नाही.
सत्त्याण्ण्व म्हणजे किती? एकूणनव्वत आणि अट्ठ्याण्णव ह्यातला फरक काय? हे तो नेहेमी विसरतो.
ह्यावर मी आधी हसायचो -की असं कसं कळात नाही साधं?
.

"उणे" हा शब्द अंकाखेरीज कोण कुठे वापरतं?
"पंचविशी दोन" किंवा "दाहोदरसे" असं आरती पाठ असल्यासारखं म्हणता आलं की काय साध्य होईल?

आता मला वाटतं की मराठी आकडे "लॉजिकली" तार्किकदृष्ट्या एकामागून एक तयार करणं हे तितकं तार्किक नाही.
केवळ तर्काने बत्तीस नंतर किती येतील हे "म्हणणं" कठीण आहे.
पण जे काही येईल ते ३०+३ असेल - हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे.

मला वाटतं असे नवे प्रयोग मराठीत बिंदास व्हायला हवेत.
बत्तीस म्हणजे तीसदोन/दोनतीस - शिवाय पुस्तकातून बत्तीस काढून टाकलेलं नाही. एक जास्तीची पायरी म्हणून फोड केली आहे इतकंच.

------------------------
संस्कृत परत आणणं हे रोगापेक्षा इलाज भयंकर वाटतं. संस्कृत भाषा व्यवहारात वापरता येईल? मराठीच (जी एक प्रस्थापित बोली आहे) व्यवहारातून खलास होते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Thirty eight प्रमाणे तीस आठ असं ठरलं असेल तर
Thirty eighth मराठीत कसे बोलले जातील? “तीस आठवा”?
शिक्षकांनी थोडंसं संधी फोड करुन शिकवले की मुलांना पटकन कळेल.
उणे हा (वजा साठी) समानार्थी शब्द शिकवणे काही जास्त जड नाही.

संस्कृत भाषेचे फायदे बरेच आहेत. http://www.bori.ac.in/ नुसार संस्कृत computer software आणि artificial intelligence programming साठी उत्तम आहे. सरोजा भाटे आणि सुभाष कक यांचे १९९१ साली प्रसिद्ध झालेले संशोधनही हेच सांगते.
व्यवहारात ती वापरल्या जात होती, तर मग आता का नाही?

वीस सात सारखा बदल, इंग्लिश भाषेचे प्रमाण पुढे ठेऊन घेण्यात आला आहे असं वाटतं. कारण शिक्षकांना प्रचलित आकेडेवारी शिकवणे काही खूप अवघड काम नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संस्कृत भाषेचे फायदे बरेच आहेत. http://www.bori.ac.in/ नुसार संस्कृत computer software आणि artificial intelligence programming साठी उत्तम आहे. सरोजा भाटे आणि सुभाष कक यांचे १९९१ साली प्रसिद्ध झालेले संशोधनही हेच सांगते.

ह्याची लिंक मिळेल का? वाचायला आवडेल.
संस्कृत आणि सॉफ्टवेअरचा कसा काय संबंध ते कळत नाही- पण AIशी संबंधित काही १९९१ साली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने लिहिले असल्यास नक्कीच वाचायला आवडेल.
---------
३८ म्हणजे आठतीसवा (आडतिसवा -आडतीसवा) किंवा (तीस आठवा -तिसाठवा) असं म्हणता येईलही. कल्पना नाही म्हणायला हवं का ते.
आपण एकोणचाळीस (एक उणे चाळीस) म्हणतो म्हणून वजाऐवजी उणे म्हणायचं की आपण वजा म्हणतो म्हणून एकवजाचाळीस म्हणायचं? कल्पना नाही.
.
मला स्वत:ला मराठी आकडे म्हणण्यात काही फार फायदा आहे असं वाटत नाही, सवय म्हणून मराठीत म्हणतो.
(मला व्यवहारात पूर्ण मराठी वापरायला आवडेल, आणि तेव्हा आकडे मराठीतून शिकल्याचा फायदा होईल, पण तशी परिस्थिती आज नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.ece.lsu.edu/kak/bhate.pdf

https://scroll.in/article/750526/how-sanskrit-came-to-be-considered-the-most-suitable-language-for-computer-software

बदल करण्यापुर्वी हवे तितके संशोधन झालेले नाही असं वाटतं. आधी आपण शिकलोच ना? तीस आठवा म्हणताना “ “तीस संख्येची आठवण” असाही होउ शकतो. तसेच हा बदल मराठी पुरता मर्यादीत आहे का? हिंदी आणि इतर भाषेत असे बदल सुचवले आहेत का? सुरवात तीस आठ ने करुन अडतीस पर्यंत विद्यार्थ्यांना नेणे हे बहुतेक सोयीस्कर ठरेल आणि वेळही कमी लागेल. आणि यासाठीच बहुतेक दोन्ही पर्याय (जुना आणि नवा) पुस्तकात असणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@संस्कृत ->
तो पहिला पेपर वाचला. त्यात थोड्या ओढून ताणून शक्यता मांडल्या आहेत असं वाटलं. पण जास्त डिटेल्स मला समजले नाहीत.
कळलं ते असं - संस्कृत ही अतिशय नियमबद्ध भाषा असल्याने त्यात नियमानुसार रचना आहेत. ह्या नियमाधारित रचनेचा फायदा यंत्राला सूचना देताना होऊ शकतो. तेव्हा संस्कृत भाषेतून यंत्राला सूचना देण्यासाठी इतर नैसर्गिक मानवी भाषांपेक्षा कमी कष्ट लागतील.

पण ह्याचा अर्थ संस्कृत ही सॉफ्टवेअर साठी उत्तम भाषा आहे असा होत नाही. किंबहुना ह्या वाक्याला अर्थ नाही. सॉफ्टवेअरमधे अनेक भाषा आहेत आणि त्यांची स्वत:ची बलस्थानं आहेत.
C/C++ are good for low level efficient programming
C#, java are good for complex programs involving high layers of abstractions.
Python is good for scripting and quick-tasks.
R is good for data analysis, stats.

संस्कृत (जर काँप्युटरला सूचना द्यायला वापरता आली तर) कदाचित इतर मानवी भाषांपेक्षा सोपी असेल. लॅटिनही असावी. पण ह्याने काहीच साध्य होत नाही.

================

सुरवात तीस आठ ने करुन अडतीस पर्यंत विद्यार्थ्यांना नेणे हे बहुतेक सोयीस्कर ठरेल आणि वेळही कमी लागेल. आणि यासाठीच बहुतेक दोन्ही पर्याय (जुना आणि नवा) पुस्तकात असणार आहे.

मान्य आहे. हाच हेतू असावा.
मला तर हा पूर्ण प्रकार म्हणजे हातचलाखी वाटते. काहीतरी पिल्लू सोडून देऊन महत्त्वाचे आरक्षण वगैरे मुद्दे तिकडे पास करून घ्यायचे.
लोकल बंद पडोत, पाणी साचून लोकं मरोत, भिंती पडोत - आपण इथे वीस दोनवर जोक करत राहू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0