इतर

गुलाम महम्मद शेख यांचे चित्रमय व्याख्यान

हा विकांत पुण्यात बरेच चांगले कार्यक्रम होते, आणि मर्फिजच्या नियमांनुसार (असल्या सगळ्या न-नियमांना मर्फिजचे नियम असे आम्ही संबोधतो, हे खुद्द मर्फिजनेच सांगितले असले पाहिजेत अशी अट नाही) (साल्या लै माजलेल्या - श्रेय: गुर्जी) कुटुंबसंस्थेच्या जंजाळात नेमके याच विकांताला आम्ही अडकलेलो असल्याने त्यापैकी एक तरी कार्यक्रम जमेल का या विषयी खात्री नव्हती.

स्पर्धा का इतर?: 

राहुल देव बर्मन

संगीतकार राहुल देव बर्मन ह्यांचा आज ७५वा जन्मदिवस आहे. आजही त्यांच्या संगीताची लोकप्रियता टिकून आहे. पाश्चात्य संगीतातले अनेक प्रकार हिंदी सिनेमात आणण्यापासून ते गुलज़ारांच्या मुक्तछंदातल्या म्हणता येतील अशा कवितांना चाली लावण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे ही लोकप्रियता आहे. आपले पिता दिग्गज संगीतकार सचिन देव बर्मन ह्यांच्याच क्षेत्रात काम करूनही त्यांच्या छायेत न राहता आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत येणं हेदेखील त्यांचं कर्तृत्व म्हणता येईल. कित्येक चित्रपटांसाठी आपल्या पित्याला साहाय्य केल्यानंतर १९६१ साली 'छोटे नवाब'द्वारे त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली.

स्पर्धा का इतर?: 

बोलके बटाटे

तीन महिने घर बंद ठेवल्यानंतर कुलूप उघडून प्रवेश करताच समोर टेबलावर दोन बटाटे हात उंचावून माझे स्वागत करीत होते. मीही हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला. माझे हात खाली आले तरी त्यांचे येईनात म्हटल्यावर बटाट्यांना बाहेर बाल्कनीत नेऊन प्रकाश दाखवला आणि त्यांची रवानगी एका रिकाम्या कुंडीत केली. ओल्या कचर्‍याचे झालेले खत त्यावर पसरले. दोन तीन दिवसातच त्या उंचावलेल्या हातांवर - कोंबांवर-हिरवे ठिपके दिसू लागले. वसंत ऋतूचे आगमन होतच होते आणि बघता बघता महिन्याभरात बटाट्याची २-३ फूट उंच झाडे/रोपे झाली. यंदा पाऊस तसा जास्तच होता. वादळी पाऊसही झाला.

स्पर्धा का इतर?: 

उत्तर-पूर्व भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

चारधामच्या अनुभवाने पोळल्यानंतर आता हिमालयात कुठे फिरायला जावे याचा विचार करत होतो. कारण एकदा का तुम्ही हिमालयात जाउन आलात की तो तुम्हाला बोलावतच रहातो. आणि तुम्हीही कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याला प्रतिसाद देऊ लागता. नॉर्थ-ईस्ट कधीचे डोक्यांत होते. अचानक संधी चालून आली आणि एका टूर तर्फे आम्ही तिथले बुकिंग करुन टाकले.
मुम्बई-गुवाहाती-काझीरंगा-बोमदिला-तवांग्-दिरांग्(सर्व अरुणाचल)- गुवाहाती-शिलाँग्-चेरापुंजी-शिलाँग्-गुवाहाती-मुंबई असा ११ दिवसांचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होता.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर