दुनिया

माझी आजी नेहमी अनेक म्हणी रोजच्या बोलण्यात सहजच बोलून जायची. " दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे " , "उसनं मांडं नी उसनं दांडं ", "दिलं तर गोड नाहीतर दोड" अश्या अनेक म्हणी आपोआप तिच्या बोलण्यात यायच्या. लहानपणी मला तिच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ लागायचा नाही.
माझं बालपण खेड्यात गेले. कोणत्याही सुविधा त्या काळात नव्हत्या. तंगडतोड करतच तालुक्याच्या गावाला जाऊन दवाखाना, भाजीपाला बाजार, म्हटलंच तर सिनेमा बघणे या गोष्टी कराव्या लागायच्या. माझ्या प्राथमिक शाळेतील वर्गमित्र व मी सर्वच शेतकऱ्याची मुले होतो. काही शेतमजुरी करणारांची होती. सगळ्यांची घट्ट अशी मैत्री होती. शाळेत आणि शाळेबाहेर एकमेकांवाचून अजिबात करमायचे नाही. आमच्या बालपणी टिव्ही, मोबाईल नसल्यामुळे अनेक मैदानी खेळ, चल्लसपाणी सारखे बैठे खेळ व भरमसाठ गप्पा मारणे, पोहायला जाणे या गोष्टींत वेळ कसा जाई हे लक्षातही येत नसे. बोअर होणं काय हे माहित सुध्दा नव्हतं.
हळूहळू बालपण सरले, जो तो पोटापाण्याच्या उद्योगाला लागला. मी शहरात गेलो. नशिबाने चांगले शिक्षण घेतले व चांगली नोकरी मिळाली. शहरात स्थाईक झाल्याने अनेक आर्थिक संधी मिळाल्या. उत्तरोत्तर प्रगती होतच गेली. बऱ्यापैकी मालमत्ता, गाडी बंगला सर्व गोष्टी लाभल्या.
इकडे माझ्या बालमित्रांपैकी आम्ही चार पाच जणच असे बाहेर पडलो. बाकीचे खेड्यात राहिले. कुणी शेती, दूधधंदा , कुणी गवंडीकाम, कुणी अशीच पाच दहा हजार रुपये पगाराची नोकरी शेती करत करू लागले. प्रपंचाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना काहींनी चांगलं नियोजन करून प्रगती साधली. काहींची फरपट झाली तर दोन-चार व्यसनाधीन होऊन पार मागे पडले, लोकांच्या टिंगल टवाळीचे साधन बनले.
दिवस असेच जात राहिले. होता होता मी पण सेवानिवृत्त झालो. शहरात मुलं वगैरे सेटल झाले. पण मला मात्र गाव खुणावत होते. रिटायर झाल्यावर खऱ्याखुऱ्या आपल्या लोकांत रहायला मिळावं म्हणून गावाला रहायला आलो. शेतात छोटासा बंगला बांधला. हळूहळू बालमित्रांच्या भेटी चालू झाल्या. पण पुर्विचे बंध आता काही दिसेना. मला फार कोणी जवळ करत नव्हते. एक प्रकारचा अलिप्तपणा , तुटकपणा जाणवत होता. काही बालमित्र गरज असेल तरच माझ्याकडे येऊ लागले. दोघे तिघे उसने पैसे मागत. मी आनंदाने द्यायचो. एका जणानं पैसे परत केलेच नाही पण अजून पैसे मागत होता. शे पाचशे द्यायला काही वाटत नव्हते पण एके दिवशी इतके इतके पैसे उसने घेतलेस परत कधी देणार असे विचारले तर गडी बोलायचाच बंद झाला. हळूहळू माझ्या लक्षात आले की परिस्थितीचे चटके सोसल्यानं या लोकांना माझ्या श्रीमंत असण्याची मनात कुठेतरी असुया वाटते आहे, आपण प्रगती करू शकलो नाही हे मनात कुठेतरी शल्य त्यांच्या मनात असावं का असे विचार माझ्या मनात यायला लागले. काळ इतका बदलला की भौतिक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आलं. सायकल चालवणारा मोटार सायकल नाही म्हणून आतल्या आत झुरू लागला. सायकलवर मित्र समोरून आला की तो मान खाली घालून बाजूने जातो हा मला अपमान वाटायला लागला आहे.
आजकाल लोक माणूस नाही तर त्याच्या पासून होणाऱ्या फायद्याला मान देतात. मला आता आजीच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ कळायला लागला आहे

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

पॉइंट आहे.

आश्चर्य वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ना. काही गोल्डन, काही ब्राऊन होत जातं.दूरदूर जातं.
उसन्यावर प्रत्येक देशात म्हणी आहेत. गुजराथी - पाडोशी बस्सो रुपियो मांगे तो सो रुपिया आपवानु अने भूली जवानू। ( शेजाऱ्याने दोनशे रु मागितले तर शंभर द्यायचे आणि विसरून जायचं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद नबा, आबा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

"दिलं तर गोड नाहीतर दोड"

वळलं तर सूत नाहीतर भूत

" दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे "

इक हाथसे दो, इक हाथसे लो
_____________
अनुभवाचे बोल आहेत. असेच असते. आपण कुठेतरी दूर जातो, गतायुष्याच्या आठवणींत, आपलं आतडं तुटतं त्यामुळे आपसूकच वय वाढल्यावर आपण आपल्या नीड (घरट्यात) परततो. पण ते जगच पालटलेले असते. आपल्या मनात काळ थांबलेला असतो पण वास्तवाता काळही पुढे गेलेला असतो, त्याची जकात वसूल करुनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सामो जी खूप धन्यवाद! आपण छान शब्दात मांडलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

तुमची आणि त्यांची नातवंडं त्याच गावात एकाच शाळेत गेली तर त्यांचीही घट्ट मैत्री होइलच. त्या वयात होतं तसं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आबा, अबापट जी.
आबा माझी नातवंडे शहरात आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

"असतील शिते, तिथे जमतील भूते"
"कामापुरता मामा, ताकापुरती आज्जी"
अशाही काही म्हणी आहेत.

तुमचा अनुभव वाचून वाईट वाटले. काही लोक असतात खरी मत्सरी.

पण सर्वच असे नसतील ना? तुम्ही लिहीले नाही, पण काहीजण तरी खरे मित्र असतीलच की.
'उडदामाजि काळे-गोरे' असायचेच.

आणखी एक म्हण आठवतीय -- दिल्हे दान .. घेतले दान --- अशी काहीतरी.
याचा अर्थ -
दिलेले दान कधी आठवू नये आणि घेतलेले दान कधी विसरू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

धन्यवाद मनीषा जी. काळ फारच बदललाय. माणसं लगेच हर्ट होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

तुम्ही सुखात, आनंदात, वैभवात आहात हे बघून माणसे हर्ट होतात -- असं म्हणताय का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

पण सर्वच असे नसतील ना? तुम्ही लिहीले नाही, पण काहीजण तरी खरे मित्र असतीलच की.
>> याविषयी म्हटलं मी. जास्त जवळ आलं तरी गैरसमज होण्याचा धोका असतोच. खूप खास मित्राला आपण काही कारणाने वेळेवर कामाला उपयोगी पडलो नाही, तरी तो तुटक वागायला लागतो, दाखवत मात्र नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

ते ही खरय म्हणा.
पण काही असतात वेगळे. सर्व काही एकाच माळेचे मणी नसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

पण काही असतात वेगळे. सर्व काही एकाच माळेचे मणी नसतात.

दहा हजारांतून अर्धा कोठेतरी नसतो. "सर्व काही एकाच माळेचे मणी नसतात" हा नियम (अपवादाने) सिद्ध करण्यापुरता.

असो चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणून नॉर्डीक देशांसारखा 50 टक्के टॅक्स लावून आधी आर्थिक समानता आणली पाहिजे. शेवटी एवढा पैसे कमवून दुःखीच राहिला. लिहिण्यावरून असही वाटतंय की नक्कीच तुमच्या आवडीच्या क्षेत्रातला जॉब केला नसणार नाही आहे. आला दिवस ढकल अस करत निवृत्त कधी झाला हे ही कळलेलं नसणार आहे. हाच फरक आहे प्रगत देशांच्या नागरिकांच्या लोकांच्या आणि भारतीयांच्या मानसिकतेमध्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

मूळ लेखाचा मुख्य मुद्दा कालांतराने जुने बंध तसेच राहात नाहीत. परिस्थिती बदलते तशी माणसं बदलतात. काही म्हणी असे अनुभवाचे बोल शब्दबद्ध करतात.
लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तीला भावुकता परवडते. मी त्याच्या अनुभवाचा सच्चेपणा नाकारत नाही, पण ज्या आठवणी जपणं, कुरवाळण्याची चैन त्याला परवडते, त्यांची पत्रास जगण्याच्या धबडग्यात इतरांना तेवढी ठेवता येत नाही. मग लेखक म्हणतात तसं त्यांच्याकडे केवळ आपल्या नडीला उपयोगी पडू शकणारी व्यक्ती असं पाहिलं जातं, सोयीस्करपणे त्याला काय कमी आहे असं गृहीत धरलं जातं.
सुशेगाद यांच्या प्रतिक्रियेमागची तार्किकता सरधोपट आहे. देशाचा आकार, लोकसंख्या, एकंदर राहणीमानाचा उच्च स्तर व सामाजिक विषमतेची तीव्रता मुळात कमी असणं यातून काही बाबी काही देशांना शक्य झाल्या याचा अर्थ त्या सर्वत्र लागू पडत नाहीत. त्याखेरीज मूळ लेखकाच्या कार्यसंस्कृतीबद्दल काढलेले अनुमान (व्याकरणदोषाकडे दुर्लक्ष करून) कशाच्या आधारावर काढले ते कळत नाही. देशकालपरत्वे मानसिकता भिन्न असतेही, पण त्याही बाबतीत साधा सोपा निष्कर्ष व सरसकटीकरण खेदजनक आहे.
(खाली लिहिलेल्या दोन फ्रेंच ओळींची सहीही तर्कटीच आहे)

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खास तुमच्यासाठी खालील दोन ओळी बदलल्यात.

