भरदुपारी

भरदुपारी पायतळीची
सावली सोडून गेली
ऊन अवघे जाळणारे
हसत ओलांडून गेली
वेदनांना लपविणारे
मुखवटे फाडून गेली
जीवघेणे भग्न सारे
सांधण्या सांगून गेली
मृगजळाला कोंडणारे
बांधही फोडून गेली
सावली वैरीण झाली,
काहिली बरसून गेली

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप भारी. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।