अंगी भिनलेला सखा पांडुरंग....

गेला गेला रे पांडुरंग, मला गं सोडून,
गेली गेली बाजारात वेश्या होण्या ग बया।
राही बाजारी गं उभी, कोणी मला गं पाहिना,
त्या सावळ्याचे रूप मला, बाजारी गेले वाया।
घाली शालु शेले किती, अंगी जरतारी पैठणी,
तरी चंदनाची उटी, मिरवी अंगी रंग दाखवाया।
हटकले लोकांसी, गायली शृंगारीक लावणी,
कोणी म्हणे मज बये, का गं उभी अभंग गाया।
असा रे कसा देवा तू, मज वेडावून टाकिले,
सारे पाश तोडिले तरी, का मनी वसे तुझी माया।
परत निघाली वेश्या, वसने वासनेची टाकून,
निघता निघता बाजारी, म्हणे कोण वारकरी ही बया।

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही कविता म्हणजे २ कविता आहेत का? एका आड एक ओळी वाचूनही सारखाच तसाच पण जरा सुसंगत अर्थ लागतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, एकच आहे पूर्ण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिद्धार्थ

धन्यवाद. बुद्धाला भेटून एका गणीकेचे झालेली उन्नती, अध्यात्मिक प्रगती ही गोष्ट फार आवडते. पिंगला नाव होतं बहुतेक, खात्री नाही. फार आवडते ती गोष्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय कथा आहे?

पिंगला ही एक नाडी आहे असं ऐकल होतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

**********

राम का गुनगान करिये |
रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये ||

https://www.thehindu.com/features/friday-review/religion/religion-story-...
पण यात बुद्धाचा उल्लेख नाही. मी काहीतरी २ गोष्टी एकत्र केल्या असाव्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"काहींच्या हातात मद्याचा पेला ही खुलतो, आणि काही दूध प्यायले तरी ताडी पित असल्यासारखे वाटतात" --- इति (बहुतेक) पु.ल.

बघा ना, बया गणिका बनू पाहतेय तर लोक तिला वारकरी समजतायत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

**********

राम का गुनगान करिये |
रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये ||