इडली, ऑर्किड आणि प्रकाश वाटा

इडली, ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत
प्रकाश वाटा -- प्रकाश आमटे

मागे एकदा दोन पुस्तक एका पाठोपाठ वाचली. दोनीही आत्मकथा, अतिशय भिन्न क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची
पहिले पुस्तक प्रकाश आमटे यांचे "प्रकाश वाटा". पुस्तकात प्रकाश आमटे त्यांच्या गडचिरोली प्रकल्प बद्दल भरभरून लिहितात. पुस्तकाची ठेवण chronological न ठेवता, प्रत्येक chapter हा कुठल्यातरी उपक्रमावर लक्ष केंद्रित करतो. अश्या आखणी मुळे वाचतांना कुठली घटना कधी झालीये हे जरी लक्षात नाही आलं तरी लोक बिरादरी प्रकल्पावर किती प्रकारची आणि कशी काम केली गेली हे व्यवस्थित लक्षात राहतं. बाबा आमटेंचा वारसा मिळाल्यामुळे, समाजाकडून जेवढे घेतले त्यापेक्षा कितीतरी अधिक सतत भरभरून परत करत राहणे हा प्रकाश आमटेंचा पिंडच असणार.

विठ्ठल कामत मात्र पूर्णपणे दुसऱ्या जगात वावरतात. कामात अश्या व्यवसायात आहेय जिथे भौतिकता (materialism) हा norm आहे. असा असला तरीही, Kamat commands his due respect and credit for the conceptualisation of the ECOTEL hotel. पुस्तक हातात घेतल्यावर आपण कामतांच्या ५० वर्ष्याच्या प्रवासाला सुरुवात करतो. प्रत्येक chapter या प्रवास मधल्या घटनांची, कामत यांनी लावलेल्या युक्त्यांची मांडणी आपल्या समोर करतो.

कामत आणि आमटे जरी दोन वेगळ्या ग्रहावरून आल्यासारखे वाटावेत इतके वेगळे असले तरीही दोन्ही पुस्तकांमधून या दोघांच्या प्रवासातलं साम्य खूप प्रकर्षाने जाणवतं

दोनीही पुस्तकं वाचतांना मला असा सारखं वाटत राहिलं कि बरोबर आहे नं - घरून ज्या गोष्टींचा बाळकडू मिळतो तिच गोष्ट तुम्हाला एवढा मोठं करू शकते. म्हणजे फक्त बाबा आमटेंकडेच प्रकाश आमटे जन्माला येऊ शकतो आणि व्यंकटेश कामतांसारख्या नावाजलेल्या hotelier कडेच विठ्ठल कामत जन्माला येतो (आपल्याबाबतीत आपण नक्की अभिषेक बच्चन झालो असतो हे सत्य अलाहिदा.)

बाळकडू असला तरीही त्याच्यापेक्षाही महत्वाचे काही असेल तर माणूस स्वतः. शेवटी बाबा आमटे आणि व्यंकटेश कामत यांनी सुरुवात शून्यातूनच केली असेल.
एक दुवा जो या दोघांना सामान्यांपेक्षा वर नेतो तो म्हणजे "ध्येय". स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतांना नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "what is your goal ?". Mostly त्या वयात goal म्हणजे नक्की काय हे कळत नाही किंवा हा प्रश्न फारसा कोणाला पडत नाही, पडला तरी त्याचे उत्तर नसते आणि इतक करून तुम्ही उत्तर दिल तर ते कधीच बरोबर नसते हा भाग वेगळा. हे दोनीही पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं कि ध्येय म्हणजे तुम्हाला काय करायच आहे याची clear definition. "मला वर्ल्ड क्लास हॉटेल बनवायचे आहे" किंवा "मला गोंड समाजासाठी हॉस्पिटल उभं करायचं आहे" हे ध्येय. CLEAR. PRECISE.

दुसरी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे - ध्यास (passion). काहीही झालं तरी मी हे हॉस्पिटल उभं करणारच. मग मला फक्त वरण पोळी खाऊन वर्षानूवर्ष काढावे लावले तरीही चालेल. कामत पण हेच सांगतात मी हे हॉटेल उभे करणारच त्या करता कर्जबाजारी होऊन रस्त्या वर झोपावं लागलं तरी चालेल. दिवस रात्री एकाच ध्येयानी झपाटलेल्या अश्या लोकांना वेडं म्हणाव कि passionate हे कधी कधी काळत नाही.
सगळ्यांनाच हे ध्येय आयुष्यात सापडतं असं नाही. सगळ्यांना, आपल्याला ध्येय सापडाव असं वाटतच असं नाही. पण असं ध्येय सापडायला पण नशीब लागतं असेल. कदाचित खूप वेग वेगळ्या गोष्टी करून बघितल्यावर कदाचित आपल्या आयुष्याचं ध्येय कळत असेल आणि हेच फक्त आपल्या हातात आहे.

