विज्ञान/तंत्रज्ञान

प्रोस्टेट मिल्किंग - प्रोस्टेट मसाज.... उर्फ पुरूषवाला "जी-स्पाॅट"

फार पूर्वी एक व्हिडीओ पाहिलेला. त्यात एक पुरुष एक सेक्स-टॉय आपल्या मागून घालतो आणि तो त्याच्या शिश्नाला हातही न लावता त्याचं वीर्य गळू लागतं. मला ते पाहून येवढं 'मॅजिकल' वाटलेलं की साला हे कसं शक्य आहे म्हणून मी फारच माझं डोकं खाल्लेलं. ज्या मुलींना माहित नाही त्यांच्यासाठी - एकवेळ बायका त्यांच्या लिंगाला हात न लावता निव्वळ कल्पनेने ऑरगॅजम करू शकतील, पण पुरुष त्याच्या शिश्नाला/वृषणाला स्पर्श केल्याशिवाय ऑरगॅजम करू शकत नाही. (नाईट फॉल वेगळी गोष्ट, ते वयात वगैरे येतानाच्या गोष्टी). पुरुषांचं मॅकेनिजम वेगळं आहे. तरी कुणी अपवाद असू शकतीलच.

अंदाज करा - किती पैसे जमा होतील?

८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्या. १५.४४ लाख कोटी रुपये या नोटांमध्ये आहेत असं आरबीआयकडून सांगण्यात आलेलं आहे. गेल्या चाळीसेक दिवसांत त्यातले बरेच पैसे बॅंकांत जमा झालेले आहेत. आपल्याला अंदाज असा करायचा आहे की नक्की किती पैसे जमा होतील. हा अंदाज करण्यासाठी खालील आलेख वापरायचा आहे. क्ष अक्षावर आठ नोव्हेंबरपासूनची दिवसांची संख्या आहे. ९ तारखेला बॅंका बंद होत्या. त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत सुमारे ५० दिवसांची मुदत आहे. य अक्षावर त्या त्या दिवसांपर्यंत जमा झालेल्या रकमेची संख्या लाख कोटीमध्ये दिलेली आहे. वरची आडवी रेषा ही साधारण १५.४४ लाख दर्शवणारी आहे.

अंदाज करा - फोटोत किती माणसं आहेत?

बऱ्याच वेळा आपल्याला मोठ्या आकड्यांमुळे गोंधळून जायला होतं. वर्तमानपत्रांत सर्रास अमुक मोर्चाला वीस लाख लोक आले होते वगैरे बातम्या दडपून येतात. ते आकडे प्रचंड फुगवलेले असतात असा माझा अनुभव आहे. पण प्रचंड संख्येने दिसणारा जमाव दिसला की आपल्याला पन्नास हजार की पाच लाख हे कळायला मार्ग नसतो. वृत्तपत्रांनी ते स्वतंत्रपणे करावं अशी अपेक्षा असली तरीही ते तसं करताना दिसत नाहीत. पण काही गणितं करून, मोजमापं करून आपलं आपल्याला ठरवता येतं. म्हणून यावेळी खाली दिलेल्या फोटोत किती माणसं आहेत याचा अंदाज करायचा आहे.

ह्युमन क्लोनिंग

(मूळ लेखक झपाटलेला फिलॉसॉफर,यांच्या पूर्वपरवानगीने इथे प्रकाशित )

काही दिवसापूर्वी क्लोजर टू गॉड हा हॉलीवूडपट पाहिला . आणि मनात विचारशॄन्खला सुरू झाली ...
http://www.imdb.com/title/tt3457486/

ऑनलाईन जाहिराती : कशा टाळाव्यात, टाळाव्यात का?

संकेतस्थळांवरील ऑनलाईन जाहिरातींचा भडिमार थांबवण्यासाठी मी अॅडब्लॉक व तत्सम इतर अॅडऑन्स वापरतो. गेल्या काही दिवसात अनेक संकेतस्थळांनी पान दाखवण्यापूर्वी अॅडब्लॉकर बंद करा अशा सूचना दाखवायला सुरुवात केली आहे. विशेषतः एनडीटीवी आणि लोकसत्ता ही माझ्याकडून नियमित पाहिली जाणाऱ्या संकेतस्थळांवर आता मी जात नाही. लोकसत्ताच्या ईपेपरमध्ये जाहिराती असल्यातरी ऑनलाईन आवृत्तीसारख्या त्या अंगावर येत नाहीत आणि बहुतेक बातम्या तिथे असतात. बाकीचे ऑनलाईन वाचन फीडली वगैरेमध्येच होत असल्याने सुदैवाने जाहिराती नाहीत.

