चित्रपट

अडीच हजार गायी चोरणारा अल्वरेज केली

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

आठवणीतला हाॅलीवुड-सहा

चोरी ती चोरीच...

समीक्षेचा विषय निवडा: 

मोहोन्जो- दारो: एक हुकलेली संधी (स्पॉयलर अलर्ट: हाय!!!)

(स्पॉयलर अलर्ट लेवल: हाय !!!)

आशुतोश गोवारीकर हा एक प्रामाणिक सिनेमाकार आहे. तो जीव तोडून मेहनत करत सिनेमे काढतो. पण त्याचं दुर्दैव म्हणा किंवा प्रयत्नांची- अभ्यासाची कमतरता म्हणा, कुठेतरी कमी पडतो. त्याचा नवा 'मोहोन्जो-दारो'ही या लौकिकाला अपवाद नाही. लगान, जोधा अकबर यासारखं प्रत्येकवेळी मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढायाची हौस कितीही असली तरी चित्राच्या विषयात आणि ते चितारणार्‍या कुंचल्यात तेव्हढा दम हवा नाहीतर 'गवत खाणारी गाय' या चित्रासारखी त्याची गत होते आणि पाहाणार्‍याला गवतही दिसत नाही अन् गायही. मोहोन्जो-दारोचीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

लख्ख प्रकाश निर्मळ...

एखादी संस्था समाजासाठी खूप काही करत असेल पण त्याच वेळेला तिची पडद्यामागे काही कृष्णकृत्ये चालू असतील तर मग अशा वेळेला काय करावं? ‘त्या कृष्कृत्यांचा मागोवा घेत त्या संस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा? की ती संस्था जे काही चांगलं करत आहे ते पाहून तिच्या उर्वरित कृष्णकृत्यांकडे कानाडोळा करावा?’ असा यक्षप्रश्न नेहमीच कोणत्याही विचारीजनापुढे उभा असतो. पण दुर्दैवाने शंभरपैकी नव्याण्णव किंवा त्याही पेक्षा जास्त वेळेस असे विचारीजन मात्र दुसरा पर्याय निवडताना दिसतात. हाच प्रश्न मार्टी बॅरॉन पुढेही उभा होता. मग त्याने काय केलं? हे जर समजून घ्यायचं असेल तर ‘स्पॉटलाईट’ हा चित्रपट पाहावा लागेल.

समीक्षेचा विषय निवडा: 

'स्टोलन किसेस' आणि मनातली ठसठस

'क्रायटेरियन कलेक्शन'ने वितरण केलेल्या कोणत्याही डीव्हीड्या आणून पाहिल्या तर 'वेळ फुकट गेला' असा मनस्ताप कधीही होत नाही. मागे ग्रंथालयात गेले होते तेव्हा फ्रान्स्वां त्रूफॉचा 'स्टोलन किसेस' दिसला; सहज उचलला. ह्या वेळेस निराळा मनस्ताप झाला.

'४०० ब्लोज' या त्रूफॉच्या जुन्या चित्रपटातलं मुख्य पात्र, अंत्वान द्वानेल आणि ते साकार करणारा नट जाँ-पियार लेऑ यांनाच घेऊन 'स्टोलन किसेस' बनवला आहे. थोडक्यात '४०० ब्लोज'मधला इदरकल्याणी अंत्वान तरुण झालेला दाखवलेला आहे. पण '४०० ब्लोज' न बघताही हा चित्रपट बघितला म्हणून फरक पडू नये.

समीक्षेचा विषय निवडा: 

डॉन ऑफ जस्टीस - नेमकं खटकतंय काय?

******पुढे स्पोइलर्स आहेत******

समीक्षेचा विषय निवडा: 

यंदा (तरी) ऑस्कर्तव्य आहे ?

नुकताच लिओनार्डो डी’केप्रियोचा ‘द रेवेनंट’ पाहिला. आलेजन्द्रो इनारीतू ( ‘birdman’ चा दिग्दर्शक) याने दिग्दर्शित केलेला आणि याच नावाच्या एका कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट एक भन्नाट सूडकथा आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

ते विश्वच निराळ

परग्रहावरची सृष्टी, पृथ्वीचा नाश ,अंतराळाची सफर हे सर्व हॉलीवूडचे अनेक वर्षांपासूनचे अतिशय आवडते विषय. आजवर अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी या विषयावर चित्रपट बनवलेले आहेत. अनेक प्रचंड गाजलेलेदेखील आहेत.काही सपशेल आपटलेत. पण हाच विषय घेऊन २०१४ साली प्रदर्शित झालेला ख्रिस्तोफर नोलनचा इंटरस्टेलर हा चित्रपट भन्नाट असाच म्हणावा लागेल. यापुर्वी नोलनने द डार्क नाईट आणि इन्सेप्शन सारखे जबरदस्त चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि यावेळीदेखील अफाट कल्पनाशक्ती आणि भौतिकशास्त्र यांचा योग्य तो मेळ घालून अत्यंत विचारपूर्वक हा चित्रपट बनवण्यात आलाय.

समीक्षेचा विषय निवडा: 

.

.

समीक्षेचा विषय निवडा: 

रॉकस्टार : फिर से उड चला

"फुकट तिकिटाच्या मोहाने माणूस काय काय करेल सांगता येत नाही रे. 'आ अब लौट चले' किंवा 'कोयला' जर मी २-२ वेळा थेट्रात बघू शकतो तर रॉकस्टार का नाही?", एरवीदेखील तिडीक आणणार्‍या लक्ष्मीकांत बेर्डे सुरात जेव्हा माझा मित्र मला हे सांगायला लागला, तेव्हा मला त्याच्या इंटरनेट कनेक्शनचा गळा घोटावासा वाटला. साली एवढीशी तर असते इथरनेट केबल. दोन मिनिटात खेळ खलास.

पण ती उर्मी आवरल्यावर मी त्याच्याच हातचं वडासांबार खाता खाता दोन मिनिटं आत्मचिंतन केलं. मला तरी पहिल्यांदा कुठे आवडलेला रॉकस्टार?
गाडीत सदैव ती रॉकस्टारी गाणी वाजवणार्‍या मित्राला मी "गाडी किंवा गाणी" असा अल्टिमेटम दिलाच होता ना?

समीक्षेचा विषय निवडा: 

अगं बाई अरेच्चा २ अर्थात एक सुण्दर चीत्रपट

शीर्षकातली चूक मुद्दाम केली आहे, कारण काहीच नाही, एक प्रतीकात्मक विरोध म्हणून. आपण प्रतिकात्मक निषेध्/विरोध करण्यात तसे चँपियन आहोत. परवाची कलबुर्गींची हत्याच घ्या- जाऊ दे, भरकटलो वाटतं.
.
तर "अगं बाई! अरेच्चा भाग २" पाहिल्यावर मन सुन्न झालं.
हा चित्रपट नक्कीच एडिटिंग, काही खास लोकांसाठी असलेले निवडक खेळ, पैसे देऊन बोलावलेल्या पत्रकारांचे रिव्हयूज -असल्या भानगडीतून गेलाच असेल ना?
तेव्हा कुणालाच सांगावसं वाटलं नाही की "बघवत नाही रे चित्रपट, भिकार आहे"
किंवा "एकाही जोकवर हसायला येत नाही हो, काहीतरी करा"
किंवा "महा गचाळ बनवलाय हो चित्रपट.. जरा बघा काही बदलता आलं तर.." ?
=====

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - चित्रपट