दोन आण्याची ( पैशाची ) गोष्ट

माझ्या लहानपणी ही गोष्ट माझा आजा मला रोजच सांगायचा. बाबा म्हणजे माझा आजा विड्या वळायचं काम करायचा.
बाबा विड्या वळत असायचा, अन् कोठूनही माझी स्वारी आली की लगेच " बाबा गोष्ट सांग" ऑर्डर सुटायची. बाबा म्हणायचा. " थांब, सांगतो." मी " नाही, आता लगेच सांग".
मग बाबाची गोष्ट सुरू व्हायची.
एक होती म्हातारी. ती चालली कुपाटी कुपाटीना. तिला सापडले दोन पैसे. दोन पैशाचं तिनं दूध आणलं. ते ठेवलं तापायला.
ते गेलं उतू. म्हातारी गेली उतरायला. हाताला आले तीन फोड. फोड फुटले. एकात निघली सकू. एकात निघली बकू. एकात निघला डिंगऱ्या. सकू पाणी आनती का? मी नाही आनीत जा. बकू पाणी आनते का? मी नाही आनीत जा. डिंगऱ्या पाणी आनतो का? आनतो आनतो. डिंगऱ्या माझा कामाचा. शाळेत जातो नेमाचा.
"बाबा, अजून सांग" बाबा म्हणायचा " तुजं पोट भरणार नाही, सांगतो."
एक होता राजा. त्याच्या डोक्यावर सात बाजा. तोच तुजा आजा.
"बाबा आजून सांग".
एक होता सांगू. एक होता नकोसांगू. सांगू चढला झाडावर. मंग खाली कोण राहीला?
मी " नकोसांगू"
बाबा " मंग नही सांगत. "
"बाबा अरिंग मिरिंग".
मग बाबा आणि मी दोन्ही पाय एकमेकांच्या पायाला जूळवायचो. मग बाबा बोटाने एक शब्द बोलत एका पायावर बोट ठेवत खेळ चालू करायचा. अरिंग मिरिंग लवंगा तिरिंग लवंगातीरचा डुबडुब बाजा गाई गोपाळ उतरला राजा. असे शेवटचं बोट ज्या पायावर थांबे. तो पाय मागे घ्यायचा.
हा खेळ झाला की, आपडी थापडी...
"आपडी थापडी गुळाची लापडी. तेलणीच्या तीन पुऱ्या. चाकूत्याचं एक पान. धर गं बेबी हाच कान. " मग कान धरून " च्याव म्याव पिताळाचं पाणी प्याव" हे करायला खूप मजा येई.
मधीच लहर आली की, "बाबा, कुकुचिकू!"
मग बाबाच्या पायावर बसायचं. बाबा पाठीवर झोपून पाय हवेत वर खाली करी व तोंडानं म्हणे. " कुकुचिकू, कुकुचिकू. राजाची लेक माझ्या बाळाची बायकू." मला इतका आनंद व्हायचा. माझा आनंद पाहून बाबाला डबल टिबल आनंद व्हायचा.
दुर्दैवाने मी तिसरी चौथीत असतानाच बाबा वारला. आमच्याकडे कुणाकडेच त्याचा फोटो नाही. चुलत्यांना, आत्यांना विचारलं पण कुणाकडंच नाहीय. अंधूक सा फोटो मनात मात्र आहे. आणि बाबाच्या गोष्टी आठवत राहतात. बाबा मी तुला फार फार मिस करतो रे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

बाबा मी तुला फार फार मिस करतो रे.

रडवलत शेवटी!!
मी ही माझ्या बाबाला 'ए बाबा' च म्हणते.
_____
अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा.
________________
इथे इथे बस रे मोरा
बाळ घाली चारा
चारा खा पाणी पी
भुर्र उडुन जा.
___________________
कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
बाळ - सांग
"सांग" काय म्हणतेस! कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
बाळ - सांग ना
"सांग ना" काय म्हणतेस! कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
अन मग असाच खेळ चालू रहातो....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सामो जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

छान आठवणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आचरट जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

छान आठवणी,
डिंगऱ्याची ही गोष्ट माहीत नव्हती, माझी आजी मी तिचे काम केले की म्हणते डींगऱ्याच माझ्या कामाचा. बरं वाटतं असं तिने म्हटल्यावर . ह्या असल्या खेळांमुळे आणि गोष्टींमुळे लहानपण खूप मजेत गेले. आज हा लेख वाचल्यावर पुन्हा आजोबा आजींच्या कुशीत जावे असे वाटते. सुदैवाने आजी ८७ आणि आजोबा ९३ वर्षाचे असूनही चालते फिरते आहेत, देतोच आता त्यांना त्रास.
एक चिमणी आली दाणा घेऊन भूर्कन उडाली, दुसरी चिमणी आली दाणा घेऊन भुर्कन उडाली....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद मार्मिक जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

नशिबवान हो मार्मिक राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कधी निवांत आपण एकांतात बसतो तेव्हा सर्व जुन्या आठवणी येतात आणि मन व्याकुळ होत .
जुने मित्र त्यांच्या बरोबर आनंदाने काढलेले ते सुवर्ण क्षण ,आई,वडील chya आठवणी सर्व सर्व आठवत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद राजेश भाऊ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

आमच्याकडे कुणाकडेच त्याचा फोटो नाही. चुलत्यांना, आत्यांना विचारलं पण कुणाकडंच नाहीय. अंधूक सा फोटो मनात मात्र आहे.

एक आपल्या मनातली छबी सोडल्यास आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीची कुठलीही ओळख असू नये हे फार त्रासदायक वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद अस्वल जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।