समाज

सरन्यायाधीशांच्या विरोधात चार वरिष्ठ न्यायाधीशांचे बंड

सरन्यायाधीश दीपक मिश्रा ह्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या चार अन्य न्यायाधीशांनी निवेदन दाखल केले आहे असे आत्ताच वाचले. त्यामुळे सरन्यायाधीश दीपक मिश्रा ह्यांची परत आठवण झाली.

सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत सक्तीने वाजविण्याचा निर्णय ह्याच दीपक मिश्रा ह्यांनी दिला होता. त्याचे परीक्षण करणारा एक धागा मी येथे सुरू केला होता. त्या धाग्याची येथे आत्ता प्रकर्षाने आठवण झाली.

न्यायमूर्ति मिश्रा हे पुरेशी Legal propriety दाखवत आहेत काय असा माझा तेव्हा प्रश्न होता. तो प्रश्न अगदीच गैरलागू नव्हता असे आता मला म्हणता येईल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आनंदवन प्रयोगवन - पुस्तकातला काही मजकूर

'आनंदवन, प्रयोगवन' या पुस्तकातला काही मजकूर, सचिन कुंडलकरचे लेख (लेख क्र १, लेख क्र २) आवर्जून वाचणाऱ्या किंवा न वाचणाऱ्या, लेखांवर खरडफळ्यावर चर्चा करणाऱ्या आणि न करणाऱ्या सर्वांना सप्रेम.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

नो रिग्रेट्स

काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

हे सारे कसे बदलेल??

अंधश्रद्धा नावाचे अविवेकी वादळ आचारविचाराचे जणू एक वादळ आज समाजात घोंघावतच आहे. जादूटोणा ,देवदेवस्की ,भूत ,भानामती अशी उघड स्वरूपातील अंधश्रद्धा देखील विज्ञान वा शिक्षणाच्या प्रभावाने कमी होताना दिसत नाही .महाराज ,साधू,बाबा,स्वामी ह्यांचा धंदा तर भलताच तेजीत चालताना दिसतो आहे .आपल्या भक्ताचे भौतिक समृद्धि ,पारलौकिक कल्याण ,आध्यात्मिक उन्नती ह्यात भर दिवसेंदिवस पडतोच आहे . नागरी सुविधेवर ह्याचा प्रचंड ताण पडतो श्रद्धेचा भाग समजून सर्वसाधारण लोक ही बुवाबाबाला भक्तीचे एकमेव द्वार त्याच्या चरणावर असते असे समजून त्यांना शरण जातात .

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आयडेंटिटीच्या बंधनात...

जन्माला आलेल्या प्रत्येकाला (आवडणारे वा न आवडणारे) नाव/आडनाव असते; व त्या नावाने आपली ओळख करून दिली जात असते. परंतु काही महात्वाकांक्षी व्यक्तींना फक्त नाव/आडनाव यात समाधान मिळत नाही. म्हणून आपल्या नावापुढे/आडनावापुढे काही तरी हवे म्हणून ते आटापिटा करत असतात. उच्च शिक्षितांना तर नावाच्या पुढे लावण्यासाठी इंग्रजीतील सव्वीसपैकी सव्वीस मुळाक्षरही कमी पडतात. काहींना आपल्या घराण्याचा अभिमान असतो म्हणून त्याला अधोरेखित करतात. काहींना आपल्या धर्माबद्दलचा वा (जातीबद्दलचा) अभिमान झाकता येत नाही म्हणून काही चित्रविचित्र पद्धत वापरून आपली आयडेंटिटी व्यक्त करत असतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आत्माराम, राधाबाई आणि रखमाबाई सगुण.

