गद्य

दुपारच्या हळव्या आठवणी ....

दुपारच्या हळव्या आठवणी ....

ललित लेखनाचा प्रकार: 

क्षणकथा: 1

Removed

ललित लेखनाचा प्रकार: 

दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग (भाग ३) - झाले मोकळे आकाश...

ते ४० तास...
बऱ्याच ठिकाणी चेकिंग खूप स्ट्रिक्ट होते, टेम्परेचर बघणे, ट्रान्झिट पास चेक करणे, फोटो काढणे हे सगळं स्वीकारूनच पुढे जावे लागत होते. खिडकीतून उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या, त्यामुळे चेकिंगच्या वेळी शरीराचे तापमानही वाढलेले येत होते. पण घरी जायचा आनंद त्याहून जास्त जाणवत होता. जास्त वेळ कुठे थांबू ही शकत नव्हतो. आता पाणीही संपत आलेले. तिथल्याच एका देवळाजवळच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाणी भरून घेतले. बिसलेरीची किंमतही त्यामुळे कळली...

ललित लेखनाचा प्रकार: 

दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग (भाग २) - पुणेकरांना केले उणे...

आम्हांला विलगीकरणात ठेवणार होते. पुढे काय हे काहीच कळत नव्हते. आमचे पासपोर्ट आधीच काढून घेतल्यामुळे शांत बसणे गरजेचे होते. सगळ्यांनी घरी तशी कल्पना दिल्यामुळे आता घरचे फोन यायला लागले, त्रास करून घेऊन काहीही साध्य झाले नसते, National policy होती ती. पुढचे पुण्याचे विमान मार्गस्थ झाले होते अनेक पुणेकरांना उणे करून!!!

ललित लेखनाचा प्रकार: 

रत्नाकर मतकरी

त्यांच्या भयकथा माझ्यावर परिणाम करून गेल्या. ‘कळकीचं बाळ’, ‘खेकडा’, ‘जेवणावळ’, ‘निमाची निमा’ व्यवस्थित आठवतात. ‘आणि माझ्या हातातला सुरा गळून पडला!’ असा कायच्या काय धक्कादायक शेवट असणारी गोष्ट आठवते. असाच शेवट ‘जेवणावळ’ या कथेचा होता. लोकांच्या मृत्यूची स्वप्नं पडणाऱ्या एका लहान मुलाला पेढा खाण्याचं स्वप्न पडतं, तेसुद्धा भयंकरच. शेवटच्या वाक्यापर्यंत सस्पेन्स धरून ठेवणे, हे अचाट आहे! एका कथेच्या शेवटी ‘अब दादाको हाथपाँव काटना नही पडेगा’ असं आहे. तो शेवट येईपर्यंत आपण वेगळी अपेक्षा बाळगतो आणि भलतंच होतं. चुटपुट लागते, म्हणणं बरोबर नाही; लेखकाला जाब विचारावासा वाटतो!

ललित लेखनाचा प्रकार: 

दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग

अमेरिकेत पर्यटनाला गेलेल्या हेमा पुरोहित यांना एकाएकी करोना साथ चालू झाल्यामुळे काही अभूतपूर्व अनुभव मिळाले. त्यांचे हे वर्णन -

अचानक १४ मार्चला एक प्रेक्षणीय स्थळ पहायला गेल्यावर पाटी पाहिली की कोरोनामुळे आता हे बंदच रहाणार आहे. तेथून परत फिरलो आणि परतीच्या प्रवासाची मानसिक तयारी आणि घाई सुरू झाली. लगेच फक्त भारत दर्शन “दूरदर्शनवर” सुरू झालं. टेन्शन आलं आणि नकळत वाढत गेलं. रात्री झोपच आली नाही. एकच विचार 'आता इथेच रहायला लागलं तर?'

ललित लेखनाचा प्रकार: 

मॅटिनी मोहम्मद - हृषीकेश गुप्ते

तुम्ही अमिताभ बच्चनचा ‘हम’ पाहिलाय? मुकुल आनंद दिग्दर्शित, किमी काटकरचं प्रसिद्ध ‘जुम्मा चुम्मा’ नृत्य असलेला ‘हम’! या सिनेमात केसभिजल्या अमिताभ बच्चनचा स्लो मोशनमध्ये जोरजोराने मान हलवण्याचा एक सिग्नेचर सीन आहे. ती मान हलवताच अमिताभच्या डोईवरचे सर्व केस पिंगा खेळल्यागत हळुवार गतीने इतस्तत: विखुरतात आणि केसात अडकलेलं पाणी तेवढ्याच हळुवारपणे चोहोबाजूंनी भिरकावलं जातं. या नेमक्या प्रसंगाचा खरा प्रणेता दिग्दर्शक मुकुल आनंद किंवा अभिनेता अमिताभ बच्चन नव्हताच. तो मॅटिनी होता! आणि हे मी कोणत्याही न्यायालयात प्रतिज्ञापूर्वक लिहून द्यायला तयार आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

शुष्क काष्ठने आण्या पत्र

समीधाने, संध्याकाळचा वरण-भाताचा कुकर लावुन, देवापुढे उदबत्ती लावली. बाल्कनीतील जाईला पाणी घालून, साठीला आलेली, समीधा जरा खुर्चीवरती विसावली. घरात,शिजलेल्या भाताचा सुगंध, घमघमाट सुटला होता. आज मानसी तिच्या मुलीला घेउन म्हणजे समीधाच्या नातीला घेउन, भेटायला येणार होती. मानसी, समीधाला भेटायला वरचेवर येत असे. त्या दोघी यायच्या आत,तेवढी काही स्तोत्रे म्हणावीत म्हणुन, समीधा जरा विसावली होती. दत्तबावनी वाचता वाचता ती एका ओळीपाशी येउन थांबली, -
"शुष्क काष्ठने आण्या पत्र| थयो केम उदासीन अत्र|

ललित लेखनाचा प्रकार: 

आमची मे महिन्याची सुट्टी

लहानपणी म्हणजे किशोर वयात वगैरे मला फार काँप्लेक्स आलेला. कसला, तर आमची आधीची पिढी सतत त्यांनी लहानपणी केलेल्या गमतीजमती, दंगा मस्ती, गलका, अश्या सुरेख आठवणी सांगायचे तसं आमच्याकडं पुढच्या पिढीला सांगायला काय वेगळं असणार असंच वाटायचं. म्हणजे काय तशी बोरींगच तर सुट्टी असते वगैरे वाटायचं. पण आता कळतंय आत्ताच्या मुलांना सांगायला पुष्कळ आहे. ते काही सांगायचं नाहीच पण आता मे महीना लागला, जरा जुनंच सगळं आठवायला लागलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

खिडकी खंडू - हृषीकेश गुप्ते

खंडूच्या नावाला ‘खिडकी’ चिकटण्यामागे त्याची विवाहित दांपत्यांच्या खिडक्यांमधून आत डोकावण्याची सवय कारणीभूत होती, का गावाने दोन ‘ख’मधला निव्वळ अनुप्रास साधला होता, याविषयी माझ्या मनात आजही साशंकता आहे. मुळात खंडूला लहानपणापासूनच उपाधींची कमतरता कधी पडलीच नव्हती. सुरुवातीला ‘स्मगलर खंडू’, मग ‘मुतर्‍या खंडू’, मग ‘खिडकी खंडू’ आणि सरतेशेवटी ‘कोयत्या खंडू’ हा खंडूला चिकटलेल्या बहुमानांचा प्रवास जेवढा रोमहर्षक आहे, तेवढाच हृदयद्रावकही आहे. गावानं खंडूवर कायम कांकणभर अन्यायच केला. जयवंतांच्या मृणालचा अपवाद वगळता या अन्यायी भूमिकेतून कुणीही सुटलं नाही; अगदी मीही. या लेखाच्या निमित्ताने खंडूच्या व्यक्तिमत्वाचं शब्दचित्र रेखाटताना मलाही शीर्षक म्हणून दोन ‘ख’मधल्या अनुप्रासाचा मोह आवरला नाहीच.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य