V स

तू आठवतेस
आणि कित्ती आठवत जातेस आठवताना याचं आश्चर्य वाटतं.

इतक्या गप्पा झाल्या?
इतकी पत्रं आली, गेली?
आकर्षणबिंदू असेल एखादा,
भिंगातून तपास केल्यावर सापडेलही -
तू पर्वताएवढी वाटली नाहीस तरी
मी मुंगीएवढी वाटत राहिले मला.

पहिला दिवस
खिडकीबाहेर तुझा आवाज -
खिडकीखाली तू
गोबऱ्या गालांवर घसरणारी सकाळ,
शुभ्र पातळ शर्टचा रंग बदलणारं ऊन ...

माझ्या काळ्या डोळ्यात तेव्हा
पडलेल्या पांढऱ्या ठिपक्यामुळे तू इतकी आठवतेस का?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे नक्की काय आहे?

(नाही म्हणजे, मला कवितेतले काहीही कळत नाही, हे आतापावेतो जगजाहीर आहे, परंतु, इतकेही कळत नसेल, याची कल्पना नव्हती. जाणवून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू आठवतेस
तू पर्वताएवढी वाटली नाहीस तरी
या दोन ओळीवरुन तु

मी मुंगीएवढी वाटत राहिले मला.
या ओळीवरुन मी

या दोन्ही मी व तु स्त्री पात्रे आहेत असे वाटते.
मग हा लेस्बीयन प्रेमाचा अविष्कार असावा असे प्रथमदर्शनी तरी वाटते.

बाकी मला कवितेतील नबा इतकी ही कळत नाही
पण एक आपला अंदाज्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

ती "spelling mistake" आहे का?
मारवाजींना कळते तितकी सुध्दा कविता न कळणारा पण तरीही अंदाज करणारा,

आपलाच,
जुमलेंद्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नात आहे ती, मोतीबिंदू पडलाय आज्जीच्या डोळ्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

...नात पर्वताएवढी नि आजी मुंगीएवढी कशी असेल?

आणि, मोतीबिंदू, की डोळ्यात पडलेले फूल?

मोतीबिंदू पर्मनण्ट नसतो कै... ऑपरेशन करून ठिकऱ्याठिकऱ्या करतात, मग त्या ठिकऱ्या शोषून घेतात, नि मग त्या (बोले तो ज्यातून डोळ्याचे वरिजनल भिंग ठि.ठि. करून काढलेले असते त्या) पिशवीत प्लॅस्टिकचे फ्लेक्झिबल भिंग टाकतात. मग लख्ख दिसू लागते. (स्वानुभव!)

व्हेअरॲज़, डोळ्यात फूल पडणे इज़ पर्मनण्ट ड्यामेज.

एकंदरीत, स्पष्टीकरण नाही पटले. (त्यामानाने, मारवाश्रींचे स्पष्टीकरण गेला बाजार रोचक तरी आहे. भले तो कवयित्रीचा वरिजनल इण्टेण्ट असो वा नसो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्रर्र्र
फार म्हणजे फारच चुकीचा अंदाज निघाला हो माझा
हे म्हणजे मला खरोखर लज्जित वाटत आहे
कुठे नात आजी आणि कुठे माझ्या डोक्यात काय येतय्
हेच ते हेच ते पापी मनवा के पापी खयालात्
आजी नात हे डोक्यात आलच नाही माज्या
ते आकर्षणबिंदु मुळे सुद्धा मी चकलो तिथे ही मला सेन्सुअल वाटली
म्हणजे आकर्षणबिंदु च्या नादात आजीचा मोतीबिंदु डोळ्याआड झाला.(माझ्या डोळ्याआड )

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

भिंगातून तपास केल्यावर सापडेलही -

कवयित्री शास्त्रज्ञ आहे..
ऐसीवरच्या शहाण्यांनो..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आरर्र्र आसं हाय व्हय!!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

सूक्ष्मदर्शकाच्या भिंगातून पाहिल्यावर मुंगी पर्वताएवढी दिसेलही कदाचित. (कदाचित नव्हे, दिसेलच.)

पण... पण... पण..‌.

इतक्या गप्पा झाल्या?
इतकी पत्रं आली, गेली?

मुंग्या पत्र कधीपासून लिहू लागल्या?

नि मुंग्यांशी गप्पा??? कवयित्रीला निश्चित भास होत असले पाहिजेत!

(एकंदरीत, हेही स्पष्टीकरण झेपले/जँचले नाही.)

एक शक्यता आहे. सूक्ष्मदर्शकाऐवजी साध्या भिंगातून उन्हातल्या मुंगीकडे पाहताना मुंगी पेटली असेल. मग हे असे कसे झाले, म्हणून कवयित्रीने त्याच भिंगातून कल्प्रिट सूर्याकडे रागाने पाहिले असेल. (कदाचित डोळ्यातल्या फुलाचे कारण ते असू शकेल.)

पण मग क्रोनॉलॉजीचा प्रॉब्लेम येतो. कारण, याचा अर्थ, मुंगीकडे पाहताना कवयित्रीच्या डोळ्यात फूल नव्हते. ते नंतर आले. एकंदरीत, अगम्य आहे सर्व. असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला समजलेली कविता/ललित

//
वेनेशिया नावाच्या मुलीस उद्देशून ललित एका आजीचे.

मला आता हालता येत नाही, डोळे अधू झालेत. खिडकीजवळच्या बेडवरती ठेवले आहे वेळ जाण्यासाठी. या रस्त्यावरून फारसे कुणी जात नाही पण शाळेला जाणारी गोबऱ्या गालाची वेनेशिया खिडकीसमोर हसून जाते. तेवढाच एक विरंगुळा. नंतर कधीतरी दुपारनंतर घरी परत जाताना खिडकीकडे पाहातही असेल पण मी झोपलेली असते खिडकीवर फिरणाऱ्या मुंग्या बघत.
----
तुझी एक पर्वताएवढी आठवण म्हणून एक ललित पाठवले आहे ऐसीला. तिकडे मला मुक्ता आत्या म्हणतात. कुणी हान्स अँडरसनच्या परीकथा वाचल्या असतील त्यांना आवडेल.
झोपते आता. //

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुक्ता_आत्ता हा आचरटबाबांचा डुआयडी आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आँ!!! कमालच केलीत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

दुरुस्ती केलीय @'न'वी बाजू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण इतकेही वाईट असाल, असे तसेही खरोखरच वाटले नव्हते, परंतु स्पष्टीकरणामुळे दिलासा मिळाला. आजन्म उपकृत राहीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं ,
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी