चाॅकलेटं

चाॅकलेटं

चाॅकलेटं, नानाविध प्रकारांची नानाविध आकारांची
चमकदार रंगीत कागदांतली, लोभविणाऱ्या स्वादांतली

काही कडू, काही गोड, काही फक्त मिट्ट गोड
काहींचा श्यामल वर्ण, काहींचा गौर रंग
चवीपरींचे त्यांचे किती सुरस अंतरंग

काही साधीशीच, गोल अथवा चौकोनी
एखादं सुंदरसं हृदयाकृती रूमानी

काही दिसतात कडू, अंतरी बदाम अन् बेदाणे
काहींचे फक्त वरवरचे मधुर चवींचे बहाणे

काही खूप प्रिय असतात, मनापासून आवडतात
कितीही लाभली तरी थोडी कमीच वाटतात

पुरवून पुरवून खाल्ली तरी, संपतातच कधीतरी
प्रत्येक नात्याला शेवट हा असतोच कुठेतरी

चाॅकलेटची चव मग रेंगाळत राहते जिभेवर
आठवणीही राहतात सोबत, साय धरत मनावर.

कांचन

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

सु-रे-ख!!! यमी!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

रूपकात्मक कवितेचे एक उदाहरण म्हणून ही कविता शाळेतल्या टेक्स्टबुककरता निवडण्याजोगी वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक मराठी असामी

शाळेतल्या टेक्स्टबुकात(च) छापण्याच्या लायकीची आहे खरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीच्या पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट होणे ही खरंतर सन्मानाची बाब. अनेक दिग्गज कवी कवयित्रींच्या दर्जेदार, गाजलेल्या कवितांचा यापुर्वी पाठ्यपुस्तकात समावेश झालेला आहे. विद्यार्थ्यांना समजेल, आवडेल अशा सोप्या भाषेत असूनही, त्या अतिशय आशयपूर्ण होत्या.
याव्यतिरिक्त कविता आवडणं, न आवडणं सर्वस्वी वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0