मॅटिनी

मॅटिनी
आज रविवारचा दिवस आहे,
गुलाबी थंडीचा महिना आहे
मुले पण मामा कडे गेली आहेत
आज जरा चुकारच मुड आहे............
*
नाष्ट्यास कांदे पोह्याचा बेत आहे
लिंबु पिळुन बशी वाफाळते आहे
का लाजतेस प्रिये ,भरव ना घास
आज तर राजा राणीच राज्य आहे.........
*
किचन मधे जरा लुडबूड करु दे
मदतिच्या बहाण्यान तुला सतावु देत.
गारठा जरा आज अंमळ ज्यादा आहे
स्वयंपाक घरातली उब जरा घेउ देत........
*
नको ति आज बेचव भेंडी अन गवार
कोवळी मटार सोलण्यास घेतली आहे
नारळ घालुन उसळीचा फक्कड बेत आहे,
अन्नपुर्णे, तुझ्या हाताची चव निराळीच आहे.......
*
आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे
राहु दे आवरा अवरी, आज एकांत आहे.
नाईट शो तर आपला नेहमीचाच आहे,
आज भामीनि ,मॅटिनी चा मुड आहे.........

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हाहा भारी गोड कविता आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नको ति आज बेचव भेंडी अन गवार
कोवळी मटार सोलण्यास घेतली आहे
नारळ घालुन उसळीचा फक्कड बेत आहे,

ठळक शब्दांचा निषेध! निषेध! निषेध!
आमच्यातर्फे आणखी दोन ओळी .....
.
भामिनीला नारळ खवण्यात, भांडी घासण्यात मदत केली
तरच मॅटीनीचा योग आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0