भावनात्मक थकवा

भावनात्मक थकवा

आजच्या तंत्रज्ञान युक्त, बदलत्या जीवनशैलीच्या जगात, ताणतणाव आणि असमाधान सगळ्याच क्षेत्रात दिसत आहे. असमाधानवाल्या ज्वालामुखीच्या तोंडावर कित्येक लोकं बसलेली आहेत. उद्योगातील गुंतागुंतीचे वातावरण आणि गळेकापू स्पर्धा यामुळे तणावात आणखीनच भर पडली आहे. लक्ष्याची पूर्तता किंवा कारकीर्दीचा विस्तार करण्यासाठी सोळा ते अठरा तास काम करून, शिवाय आठवड्याच्या शेवटा पर्यंत हे लोक काम ताणत आहेत. त्यांना आपण हे सगळं करू शकतो हे दाखवायचं आहे. गुंतागुंतीचे प्राधान्यक्रम, विषयाच्या खोलात शिरणे, गिऱ्हाईकांच्या सतत मागण्या, आणि कुटुंबाच्या गुंतागुंतीचे वातावरण या ताणात अजून भर घालते आहे.
या सर्व गोष्टींमध्ये सततची चिंता वाढली आहे. सभोवतालच्या सर्व गोष्टींसह सद्भावना हरवणे, नाराज होणे, चिडचिड वाढणे आणि रिक्तपणाची भावना होणे, सामावली आहे. सर्व गोष्टी असूनही काहीतरी कमी आहे ही भावना पाठ सोडत नाही.

ख्रिस्तीना मँसलाच, कॅलिफोर्निया विद्यापीठातील "बर्न आउट " च्या संशोधिका म्हणतात कि भावनात्मक थकवा आणि उपेक्षा यांचा लक्षण समूह म्हणजे बर्न आउट होय आणि तो सतत, लोकांसमवेत बंदिस्त वातावरणात काम करतात अशांना होतो. सतत लोकांच्या संपर्कात येणाऱ्या आणि स्वतःच्या अडचणी मनात दाबून ठेवणाऱ्या परंतु सर्व काही आलबेल आहे असा मुखवटा धारण करणाऱ्या व्यवस्थापकांना हे संकट झेलावे लागते.त्यांना विविध प्रकारच्या लोकांशी संवाद साधणे, त्यांचे संघर्ष सोडवणे, त्यांच्या आकांक्षा हाताळणे आणि निर्बंध आणि कामगिरीच्या दबावांसह वेळेवर संतुलन ठेवणे नेहमीच आवश्यक भासते.

हॅरी लेव्हिनसनच्या मते, बहुतेक लोकांना, अगदी प्रभावी व्यवस्थापकांना देखील कदाचित त्यांच्या कारकिर्दीत काही काळ बर्नआउटचे विकार होऊ शकतात. या व्यवस्थापकांना त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा स्वतःचे काम अधिक चांगले करण्याची गरज हे त्या मागचे कारण असू शकते.

समस्या मुख्यत्वे मध्य आणि उच्च स्तरावरच्या व्यवस्थापकामध्ये आढळते. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की ८० टक्के लोक चिंता आणि ५५ टक्के लोक निराशेचा सामना करत आहेत. वैद्यकीय मदत घ्यावी या साठी ते एका वर्षापेक्षा जास्त काळ थांबून राहिले. अनेक लोक हे सगळं यश आणि त्यानंतर येणारी लोकप्रियता तणावाच्या रेशमी वस्त्रा खाली लपवतात तर इतर लोक या विदारक सत्याचा सामना करण्यासाठी धैर्याने एकत्र येऊन या नकारात्मक वातावरणातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात.

या संकटांचा सामना कसा करावा हा एक मोठा प्रश्न आहे. अशा एका गोष्टीची आवश्यकता आहे जी लोकांना आधुनिक जीवनशैलीतील असंख्य आव्हानांना तोंड देण्यास मदत करेल आणिज्यामध्ये शांती आणि समाधान याच्या पूर्ततेसह बहुआयामी यश मिळेल.

अध्यात्मिक बुद्धिमत्ता यात ह्याचं उत्तर दडलेले आहे. अनुभवातून अर्थ शोधणारी ही उच्च पातळीची बुद्धिमत्ता. परिस्थितीच्या नकारात्मकतेमध्ये अडकून बसण्यापेक्षा याची कास धरली तर ते व्यापक दृष्टीकोन प्रदान करून तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याचा वस्तुपाठ शिकवते.

बुद्धिमत्ता गुणांक (आयक्यू), जी प्रामुख्याने तार्किक समस्या सोडविण्याच्या क्षमतेची प्राथमिकता निर्धारित करते, ती एखाद्या व्यक्तीच्या नोकरी मधल्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मुख्य शक्ती म्हणून कार्यरत असते. विशेष ज्ञान लागत असलेल्या काही नोकऱ्यांमध्ये एखाद्याची नियुक्ती त्यामुळे निश्चित केली जाऊ शकते.
पण संघटनांमध्ये काम सुरू झाल्यानंतर भावनात्मक बुद्धिमत्ता (ईआय) एक मजबूत प्रेरणादायी गोष्ट ठरते कारण टीमचे यश मुख्यत्वे कार्यसंघाच्या सभासदांच्या कामगिरीपेक्षा समूह गतीशीलतेवर अवलंबून असते. तथापि व्यक्ती जेंव्हा वरच्या जबाबदारीच्या पदावर चढत जाते , जिथे वस्तुपाठ घालून देणे आवश्यक असते, तिथे अध्यात्मिक बुद्धिमत्ता, आनंदी राहण्यासाठी सकारात्मकता आणि अनुकंपा प्रदान करण्यासाठी आवश्यक ठरते.

म्हणूनच, अधिकाधिक लोक अशा उच्च चेतनेच्या अंतर्गत भागांना शोधण्याचा प्रयत्न करतात कारण ते आंतरिक स्रोतांच्या शोधमोहीमा आणि त्यांच्या उपयोगाद्वारे प्राप्त होणाऱ्या चेतना याबद्दल संवेदनशील बनतात.

जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्मिकदृष्ट्या बुद्धिमान असते तेव्हा ती व्यक्ती प्रत्येक मुद्द्याकडे जागरूकतेन पाहते आणि सद्भावना व करुणा लक्षात घेऊन विश्वासाने विचार करते. त्यामुळे ती आपोआपच सकारात्मक आणि जबाबदारी घेऊन वागते. जेव्हा आपण इतरांना स्वत:चाच विस्तारलेला भाग म्हणून पाहणे प्रारंभ करतो तेव्हा त्यांची ग्रहणक्षमता आणि खुलेपणा वाढतो आणि ते सर्वांच्या फायद्याचं ठरतं.निश्चलता आणि मन:शांती आणणारे असेही त्याला ओळखले जाते. ती अव्यवस्था कमी करते आणि माहिती वर पुरेशी प्रक्रिया करायला सक्षम करते.

इथे थोडीशी सावधगिरी बाळगली पाहिजे. जरी दोन्हीं कल्पनांची हाताळणी सारखीच वाटतं असली तरी अध्यात्मिक बुद्धिमत्ता म्हणजे अध्यात्म नव्हे. प्रत्यक्षात दोन्हीं वेगवेगळे आहेत. अध्यात्म हा अभ्यासण्याचा विषय असून अध्यात्मिक बुद्धिमत्ता प्रश्न सोडवण्यासाठी अंमलात आणायचा क्रियात्मक भाग आहे. म्हणून अध्यात्माच्या खोल बाबींचा अभ्यास न करता आणि त्यांत प्राविण्य न मिळवताही अध्यात्मिक बुद्धिमत्ता आपण अंमलात आणू शकतो आणि त्या द्वारे भावनात्मक थकवा घालवू शकतो.

_____

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे विवेचन चांगले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मराठी असामी