एका फेसबुक्याचा मृत्यू -एक काल्पनिक कथा

एका फेसबुक्याचा मृत्यू -एक काल्पनिक कथा

-------------------------------------------------

तसा रूढ अर्थाने तो लेखक नव्हता

वाचन अनुभव प्रवासा मुळे त्याचे व्यक्तिमत्व बहुगामी बनलं होते

तो फेसबुकावर आला अन त्यानं एक कथा पोस्ट केली

लोकांना ती आवडली

कॉमेंट्स व लाईक्स चा वर्षाव झाला

कॉमेंट्स व लाईक्स च्या वर्षावाने त्याचा आत्म विश्वास वाढला

व तो नियमाने लेखन करू लागला

अनेक समुह होते त्यात पण त्याने सदस्यता घेतली व लिहू लागला

तिथे पण त्याचे लेखन आवडू लागले

त्याचा आत्मविश्वास पक्का झाला

आत्मविश्वासाचे रूपांतर अहंकारात कधी झाले ते त्याला हि कळले नाही

हळूहळू त्याचे लेखन आग्रही आक्रमक होऊ लागले

नकळत आपल्या लेखनाशी तुलना करत इतर सदस्यांचे लेख त्याला फिके वाटू लागले

व तो तसे कॉमेंट्स करू लागला कॉमेंट्स विखारी अपमानास्पद असायचे

इतरांना ते खटकू लागले

आरे ला कारे सुरु झाले

संवादाचे रूपांतर खटक्यात झाले

एडमिन्स कंटाळले

काही समूहात नारळ मिळाले तर काही त्याने स्वता होऊन सोडले

समूहात असताना व सोडल्यावर पण हा समूह फालतू आहे -इथे कंपूबाजी आहे -ठराविक लेखाना लाईक्स मिळतात अशी विधाने उधडपणे करू लागला

परिणाम नारळ मिळाले

मात्र आपल्या भिंतीवर लेखन चालूच होते -

पण त्यात सहजता नव्हती विखार होता राग होता

तिथे पण कुणी विपरीत कॉमेंट वा मनाजोगती कॉमेंट केला नाही तर तो त्या मित्राला हाकलून देत असे

हळूहळू मैत्री यादी रोडावली

कहर म्हणजे "ही माझी भिंत आहे माझे विचार पटत नसतील तर निघून जावे अन्यथा धक्के मारून बाहेर काढले जाईल " अशी धमकी वजा भाषा असायची

आठवड्याला पोस्ट टाकत मित्र यादी साफ करत आहे कचरा बाहेर काढत आहे असे पण पोस्ट करायचा

हळूहळू पाच पंच वीस मित्र राहिले

ते कधी भिंतीवर फिरकत नसत वा फेक होते

तो पोस्ट टाकायचा

एक वा २ लाईक्स असायचे

पुढे त्याचे असे मत बनले कि ही आभासी माध्यमे बोगस आहेत

या मुळे समाजात फूट पडते जातीयता वाढते

या माध्यमावर सरकारने बंदी घातली पाहिजे

पण असे काही झाले नाही

तो कंटाळला

त्याने फेसबुक अकाउंट डिलीट केले

आता तो अज्ञात वासात विजन वासात आहे

फेबूक मात्र जोरात चालू आहे लोक कथा कविता पोस्ट करतात

गेट टुगेदर जोरात चालू आहे

लोक फोटो अप लोड करत असता त्यांना लोक लाईक्स मारतात

इन बॉक्स मध्ये च्याटिंग चालू आहे

जीवन प्रवाही आहे कोणासाठी कोण थांबला ?

फेसबुक जीवन चैतन्यांनी भरलेले एक सळसळते वास्तव आहेले एक सळसळते वास्तव आहे

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)