निळाई

निळी भेटते सावली हरवलेली
जिथे गात आभाळ वाऱ्यासवें
जिथे जोजवीती जुन्या वेदनांना
निळ्या चांदण्यांची नवी आर्जवे

निळ्या पर्वतातील वाटा विराण्या
किती नागमोड्या कथा सांगती
किती सावळे ते उसासे कळ्यांचे
निळ्या पावलांचे ठसे सांगती

सरे वाट जेथे तिथे देवराई
निळे तेथले बिंब पानांतले
निळा भास दाटें नभीं भारलेला
सरे चांदणे सावल्यांचे खुळे

field_vote: 
0
No votes yet