अभियांत्रिकी पदविकेनंतर असणाऱ्या कोर्सेसची माहिती हवी आहे

माझा भाऊ सध्या अभियांत्रिकी पदविका अर्थात डिप्लोमा इन मेकॕनिकल इंजीनिअरींग करत आहे.
पुढच्या वर्षी त्याला मेकॕनिकल इंजीनिअरींगशी संबंधित कोर्स करायचा आहे. तरी मार्गदर्शन हवे आहे.

पोकेमॉन गो : 20 वर्षांची तपश्चर्या

आज पोकेमॉन गो (Pokemon Go) या मोबाइल फोनवरच्या गेमने जगात धमाल उडवून दिली आहे. 7 जुलै 2016 साली, म्हणजे अगदी अलीकडेच रिलिज झालेल्या या गेमने जगातील सगळी रेकॉर्डस तोडली आहेत. केवळ एका रात्रीत हा गेम प्रचंड लोकप्रीय झाला व जगभर याच्यावर लोकांच्या उड्या पडू लागल्या. केवळ पहिल्या आठवड्यातच 10 लाखांच्या वर लोकांनी हा गेम डाऊनलोड करून त्याने ट्विटर, फेसबूक, स्नॅपचार्ट, इन्टाग्रॅम व वॉटसअपचे रेकॉर्ड तोडले व 600 कोटी डॉलर्सची कमाई केली. हा गेम चालत खेळायचा गेम आहे. या गेमने लोकांना एवढे वेड लावले आहे की एरवी अजीबात न चालणारी माणसे या गेमच्या निमीत्ताने मैलोंमैल चालायला लागली.

गणिती / तांत्रिक मास्टर किंवा पी-एच डी मिळविलेल्याला ताबडतोब ग्रीन कार्ड !

अमेरिकेत कोणतीही गणिती किंवा तांत्रिक मास्टर किंवा पी-एच डी मिळविलेल्याला हिलरीकाकू ताबडतोब ग्रीन कार्ड देऊ म्हणतात ! फक्त नोकरीची ऑफर असण्याची अट आहे . (हे आधी मिट रॉम्नी ने 2012 सालीच मांडले होते!) यातून अशा पदव्याचा काळा बाजार सुरू होईल , तसेच वयस्क अमेरिकन लोकांना काढून त्याजागी स्वस्त अशियन पोरांना स्वस्तात आणले जाईल अशी टीका होत आहे (पण हे सध्याही चालू आहेच !) . सध्या अमेरिकन मास्टर्स वाल्यांना वीस हजार वेगळे "H-1B"व्हिसा आहेतच . अमेरिकेच्या दृष्टीने काहीही असले तरी भारताने याचे स्वागत आणि समर्थन करायला हवे .

पृथ्वीच्या तापमानातील वाढ रोखण्यासाठी तांत्रिक उपाय: सल्फर कणांची निर्मिती

२० किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानातून हवेत सल्फ्यूरिक असिडचे फवारे मारायचे; पाण्याच्या वाफेबरोबर त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन सल्फेटचे मायक्रो कण तयार होतील , जे सूर्याचा प्रकाश परावर्तित करतील . यामुळे सूर्याची सुमारे एक टक्का उष्णता पृथ्वीवर पोचण्यापासून थांबविता येईल. सुरुवातीला २५,००० मेट्रिक टन सल्फ्यूरिक असिड आणि ११ विमाने लागतील (नंतर हे वाढवीत न्यावे लागेल ) आणि एकूण खर्च (सुरुवातीला, दर वर्षी ) सुमारे ७० कोटी डॉलर्स येईल . अधिक वाचन :

बॉस मराठी इनपुट प्रॉब्लम

ऐपल मक़बूक प्रो वर गूगल मराठी इनपुट कसा वापरायचा। इन बिल्ट इनपुट सिस्टेम हिंदी आहें त्यामूले टाइप करता येत नाही। सिस्टेम प्रेफ़्रेन्स वर जौण
ट्राय केला। पूर्णविराम येत नाहिए उभि रेश एटेय अशी ।।।।

प्लीज़ हेल्प
फ़ोरम वर पण सर्च केला सोलशन नाही मिलाल

विंडोज़ मध्ये जसा फ़्री फ़्लो वापरता येत होता तसा पाहिजे

पाने

Subscribe to RSS - विज्ञान/तंत्रज्ञान