लघुकथा - परी

------------------------
परी
-----------------------
त्या चिमुरड्याने शेजारी नवीन रहायला आलेल्या चिमुरडीला घरी बोलावलं . खेळायला .
पोरगी भलतीच गोड होती. एखादी परी ? …
त्याच्या घरात काचेच्या हंडीमध्ये मासे होते. रंगीबेरंगी ,चमकणारे, गप्पी मासे. तिला गम्मत वाटली .
गालावर हात ठेऊन ती आश्चर्याने म्ह्णाली ,” अय्या !फिश!”
मग तिने मोजायची सुरुवात केली.” एक दोन तीन चाल .ए, चाल माशे आहेत .”
“नाही गं ! पाच माशे आहेत.”
“नाही ले, चालच आहेत.”
“तुला माइती का मला माइती? माजे माशे आहेत ! तू मोजायला चुकतीये.”
त्यावरून दोघे भांडले .ती परी गेली घरी.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला .सवयीप्रमाणे माशांकडे गेला .हंडीत चार मासे मजेत फिरत होते. पाचवा- तळाशी पांढरं पोट वर करून निपचित पडला होता.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'काली जुबान' , 'काळी जीभ' यावरती मी अजिबातच विश्वास ठेवत नाही. असा काहीसा आशय आहे की काय?
त्या चिमुरडीची बत्तीशी योगायोगाने वठली एवढेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

सामो
आपण घ्याल तसा अर्थ
लोकांनी याचे वेगवेगळे अर्थ लावले आहेत
आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद बिपिन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!