सांजवेळी

सांजवेळी आकाश तारे
पांघरूण यावे
तु निघायचे म्हणताच सारे
अंधारून यावे

मी अडवावी वाट तुझी
पाऊल तुझेही अडखळावे
नकळतच व्हावा स्पर्श तुला
अन लाजून तू चूर व्हावे

नसावे अंतर श्वासांचेही
तनमन ईतके एक व्हावे
चूंबावे मी ओठ तुझे तु
गुलाब बनुन बहरून जावे

सरुच नये रात्र नशीली
युगेयुगे उलटुन जावी
मी तुझ्या अन तु माझ्या
मीठी मध्ये हरवून जावे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गोड......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिद्धार्थ