P.S.- आता चुत्या सारखे बदलल्या आहेत ऐवजी बदलल्यात असा प्रश्न करू नका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

व्यक्त होणं अटळ आहे. तुम्ही काय, कसं व्यक्त होता की काहीच बोलत नाही यातूनही प्रत्येकजण सतत व्यक्त होतच असतो. कोणाचाही विनाकारण अधिक्षेप केलेला पाहून मला राहावलं नाही. पण शेरेबाजीत धन्यता मानणाऱ्यांकडून तारतम्याची अपेक्षा केली हे चुकलंच माझं. आता तारतम्यच नव्हे तर ताळतंत्रही नसलेल्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेवर इतका वेळ घालवल्याचं वाईट वाटतं.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अपेक्षा कशाला, चांगलं खडसावलत तुम्ही. अनेकांना इच्छा असणार तेच सुनवायची, पण गटारगंगेचा ओघ आपल्यावर वळू नये म्हणुन लोक गप्प बसतात. नवीन आहात शिकाल हळूहळू. आणि मग तुम्हीही अशा प्रतिक्रियांवर गप्प बसाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कंटेंट बद्दल व्यक्त झाला असता तर ठीक होत खसली फ्रेंच लाईन्स वर शेरेबाजी करायला तुम्हीच सुरवात केली. फक्त भाषा चांगली वापरून कुत्सितपणा करता येतो. तो केलात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

खुपच धन्यवाद उज्वला जी. किती सुंदर शब्दांत माझ्या लेखाचे सार आपण सांगितलं आहे.
[ लिहिण्यावरून असही वाटतंय की नक्कीच तुमच्या आवडीच्या क्षेत्रातला जॉब केला नसणार नाही आहे. आला दिवस ढकल अस करत निवृत्त कधी झाला हे ही कळलेलं नसणार ] >> सुशेगाद एकदम यझ आकलनशक्ती की वो तुमची. काहीही बरळल्यासारखं...

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

शाखेवर या 6 वाजता चड्डी घालून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

यझ शब्द आवडला.

(म्हणजे, नावीन्यपूर्ण वगैरे नाहीये, चांगला परिचयाचा आहे. परंतु तरीही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणी आपण व्यवहारात उतरून वागत नसतो फार. चार गोट्या देतोस तर तुला दोन पेरू देतो एवढाच साधा. फार मनाला लावत नाही. मोठेपणी तसं नसतय. बायकामुले लगेच बोलतात. बघा तुमचा मित्र कसा वागतो.
बाकी तुम्ही गावी परत अचानक जाऊन घर बाधले का? थोडे एक दोन वर्षी किंवा वर्षाआड जात राहून निर्णय घ्यायचा होता.

पाचदहा किमि वेगळ्या गावातही घर बांधल्यास गावचे वातावरण मिळाले असते, तेवढाच खर्च आला असता आणि गोडवा राहिला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आबाबा. एक हुशार मुलगा म्हणून मला गावाचे आणि वर्गमित्रांचे खूप प्रेम मिळाले होते. पण जवळपास तीस वर्षे संपर्क तुटला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

मस्तपैकी आपल्या बालपणीच्या मित्रांचा व्हा. अप ग्रुप बनवायचा, शिळ्या कढीला ऊत आणायचा,चांगला प्रतिसाद मिळतो. कधीतरी गेट टुगेदर करून दंगामस्ती करायची. चांगले वाईट बालमित्र तेव्हाच कळतात. संबंध वाढवायचे की थांबवायचे हा निर्णय तिथेच घ्यायचा.
कॉलेज काळातील म्हण- नो मनी पुशीना कोणी, यस मनी साऱ्या जणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खिशात असलं मनी तर माग फिरतील सतरा जणी वर तुम्ही टीकटॉक बनवलाय काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद मार्मिक जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

कोकणींत सुशेगादचा अर्थ संपन्न.
सुशेगाद गोवा, संपन्न महाराष्ट्र, गरवि गुजरात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घाटी लोक काहिबी अर्थ लावतात. म्हणून तर वेगळा स्टेट साठी वोट केलेला।

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

(माय)बाप पोर्तुगीजांकडे होतात, ते काय वाईट होतात? उगाच आक्रमण केले तुमच्यावर, १९६१च्या डिसेंबरात!

त्या (हलकट) नेहरूची खाज, दुसरे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणून MH 12, MH-40 च्या गाड्या घेऊन, बागा, कळगुंट वर अंडरवेअर वाळत घालून, शांताबाई गाण्यावर नाचत असता वाटत. बाई न बघितल्यासारखं खाजवत. नशीब रेफ्रँडम घेतलेला नाहीतर आत्तापर्यंत उच्छाद मांडून ठेवला असता. आख्खा नॉर्थ घाण करून ठेवलाय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

ओके.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0