चित्रपट

द लंचबॉक्स .

(ही काही समीक्षा म्हणता येणार नाही. पाहुन वाटलं ते लिहिलं.)

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचं नातं असतं फक्त स्वत:शी. मोठ होताना , स्वत:तला ’मी’ वेगवेगळ्या नात्यात विखुरला जातो. ही नाती अंतर्गोल , बहिर्गोल आरश्यांसारखी. ती आपल्याला खरा ’मी’ दाखवतंच नाहीत. यामुळे आपण कसे आहोत, काय करायला हवंय याची उत्तरं शोधणं कठीण जातं. अश्यावेळेस आपल्याला आपण शोधून देणारं नवं नातं - तात्पुरत आणि बिननावाचं का असेना - मिळालं तर? . अश्या नात्याची गोष्ट म्हणजे ’लंचबॉक्स’

समीक्षेचा विषय निवडा: 

अर्र... राजकुमार

आर्र... राजकुमार

पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले.

समीक्षेचा विषय निवडा: 

शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये...

लॉस एंजेलिस च्या जवळ समुद्रात वादळ होते व टोर्नेडोज तयार होतात. पाण्यातील मासे त्याबरोबर उचलले जातात व एलए वर शार्क्सचा पाऊस पडतो. शब्दशः खुदा जब देता है स्टाईल ने छप्पर फाडके मासे पडतात. मग आपले हीरो, त्याचे जवळचे लोक व इतर मिळून ते टोर्नेडोज व मासे यांना कसे हरवतात ही स्टोरी. आता हे मासे म्युटेटेड वगैरे नाहीत. माशांसारखे मासे, फक्त वादळामुळे आकाशात उडून परत खाली पडतात. या ब्याकग्राउंड वर हा चित्रपट पाहावा. म्हणजे प्रत्येक महान स्टोरीटेलिंग मधे सामान्य लोकांची असामान्य कामे असतात तसे सामान्य माशांनी केलेल्या असामान्य गोष्टी तुम्हाला कळतील.

झटपट उत्क्रांती -

समीक्षेचा विषय निवडा: 

ऱ्हायनो सिझन

पिफमधल्या आवडलेल्या काही चित्रपटांपैकी एक ऱ्हायनो सिझन. इराणच्या कट्टर इस्लामिक राजवटीमधे एका कवीला आणि त्याच्या बायकोला ब्लास्फेमीच्या आरोपाखाली वेगवेगळ्या तुरुंगात टाकलं जातं, ३० वर्षानंतर सुटल्यावर बायकोचा शोध घेणाऱ्या कवीची हि कथा.

समीक्षेचा विषय निवडा: 

फॅंड्री - जाता नाही जात ती...

(ह्यात सिनेमाची गोष्ट अजिबात सांगितलेली नाही; त्यामुळे कोणताही रहस्यभेद ह्यात नाही.)

समीक्षेचा विषय निवडा: 

निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट

एखादी गोष्ट आवडण्याकरिता त्या गोष्टीत काय असायला हवं?

समीक्षेचा विषय निवडा: 

भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स

मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते. या लेखात साम्य व विरोध या दोन्हींचा परामर्ष घेण्याचा विचार आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

सीता सिंग्ज द ब्लुज्

पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन (किंबहुना स्वयंसेवकाचे [माकड]चाळे) सोडल्यास मला या माझ्या पहिल्यावहिल्या फेस्टिव्हलकडून बरेच नवे, चांगले काही मिळाले सुद्धा. 'रेगे' हा मराठी चित्रपट १५ हून अधिक मिनिटे न बघवल्याने आम्ही सगळे उठून बाहेर आलो आणि पुढील चित्रपटाला बराच वेळ होता म्हणून दुसर्‍या एका स्क्रीनवर 'अ‍ॅनिमेशन आणि अ‍ॅनिमेशनपटांचे भविष्य' नावाच्या व्याख्यानाला जाऊन बसलो होतो. व्याख्याते एक वक्ते म्हणून तितपतच असावेत - वाटले - मात्र त्यांनी दाखवलेल्या क्लिप्स/अ‍ॅनिमेशन्स त्यांचे प्रकार सगळेच भन्नाट होते.

समीक्षेचा विषय निवडा: 

एक Serious अन हृदयस्पर्शी "Timepass"…

आत्ता काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट बघितला…"Timepass"…
Trailar इतके आवडले होते याचे की, Release झाला की लगेच Theater गाठायचं हे तसं आम्हा मित्रांचे पूर्वीच नक्की झाले होते…
आलो मग बघून "Timepass"…
हा चित्रपट इतका आवडला की तो बघून आल्यानंतर असा एकही दिवस गेला नसेल ज्या दिवशी ह्याच्यातील dialogues बद्दल बोललो नसेल मी…
भेटल्यावर, जेवतांना, चहाला गेल्यावर, office मध्ये कधी फारंच bore झालं की "Timepass" चा विषय निघणार हे नक्कीच… कधी तो दगडू, ती प्राजू आणि कधी-कधी तर तो बालभारती देखील…

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - चित्रपट