गूगलच्या मदतीने मी दुसरेच काही शोधत असता Radhabai Atmaram Sagun/Sagoon, Book publisher अशा एका नावावर माझी दृष्टि पडली. ह्यापूर्वी १८६०च्या दशकात स्थापन झालेल्या निर्णयसागर ह्या प्रकाशनव्यवसायाचे मूळ संस्थापक जावजी दादाजी आणि तदनंतर त्यांचे चिरंजीव तुकाराम आणि पांडुरंग ह्यांनी हा व्यवसाय सांभाळला होता. पांडुरंग जावजी ह्यांचा १९४० साली मृत्यु झाल्यानंतर जिजाबाई, सत्यभामाबाई आणि लक्ष्मीबाई ह्या चौधरी कुटुंबातील तीन विधवांनी आपल्या परीने काही वर्षे त्या व्यवसायाची ढासळती इमारत सावरून धरली होती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स‌त्तेत‌ली मिश्किली आणि विवेक

काल‌ माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस‌ क्ल‌बात‌. त्यांनी "एक असाधारण वाचक" साद‌र‌ केलं. हा "अॅल‌न‌ बेनेट‌" लिखित‌ ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उप‌स्थित राह‌णं हा नित‌ळ सुंद‌र‌, निव्व‌ळ अप्र‌तिम‌ अनुभ‌व होता. विविध‌ भाषांव‌र‌ची पुरंदरेंची हुकुम‌त‌ , व त्या- त्या भाषेत‌लं स‌हित्य‌ स‌म‌जून घेणं हे स‌ग‌ळं त‌र‌ त्यांच्याठायी आहेच‌ प‌ण एका भाषेत‌ला म‌ज्कूर‌ दुस‌ऱ्या भाषेत‌ नेम‌क्या आश‌यास‌ह‌ पोच‌व‌णं हे काम‌ लै अव‌घ‌ड‌. प‌ण ह्या त्यात‌ही वाक‌ब‌गार आहेत‌.
असो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे

'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स्त्रीवाद -- फेमिनिझ‌म‌ एकाच‌ लिंगाचा, एकाच‌ लिंगासाठी का ?

ख‌फ‌व‌र‌ चालेल्या च‌र्चेत‌ले मुद्दे इथे टंक‌त आहे. ज‌र इथं टाक‌णं ठीक‌ न‌सेल‌; त‌र‌ धागा उड‌व‌लात‌ त‌री चालेल‌.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आमचा छापखाना - भाग २.

आमचा छापखाना - भाग २.

कंपोझिंगनंतरचे काम म्हणजे केलेल्या कामाची छपाई. येथे आम्हा पोरासोरांचे विशेष काही काम नसायचे. आमच्याकडे छपाईची तीन यन्त्रे होती - एक मोठे सिलिंडर मशीन, एक मोठे ट्रेडल आणि एक छोटे ट्रेडल. नवे मोठे ट्रेडल माझ्या डोळ्यासमोर ५०-५१ साली आले. सिलिंडरहि ५४-५५ साली आले. तत्पूर्वी एक जुने सिलिंडर होते. नंतरचे मुंबईच्या एका छापखान्याकडून सेकंड हॆंड घेतले होते. ह्या सिलिंडरवर एका वेळी पुस्तकाची आठ पाने छापली जात. म्हणजे पाठपोट १६-पानी फॉर्म ह्यावर निघत असे. भगवानरावच हे मशीन चालवत असत. ट्रेडल मशीन्स त्याहून लहान कामांना वापरली जात. हाताने कागद घालायचे ट्रेडल मशीन कसे काम करायचे ते ह्या विडीओमध्ये पहा.
सिलिंडर मशीनचे काम येथे पहा.

मला आठवणार्‍या अगदी जुन्या काळात म्हणजे ४६-४७ सालापर्यंत सातार्‍यात वीज पुरवठा अगदी मर्यादित असे. सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी नावाच्या खाजगी कंपनीची वीजनिर्मिति सातार्‍याच्या वायव्य बाजूस असलेल्या बोगद्यावरच्या टेकडीवर जनरेटर बसवून केली जाई. सातार्‍याच्या पश्चिमेस गावापासून १५०० फूट उंचीवर यवतेश्वरचे पठार आहे. ह्या पठारावर कासचा तलाव आहे आणि ह्या तलावाचे पाणी खापरी नळाने सातार्‍यात उतरवून पिण्याचे पाणी म्हणून नळाने त्याचे वाटप होई. ह्याच पाण्याचा वापर करून बोगद्यावरच्या टेकडीवर वीजनिर्मिति कधी एकेकाळी केली जाई हे वीजनिर्मितिकेंद्र तेथे असण्याचे मूळ कारण. पण मला आठवते तसे पाण्यावर वीज निर्माण करणे केव्हातरी पूर्वीच थांबले होते आणि नंतर वीज डीझेल जनरेटर वापरून होई आणि त्या विजेवर गावात मिणमिणते दिवे कसेबसे लागत असत. आमच्याकडे मशीन्स चालविण्यासाठी ऑइल एंजिन बसविले होते आणि त्याची शक्ति Shaft-pulley-belt मार्गाने मशीनपर्यंत पोहोचविली जाई. ’मराविमं’ची स्थापना होऊन पुरेशी वाढ होईपर्यंत असेच चालू होते. नंतर ऑइल इंजिनाची जागा इलेक्ट्रिक मोटरने घेतली. तीन मशिनांपैकी एखादे तरी चालू असे. बोटीवर असतांना इंजिनाची सूक्ष्म थरथर सर्व वेळ जाणवत राहाते तसा मशीनचा लयबद्ध आवाज सर्व घरभर पोहोचत असे पण आम्हाला त्याचा कधी त्रास झाला नाही.

आमची इथली करमणूक म्हणजे मशीनची लयबद्ध हालचाल पाहण्यात आम्ही गुंगून जात असू. चटक-फटक आवाज करत वेगाने फिरणारे मशीनचे पट्टे, वर आलेला कागद उचलून तो इकडून तिकडे नेऊन पोहोचविणारा सिलिंडरचा लाकडी फणा, रुळावरून फिरणार्‍या आगगाडीच्या चाकासारखी सिलिंडरच्या पाट्याखालची चाके, एकमेकांना उलटसुलट फिरविणारी ट्रे्डलची दातेरी चाके अशा गोष्टी बघत बसायला आम्हाला मोठी मजा येई. ह्याच दातेरी चाकांमध्ये माझ्या काकांनी त्यांच्या लहानपणी आपले बोट घातले होते. त्या अव्यापारेषु व्यापाराचा परिणाम म्हणजे त्यांचे तर्जनीचे शेवटचे पेर पार चिरडलेले आणि असे तर्जनीचे बोट त्यांनी जन्मभर बाळगले.

छपाईनंतरच्या प्रक्रियांमध्ये आणि बाइंडिंगच्या पूर्वतयारीमध्ये मात्र आम्ही शाळेपासून मोकळा वेळ असेल तशी यथाशक्ति मदत करत असू. ह्या गोष्टी म्हणजे कागदांना घड्या घालणे आणि जुंपणी, नंबरिंग, परफोरटिंग आणि स्टिचिंग. १६ पानांचा फॉर्म घेऊन त्याला उजवीकडून डावीकडे तीन घड्या घातल्या की पुस्तकाच्या फॉर्मची १ ते १६, १७ ते ३२ अशी पाने एकमेकासमोर येत. त्यासाठी पानांची छपाई तशी आधीच केलेली असे. जमिनीवर मांडा मारून बसायचे, कागद समोर घ्यायचे आणि घड्या करायच्या. मी आणि माझा धाकटा भाऊ, कधीकधी आजोबाहि आम्हाला जमेल तितके हे काम उरकायचो. (बहिणींना ह्या कामात, किंबहुना छापखान्याच्या कसल्याहि कामात, exemption होते.) अशा शंभराच्या कट्ट्या करून एकेक फॉर्म हातावेगळा करायचा. सगळे फॉर्म घड्या घालून झाले की ते सभोवती आपापल्या गठ्ठ्यांमध्ये अर्धवर्तुळात मांडायचे आणि नंबरवारीने एकेक पुढे ओढून घेऊन पूर्ण पुस्तक जुळवायचे. एखाद्या व्यवसायाच्या बिलबुकासारखे काम असले तर तीनचार रंगांचे कागद जुंपणीत असायचे. बिल फाडता यावे यासाठी पर्फोरेटिंग मशीनने त्यांना भोके पाडायची आणि त्यांच्यावर हातात धरायच्या नंबरिंग मशीनने नंबर घालायचे. येथवरची काहीशी कंटाळवाणी पण सहज करता येण्याजोगी कामे करून आम्हीहि व्यवसायाला हातभार लावत असू. परफोरेटिंग मशीन असे दिसे:

आणि नंबरिंग मशीन असे:

इतके झाले बाइंडिंगचे काम सुरू होई. त्यासाठी पुस्तक लहान असेल तर सरळ स्टिचिंग मशीनकडे जायचे. ह्या मशीनमध्ये लोखंडाच्या वायरस्पूलमधून लोखंडी तुकडे पुस्तकातून घालून पुस्तकाची पाने स्टेपल केली जायची. अशा मशीनचे चित्र येथे पहा.

अधिक मोठे पुस्तक आमच्या बाइंडरकडे बाइंडिंगला दिले जाई, पुस्तकांचा एक गठ्ठा हॆंडप्रेसमध्ये दाबून धरून त्याच्या कडेला करवतीने कापून फॉर्ममध्ये दोरा ओवण्यासाठी भोके पाडली जात. नंतर एकेक पुस्तक समोर घेऊन बाइंडर त्यामध्ये दोरा ओवून बाइंडिंग करीत असे. हॆंडप्रेसचे चित्र येथे पहा.

स्टिचिंग/बाइंडिंग झाले की पुस्तकाची पाने सुटी करण्याचे काम होई. पुस्तकांचा एकेक गठ्ठा गिलोटिन कटिंग मशीनमध्ये दाबून धरून ब्लेड पाळीपाळीने त्याच्या तिन्ही कडांतून नेले की पाने सुटी होत. ह्यानंतर अखेरचे काम म्हणजे पुस्तकाचे कव्हर त्याला वरून चिकटवणे की झाले पुस्तक तयार. गिलोटिन कटिंग मशीनचे चित्र येथे पहा.

पुस्तकाचे कवर चिकटवण्यावरून आठवले. ह्यासाठी खास चिकट सरस आमचे बाइंडर स्टोववर तयार करीत असत आणि त्याचे साहित्य नैसर्गिक हाडामधून मिळवलेले असे. त्यामुळे ते स्टोववर पातळ करतांना त्याचा स्मशानात असतो तसा वास घरभर पोहोचत असे! पण त्याला काही इलाज नव्हता.

येथे ब्रॅंटफर्ड नावाच्या गावी उत्साही लोक एक Heritage Village चालवतात. १८५०च्या पुढेमागे कॅनडा कसा दिसत असे ते दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे एक प्रिंटरी - म्हणजे आपल्याकडचा छापखाना - आहे. तो पाहायला मी गेलो आणि मला सातार्‍यातील आमच्या छापखान्यात गेल्यासारखेच वाटले. त्याच केसेस आणि तीच मशिनरी. तेथील स्वयंसेवकाशी छापखाना ह्या विषयावर माझ्या खूप गप्पा झाल्या. आता भारतातील आमचा छापखाना पाहिलेले कोणी नातेवाईक कॅनडाभेटीवर आले की नायागरा धबधब्यासारखेच हे एक अवश्य भेट देण्याचे स्थळ झाले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - समाज