What sets Kamat and Apte apart from rest of the world is also the clear vision.
बऱ्याच लोकांना हे कळतही असेल कि हेच आपले ध्येय पण किती लोक त्याच्या करता आपला पूर्ण आयुष्य पणाला लावू शकता. कामतांनी वर्ल्ड क्लास उभे करण्याचे स्वप्न त्यांच्या आयुष्यात खूप लवकर बघितले. ते पूर्ण कसे करायचे हे त्यांना तो रस्ता पकडल्यावर कळत गेले. आणि मग हॉटेल करता जागा मिळणे, वेळेत कर्ज मिळणे हे घडत गेले.. कदाचित त्यांनी घडवून आणले हे जास्त बरोबर आहे. जसं पाउलो कोहेलो "The Alchemist" मध्ये म्हणतो तसं - When you want something, all the universe conspires in helping you to achieve it.

अजून एक धागा जो या दोघांना जोडतो तो म्हणजे या दोघांनाही मिळालेली कुटुंबाची साथ. आई वडिलांनी मुलांवर दाखवलेला विश्वास मुलांना किती शक्ती देऊ शकतो हे दोनीही उधाहरणातून कळते. आमटे परिवाराकडे तर हि परंपराच सुरु असल्या सारखी वाटते कि मुलाला "literally" मोकळा रान द्यायचं आणि रान म्हणजे अगदी रानच. गडचिरोलीचा प्रकल्प बाबा आमटेंनी प्रकाश आमटेंना दाखवला पण फक्त तितकंच. प्रकल्प सुरु कसा करायचा हॉस्पिटल पहिले कि शाळा ... लोक पहिले कि प्राणी हे सगळे प्रश्न प्रकाश आमटेंनी स्वतः सोडवले. पालकांकडून अजून काय अपेक्षित असतं? Guidance, Support आणि आपल्या मुलांवर विश्वास. तीच गोष्ट कामतांकडे. वडिलांचा कितीही धाक असला तरीही, व्यंकटेश कामत आई वडिलांनाकडेच वळून बघतात. Orchid लवकर पूर्ण करायची जिद्द पण कामतांना वडिलांच्या आजार पण मुळेच मिळाली.

तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनीही मिळालेली बायको ची साथ. मंदाकिनी आमटेंना तर लग्न करतांनाच माहित होतं कि remote जागे वर जाऊन राहायचं, तिथे सर्वस्व झोकून काम करायचं, मुलांना सांभाळायचं आणि असा झपाटलेला नवरा सांभाळायचा आणि हे असा दिव्य पार पाडणं त्यांनी स्वीकारलं हे प्रकाश आमटेंचं नशीब. पद्मा कामतांचा नवरा तर “well-to-do” होता. तरीही वेळ आल्यावर, त्या समर्थपणे कामतांच्या मागे उभ्या राहिल्या आणि या सगळ्यांची झळ मुलांपर्यंत पोहचू दिली नाही.

कोणालाही आपल्या कुटुंब करून अजून काय अपेक्षित असतं?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या दोघांच्या मुलाखती टीव्हीवर दाखवल्या गेल्या. वाचनालयांत त्यांच्या पुस्तकांना सतत मागणी असते आणि कौतुक होत असतं. आमटेंच्या प्रकल्पांना भेटीसाठीच्या सहली आगावू आरक्षित असतात. खूपच चर्चेत असतात.
पुस्तकांतून लोकं स्फूर्ती घेत असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या जुन्या खेळाचे पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे. (दुवा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१- नबा , प्रेमळप्रतिसाद , लाइक्स
२- नबा, सरळप्रतिसाद, गोडबोले
३- नबा 1
3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

..

नबा, सरळप्रतिसाद, गोडबोले

असंबद्ध शब्द मांडणे अशी स्पर्धा आहे, विरुद्धार्थी शब्द अशी नव्हे.

त्यामुळे केवळ

'न'बा, न'बा, न'बा

हेही परफेक्ट होईल.

कसे नबा?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...हे लक्षात आले असेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश आमटे, विठ्ठल कामत आणि ऐसी.

---

लहान वयात मला कार्व्हर वाचून आनंद वगैरे झाला होता. आता कंटाळा येतो. शिवाय असल्या प्रेरणादायक एकोळींचा लिंक्डइन, फेसबुकवर सुक्काळ असतो. ते कमी म्हणून का काय, स्वतःवर फार खुश असणारे दोन लोक गेल्या आठवड्यात भेटले. अजीर्ण झालं.

पुपुल जयकरांनी लिहिलेलं इंदिरा गांधींचं आवडलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लहानपणी काही आत्मचरित्रं वाचून पण आपले विचार वगैरे बदलल्या सारखे वाटले होते. आता प्रेरणादायक आत्मचरित्रांमध्ये "where is the catch?" हाच प्रश्न जास्त राहतो डोक्यात. also it takes time to understand "victory is written by victors" but that does not mean there are no failure stories. rather 1 sucess story may have 100s of untold failure stories.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिचे/ज्याचे चरित्र लिहायचे, तिचे/त्याचे आयुष्य खरोखरच प्रेरणादायक असते/आहे काय, हा केवळ एक प्रश्न झाला. (आणि तो रास्त असू शकेलही.) मात्र...

१. दुसऱ्याचे चरित्र लिहिणाऱ्यांचे स्वतःचे आयुष्य कितपत प्रेरणादायक असते, याबद्दल कुतूहल आहे. (किंबहुना, आपल्या स्वतःच्या आयुष्यात काहीही प्रेरणादायक नाही - साध्या मराठीत सांगायचे झाले, तर आपल्याला कोणी हिंग लावून विचारीत नाही - हीच जाणीव बहुतांश परचरित्रांमागील प्रेरणा असावी काय?)

२. कमिशन्ड चरित्रे - सांगणारे सांगणार, लिहिणारे लिहून घेणार (मराठीत: 'शब्दांकन करणार') - हा त्यापुढचा रोचक प्रकार.

३. राहता राहिली गोष्ट आत्मचरित्रांची. एखादी व्यक्ती आत्मचरित्र लिहिण्यास उद्युक्त होण्यामागची प्रेरणा काय असावी? (खरेच, कोणी आत्मचरित्र का लिहावे? Unless one strongly feels that one owes the world an explanation?)

४. याव्यतिरिक्त, दुसऱ्याचे चरित्र वाचून (येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येक) तिसऱ्याला ते वाच (नि त्यातून बोध घे), म्हणून उपदेश करत सुटणारी एक जमात असते. (ममवंमध्ये, वयोवृद्धांत नि कऱ्हाडे ब्राह्मणांत यांचा विशेष प्रादुर्भाव आहे.) यांच्या आयुष्यात मात्र 'आज सकाळी मी शिंकत असताना पादलो' इतकेही दूरान्वयानेसुद्धा रोचक अथवा मनोरंजक असे काही घडत नसावे (उद्बोधक वा प्रेरणादायक तर फार पुढची गोष्ट झाली!), याची जवळपास खात्री आहे. ('चरित्र' वा 'आत्मचरित्र' कॅटेगरीत मोडत नसला, तरी डेल कार्नेगी हा सहसा असल्या लोकांचा फेवरिट लेखक असतो, असे सामान्य निरीक्षण आहे. चूभूद्याघ्या.)

(या जमातीची आणखी एक खासियत म्हणजे, ज्याच्या/जिच्या चरित्राचा पुरस्कार करतात, त्या व्यक्तीचे पुढे दैववशात् जर ग्रेसपतन झाले, तर त्याचेही त्यांना सोयरसुतक नसते. झटक्यात आपण असा पुरस्कार करीत होतो, हे (सोयिस्करपणे) विसरून जातात, नि दुसऱ्या कोणाचा पुरस्कार करू लागतात. (पण गप्प होत नाहीत.))

असो चालायचेच.

..........

भले ते स्वतः लिहिलेले असो, वा तिसऱ्याकडून 'शब्दांकन करवून'१अ घेतलेले असो.

१अहवाई अवतरणचिन्हे माझी.

माझ्यासारखा एखादा असेल, तर त्याही परिस्थितीत आत्मचरित्र लिहिणार नाही. जग गेले तेल लावत. (आणि, तसेही, कोणाला काय पडलेय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३. राहता राहिली गोष्ट आत्मचरित्रांची. एखादी व्यक्ती आत्मचरित्र१ लिहिण्यास उद्युक्त होण्यामागची प्रेरणा काय असावी? (खरेच, कोणी आत्मचरित्र का लिहावे? Unless one strongly feels that one owes the world an explanation?
हा प्र्श्न आवडला यावर जेव्हा विचार करु लागलो तेव्हा मला वाटलेल्या प्रेरणा
१-
कधी कधी काही आत्मचरीत्रे स्व बाह्य कारणासाठी लिहीली जात असावी म्हणजे आम्ही आणि आमचा बाप सारखी आत्मचरीत्रे लिहितांना लेखकाला स्वत: विषयी बोलण्याची बेसीक हौस तर असतेच पण त्या पलीकडे आपण ज्या कम्युनिटीचे प्रतिनीधी आहोत तीला ॲड्रेस करणं आपल्या जगलेल्या आयुष्याच्या माध्यमातुन हा ही एक भाग असतो. असु शकतो.
२-
एक सर्वसाधारणपणे असेही असु शकते की एक मोठा प्रवास झाल्यावर विशेषत: एखाद्या क्षेत्रात तर त्या व्यक्तीला आपले आयुष्य शेअर करण्याची उर्मी दाटुन येत असावी त्याला त्या क्षेत्रातुन त्या मंडळीतुन ही " भाउसाहेब आपलं वादळी आयुष्य जगासमोर यायला हवं ' हा आग्रह होत असेल ही ही एक प्रेरणा असेल.

काही आत्ममग्न नारसिस्टांना असेही वाटत असेल की ( म्हणजे तुम्ही म्हणता त्या एक्सप्लनेशन पेक्षा वेगळी प्रेरणा ) की मी जे काही जगलो ते इतकं विलक्षण आणि प्रेरणादायी आहे की ते मी जगाबाहेर जायच्या अगोदर जगासमोर गेलच पाहीजे नव्हे ते अत्यावश्यकच अस माझ कर्तव्य च आहे असही वाटत असेल.
४-
काही आयुष्यात सर्व गमावुन बसल्यावर आत्मचरीत्र लिहुन च शेवटची प्रसिद्धी शेवटचा इनकम सोर्स म्हणून ही प्रेरीत होत असावीत काहींना कॅथार्सिस ची गरज काहींना आत्मपरीक्षणाची ही उर्मी असेल आत्मचरीत्र लिहीण्यामागे
आपुलाच संवाद आपणासी टाइप तसेही डायरी लिहीणारे लोक ही आत्मचरीत्र एक प्रकारच लिहीतच असतात की
असे अजुन काय काय विचार आले डोक्यात्
बाकी काही आत्मचरीत्रे \ चरीत्रे फार आठवतात जगाच्या पाठीवर मधील बाबुंजीची गरीबी संघर्ष मनाला चटका लावुन जाते. कार्व्हर पुस्तक मी मोठा झाल्यावर वाचल अजुन इतका मोठा झालो तरी मी जेव्हा केव्हा वाचतो तेव्हा माझे डोळे पाणावतात मन भरुन येत मी त्या व्यक्तीमत्वाच्या भव्य चांगुलपणाने भारावुन जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

इडली,आर्किड हे हॉटेलिंगचे (रेस्टॉरंट्स),सुरू करून चालवण्याचे अनुभव असतील तर काही वाचकांनी आत्मचरित्र म्हणून चुकीचा प्रसार केला असेल का?
मग तसे अनुभव अवश्य लिहावेत. अर्थात ते कुणाला प्रेरणा मिळावी म्हणून नसतील. सर्व जण काही एकाच क्षेत्रात नसतात पण तिकडे काय चालते याची उत्सुकता म्हणून वाचत असतील.
अम्हाला सर्कस पाहाण्याची आवड होती तेव्हा सर्कसच्या जीवनावरचे दामू धोत्रेचं पुस्तक आवडीने वाचलं होतं. प्रेरणा वगैरे काही घेतली नाही. ( मी आणि भाऊ जोकरांच्या गंमती घरी करून पाहायचो. त्यात पादल्यावर पावडर कशी उडते ते काही जमले नव्हते तरी पायांत पावडरचा डबा धरून लपवून दाबून पावडर उडवायचो. मग या प्रेरणेसाठी मार मिळाला होता. अरेच्या, तो पॉन्डसचा ब्रँड अजून चालू आहे की!!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जयकरांनी इंदिरा गांधींच्या निर्णयांची केलेली समीक्षा किंवा चिकित्सा असंही म्हणता येईल.

प्रेरणादायी वगैरे मला फार काही वाटत नाही; पण साधारण आपल्यासारख्या परिस्थितीत असणाऱ्या, विचार करू शकणाऱ्या लोकांचे विचार ऐकायला मला आवडतं. स्वतःची ओळख आणखी पटते.

"प्रेरणादायी" लोकांमुळे असा फायदा होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय चुका केल्या/झाल्या मग कशा निस्तरल्या हे सुद्धा उपयोगाचे. काही गोष्टी फक्त चरित्रनायकास माहीत असतात त्या म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला प्रेरणादायी पुस्तके मनापासुन आवडतात.
पण प्रेरणादायी चरीत्रग्रंथांपेक्षा प्रेरणादायी तंत्रग्रंथ अधिक आवडतात.
म्हणजे एखादे तंत्र शिकवणारे पुस्तक असेल तर ते अंमलात आणण्याची प्रेरणा मिळते जीवन काही अंश का होइना बदलते सुधारते
चरीत्रग्रंथातील व्यक्तीविषयी विपरीत माहीती तथ्य समोर आल्यास प्रेरणा कितीही का असेना काही प्रमाणात तरी पातळ होते तिच्यापासुन मिळणारी उब कमी होते. चटकन आठवणारे उदाहरण म्हणजे लान्स आर्मस्ट्राँग
तंत्रग्रंथ सहसा निराश करत नाहीत फार तर काही तंत्रे अपरीपक्व अव्यवहार्य असल्याने प्रत्यक्ष अंमलताना कुचकामी ठरतात
तर
चरीत्र नव्हे तंत्र हा माझा मंत्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

लान्स आर्मस्ट्राँगच उदाहरण अगदी बरोबर आहे. His downfall was epic.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.maayboli.com/node/47097
.
ह्यातल्या प्रतिसदांतील काही भाग --
मजा अशी की, पुस्तकातला एकही शब्द (प्रस्तावना वगळता) पुस्तकावर लेखक म्हणून ज्याचं नाव आहे, त्यानं लिहिलेला नाही. पुस्तक लिहिलं आहे शोभा बोंद्रे यांनी. आणि या कामाचं श्रेय काही त्यांना मिळालं नाही. लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली ती पुस्तकाच्या नायकाला. वर प्रस्तावनेतली ती वाक्यं. शोभा बोंद्रे यांनी या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
.
.
ह्याशिवाय, हा अजून एक प्रतिसाद --
.
.
बापरे, हे आत्ताच वाचतेय. इडलीवाले खरोखरंच भामटा माणूस आहे. माझ्या लेखनाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात हा माणूस मला एका अ‍ॅप्रोच झाला, माझ्याकडे मॅनेजमेन्टचे खूप फंडे आहेत जे लोकांना उपयोगी पडतील, तर ते तुम्ही शब्दांकित करा, आपण लेखमाला करु म्हणून. मी एकुण वीस भाग आधी करुन द्यावेत आणि मग एक एक भाग प्रसिद्ध झाला की तुमचे पैसे देत जाऊ असा करार (तोंडी) झाला. पहिला भाग छापून आला आणि त्यात शब्दांकन म्हणून कुठेही माझे नाव नाही. इडलीवाल्यांच्या म्हणण्यानुसार ती उ.सं.ची डुलकी. मग दुसरा भाग आला. त्यातही नाव नाही. मी छापून आलेल्या भागाचे पैसे मागीतले, तर दहा भाग झाले की एकदम चेक देऊ वगैरे. दहा भागांनंतर माणूस भेटेनाच. परदेशातले दौरे चालू आहेत असं त्यांचा सेक्रेटरी सांगायला लागला. वीस भाग छापून आल्यावर मग तीन महिन्यांनी ऑर्किड हॉटेलात बोलावून चेक सुपूर्द केल

महिन्यानी मला फोन. आपण याचे पुस्तक करायचे आहे. माझ्याकडे भरपूर अजून मटेरियल आहे, ते वापरु. तुम्ही येऊन जाल का? मी गेले. त्याच्याकडे मॅनेजमेन्टच्या इंग्रजी पुस्तकांतून ढापलेला मजकूर. म्हणाला. हे माझे अयुष्यभराच्या चिंतनाचे (!) सार. तुमच्याकडे सुपूर्द करतो. आपण झकास पुस्तक करायच
याला म्हटले हे अमुक इंग्रजी पुस्तकातले आहे. अधिकृतरित्या अनुवादाचे हक्क मिळवा. मी अनुवादक म्हणून काम बघीन. तसा इडलीवाला मनातून चिडला. पण हट्टाला पेटला होता. म्हणाला. तुम्ही फारच सुंदर लिहिलित लेखमाला म्हणून काम तुम्हिच करावं अशी इच्छा आहे. मजकूर ओळखू येणार नाही अमुक पुस्तकातला अशा तर्‍हेने बदला म्हणजे कोणी हरकत घ्यायचे नाही. आम्हीही असेच करतो हो. इतर सुप्रसिद्ध शेफ्सच्या रेसिप्यांमधे चेंज (हे त्याचेच शब्द). म्हटलं नाव द्यायला हवे मुख्य कव्हरवर. आणि लेखी करारपत्र द्या, अ‍ॅडव्हान्सही लागेल. मग कामाला सुरुवात करीन. आता गडबडला. म्हणाला पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. आजतागायत गायब. नंतर त्याचं पुस्तक आलंच. व्यवस्थापनाचे मूलमंत्र सांगणारं.

इडलीवाला खतरनाक भामटा आहे यात वादच नाही.
Submitted by शर्मिला फडके on 3 June, 2014 - 13:02

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे ओव्हरॉल भामटेगिरीचा अभ्यासक्रम म्हणता यावा.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

हे मायबोलीवरचे अगोदर वाचले आहे.
पण लोकांनी स्वत:ची फसवणूक करूनच घ्यायची म्हटल्यावर आपण काय करणार? आणि मग मी फसलो फसलो.
त्यांच्याबद्दल दोनतीन धागे आले होते. पण तो फसलेल्यांनी व्यक्त केलेला वैताग वाटला.

त्यांच्या एका हॉटेलात मिनरल पाण्याच्या बॉटल किंमती विरुद्धची केसही कामत जिंकले. एवढंच नाही तर सर्व हॉटेलिअरांना त्याचा फायदा झाला.

कामत स्वत: कायद्याचे चांगले जाणकार असावेत किंवा योग्य वकील ठेवत असावेत.

मोठा धंधा करणाऱ्याने आपले हित बघावे, जागरुक राहावे, कायद्याने सुरक्षित राहावे हे करू नये का? एक दोन ठिकाणी चुकलेही आहेत/असतील तरीही आगामी होतकरू व्यवसायींनी धडा घेण्यासारखा आहे. आता हे सल्ले त्या चरित्रात दिले नसतील किंवा इतर असे किस्से सांगितले नसतील तर एक ललित पुस्तक ठरावे.
--------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लेखाचा विषय लेखकाने त्या पुस्तकातून स्फुर्ती मिळवली हा आहे. तर ओके छानच.

बाकी "खतरनाक भामटा आहे यात वादच नाही. अशा टीका कुठे फेकणे वेगळे आणि त्रस्त व्यक्ती भामटा आहे सिद्ध करू न शकणे वेगळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याच्याकडे मॅनेजमेन्टच्या इंग्रजी पुस्तकांतून ढापलेला मजकूर. म्हणाला. हे माझे अयुष्यभराच्या चिंतनाचे (!) सार. तुमच्याकडे सुपूर्द करतो. आपण झकास पुस्तक करायच
याला म्हटले हे अमुक इंग्रजी पुस्तकातले आहे. अधिकृतरित्या अनुवादाचे हक्क मिळवा. मी अनुवादक म्हणून काम बघीन.

साहेबांच्या शोधनिबंधातले किडे काढता काढता हे असेच होते आहे. प्लॅग के मम्मी का डोळा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. बऱ्याच लोकांनी नमूद केल्या प्रमाणे इडलीवाले भामटे असतील हि. पण इथे प्रयत्न फक्त आणि फक्त दोन्ही पुस्तकांमध्ये साम्य दाखवायचा होता. त्यांच आयुष्य निष्कलंक होत कि नाही यावर माझा अभ्यास नाही. पुस्तकाला facevalue वर घेऊन लेख लिहायचा प्रयत्न केला एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बराच विचार करायला लावल्याबद्दल @ अहम्_लिखामि, @ 'न'वी बाजू, @मन१ धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0