Lyrics

तेरे नूर के दस्तूर में न हो सलवटें न शिकन रहे मेरी कोशिशें तो है बस यहीं रहे खुशबूएं गुलशन रहे तेरी ज़ुल्फ़ सुलझाने चला तेरे और पास आने चला
"सत्यमेव जयते " च्या टायटल सॉंग मधील वरील ओळी ऐकतांना आपण काहितरी युनिक ऐकतो आहे हे जाणवले आणि मी शोधु लागलो हे कोणी लिहिलय ? नाव कळलं प्रसुन जोशी
मग मी त्याच्यावर लक्ष ठेऊ लागलो. सत्यमेव हे गाणं सुद्धा सुंदर अर्थपुर्ण ओळींनी भरलेलं आहे

मुझे खुद को भी है टटोलना कहीं है कमी तो है बोलना कहीं दाग हैं तो छुपायें क्यों हम सच से नज़रें हटायें क्यों
मला प्रसुन च्या इतक्या साध्या सरळ सोप्या शब्दांना इतकी तेज धार देण्याचं कसब फ़ार आवडलं. रंग दे बसंती च्या गाण्यातील या ओळी बघा साधेच शब्द आहेत (सीधी सी बात ना मिर्च मसाला सारखं)
आंधियो से झगड रही है लौ मेरी, अब मशालो सी बढ रही है लौ मेरी,
नामो निशॉ रहे ना रहे, ये कारवॉ रहे ना रहे, उजाले मै पी गया, क्यो सहते रहे
रु-ब-रु रोशनी है
धुऑ छ्टा खुला गगन मेरा नयी डगर नया सफ़र मेरा जो बन सके तु हमसफ़र मेरा
रु-ब-रु रोशनी है
मात्र या गाण्याची सुरुवात एकदम बोली भाषेत सणसणीत ऐ साला अशी अनोखी आहे.
प्रसुन चा साल्याचा साला शब्द लाडका दिसतो भाग मिल्खा भाग मध्ये साला ने तो लाइन क्लोज करतो.
कोयला काला है चट्टानो ने पाला है,
अंदर काला बाहर काला पर सच्चा है साला
काय ताकदीचे लिरीक्स आहेत मिल्खा चा सगळा संघर्ष मोजक्याच शब्दात बांधुन शेवटाला साला शब्द सणसणीत तडाखा दिल्यासारखा टाकतो. गायक ही त्याचा पुर्ण वापर करुन घेतो.

एकामागोमाग दारुगोळ्यासारखे आदळणारे शब्द

जिंदगी का ये घडा रे एक सांस मे चढा रे हिचकियो मे क्या है मरना पुरा मर ले.
पण पुन्हा त्यात एकदम कॉन्ट्रास्ट म्हणजे अवघड कसरत साधत या हळुवार ओळी येतात
उलझे क्यूँ पैरों में ये ख़्वाब क़दमों से रेशम खींच दे, पीछे कुछ ना आगे का हिसाब इस पल की क्यारी सींच दे
गझनीतल्या गाण्यातल्या या ओळी बघा त्याच्या
बहेका मै बहेका वो बहेकी हवा सी आयी
एक ही नजर मे सब मंजिल वंजिल पायी
हटके अलग सी थी बिलकुल जुदा सी
ना ही अदाए ना कोई अंगडाई
एरवी या गाण्यात मला त्याच्यातल्या खट्याळपणाचा भास होतो. म्हणजे बघा मंजिल अदा आणि अंगडाई हे बॉलिवुड चे गाण्यातले स्टीरीओटाइप्स हजारो गाणी एकेकावर
त्याला एका मिश्कील शैलीत मंजिल वंजिल पायी मस्तच ( तुम्ही जे अदा अंगडाई म्हणताना बाबा त्यातल काही नाही तिच्यात पण तुम्ही जी मंजिल वंजिल म्हणता ती भेटली बर्का असे जणु म्हणत असावा असे वाटते )
गुजरे जहॉ से वो रौनक उडाए, चलके नदीसी वो मुझको भिगोती जाए
किती सुंदर क्या बात है हाए !!! पुढे तो म्हणतो
राह मे उसकी हाथ बांधे हुए , पलके बिछाए हुए, सर को झुकाए हुए, खुश्बुओसे छाए हुए,
टकटकी बांधे हुए, साथ साध जाने कितने सारे मौसम खडे हुए.

तसाच अमिताभ भट्टाचार्य हा सुद्धा एक प्रतिभाशाली गीतकार आहे त्याचं सर्वाधिक आवडणारं गाणं म्हणजे " रे कबीरा मान जा ". खर म्हणजे कविताच लिरीकल पोएट्री जणु !
गाण्यातली गुढता भुरळ पाडणारी
कैसी तेरी खुदगर्जी ना धुप चुने ना छांव, कैसी तेरी खुदगर्जी किसी ठोर टिके ना पॉव
बन लिया तु अपना पैगम्बर, तर लिया तु सात समंदर फ़िर भी सुखा मन के अंदर
क्यु रह गयॉ
किंवा तु हवा का एक बवंडर बुझ के यु अन्दर ही अन्दर
क्यु रह गयॉ
या ओळींमधील रिक्तता व्यर्थता आर्तता मनाला भिडते हे एकीकडे आणि दुसरीकडे " लब नमक रमे ना मिसरी " यातील शब्दाची कुशल किमयागारी भुरळ पाडते आणि तिसरीकडे
टुटी चारपाई वोही ठंडी पुरवाई रस्ता देखे, दुध की मलाई वो ही मिट्टी की सुराही रस्ता देखे
या ओळींमधील गुढता हे काय आहे ? हा काय म्हणु पाहतोय ? अतीव सुंदर अस गाणं आहे हे जितक्या वेळा ऐकतो तितक्या वेळा ताजं च वाटतं.
अमिताभ च हे एक गाणं ऐ दिल है मुश्कील चित्रपटातील बघा, यात त्याने बॉलिवुडच्या गाण्यात क्वचितच बहुधा पहिल्यांदाच वापरले गेलेले असे काही शब्द वापरले आहेत.
मेरी रुह का परींदा फ़डफ़डाए, लेकीन सुकुन का जजीरा मिल ना पाए
वे की करां वे की करां ( जजीरा - द्विप टापु बेट )
एक बार तजल्ली तो दिखा दे, झुठी सही मगर तसल्ली तो दिला दे
रांझन दे यार बुलेया , सुनले पुकार बुलेया, तु ही तो यार बुल्लेया , मुर्शीद मेरा मुर्शीद मेरा
तजल्ली व तसल्ली चा एकत्र उपयोग निव्वळ अप्रतिम आहे. तजल्ली चा अर्थ ईश्वरीय प्रकाश वा दर्शन म्हणु या. मुर्शीद म्हणजे मार्गदर्शक
मै ता-गुल से लिपटी हुइ तितली की तरह मुहाजिर हु, एक पल को ठहरु एक पल मे उड
वे मै ता हु पगडंडी लबदी ऐ जो राह जन्नत की , तु मुडे जहॉ मै साथ मुड जाऊ
(मुहाजिर- इथे रेफ़्युजी, तात्पुरता निवासी या अर्थाने ) पुढे एका ओळीत तर
जिस दिन से आश्ना से दो अजनबी हुए है, तनहाईयो के लम्हे सब मुलतवी हुए है. क्यु आज मै मुहब्बत फ़िर एक बार करना चाहु.
ये दिल तो ढुंढता है इन्कार के बहाने , लेकिन ये जिस्म कोई पाबंदीया ना माने.
मागे एक स्वानंद आणि अमिताभ इ. लिरीसीस्ट च्या चर्चेचा एक कार्यक्रम होता त्यात त्यांनी मार्केट च्या गाण्याकडुन असलेल्या सर्व डिमांड पुर्ण केल्यावर एकुण गाण्यात आमचा "से" हा फ़ार तर १० ते २० टक्के इतकाच शिल्लक राहतो पण ही अशी वरील गाणी बघितल्यावर यावर विश्वास बसत नाही. यात म्हणजे इतकी स्वतंत्र रचना करुन पुन्हा त्याचा फ़्लो स्मुथ ठेवणे फ़ार अवघड आहे याचे श्रेय संगीतकाराचे ही तितकेच आहे.
अमिताभ चे अजुन एक लुटेरा या चित्रपटातील ( हा सुंदर चित्रपट ओ हेन्री च्या द लास्ट लीफ़ या कथेवरुन प्रेरीत आहे ) च्या गाण्यातील लिरीक्स सुंदर आहे.

हवॉ के झोके आज मौसमो से रुठ गए, गुलो की शोखीयॉ जो भवरे आके लुट गए, बदल रही है जिन्दगी की चाल जरा, इसी बहाने क्यु ना मै भी दिल का हाल जरा
सवार लुं. सवार लुं हाय सवार लुं
ये सारी कोयले बनी है आज डाकिया , कुहुं कुहुं मे चिठ्ठीयॉ पढे मजाकिया , इन्हे कहो की ना छुपाए, किसने है लिखा बताए, उसकी आज मै नजर उतार लुं
सवार लुं सवार लुं हाय सवार लु

या सिनेमाची बंगाली पार्श्वभुमी असल्याने अमिताभ ने याच गाण्याचं एक ओरीजीनल बंगाली व्हर्जन ही बनवलं होतं असं तो एका मुलाखतीत म्हणतो त्यात त्याने ते गाऊनही दाखवलय.
या वरील सर्वांहुन अतिशय वेगळ्या धाटणीची गाणी ही त्याने लिहिलीय जसे ज्याने तो प्रसिद्ध झाला ते इमोशनल अत्याचार तसच देहली बेली तील भाग डी के बोस, भाग डी के बोस हे एक नंबर मवाली टुक्कार द्विअर्थी गाणं असो (इथे गुलजार साहेबांच्या याच कौशल्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे एकीकडे साथिया साथिया मद्धम मद्धम तेरी ये गीली हसी, वा ताजा गिरे पत्ती की तरह सब्ज लॉन पर लेटे हुए सारख्या कोवळ्या ओळी आणि दुसरीकदे गोली मार भेजे मे भेजा शोर करता है ) वा ओल्ड वर्ल्ड चार्म जपत रचलेलं बलम पिचकारी जो तुने मुझे मारी तो सीधी साधी छोरी .... असो . या गाण्याच ही एक ओरीजनल व्हर्जन होत ज्यात तो म्हणतो की त्याला ओरीजनली खालील ओळी ठेवण्याची इच्छा होती मात्र तो म्हणतो मला ते ज्या यंग क्राउड साठी होतं त्यांच्या साठी त्यात बदल करावा लागला.

बलम पिचकारी जो तुने मुझे मारी तो बोले रे जमाना खराबी हो गई, मेरे अंग राजा जो तेरा रंग लागा तो ब्रिज की ये कन्या नवाबी हो गई.

खर म्हणजे अमिताभला गायक बनण्याची इच्छा होती त्याने काही गाणी गायलेली सुद्धा आहे त्यामुळे तो म्हणतो की मला धुन डोक्यात असल्याशिवाय गाणं लिहिणं जमतच नाही.
इतक्या सुंदर रचना करुनही हा फ़ारच नम्र माणुस आहे इतकी इमोशनली इन्टेन्स रचना करणारा माणुस प्रांजळपणे म्हणतो की मी एक प्रॉडक्ट देतो एक डिमांड पुर्ण करण्याचा प्रयत्न असतो तसेच एंड युजर महत्वाचा आहे व माझं एक कमर्शियल प्रॉडक्ट आहे त्यात मला अनेकदा मॉडिफ़ाय कराव लागतं. तर इतक्या कमर्शियल चौकटीच्या बंधनात राहुन त्या सर्वांची मागणी पुर्ण करुन सुद्धा शेवटी त्यात एक स्वत: च्या रचनात्मक सौंदर्याचा समावेष करणं खरं म्हणजे करता येणं जमणं हीच मोठी गोष्ट आहे.

कौसर मुनीर च्या ही काही रचना त्यातील अत्यंत हळुवार भावना मनाला भिडुन जातात जस की हे एक गाणं बघा स्टीरीओटाइप बॉलिवुड मध्ये ही वेगळी शैली वाटते मला तरी
नए नए नैना रे ढूंढे है दरबदर क्यों तुझे ,नए नए मंज़र ये तकते है इस कदर क्यूँ मुझे
जरा जरा फूलो पे झड़ने लगा दिल मेरा ,जरा जरा कांटो से लगने लगा दिल मेरा
मैं परेशान परेशान परेशान परेशान आतिशे वो कहाँ , मैं परेशान परेशान परेशान परेशान रंजिशे है धुँआ हाँ

प्रेमात पडलेल्या मुलीत बदल होतोय तो ही कसा अगदी हळुवार बदल धीरे धीरे से तो ज्या सुंदर शैलीत मांडलाय तो खुप भावतो. यातले नए नए नैना हे स्वत;ला उद्देशुन युनिक आहे. तसेच आतिशे वो कहॉ रंजिशे है धुऑ हा मला वाटतं माझ्यात पुर्वीची गर्मी राग भरलेला आता कुठाय ? म्हणजे ती तक्रार संपलीये आणि निराशा उडुन जातेय असा अर्थ म्हणजे असा हळु हळु स्व मध्ये बदल होतोय...
चाहत के छीटे है खारे भी मीठे है मैं क्या से क्या हो गई
जरा जरा फितरत बदलने लगा दिल मेरा
जरा जरा किस्मत से लड़ने लगा दिल मेरा

अफ़लातुन लिरीक्स की बात हो और पियुष मिश्रा का जिक्र ना हो ?
पियुष मिश्रा हा बोलुन चालुन एक दमदार कवी आता हा जेव्हा बॉलिवुडसाठी गाणी लिहितो तेव्हा तो बॉलिवुडच्या टीपीकल साचांची अक्षरश: पार वाट लावुन देतो. इतकी भन्नाट लिरीक्स याने दिलेली आहेत एकीकडे अगदी परीपुर्ण आरम्भ सारखी कविता म्हणा वा गाणं म्हणा तर दुसरीकडे त्याच्या राणाजी म्हारे या गाण्याची लिरीक्स बघा या गमतीदार गाण्यात तो ज्या हसत खेळत पॉलिटीकल / सोशल कमेंटस करतो ते पुर्ण गाणं मुळातुन ऐकण्यासारखे आहे बॉलिवुड मध्ये असे काही अभावाने आढळते

राणाजी म्हारे गुस्से मे आए ऐसो बलखाए अगिया बरसाए घबराए म्हारो चैन , जैसे दुर देस के जैसे दुर देस के टावर मे घुस जाए रे एरोप्लेन
राणाजी म्हारे ऐसो गुर्राए ऐसो थर्राए भर आए म्हारे नैन जैसे सरे आम भई, इराक मे जाके जम गए अंकल सैम
म्हारी तो बीच बजरिया हाय बदनामी हो गई , म्हारी तो लाल चुनरीया शर्म से घानी हो गई, म्हारो तो धक धक होवे जो जो बीते रे
जैसे हर एक बात पे जैसे हर एक बात पे डेमॉक्रसी मे लगने लग गई बेन्ड
बर हे सर्व राणाजी म्हारे चा पारंपारीक ओल्ड वर्ल्ड चार्म सांभाळुन सिनेमातलं त्यावरील नृत्य ही त्याच पारंपारीक शैलीतील पण त्याच्यातच टाकलेला समकालीन आशय एकदम विरुद्ध
हा कॉन्ट्रास्ट फ़ार लोभस आहे पुन्हा त्यात गांभीर्याला फ़ाट्यावर मारुन सगळं गंमत जंमत शैलीत त्यामुळे गाणं अधिकच बोचतं.

पियुष मिश्राचं अजुन एक उल्लेखनीय काव्यात्म गाणं म्हणजे गॅग्ज ऑफ़ वास्सेपुर मधील,

इक बगल में चाँद होगा, इक बगल में रोटियाँ , इक बगल में नींद होगी, इक बगल में लोरियाँ हम चाँद पे, हम चाँद पे,
रोटी की चादर डाल कर सो जाएँगे और नींद से, और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएँगे
एक बगल में खनखनाती, सीपियाँ हो जाएँगी , एक बगल में कुछ रुलाती सिसकियाँ हो जाएँगी
हम सीपियो में, हम सीपियो में भर के सारे तारे छू के आएँगे ,और सिसकियो को, और सिसकियो को
गुदगुदी कर कर के यूँ बहलाएँगे . और सिसकियों को, गुदगुदी कर कर के यूँ बहलाएँगे

मित्रांनो तुमची आवडती लिरीक्स शेअर करा लिरीक्स वर चर्चा करायला खुप आवडेल. चर्चेच्या ओघात अजुन अजुन सुंदर गाणी आठवत जातील मजा येइल

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाह!!! खूपच छान लिहीले आहेत मारवा.
मीदेखील ओळी आठवण्याचा प्रयत्न करते आहे. आठवल्या तर लिहीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रसून जोशी ३ चित्रपटांमुळे कायम लक्षात राहिले आहेत.
१. रंग दे बसंती.
२. दिल्ली ६
३. तारे जमीन पर

तुम्ही रंग दे बसंतीवर लिहिलंच आहे- त्यातली जोशीली आणि एकदम खुल्या दिलाची गाणी ऐकून वेडा झालो होतो.
नाटा ये सन्नाटा है, देखो लंबू शोर है
हर दिल मे बुडबुड करता - H2SO4 है ..

किंवा अंगावर काटा आणणारं लुकाछुपी- (शब्दांमुळे, लताच्या आवाजाने नाही)
तेरे किस्सों जैसा भोला सलोना जहां है
यहां सपनो वाला
मेरी पतंग हो बेफिक्र उड़ रही है मां
डोर कोई लुटे नहीं बीच से काटे ना

.. .
हे सगळं पहिल्यांदा ऐकल्यावर खुळावाय्ला झालं होतं.
.
पण प्रसून जोशी ए-१ वाटले ते "तारे जमीन पर" मुळे.
"तारे जमीन पर" हे गाणं इतकं भारी आहे! अख्खं गाणं उतरवता येईल.
जैसे आँखों की डिबिया में निंदिया
और निंदिया में मीठा सा सपना
और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई
जैसे रंगों भरी पिचकारी
जैसे तितलियाँ फूलों की क्यारी
जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई
....
जैसे बैठे बैठे मीठी सी झपकी
जैसे प्यार की धीमी सी थपकी
जैसे कानों में सरगम हरदम बजती ही रहे

ह्या आधी नव्या हिंदी चित्रपटांत एवढं सुंदर आणि निष्पाप काही ऐकलं नव्हतं.

गोष्ट तारे जमीन परची आहे तर त्यातलं "मेरा जहाँ" विसरून चालणार नाही.
उत्कृष्ट शब्द, चाल आणि चित्रिकरण - इतकं भारी गाणं हिंदी सिनेमात फार कमी वेळा जुळून येतं.
पुन्हा- सोप्पं, सुंदर आणि निष्पाप.

उड़ने को सौ पंख दिए हैं
चड़ने को खुला आसमान
मुड़ने को है करवट करवट
और बढ़ने को मेरा जहाँ

तारे जमीन पर मधल्या गाण्यांचे शब्द हा वेगळा विषय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माझ एकुलतं एक वरुण चं आवडतं गाणं आहे

मोह मोह के धागे
--------------------------
ये मोह मोह के धागे
तेरी उंगलियोंसे जा उलझे
कोइ टोह टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे
है रोम रोम एक तारा
जो बादलों मे से गुझरे

जयदीप साहनी सुद्धा कधी कधी आवडतो.
जेव्हा पासून अंधाधून पाहीलाय तेव्हा पासून त्यातलं नैना दा कसूर आवडलय रिपिट मोड वर असतं बरेचदा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

ते मोह-मोह आणि टोह-टोह कळत नाही पण गाणं फार भिनतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0