सामाजिक

स्त्री लैगिंकतेचा 'ब्र'

वेगवेगळ्या मराठी संस्थाळावर अनेकवेळा स्त्रीच्या लैगिकतेविषयी चर्चा झालीय. यात अनेक पुरुष सदस्यांची मते पाहण्यात आली. बरेचदा ती मत अचाट, अतर्क्य वाटली. "स्त्रीला कामभावना नसतात. ती थंड असते. ती पुरुषाच्या भावनांचा विचार करत नाही परिणामी त्याच्याशी समरसून रत होत नाही." इत्यादी अनेक तारे तोडलेले वाचले आहेत.
फार कमी वेळा स्त्री सदस्या मते मांडतात. कारण संकोच, भीती, उगाच कशाला वाद घाला...पण सख्यंनो तुम्ही पण तुमची मते मांडा.
आज पुन्हा एकदा या विषयावर थेट चर्चा सुरु व्हावी असे वाटते आहे. कारण एकच पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे. तस होणं अवघडच आहे तरीपण.

Taxonomy upgrade extras: 

स्त्री-मुक्ती: एक थोतांड

स्त्री आणि पुरुष हे भेद अनादि काळापासून आहेत. कित्येक सहस्रकांपूर्वी मनू हा जो एक थोर तत्त्वज्ञ होऊन गेला, त्याने ह्या विषयाचा सांगोपांग विचार करून ‘मनुस्मृती’ नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्याने ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ असा अत्यंत मौलिक विचार मांडला आहे. आधुनिक काळात मात्र काही स्त्रिया पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या आहारी जाऊन मनूबद्दल गैरसमज करून घेऊ लागल्या आहेत. ‘स्त्री-मुक्ती’ हे त्यांनीच आणलेलं थोतांड आहे. स्त्री ही कधीच मुक्त असू शकत नसल्यामुळे ‘स्त्री-मुक्ती’ हा वदतोव्याघात आहे.

Taxonomy upgrade extras: 

ब्राम्हणी पितृसत्ता आणि सोशल मीडिया

भारताबाहेर राहून, उच्चजातीत जन्माला येऊन किंवा 'एसी ऑफिसात गुबगुबीत खुर्चीत बसून'ही भारतात, आपल्या घरापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या वस्तीत आणि अगदी आपल्या शेजारच्या खुर्चीत बसलेल्या सहकर्मचाऱ्यांच्या मनात खरोखर काय विचार आहेत, हे समजून घ्यायचं असेल तर आज सोशल मिडीया - लोकमाध्यमांना पर्याय नाही. माणूस समोर असताना त्यांच्या बोलण्याची, वर्तनाची समीक्षाही न करणारे लोक आंतरजालाच्या आभासी मितीमध्ये जातात तेव्हा विषारी, विखारी बोलायलाही त्यांना अडचण वाटत नाही.

Taxonomy upgrade extras: 

आमची भारतीय प्रमाणवेळ !

‘’अनेक बाबतीत विविधता व मतभिन्नता असलेल्या तुमच्या देशातील नागरिकांमध्ये एखाद्या बाबतीत तरी समानता आहे का हो?’’ असा प्रश्न जर आपल्याला एखाद्या परदेशी व्यक्तीने विचारला, तर त्याचे उत्तर ‘’होय, आम्ही भारतीय, ठरलेली वेळ न पाळण्याच्या बाबतीत समानधर्मी आहोत’’ असे देता येईल!

Taxonomy upgrade extras: 

धावते विचार....

---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------
पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस.
.
.

Taxonomy upgrade extras: 

शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?

शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? ऐसीकरांचे मत काय?

Taxonomy upgrade extras: 

पूर्ण बुरख्यावर बंदी

https://www.washingtonpost.com/world/europe/germanys-merkel-backs-sweepi...

पूर्ण बुरख्यावर बंदी आणा असे जर्मनीच्या चान्सलर म्हणताहेत.
ऐसीवर दुखवटा जाहीर केला पाहिजे.

(हेही वाचा : फ्रान्स आणि बुरखा बॅन, निधर्मीपणा, व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे)

Taxonomy upgrade extras: 

पुरोगामी - प्रतिगामी

मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले.

Taxonomy upgrade extras: 

कौतुक? चुकून कधीतरी !

गेल्या अर्धशतकात शहरीकरण अफाट वाढले. महानगरांचा तर चेहराच हरवून गेला. तिथल्या गतिमान जीवनात माणसे पिचून निघाली. पैशापाठी धावता धावता आयुंष्यात भावनांना फारसे स्थान उरले नाही. निस्वार्थी विचारपूस तर दुर्मिळच झाली. ‘’मी माझा’’ हा माणसांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला. माणसे अनेक शारीरिक व मानसिक रोगांनी ग्रस्त झाली. याच्या जोडीला काही ‘सामाजिक रोग’ ही आपल्याला चिकटले आणि त्यांचा प्रसारही झपाट्याने झाला. त्यापैकी एक रोग म्हणजे ‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’. या रोगाचा विचार आपण या लेखात करूयात.

Taxonomy upgrade extras: 

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि - मिथकाची मोडतोड

ह्या लेखाच्या पार्श्वभूमीसाठी हा पहिला ललित लेख - नैनं छिन्दंति शस्त्राणि

"वरच्या शेखरदादाला बघायला मुलीकडचे लोक आले आहेत," असं मी आईला म्हटलं, तेव्हा तिच्या डोळ्यांत क्वचितच दिसणारा डँबिसपणा दिसला. तिची प्रतिक्रिया अशी का, हे मला तेव्हा समजलं नाही. भाषेतल्या अशा अनेक गमती मला अजूनही समजत नाहीत; पाचवी-सहावीत असताना काय समजणार होत्या!

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक