सुगरणी च्या पाक गृहातुन.. एक रेसिपी

सुगरणी च्या पाक गृहातुन..
एक रेसिपी
...............
केळीचे शिकरण
साहित्य..
केळी..(जळगावची..पिकलेली..पिवळ्या सालिवर ठिबके असलेली)
तापवुन थंड केलेले दुध...(शक्यतो चितळे यांचे)
साखर
कृति
स्टील चे पातेले घ्यावे..
केळी सोलुन कुस्करुन त्यात ठेवावी..
स्टील च्या चमच्याने मॅश करावी..
योग्य प्रमाणात साय व दुध घालाले..
चवि प्रमाणे साखर घालावी..
चमच्याने मिश्रण ढवळुन एक जीव करावे..
केळीचे शिकरण तयार..
तुम्ही जर चंगळवादी असाल तर मटार उसळ सोबतिला हवी..
शिकरण..मटार ऊसळ व मऊसुत पोळ्या...
म्हणजे चंगळवादा ची परिसिमा...
...
निवेदन..समुहावरील भगीनी कदाचित म्हणतील.."केळीचे शिकरण ही काय सुगरण रेसिपी आहे का? मुळात ही रेसिपी नाहिच..
पण ही रेसिपी सुगरण च करु शकतात कारण
मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण
हे गीत आमचे म्हणणे सिद्ध करते..
तेंव्हा मस्त खा स्वस्थ रहा....
यंजोय

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मटार उसळ अपग्रेड करा ना.
सुरणाचे कबाब

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0