मधुरा

मधुरा ही आमच्या गल्लीतल्या बाळू भटाची मुलगी. बाळू बामणाला बापू आणि मधुरा ही दोन मुले.‌ मधुरा बापूपेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. बाळू भट गावात व आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये सत्यनारायणाची पूजा, श्राध्दं, पंचांग सांगणं, भुमीपुजनाचे मुहूर्त काढून देणं, लग्न लावणं अशा कामांसाठी डिमांड असलेलं व्यक्तिमत्व होतं. भाग सधन शेतकरी, व्यापारी लोकांचा असल्यानं लोकंही भरपूर दानदक्षिणा द्यायचे. पैसे आणि शिधा वेगळा. कधी कापड, भांडी सुध्दा मिळायची.
सत्यनारायण पूजा सांगायला गेल्यावर बदाम, खडीसाखर, खारका, खोबरं, डाळ, गुळ वगैरे बरंच शिधा म्हणून बाळूभट घरी आणत. मधुरा आता मोठी झाली होती. खायला एवढं पौष्टिक पदार्थ मिळाल्यानं तिचं शरीर गोल गरगरीत, पुष्ट दिसायला लागले होते. चेहऱ्यावर जवानीचं तेज दिसू लागले होते. मधुराच्या आईला लेकीच्या लग्नाची काळजी पडली होती. नाही म्हणायला मधुरा थोडीशी लठ्ठ वाटायला लागली होती आणि आवाजही मधूर नाही तर घोगरा पुरुषी होता.
बाळूभट निश्चिंत होते. त्यांचं आराध्यदैवत श्रीकृष्ण होते. तो श्रीकृष्ण सगळे व्यवस्थित पार पाडील यावर त्यांचा विश्वास होता. मधुरा लहानपणापासून रामायण, महाभारताच्या गोष्टी वडिलांकडून ऐकत मोठी झाली होती. आता कळती झाल्यावर लग्नाच्या चर्चेनं तिला लवकरच आयुष्याचा जोडीदार मिळणार या विचाराने रोमांचित होत होती. तिचंही आराध्य दैवत श्रीकृष्णच होतं. कृष्ण आणि राधाची प्रेमकहाणी आठवून असाच सखा आपल्याला मिळावा ही तिची इच्छा होती. मनोमन कृष्णाला तुझ्यासारखा जोडीदार मिळू दे अशी प्रार्थना करायची.
अशातच मधुराकडे फोर जी मोबाईल आला. व्हाटस् अप नि फेसबुक वर तिचा वेळ छान जावू लागला. हॉटस्टारवर महाभारत, राधेय, श्रीकृष्ण अशा मालिका पाहताना ती आनंदून जायची. एक दिवस तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. किशन नावाच्या मुलानं पाठवली होती. रुबाबदार सावळ्या रंगाच्या तरुणाचा फोटो पाठवणाराचा होता. मधुरानं रिक्वेस्ट स्विकारली.
मधुरा रोजच सेल्फी काढून अपलोड करायची. तिकडून किशन तिला "किती सुंदर दिसते!" , " एकच नंबर फोटो" यांसारख्या कॉमेंट्स न चुकता करत असे. मधुरा सुध्दा त्याच्या प्रतिसादाने आनंदून जायची व त्याला स्मायल्या पाठवायची. हळूहळू मधुरा आणि किशन जास्तच जवळ आले. रोजच चॅटिंग करत. एक दिवस फोन नंबर ची अदलाबदल झाली व चोरुन गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर गाडी प्रेमाच्या रुळावरून धावायला लागली.
प्रेमाच्या आणाभाका दिल्या घेतल्या. त्यानं लग्नाची मागणी घातली व मधुराने होकार दिला. किशन मुंबईत रहात होता. मधुरा किशनच्या प्रेमात वेडी झाली होती. त्याच्याशी लग्न करण्यासाठी ती घरुन पळाली. बरोबर काही कपडे, पैसे घेऊन एकटीच कुणालाही कळू न देता मधुरा पळून गेली.
क्रमशः
ता. क. संपूर्ण काल्पनिक कथा आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"सत्यनारायण पूजा सांगायला गेल्यावर बदाम, खडीसाखर, खारका, खोबरं, डाळ, गुळ वगैरे बरंच शिधा म्हणून बाळूभट घरी आणत. मधुरा आता मोठी झाली होती. खायला एवढं पौष्टिक पदार्थ मिळाल्यानं तिचं शरीर गोल गरगरीत, पुष्ट दिसायला लागले होते. चेहऱ्यावर जवानीचं तेज दिसू लागले होते. "

इन शॉर्ट बामनाची पोरगी उफाड्यावर आली होती.

हॉटस्टार वर काय सावधान इंडिया बघत होती?

एक नंबर लिहिलंय, जर अजून रंगवून दोन तीन पार्टस मध्ये मनीषा सारखा लिहायला हवं होतं, सस्पेन्स चालू होताच खतम झाला गोल्डन ब्राउन जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद सुशेगाद जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

अजून रंगवून दोन तीन पार्टस मध्ये मनीषा सारखा लिहायला हवं होतं,

एकदम रंगपेटी उपडी करावी म्हणता? इकडे रंगांपेक्षा छायाप्रकाश सिलुएट ट्राइ करणार असतील लेखक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0