त्रिकथा २: आ दा पा दा

मी माधव डोळस उर्फ माध्या डोळस.

एक टाइम माझी पण थोडीशी हवा होती अंडरवर्ल्ड मध्ये.

शिवाय माझं नावही म्हणे २०-३० वर्षांपूर्वीच्या कोणत्यातरी नामचीन गुंडाशी मिळतं जुळतं होतं.

मला खरं तर आधी भारी वाटायचं हे सगळं.

डेअरिंग याहूम आपल्यात पहिल्यापासून.

केशूचा तर उजवा हात होतो मी... आणि डावा हात मदन्या.

पण केशूभाई म्हणायचाच, 'खरा जिगर माध्यातच आहे'

मदन्यात डेअरींगपेक्षा क्रौर्य जास्त होतं...

कुठे झुरळाला चटकेच दे, कुत्र्यांचे पायच बांध, आंधळ्या भिकाऱ्याला टपलीच मार असं काय काय करायला भारी आवडायचं त्याला.

त्यात मदन्यानं कुठूनतरी ती नार्कोझ सिरीज बघितली आणि केशूभाईला दाखवली.

त्यानंच केशूभाईच्या डोक्यात ते पुण्याचा पाब्लो एस्कोबार बनायचं भूत घातलं.

केशूभाई जास्तच खतरनाक जास्तच विकृत बनत चालला होता दिवसेंदिवस.

मला मात्र हळूहळू कंटाळा यायला लागला होता या सगळ्याचा.

त्यात त्या नदीवरच्या दंगली झाल्या दोन्ही जमातीतली शेकडो माणसं मेली.

मी कशात नव्हतो, पण एकदा केशूभाईला फोनवर आमदारबाईशी खुसपुसताना ऐकलं...

त्यानंच बाईच्या सांगण्यावरून दंगल भडकावलीय ह्याची जवळ जवळ खात्री होती मला.

मी मग जरा विचार करायला लागलो...

त्यात झिलिक पण प्रेग्नंट झाली आणि तिच्या पोटातली ती धडधड ऐकून वेगळंच कायतरी वाटायला लागलेलं.

धतिंग आणि खाणं, दोनच शौक होते आपले...

पण हळूहळू भाईगिरी सोडून द्यावीशी वाटायला लागलं होतं

खाण्यात मात्र पाणीपुरी फेव्हरीट!

आपला ठरलेला भैया पण होता पाणीपुरीवाला... गुप्ता!

चांगला होता बिचारा... गायीसारख्या मोठ्ठ्या पाणीदार डोळ्यांचा.

सेनापती बापट रोडवर त्याचा तो लाल अलवणातला लहानसा ठेला लावायचा.

कधीकधी बरोबर पोरगा असायचा.

त्याचीच छोटी कॉपी, तसेच पाणेरी डोळे...

गुप्ताच्या पाया-पायात घोटाळत... मांजराच्या पिल्लासारखा.

फारसं बोलायचा नाही तो...

मोठ्ठया डोळ्यांनी बघत मात्र रहायचा टुकूर टुकूर!

रोज न चुकता पाणीपुरी खायचो मी त्याच्याकडे.

अजब चव होती त्याच्या हाताला.

मुलायम रगडा, गोडूस चटणी, ठसकेदार पाणी, कुरकुरीत पुरी...

या सगळ्यांचे एकाचवेळी एकत्र आणि स्वतंत्र उत्सव चालायचे..,

माझ्या जिभेवर, घशात, गालांत, ओठावर, पोटात, छातीत, मेंदूत.

त्यादिवशी सुद्धा...

खरं तर माझी सगळी सेटींग झाली होती.

पुण्यातला माझा शेवटचा दिवस होता तो.

केशूभाईच्या फोनमधली ती दंगलीच्या संभाषणाची रेकॉर्डिंग मी सुमडीत माझ्या फोनवर घेतली आणि केंजळे सायबांना पाठवली.

आता इकडे केशू, मदन्या आणि त्या आमदार बाई बाराच्या भावात

आणि आम्ही तिकडे क्राईम ब्रँचच्या खबरी फंडातून केंजळसायबांनी दिलेले दीडलाख घेऊन कोलकात्याला छू.

मग कदाचीत कोलकात्याला बुर्जी पावची गाडी टाकली असती.

पण तिकडे लोक खातात तरी का आपल्यासारखे बुर्जीपाव? कोण जाणे??

का गुप्तालाच घेऊन जावा आणि पाणीपुरी टाकावी?

काय बरं म्हणतात तिकडे पाणीपुरीला?

पुचका वाटते.

गुप्तावरून मला पाणीपुरी आठवली त्याची.

मी घड्याळ बघितलं.

माझा पाणीपुरीचा टाइम झालेला.

बरोब्बर साडेतीन तास होते केंजळे सायबांना भेटायला.

त्यांना भेटून पैशांचं पाकीट घेतलं की डायरेक् स्टेशनवर.

झिलिक कामावरून परस्पर तिकडेच येणार होती.

मग १० च्या लातूर हावरा एक्सप्रेसनी कलटेश!

डायरेक कोलकाता.

तिकडे झिलिकचा भाऊ होताच.

माझ्या डोक्यात कीडा वळवळला...

पाणीपुरीची तलफ आली.

तसाही आज शेवटचा दिवस पुण्यातला.

नाही म्हटलं तरी हुरहूर लागलेली.

पण नको जाऊदे तिच्यायला आज पोटपण खराब होतं...

सकाळपासून ढाम-ढूम चालू होतं.

ते सुद्धा नुसतं 'झागवालं' नव्हे तर डेंजर वासवालं.

माझ्याच नाकातले केस करपायची पाळी आली होती.

झिलिकनं जाताजाता धमकी दिली होती...

जाताना डब्यात प्रदूषण केलंस तर चालत्या ट्रेनमधून फेकून देईन म्हणून... ह्या ह्या ह्या!

जाऊ दे नको जायला आज...

दहाव्या मिंटाला गुप्ताकडे होतो मी Smile

एक एक पाणीपुरी मन लावून खाल्ली मी.

ह्या शहराची शेवटची चव साठवून घेतली.

गुप्ताला पैसे दिले, छोटूला टाटा केला तेवढ्यात गुप्तानी मसाला पुरी पुढे केली.

हो म्हणजे चाटनंतरची कडक पुरीवर बटाटा, मसाला आणि शेव टाकलेली फ्री पुरी हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे.

कोलकात्यात अशी फ्री पुरी देतात का?

मला उगीचच सेंटी वाटलं,

मी पुरी तोंडात कोंबली...

...

...

...

तितक्यात केशूभाई आणि मदन्या बुलेटवरून फुदफुदत आले.

दोघांची नजर बघून मला चर्र झालं.

केशूभाई सरळ माझ्याकडे आला,

"तुझा फोन लागत नाय."

(मी सिम फेकून नवीन घेतलं होतं.)

"बॅटरी ऑफ आहे केशूभाई."

केशूभाईनी दोन क्षण रोखून बघितलं...

बुलेट साईडला लावली...

आणि अंगावर धावला... गुप्ताच्या.

त्यानं फाडकन गुप्ताच्या कानफडात मारली.

पाठून मदन्यानी त्याचा पाण्याचा मटका उचलून खाली आपटला.

रस्त्यावर तिखट शेवाळी पाणी पसरत गेलं.

गुप्ता हेलपांडत होता.

पोरगा मात्र त्याच्या पायाला चिकटूनच होता.

मला कळेनाच क्षणभर की गुप्ताला का मारतायत ते... सालस माणूस होता तो.

मी मदन्याला ढकलून दिलं आणि केशूभाईला आवरायची धडपड करायला लागलो...

"जाऊ दे ना केशूभाय, काय झालं?"

"अरे माध्या मार भेंचोत...

हे भय्या लोक...

तिकडे ठाण्यात एक भय्या पाणीपुरीच्या मटक्यात मुततोय, बघितला नाय काय व्हिडीओ व्हाट्सअप वर...

यांना सगळ्यांना सरळ केला पायजे... #$$%"

मला केशूभाई आवरत नव्हता.

खरंतर तिकडे ठाण्यात कोणीतरी कायतरी केलं म्हणून इकडे बिचाऱ्या गुप्ताला मारण्यातलं लॉजिक काय कळत नव्हतं,

पण आपण सगळेच दिवसेंदिवस जास्तच येड्या गांडीचे होत चाललो होतो...

तितक्यात मदन्यानं कुठूनतरी एक प्लास्टिकची बाटली काढली... आतमध्ये सोनेरी पिवळट लिक्विड हिंदकळत होतं.

मला काही कळायच्या आतच त्यानं ती बाटली गुप्ताच्या तोंडात खुपसली...

"पी मूत आयघाल्या"

खदाखदा हसत होता मदन्या...

गुप्ता घाबराघुबरा होत ठसकला!

मी केशूभाईला सोडून गुप्ताकडे धावलो...

मदन्यानं तेवढ्यात पोराला खस्स्कन ओढला आणि त्याच्या तोंडात तो बाटली खुपसणार...

इतक्यात मी मदन्याच्या बरगडीत एक लाथ घातली...

तो हेलपांडून खाली पडला!

माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसांनी रागाचा एक दाट लालसर ढग तयार होत होता...

असा ढग तयार झाला की खूप शांत वाटायचं मला... शांत आणि तल्लख आणि फाष्ट.

पुढच्याच २० सेकंदात मी खाली पडलेल्या मदन्याला पार फोडून टाकला.

त्याच्या चेहेऱ्याच्या जागी रक्तामांसाचा चिखल राह्यला होता फक्त!

हळूहळू माझा राग ओसरला आणि मग मला कळलं काय लोचा करून ठेवला होता मी ते.

जायच्या आधी ह्या लफड्यात पडायलाच नको पायजेल होतं... पण गुप्ताच्या पोराचे ते मोठ्ठे डोळे नाचत राह्यले असते डोक्यात मध्ये पडलो नसतो तर.

मी हळूच पाठी वळलो...

केशूभाई कोणाशीतरी फोनवर बोलत होता.

... पळून जावं का?

तीन तास काढून डायरेक्ट झिलिकला स्टेशनावर बोलावता येईल.

हळूहळू गर्दी जमायला लागली होती.

तेवढ्यात केशूभाई लगबगीनं जवळ आला.

"चल इकडून लवकर आधी... मदन्याला आपली पोरं उचलतील नंतर येऊन"

त्यानं बुलेट काढली.

मी नाईलाजानं पाठी बसलो.

इकडून लवकर छू होणं पण जरुरी होतं.

जाता जाता ते पोलीस-बिलिसचं लफडं मला नको होतं.

केंजळेसायबांनी सांभाळूनही घेतलं असतं पण वेळ गेला असता.

मला आता १० ची गाडी दिसत होती.

माझी घालमेल घालमेल.

कशाला ती पाणीपुरी खायला गेलो आणि झवती माकडं अंगावर घेतली असं वाटायला लागलं.

आमची बुलेट गोखलेनगरच्या चौकातून लेफ्ट मारून दीप बंगला चौकाकडे सुसाट चालली होती.

पण हा सगळा केशूभाईचा एरिया होता.

मला सेफ वाटेना.

मी हळूच आजूबाजूला बघायला लागलो.

कुठे काय दांडू-बिंडू दिसला तर सरळ केशूभाईच्या डोक्यात घालून बुलेट घेऊन पशार व्हायचं शिजायला लागलं... माझ्या डोक्यात.

दीप बंगला चौकात नेहेमीप्रमाणे गाड्यांचा कल्ला झालेला.

मला बाजूच्या भंगाराच्या हातगाडीवर रॉड दिसला एक.

मी हळूच तिकडे हात सरकवणार...

तितक्यात बाजूच्या बाइकवाल्यानं माझ्या डोक्यात फाडकन हेल्मेट मारलं आणि सगळा काळोख झाला.

...

...

...

मी हळूच डोळे किलकिले केले.

एका गाडीच्या आत होतो मी.

बहुतेक केशूभाईची वॅगन-आर

पुढे ड्रायव्हिंग सीटवर संत्या होता.

बाजूला केशूभाई.

मागे माझ्या बाजूला सनी.

हात गच्च बांधले होते माझे आणि डोकं घणघणत होतं.

सनीला कळलं मला शुद्ध आल्याचं... फाडकन माझ्या कानशिलात बसली.

ओठात खारट रक्त जमा झालं.

केशूभाईनी पाठी बघितलं आणि पाब्लो-बिब्लोसारखा टेरर लुक द्यायचा प्रयत्न केला.

मला तशाही स्थितीत हसू यायला लागलं.

अजून एक ठाप्पकन बसली मला.

केशूभाईनी माझ्यापुढे रिझर्वेशन नाचवलं हावरा एक्सप्रेसचं.

मला डोकं आपटून घ्यावंसं वाटायला लागलं.

तरी झिलू सांगत होती ऑनलाईन मेसेज आलाय त्या कागदाची काय जरूर नाय म्हणून.

पण मी आपलं सेफ्टी म्हणून खिशात ठेवला होता प्रिंट-आऊट.

तोच पडला असणार खिशातून, मघाशी मारामारीत.

"काय भावड्या आम्हाला न सांगता पळून चाललाय अचानक?

काय गेम काय्ये?

आमची काय टीप-बीप देतो का काय?

रिक्षा पण विकतायत म्हणे तुमच्या मिसेस?"

परत थाड-थाड दोन बसल्या.

माझा फोन केशूच्या ताब्यात होता आणि तो उघडायचा प्रयत्न करत होता.

मी हळूच बाहेर नजर टाकली रस्त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला.

कुठेतरी भोर गावाचा बोर्ड ओझरता दिसला.

आणि माझी ट्यूब पेटली आम्ही वरंधा घाटातल्या केशूच्या फार्म-हाऊस वर चाललो होतो.

म्हणजे मी जवळ जवळ दोन-अडीच तास आऊट होतो.

किती वाजले असतील साडे-नऊ दहा?

ट्रेन गेली असेल.

दोनतीनदा वाजलासुद्धा फोन... झिलू असणार.

वाट बघून ती रडवेली झाली असेल.

मला लहान मुलासारखं मोठ्ठ्यानं भोकाड पसरावसं वाटलं.

केशूनी त्याची माणसं हाल हाल करून मारून टाकणार मला त्या निर्जन जागी.

कसलं कोलकाता नी कसलं काय. कुठून त्या गुप्ताच्या लफड्यात पडलो असं झालं मला.

मी गळून बघत राह्यलो काळ्या काचेतून बाहेर.

गाडी आता घाटात पोचली होती.

संत्याचं ड्रायव्हिंग म्हणजे सुसाट.

माझा खास दोस्त खरं तर संत्या... मीच लावलेला त्याला केशूकडे.

पण आज मला कापताना तो पाठी पुढे बघणार नाही याची गॅरंटी होती.

"पासवर्ड सांग रे भोसड्या", केशू खेकसला.

तितक्यात गाडीनं एक सफाईदार वळण घेतलं...आणि माझ्या पोटात गुरगुरलं.

खराब पोट विसरूनच गेलो होतो मी

का का का खाल्ली मी पाणीपुरी?....

मला फुस्सकन पादायला आलं...

ढुसकीचा गंध गाडीभर दरवळला...

दोन सेकन्दात सगळ्यांची नाकं वाकडी झाली.

"कोण रे तो आयघाल्या?"

केशूभाईनं शिव्या हासडत गाडीच्या काचा खाली केल्या,

रानटी चाफ्याचा घमघमाट आत आला...

घाटात कुठेतरी फुलला असणार...

संत्या ठसाठस शिंकायला लागला... हो लहानपणापासून त्याला चाफ्याची ऍलर्जी होती.

एक सेकंद त्याचं लक्ष ढळलं...

समोर शार्प टर्न आला...

आणि मी जीव खाऊन हॅन्डब्रेक खेचला.

गाडी गर्र्कन फिरली आणि कठडा सोडून खाली उतरली.

पंधरा-वीस फूट खाली रस्त्याला लागूनच थोडं पठार होतं गाडीनं तिथं पहिली कोलांटी मारली आणि मी दरवाज्यातून बाहेर फेकलो गेलो.

कशावर तरी थाड्कन डोकं आपटलं माझं.

गाडीनं तशीच दुसरी कोलांटी मारली आणि गाडी पठार सोडून खालच्या खोल दरीत गेली

एक पाच सेकंदांनंतर ढूमक्कन स्फोटाचा आवाज आला.

जाळाचा प्रकाश वरपर्यंत आला आणि त्या क्षणमात्र प्रकाशात मला दोन गोष्टी धूसर दिसल्या:

एक म्हणजे माझा फोन.

केशूच्या हातातून उडाला असणार बहुतेक गाडी पलटली तेव्हा.

आणि... दुसरं...

...

...

...

मी पुन्हा बेशुद्ध झालो...

पुन्हा शुद्धीवर आलो...

बाजूला कुठेतरी माझा फोन वाजत होता.

मी डोळे उघडून शोधला

पण किर्र अंधार होता.

फोन एकसारखा टिरटिरत होता.

लाईट खरं तर दिसायला हवा होता फोनचा पण कायतरीच गच्च अंधार होता.

मी कसातरी अंदाजानी शोधून फोन घेतला...

फोन वाजत होता पण मला कॉल घ्यायचं बटण दिसेचना च्यायची...

आणि तेव्हा माझी ट्यूब पेटली मला दिसायचं बंद झालं होतं!

मी अंदाजाने स्वाईप मारलं आणि फोन कट झाला.

पुन्हा आला...

आता उलटीकडे स्वाईप केलं.

लागला... नशीब!

झिलिकचाच फोन होता.

मला शोधून शोधून भैसाटली होती ती.

तिला कसंबसं शांत केलं,

गाडी उलटायच्या आधी मी "न्हिवे" ५ कि. मी. चा दगड बघितला होता ते तिला समजावून सांगितलं.

तिनी लगेच रिक्षा काढली हो म्हणजे पुण्यात "सखी-रिक्षा" चालवायची ती...

आणि मग स्वतःशीच हसत-रडत डोळ्यापुढची काळीशार शाई बघत शांतपणे पडून राह्यलो.

आज तीस वर्षं झाली या सगळ्या गोष्टीला...

कोलकात्यात कधीच कुणालाच माझी बॅक-ष्टोरी नाय सांगितली...

पण आज "ऑनलाईन ब्रेल पुणे टाइम्स"मध्ये बातमी वाचली मदन्याविषयीची आणि हे सगळं कुणालातरी सांगावंसं वाटलं.

त्यावेळी आमदारबाईंना शिक्षा झालीच माझ्या क्लिपच्या पुराव्यावर

केशूभाई मेलाच जळून त्या कारच्या स्फोटात.

मदन्या मात्र सुटला संभाषणात त्याचं नाव स्पष्ट नव्हतं म्हणे.

मग काय मेलेल्या केशूभाईची जागा मदन्यानं लगेच घेतली.

मदन्या एवढा मोठा होईल वाटलं नव्हतं पण आपल्याकडे जात-जमात-धर्म-प्रदेशाच्या नावावर मोठं होणं तसंही कुठं अवघड आहे म्हणा.

पण आजची बातमी वाचून जीवाला बरं वाटलं...

काय म्हणालात?

मला स्फोटाच्या प्रकाशात दोन गोष्टी दिसल्या आणि मी एकच सांगितली? (माझा फोन)

हा बघा खरा सुज्ञ वाचक वगैरे. मानलं राव तुम्हाला -/\-

हां तर झिलिक दोन तासांनी पहाटे मला घ्यायला आली तेव्हा मला (डोळे जाण्याआधी) दिसलेली दुसरी गोष्ट आम्ही रिक्षात टाकली...

ती म्हणजे अडीच करोड रुपये भरलेली पैशाची बॅग.

ते नोटबंदीचे दिवस होते आणि केशूनी कुठूनतरी जुन्या नोटा बदलून आणली असणार ती कॅश.

पहाटेच्या गाडीनी आम्ही डायरेक कोलकाता!

आणि कोलकाता तशी फार स्वस्त सिटी आहे बरं का!

अडीच करोड + दीड लाख रुपये आम्हाला आरामात पुरले,

बुर्जीपावची गाडी टाकायला...

माझ्या पोराला, नयन त्याचं नाव, शिकून मोठ्ठा डोळ्यांचा डॉक्टर बनवायला...

दुसऱ्या एका अनाथ पोराचा शिक्षणाचा खर्च उचलायला...

वगैरे वगैरे...

आणि आता तर नयननी हौस म्हणून हॉटेल पण टाकलंय...

काय बरं त्याचं नाव...

हां आठवलं...

अंधाराची ^खरी चव

-नील आर्ते

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

च्यायला लयीच भारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे एक नंबर लिव्हताव राव तुम्ही.
भारीच्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार आचरटबाबा, अभ्या:

हा प्रयत्न आहे तीन कथा लिहायचा...

वेगवेगळ्या पण तरीही एकमेकांना सैलसर जोडलेल्या.

"लव्ह सेक्स और धोखा" सारख्या किंवा "डेव्हिड" सारख्या

त्यातली ही दुसरी कथा

पहिली इथे: अंधाराची ^खरी चव

(तिसरी लवकरच टाकेन.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरारारारा! खतरनाक! लै भारी ल्हेता ओ भाई. आजपसून आपन तुमचे फॅन हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार जुवि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त!! अंधाधून आठवला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मुठभर मास वगैरे...
अन्धाधुन जाम आवडता आहे.

सशाच योगदान... टू गुड

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मारिओ पुझो ( जो काय उच्चार असेल तो) याने म्हणे खरा डॉन पाहिला नव्हता. पण माफिया /प्यारेलेल अनडरवल्ड मध्ये वाव भरपूर आहे म्हणायचा. बाकी त्याच्या फोटोतल्या चेहऱ्याकडे पाहून हा मनुक्ष असले गाडफादरवगैरे इतके स्फोटक व्यंग्योक्तीपूर्ण लिहितो असं वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण आज "ऑनलाईन ब्रेल पुणे टाइम्स"मध्ये बातमी वाचली मदन्याविषयीची

बातमी फोटोसकट छापून आली होती काय? 'ऑनलाईन ब्रेल'मध्ये?

==========

बायदवे, जेलर पिच्चर पाहिला होतात काय कधी? त्यात लताबाईचे 'हम प्यार में जलने वालों को' गाणे होते ते? (तेवढे एकच) गाणे सुंदर होते, पण (बाकीची गाणी आणि) ष्टोरी भिकार होती ती? सांगण्याचा मतलब, गाडीचा ॲक्सिडेंट होऊन माणसाची दृष्टी जाणे ही थीम तशी बरीच जुनी आहे. ती वापरलीत, हरकत नाही, परंतु प्रोटोकॉल चुकलात राव! प्रथेनुसार, अपघातात ज्याची दृष्टी जाते असा गृहस्थ, अपघातापूर्वी (१) कितीही मवाली, हलकट, दुसऱ्याच्या बायकोबरोबर लफडी करणारा, किंवा तत्सम असला, तरीही, आणि (२) मुख्य म्हणजे, कितीही अपटुडेट, सुटाबुटातला, गर्भश्रीमंत असला, तरीही, अपघातात दृष्टी गमावल्यानंतर, (१) त्याचे हृदयपरिवर्तन होते, आणि, (२) तो कफल्लकासारखे कपडे घालून भिकाऱ्यांची गाणी म्हणत रस्त्यातून हिंडू लागतो. (खास करून एखाद्या नाचणाऱ्या बाईचा प्रोग्राम जर कुठे चालू असेल, तर आपले प्रसंगविसंगत गाणे म्हणत रंगभंग करायला हा तिथे कडमडलाच पाहिजे. प्रस्तुत व्हिडियोत साधारणतः ३:०७च्या सुमारास गृहस्थाची एंट्री पाहा. अर्थात, संपूर्ण गाणे पाहिलेत तरीही हरकत नाही म्हणा. म्हणजे, दिसत असले, तर. दुर्दैवाने या व्हिडियोची ब्रेल-एन्कोडेड आवृत्ती उपलब्ध असल्यास सापडली नाही. पण ते असो.)

तर, हे सगळे पुराण एवढ्याकरिता, की जनरीत ही अशी असताना, खुद्द सोहराब मोदींसारख्या दिग्गज थोरामोठ्यांनी परिपाठ घालून दिलेला असताना, हे हो काय भलतेच लिहून बसलात? ष्टोरीलाइन बदला! रेल्वेतल्या भिकाऱ्यांची जी कुठली कंटेंपररी गाणी असतील चालू जमान्यात - आमच्या जमान्यात 'खै के पान बनौरस वाला' असायचे, नाही तर 'केसेवा माड्येवा' सदाबहार - ती गाणी 'लातूर हावरा एक्स्प्रेस'मध्ये म्हणायला लावा तुमच्या माधवरावांना!

==========

आणि हो, लातूरहून हावड़्याला जाणारी ट्रेन पुण्यात कशाला कडमडेल? (मुळात लातूरहून हावड़्याला जाणारी डायरेक्ट ट्रेन कोणती, हा प्रश्न येथे उपस्थित करत नाही.) त्यापेक्षा, (गायपजामा संस्थानातली) सीथ्रू-जामजा पाशिंजर चालली नसती काय?

==========

पाणीपुरीच्या मडक्यात भय्या (ॲलेजेडली) मुतणे आणि नोटबंदी या सीक्वेन्समधला ॲनाक्रॉनिझम कैच्याकैच आहे. भय्याच्या तथाकथित प्रसंगाच्या नजीकच्या भविष्यकाळात नोटबंदी घडली नाही. ती बरीच नंतर घडली. भय्या प्रसंग मनमोहनसिंगांच्या कारकीर्दीतला. नोटबंदी आणली मोदींनी. उगाच काहीतरी, झाले.

उद्या अफझलखानाच्या पोटात झाशीच्या राणीने वाघनखे खुपसली म्हणाल. असल्या ष्टोऱ्या वाचल्या, की इतिहासाबद्दल काळजी वाटू लागते.

==========

थोडक्यात मला तुमची मॉरल ऑफ द ष्टोरी एवढीच जाणवली, की तुमच्या या माधवरावाने पोट बिघडलेले असतानासुद्धा पाणीपुऱ्या खा-खा-खाल्ल्या, नि मग नंतर कधीतरी घाण पादला. हे (तुम्हांस) रोचक, मनोरंजक नि उद्बोधक (वाटणारे) शुभवर्तमान येथील समस्तांपर्यंत पोहोचविण्याकरिता (तसेच, आयघाल्या, भोसड्या, झवती माकडे अंगावर घेणे, यांसारखे वाक्प्रचार बिनदिक्कतपणे वापरण्याची हाताची खुमखुमी जिरविण्याकरिता) निमित्तमात्र म्हणून उर्वरित कथेचा हा सर्व फापटपसारा तथा डोलारा आहे. चालायचेच.

(ते वाक्प्रचारसुद्धा अचूकपणे वापरण्याची काळजी घेतलेली नाही. अंगावर घेतात, ती झवती गाढवे; झवती माकडे नव्हेत. फॉर ऑबव्हियस रीझन्स - पाहा विचार करून. पण जाऊ द्या. आजकालची तरुणाई आहे; ढिसाळपणा हा चालायचाच. असो.)

==========

थोडक्यात, कथा भिकार आहे, हे वेगळे सांगणे नलगे.

इतःपर, अंधकथा लिहायचीच झाली, तर चांगली अंधकथा कशाशी खातात, याची चुणूक म्हणून रस्किन बाँडची 'द आइज़ हॅव इट' (उपाख्य 'द आइज़ आर नॉट हियर' किंवा 'द गर्ल ऑन द ट्रेन') वाचून पाहाच, एवढेच सुचवू इच्छितो.

पुढील लेखनास शुभेच्छा. (असे लिहायची प्रथा आहे, म्हणून.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

फिक्शन नामक पदार्थ खाताना तो आपल्याला माहिती असलेल्या पाककृतीप्रमाणेच बनवला जावा- अशी मागणी करणारे वाचक कितीही खवय्ये असले तरी ते वाचकच!
म्हणजे उ.दा जगात पाणिपुरीत मुतायचे पाणी घालणारा एकमेव भैय्या हा मनमोहन सिंगांच्याच काळात होता हे बोले तो तुम्हास नेमके कसे ठाऊक? असो.

ब्रेलचा मुद्दा घेऊन तुम्ही प्रतिक्रियेची जी उंची गाठली होती ती पुढे राहिली नाही... असो, चालायचेच Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लातूर हावडा एक्सप्रेस व्हाया पुणे तेव्हा मी कन्फर्म केली होती आता मात्र दिसत नाहीये बघतो त्याचं काय करायचं ते.

अस्वल म्हणाल्याप्रमाणे व्हॉट्सॅपवर काहीतरी वायरल होण्याचा प्रसंग दुर्दैवाने कधीही घडू शकतो. त्यामुळे त्याची क्रोनोलॉजी मागेपुढे करण्याचे स्वातंत्र्य घेतलंय.
गाढवांच माहिती आहे पण मला माकडच लिहूशी वाटलं... (परत लेखन स्वातंत्र्य वगैरे)
आणि ब्रेल-पेपरात फोटो कशाला? मदनच्या पूर्ण नावानी कळेलच की

जे न देखे न'वी ते देखे कवी Smile
बाकी कथा आवडण्या न आवडण्याचा तुमचा हक्क मान्यच,
आणि मला आवडेल ते लिहिण्याचा माझा हक्क सुद्धा!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालक,

१. त्या पानावर, पुण्याहून कोलकात्याला जाण्याकरिता उपलब्ध असलेल्या (थेट किंवा बदलून) गाड्यांची परम्यूटेशने/काँबिनेशने दिलेली आहेत.
२. थेट नसलेल्या गाड्यांची परम्यूटेशने/काँबिनेशने बहुधा तुमच्याआमच्यासारख्या पब्लिकने सुचविलेली आहेत (ΣChain या नावाने), आणि त्यांना काय वाट्टेल ती, मनाला येतील तशी नावे दिलेली आहेत.
३. थेट गाड्यांपैकी एकीचाही लातूरशी काहीही संबंध नाही.
४. थेट नसलेल्या काँबिनेशनांपैकी ज्यांचा दूरान्वयानेदेखील लातूरशी संबंध आहे, अशी काँबिनेशने चार:
- ४अ. पुणे-अमरावती एक्स्प्रेसने पुण्याहून अकोल्यापर्यंत; अकोल्याहून पुढे गीतांजली एक्स्पेसने हावड्यापर्यंत. यात पुणे-अकोला स्ट्रेचवर लातूर स्टेशन येते. या काँबिनेशनला ते साइटवर चढविणाऱ्या गाढवाने ('Pratap~') '13725/Σ Latur to Howrah ΣChain' असे नाव दिलेले आहे. बहुधा आपला रोख याकडे असावा.
- ४ब. पुणे-हैदराबाद एक्स्प्रेसने पुण्याहून हैदराबादपर्यंत; मग तेथून सिकंदराबादेस जाऊन मग सिकंदराबाद-गुवाहाटी सुपरफास्ट एक्स्प्रेसने सिकंदराबादेहून हावड्यापर्यंत. यात पुणे-हैदराबाद स्ट्रेचवर लातूर येते. या काँबिनेशनला ते साइटवर चढविणाऱ्या गाढवाने ('Dinesh Gada') '20037/Σ Bidar Guwahati Weekly Express ΣChain' असे नाव दिलेले आहे. (बिदर हे पुणे-हैदराबाद स्ट्रेचवर येते.)
- ४क. पुणे-अमरावती एक्स्प्रेसने पुण्याहून बडनेऱ्यापर्यंत; बडनेऱ्याहून पुढे अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्स्पेसने हावड्यापर्यंत. यात पुणे-बडनेरा स्ट्रेचवर लातूर स्टेशन येते. या काँबिनेशनला ते साइटवर चढविणाऱ्या गाढवाने ('09029 Surat UDN GAYA Humsafar AC Express 09030^~') '21501/Σ Pune- Tatanagar(Jamshedpur) [Catch 2nd train 12833/Ahmedabad-HWH at Badnera, Maharastra] ΣChain' असे नाव दिलेले आहे. (टाटानगर हे बडनेरा-हावडा स्ट्रेचवर येते.)
- ४ड. पुणे-अमरावती एक्स्प्रेसने पुण्याहून अकोल्यापर्यंत; अकोल्याहून पुढे साईनगर शिर्डी-हावडा सुपरफास्ट एक्स्पेसने हावड्यापर्यंत. यात पुणे-अकोला स्ट्रेचवर लातूर स्टेशन येते. या काँबिनेशनला ते साइटवर चढविणाऱ्या गाढवाने ('09029 Surat UDN GAYA Humsafar AC Express 09030^~') '21502/Σ Pune- Tatanagar(Jamshedpur) [Catch 2nd train 22893/Shirdi-HWH at Akola, Maharastra] ΣChain' असे नाव दिलेले आहे. (टाटानगर हे अकोला-हावडा स्ट्रेचवर येते.)

यावरून असे लक्षात येते की:

१. लातूरहून हावड्याला पुण्यामार्गे (= लातूर हावडा एक्स्प्रेस व्हाया पुणे) जाणारी एकही गाडी (अथवा गाड्यांचे काँबिनेशन) नाही. (स्टँड्ज़ टू रीझन.)
२. उलटपक्षी, पुण्याहून हावड्याला लातूरमार्गे जाणारी काही काँबिनेशने आहेत. (थेट गाड्या नाहीतच; त्यामुळे 'समथिंग समथिंग एक्स्प्रेस व्हाया समथिंग' असे नाव एकाच गाडीला द्यायचा प्रश्न उद्भवत नाही.)
३. समजा, काँबिनेशनला जरी नाव द्यायचे झाले, तरी त्यास 'लातूर हावडा एक्स्प्रेस व्हाया पुणे' म्हणता येणार नाही. 'पुणे हावडा एक्स्प्रेस व्हाया लातूर' म्हणावे लागेल फार तर. (पण गाड्यांच्या काँबिनेशनांना नाव देण्याची पद्धत तशीही नाहीच.)

मॉरल ऑफ द ष्टोरी:
१. 'लातूर हावरा एक्स्प्रेस' असे (पुण्यातून जाणारे) काहीही नाही.
२. वाचायला शिका. दुसऱ्या साईटवर गाड्यांची माहिती चढवणाऱ्यांने (त्याला नावे देताना) काही गाढवपणा केला, म्हणून डोळे झाकून तो गाढवपणा आपणही केलाच पाहिजे, असे काही बंधन नाही.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

बाकी कथा आवडण्या न आवडण्याचा तुमचा हक्क मान्यच,
आणि मला आवडेल ते लिहिण्याचा माझा हक्क सुद्धा!

ष्टोरी कशीही (ॲज़ इन, भिकार) असो. मात्र, ही ॲटिट्यूड आवडली.

----------

अस्वल म्हणाल्याप्रमाणे व्हॉट्सॅपवर काहीतरी वायरल होण्याचा प्रसंग दुर्दैवाने कधीही घडू शकतो. त्यामुळे त्याची क्रोनोलॉजी मागेपुढे करण्याचे स्वातंत्र्य घेतलंय.

हो, पण... किती मागेपुढे?

आणि ब्रेल-पेपरात फोटो कशाला? मदनच्या पूर्ण नावानी कळेलच की

हो, पण... ऑनलाइन पेपर जर ब्रेलमध्ये असू शकतो, तर त्या बातमीबरोबर (ब्रेलमध्ये (!)) फोटोसुद्धा आला असता, तर त्याचा पिझ्झाझ वाढला नसता काय?

गाढवांच माहिती आहे पण मला माकडच लिहूशी वाटलं... (परत लेखन स्वातंत्र्य वगैरे)

हो, ते (बोले तो, लेखनस्वातंत्र्य वगैरे) ठीक आहे, पण...माकडांची बदनामी थांबवा!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोघांच्या प्रतिसादांतून एकच सांगायचेय की तपशिलाकडे लक्ष ठेवा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदापादा ठिक पण दामाजीचा घोडा हावडा ब्रिजवर पुढच्या भागात झिलकीबरोबर सेल्फि?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लवकरच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे सुद्धा चुकलय -पोट बिघडलेले असतानासुद्धा पाणीपुऱ्या खा-खा-खाल्ल्या
पाणी पुरीचे पाणी अतीशय पाचक असते. पोट बिघडल्यावरचे आहार-औषध म्हणता येईल इतके.
कांदा भजी टाका. ही बरीचदा कच्ची असल्याने ट्रेक सुरू करतानाच खाल्ल्याने ट्रेकरांना गड सोडावा लागला आहे.

गोष्टीचा आराखडा चांगला आहे आणि वाचताना तिकडेच लक्ष दिले. गाड्यांचा अभ्यासही केलात हे आवडलं. दिलेली साइट ओपरा ब्राउजरची होती आणि फक्त तीच माझ्या फोनमध्ये चालत असल्याने वापरायचो. 'सिग्मा' चिन्हाच्या गाड्या म्हणजे थेट गाडी नसल्यास कुठे जाऊन बदलता येईल हे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कांदा भजी कच्ची कशी असतात ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"अहो अन्नपूर्णाबाई
तुमचा स्वयंपाक किती बरवा
आतुनी राहतो हिरवा।

- अन्नाला नावे ठेवू नयेत पण घशाखाली उतरेना. "- गोनिदा, दक्षिणवारा पुस्तकातून .
तर शिजवलेललं अन्न कच्चच नव्हे तर हिरवंसुद्धा असतं.
मलयालममध्ये पच्चमायि ( पच्च = हिरवं). एकदा ट्रेनमध्ये*१ रत्नागिरीहून आउटसोर्स केलेला नाश्ता आला. पोहे. उपमा इत्यादी. उपम्याचा रवा चांगला न भाजता केवळ गरम पाण्यात हलवून आणलेला. शेजारच्या मल्लुने ठेकेदाराला बोलावले "इ उपमा पच्चमायि~~" असं काही सांगितलं.

#१ - टिळक टर्मिनस ते कोशुवेली गरीबरथ गाडीला pantry car नसते. केटरिंगचा ठेकेदार गाडीत असतो. ओर्डर घेऊन पुढच्या स्टेशनाच्या हॅाटेलवाल्याकडून फोन करून मागवतो. तो तेवढा माल क्रेटात चढवतो. उडपि, पनवेल स्टेशनांत चांगला अनुभव होता. रत्नागिरीच्या काकुंनी करामत केलेली.
जरा अवांतर झालं वाटेल पण मर्डर ओन ओरिएंटल एक्सप्रेसमध्ये अगाथा बाइंनी रेकि करून तपशिल खिळे मारून पक्के केलेले पाहता डोळ्यांतून पाणी येतं.

अमचे नबा भूमिती शिकवायचे त्यामुळे त्यांना सिद्धता सरळ कोनात लागते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपमा पच्चमायि~~

कसली हसतेय!! ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

ऑनलाइन ब्रेल वाचण्यासाठी टचस्क्रीन लागत असावा काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0