निरंजन प्रधान -वय अदमासे चाळीस

निरंजन प्रधान -वय अदमासे चाळीस

आई लहानपणीच वारली -बाबा मुबई न पा मध्ये finance Department मध्ये नुकतेच वारलेले

निरंजन साधारण बुद्धिमत्तेचा -पण खूप देखणा -अभिनयाची आवड -नाटकात काम करायचा

पण फारसा चमकला नाही -तरी त्या व्यवसायाशी निगडित कलाकाराशी जवळीक असलेला

नाटक या व्यतिरिक्त त्याला अध्यात्म व गूढशक्ती या बद्दल आकर्षण होते

दादर ला वडिलोपार्जित flat

थोडेफार सेव्हिंग वरचे व्याज नाईट मिळाली तर मिळणारे पैसे यावर जगत होता

त्याला छान छाकीचे विलासी जीवन व सुंदर स्त्रिया यांचा सहवास आवडायचा

व्यक्तिमत्व रुबाबदार असल्याने अनेक मदनिका त्याला वश असायच्या

त्याला फोन आला

रमा मामी गेली

त्याच्या डोळ्याला अश्रूंची धार लागली

मामा मामी चा निरंजन वर खूप जीव होता

मामा नगर नजदिक एका खेड्यात राहात होते

शेती करायचे चाळीस एकर जमीन

बाबा गेले तरी दाजी अन ताईंनी हिस्सा मागितला नाही

ना तंटा ना कज्जा

मात्र राम मामा तिच्या हिश्याच धान्य पैसे तिला पोहोचवत असे

गेले काही दिवस मामी आजारी असल्याने शेतीकडे मामाचा दुर्लक्ष झालं होत

निरंजनने पिशवी भरली अन तो नगर कडे समाचाराला निघाला

*

घरी येताच तो मामा च्या गळ्यात पडला

अश्रूचा बांध फुटला

दोघे रडत होते

निरंजनला आजोळच्या आठवणी न भरून आले

मामी ची माया त्याला आता तो पारखा झाला होता

अश्रूचा भर ओसरला

मामा अन तो रात्रभर गप्पा मारत होते

निरंजन मामा ला धीर देत होता

निरंजन ने निरोप घेतला जाताना मामा ने त्याच्या हातात पाच लाख व पाण्याची बाटली ठेवली

हे कशाचे ?

अरे हा ताईचा हिस्सा -द्यायचा होता पण राहून गेला

अरे मामा कशाला?-असू देत कामी येतील

निरंजन पैसे पिशवीत ठेवले व निरोप घेतला

जाताना स्म्शान लागते -सांभाळून जा -मामा म्हणाला

*

स्मशान लागले

एक पिंपळाचे झाड होते त्याला पार घातला होता

तिथून कण्हण्याचा आवाज आला

तो तिकडे गेला -पारावर एक माणूस पहुडला होता अंगावर भगवे उपरणे होते

तसा फारसा वयस्कर दिसत नव्हता

बाबा बर वाटत नाही का ?

गळ्याला शोष पडला आहे -पाणी आहे का??/

निरंजन न तत्परतेने बाटली काढली बूच उघडले व त्याच्या हातात दिली

पाणी पिताच त्याच्या अंगात तरतरी आली

बाबा आपण कोण आहात -नाव काय ?

मित्रा माझ्याकडे फार वेळ नाही

मी काय सांगतो ते नीट एक असे म्हणत खांद्यावर अडकवलेल्या झोळीतून त्याने एक आलंनकरा असते त्या मापाची पेटी काढली -दोन पेले काढले एक सोन्याचा व एक चांदीचा -एक छोटी पोथी काढली

ती संदूक उघड -

त्याने ती पेटी उघडली अन चकित झाला

आत सोन्याचे दागिने होते

त्याने बाबा कडे पाहिले

साधारण एक किलो सोने आहे

मला आजचा सोन्याचा बाजार भाव माहीत नाही -जो असेल त्या प्रमाणे याची किंमत आहे

शंभर नंबरी सोने आहे -हि अक्षय पेटी आहे

सोने बाहेर काढून तू विकले अन पुन्हा पेटी उघडली की

पेटी आहे तशीच भरलेली असेल -तुला पैशाची ददात पडणार नाही

आता हे पेले -यात पाणी भरायचे पोथीत दिलेला मंत्र तीन वेळा म्हणायचा अन ते पाणी प्यायचे

याने तू तारुण्य विकत घेऊ शकतोस

म्हणजे कळले नाही बाबा -

सांगतो -आता तुझे वय चाळीस आहे

तू एका गरजू साठच्या आसपास वय असलेला माणूस निवड

किती वर्षे तरुण व्हायचे ते ठरव -समजा विस वर्षे असे तू ठरवले तर त्याला त्याची किंमत दे त्याला नाराज करू नको लाख रु वर्षाला या प्रमाणे वीस लाख जवळ ठेव

दोघे समोरासमोर बसा त्याच्या पुढ्यात सोन्याचा तर तुझ्याकडे चांदीचा पेला पाण्यानी भरून ठेव

ती वेळा पोथीतला मन्त्र म्हण -त्याच्या पेल्यातले पाणी तू पी व तुझ्या पेल्यातले तो

पाणी पिले कि त्याला पैसे गे व तो गाव सोडेल असे बघ

आता तुझे खरे वय साठ वर्षे असेल पण प्रत्यक्षात तू विशी चा तरणाबांड तरुण असशील

बाबांनी गळ्यातले लॉकेट काढत त्याच्या गळ्यात घातले -हे चमत्कारी लॉकेट आहे यामुळे तुला असंख्य आरोग्य लाभेल तू कधीच आजारा पडणार नाही वा जरा जर्जर होणार नाहीस

मित्रा आता तुझ्या कडे तारून आहे -पैसा आहे व आरोग्य आहे -जा मस्त जीवन जग

*

निरंजन मुंबईला आला -

त्याने घरी आल्यावर ती पेटी उघडली

त्यातले दागिने काढले व सराफ बाजारात गेला

त्याने ते दागिने मालकाला दाखवले त्याने सोन्याचा कस लावण्यासाठी आपल्या माणसाकडे दिले

साहेब सोने शतर नंबरी आहे -इतके शुद्ध सोने मी बघतले नाही

वजन केले गेले

तुम्हाला चेक हवा कि रोकड ?

कसाही चालेल -हे दागिने आमचा पिढिजात ठेवा आहे

मला नड आहे म्हणून विकत आहे

*

निरंजन ब्यांकेत जायचा तिथे एक वोचमन होता

तो निरंजन चा चाहता होता -निरंजन च्या व्यक्तिमत्वाने तो भारला होता

हाय -दादा कस चालले आहे

भाऊ काय सांगू पोरीचं लग्न करायचंय -जवळ पैसा नाही -काय करावं समजत नाही -कंत्राटी नोकरी -अपुरा पगार

मी सांगितले तर तू ऐकशील ?

हो सांगा ना --

मग चाल माझ्या बरोबर -तुझ्या सा-या अडचणी मी दूर करेन

दोघे जण त्याच्या flat वर आले

ते समोरासमोर बसले

निरंजन ने सुवर्ण पेला त्याचा कडे व चांदीचा आपल्या कडे ठेवला

त्यात पाणी भरले व म्हणाला मी आता काही मन्त्र म्हणणार आहे त्यानंतर मी हा चांदीचा पेला तुला देईन त्यात भरलेले मंतरलेले पाणी तू पिऊन टाकायचे

पाणी पिलास कि मी तुला १५ लाख रुपये रोकड देईल

त्यातून तुझ्या गरजा पु-या होतील -मात्र पैसे हातात पडले कि तू हे शहर सोडायचे

आपल्या गावी जा अन मुलीचे लग्न कर

हे ऐकताच वोचमन खुश झाला

निरंजन ने मंत्र म्हटले ग्लास ची आदला बदल झाली

पाणी प्यायले दोघेजण

निरंजनने त्याला १५ लाख रु पये दिले ते घेऊन वोचमन निघाला

*

तो जाताच निरंजन ने फक्त ला कुलुप लावले

वरळीला त्याने फ्ल्याट भाड्या नी घेतला होता

पैशाची पिशवी घेऊन तो फ्ल्याट वर आला

*

आल्यावर त्याला दमल्या सारखे वाटत होते -डोळ्यावर झोपेची झापड आली होती

तो बेड वर झोपी गेला

संघ्याकाळी सायासें सहाच्या सुमारास त्याला जाग आली

शरीरात चैतन्य भरल्या गत झाले होते अगदी वीस वर्षाच्या तरुणा गत

तो अंघोळीला बाथरूम मध्ये गेला मस्त आंघोळ दाढी झाली

ओल्ड स्पाईस लोशन चा गंध दरवळत होता

त्याने मार्क्स अँड स्पेन्सर मधून घेतलेला सौम्य निळ्या रंगाचा शर्ट घातला

पार्क ऍव्हेनु ची डार्क ऑक्सफोर्ड ब्ल्यू ची प्यान्ट चढवली

त्याने आरशात पाहिले हँडसम दिसत होता

शूज चढवले अन खाली आला

खिताळले व्ह्यालेंट चेक केले -३०-३५ हजार होते

शिवाय कार्ड पण होते

त्याने चार हजार पाकिटातून काढले अन वरच्या खिशात ठेवले पाकीट मागच्या हिप पॉकेट मध्ये सरकवले

हात केला ट्याक्सी थांबली

सर कुठे ??

क्लाउड नाईन पब वर गाडी घे

मागच्या सीट ची काच खाली सरकवली

हवेचा गार झोत आला

आजची रात्र तो मजेत घालवणार होता
7Shraddha Joshi-Aradhye and 6 others
3 comments
Like
Comment
;

field_vote: 
0
No votes yet