ऐसी अक्षरे" या जातीयवादी संस्थळावर बंदीची मागणी...
प्रस्तुत धाग्यावर पुरेशी चर्चा झालेली आहे. प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आणि योग्य ती पावलं उचललेली आहेत. हे सर्व लक्षांत घेऊन प्रस्तुत चर्चा वाचनमात्र करण्यात आलेली आहे.
- "ऐसी अक्षरे" प्रशासन
"आपण यांचं मीठ खाल्लय" हा माझा आगरी समाजाचा इतिहास सांगणारा लेख दै. नवशक्तीत प्रकाशीत झाला होता. हा व अन्य विणकर, शिंपी, डहर उर्फ ढोर या जातींचाही इतिहास सांगनारे लेख मी नुकतेच ऐसी अक्षरे ( aisiakshare.com ) या एका सुबुद्ध व्यक्तींनी चालवलेल्या विचारी म्हणवणा-या संस्थळावर प्रकाशित केले होते. लेख जेंव्हा प्रसिद्ध केला जातो तेंव्हा त्यावर वाचकांची टीका-टिप्पण्णी अपरिहार्य अशीच असते. किंबहुना तीच अपेक्षीत असते. त्यातुन विषय पुढे जायला मदत होत असते. परंतु या संस्थळावर जो जातीयवादाचा भयंकर पगडा आहे तो पाहता अशी संस्थळे ही समाजविघातक आहेत हे लक्षात येईल.
माझ्यावर व्यक्तिगत टिका मी समजु शकतो. जातीय झुंडशाहीची ती एक अपरिहार्य अवस्था असते. कंपु करून संस्थळावरील आपलाच हक्क अबाधीत ठेवायचा असे लोक प्रयत्न करनारच. कोणत्याही लेखकाने लिहिलेल्या (स्व-कंपुतील नसलेल्या) लेखकाच्या प्रतिपादनाकडे लक्ष न देता त्याची शैली कशी आहे व कशी असायला हवी याचेच चर्वितचर्वण करण्यात अशांना रस असतो. हेतु साधा असतो तो हा कि इतरांना नाउमेद करणे. माझा मुद्दा समजावुन घेण्यासाठी मी आधी त्यांच्या समग्र प्रतिक्रिया येथे प्रकाशित करत आहे. कृपया त्या शांतपणे वाचाव्यात.
Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.
Sun, 22/07/2012 - 19:27 | लेख.... (Score: 4 रोचक )
मन
पुण्य: 2
लेख कसा वाटला ह्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही.वरती चर्चा, आक्षेप चाललेलेच आहेत.
विक्रम देशपांडे ह्यांचे प्रतिसाद हिडिस,गलिच्छ वाटले. विशेषतः पुढील वाक्ये:-
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
वाटाघाटी करणारे हे कोण आहेत, आणि कशाच्या वाटाघाटी करणार आहेत हे कळले तर बरे. असे प्रतिसाद इथे(ही)राहतात हे पाहून आश्चर्य वाटले.कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात.
· प्रतिसाद
--मनोबा
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 20:20 | सहमत/असहमत (Score: 4 मार्मिक )
मुक्तसुनीत
पुण्य: 2
>>>>>>>>>>>>>>>
लेख कसा वाटला ह्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही.वरती चर्चा, आक्षेप चाललेलेच आहेत.
विक्रम देशपांडे ह्यांचे प्रतिसाद हिडिस,गलिच्छ वाटले. विशेषतः पुढील वाक्ये:-
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
वाटाघाटी करणारे हे कोण आहेत, आणि कशाच्या वाटाघाटी करणार आहेत हे कळले तर बरे.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
प्रचंड सहमत.
>>>>>>>>>>>>>>>>>
असे प्रतिसाद इथे(ही)राहतात हे पाहून आश्चर्य वाटले.कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात.
<<<<<<<<<<<<<<<<<<
१. ऐसी अक्षरेच्या धोरणांनुसार कुणालाही आपली राजकीय/सामाजिक संदर्भाततली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्याशी सहमत/असहमत होणे, त्याला विरोध करणे , कडकडीत निषेध नोंदवणे याचीही मोकळीक आहे.
२. "ब्राह्मणांच्या हत्याकांडा"ची कॉन्स्पिरसी थिअरी विनोदी वाटली. त्याच्याशी असहमती नोंदवतो.
देशपांडे यांना सुचवतो की त्यांचं लिखाण हे जातिवाचक लिखाणाचा एक अत्यंत वाईट नमुना आहे. आपल्या मतांचा त्यांनी पुनर्विचार करावा. जन्माधिष्ठित वर्चस्व, विशिष्ट जातींचं de facto वरचढ असणं वगैरे वगैरे मतं ही असमर्थनीय आणि बुरसटलेली आहेत. "ब्राह्मणांवर अन्याय होतो, त्यांना अकारण झोडपले जाते" या अर्थाचे प्रतिपादन हमो मराठे आणि इतरांनी केलेलं आहे त्या अंगाने त्यांना मांडायचे तर मांडावे. अन्यथा त्यांच्या मतांचा तीव्र निषेध मी नोंदवतो.
· प्रतिसाद
"हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर ते फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता कोणते फुटावयाचे - मातीचे की लोखंडाचे - हे ठरलेले आहे" - वासुदेवशास्त्री खरे
Sun, 22/07/2012 - 16:00 | धागालेखकाच्या हास्यास्पद (Score: 1 )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
धागालेखकाच्या हास्यास्पद प्रतिसादांना काहीही उत्तर देणे नाही!
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 09:24 | मिठाचा 'शोध' कोणी लावला? (Score: 5 मार्मिक )
अरविंद कोल्हटकर
पुण्य: 2
ह्या लेखातील अतिव्याप्त विधानांबद्दल फार काही लिहीत नाही. बहुजनसमाजाला योग्य ते श्रेय दिले जात नाही अशा रुखरुखीतून हे लेखन निर्माण होत आहे. वाचणारे वाचतात आणि टाळ्या वाजवतात. बहुप्रसव लेखकाच्या नावावर आणखी एक 'वैचारिक' पुस्तक जमा होते. 'Preaching to the converted' अशा प्रकारचे हे लिखाण वाटते.
'आगरी समाजाचे भारतीय संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी मीठाचा शोध लावला' ह्या एका विधानावर थोडे सविस्तर लिहितो. मीठ कोणी 'शोधले', चाक कोणी 'शोधले', विस्तव कोणी 'शोधला', आडोसा निर्माण केला किंवा प्राण्यांची कातडी पांघरली तर ऊन्ह-वारा-पाऊस-थंडीपासून बचाव होतो हे कोणी 'शोधले' अशा प्रश्नांना उत्तरे असतात असे मला वाटत नाही. 'शोधले' कोणीच काहीच नाही, जे निसर्गाने उपलब्ध होते ते 'ओळखले' इतकेच म्हणता येईल. तेहि अमुक एका काळी किंवा अमुक एका जागीच घडले असेहि म्हणता येत नाही. हे होतेच आणि अनेक जागी आणि अनेक वेळा हे स्वतन्तपणे लक्षात आले इतकेच म्हणता येईल. हे हजारो वर्षांपूर्वीच घडले असावे, त्याचा इतिहास फक्त सात हजार वर्षांचाच आहे असे मानायचीहि गरज नाही. हिंदुस्तानाच्या पश्चिम किनार्यावर घडले असेल तसेच बंगालच्या पूर्व किनार्यावरहि स्वतन्त्रपणे सापडले असेल, मध्यपूर्वेतील उष्ण समुद्रकिनार्यांवरहि सापडले असेल. सोनवणींच्या स्कीममध्ये आगरी - का कोळी? - जमातीला ह्याचा copyright द्यायचा असला तर ते त्यांचे स्वातन्त्र्य आहे पण सर्वांनी ती स्तुतिस्तवने गाण्यात मागे सूर लावावा इतके काही आगरी - का कोळी - समाजाचे विशेष योगदान मीठक्षेत्रात मला दिसत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 00:09 | ऐसी अक्षरे या संकेतस्थळाची (Score: 2 मार्मिक )
ऐसीअक्षरे
पुण्य: 1
ऐसी अक्षरे या संकेतस्थळाची अधिकृत भूमिका सर्व पानांच्या तळाशी ऐसीअक्षरेची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे दिसते. त्यातल्या मार्गदर्श तत्त्वांत उल्लेखल्याप्रमाणे "जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल." सर्व विचारसरणींच्या, सर्व प्रकारच्या सदस्यांचे ऐसी अक्षरेवर स्वागतच आहे.
सदस्यांनी लेखन करताना व्यक्तिगत आरोप आणि अशिष्ट भाषा टाळावी ही विनंती.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 01:41 | मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
श्री. सोनवणी : <<<<< मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही>>>>> माझे नाव व टोपणनाव एकच आहे. व मुख्य म्हंजे मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण इतर जातींपेक्षा महान आहेत हे मान्य करताना मला कसलाही अपराधीपणा वाटत नाही. टोपणनावांबद्दल तुमचा राग हा टोपणनाव घेणार्याची जात ओळखता येत नाही म्हणून आहे. व तुमचा दावा की -- मी सर्व जातींचा मी सन्मान करतो -- हा तर सोंगीपणाचा कळस आहे. तुम्हास एकदोन क्षुल्लक पुरावे मिळाले तर तुम्ही ढोर हेच ब्राह्मण होते व ब्राह्मण च अस्पृश्य होते हे दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. जसं ती बरखा दत्त - हिंदू हेच देशद्रोही आहेत व मुसलमान हेच सर्वात जास्त देशभक्त आहेत हे दाखवायचा उद्योग करत असते तसा. अत्यंत क्षुल्लक योगदान असलेल्या जातींचे डोंगरा-यवढे योगदान आहे असे दाखवायचा उद्योग तुम्ही चालवलेला आहे. कोळी/आगरी यांनी मीठ शोधून काढले म्हंजे अमृत शोधून काढले या आवेशात तुम्ही लेख लिहिलेला दिसतो. ब्राह्मण हे कोणत्याही क्षमतेविना "वरचे" झाले व बाकीचे सर्व क्षमता असूनही "खालचे" राहिले असे सिद्ध करण्याचा उद्योग करणे याचा अर्थ विद्वत्ता नव्हे व इतिहास संशोधन त्याहून नव्हे.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 13:52 | सर्वांचे आभार. मी ही (Score: 2 रोचक )
Sun, 22/07/2012 - 11:25 | जनरलायझेशन (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
ठाणे व रायगड्(उत्तर) परिसरातच आगरी समाज हा (उत्तर भारतातील) जाटांप्रमाणे (जट जट जट .... दो दुने अठ) आडमुठा, हेकट, अशिक्षित, दांडगाई करण्यास उत्सुक म्हणून कुप्रसिद्ध आहे. जसे शिख लढवय्ये आहेत तसे जाट ही. पण आगर्यांची दादागिरी ही स्थानिकांवरच चालते. पण एखाद्या समाजाचे गुण मान्य करताना जनरलायझेशन चा दोष लागत नाही पण त्याच समाजास दोष देताना मात्र 'जनरलायझेशन होते' म्हणून गळे काढताना हे सोनवणींसारखे पुरोगामी लोक पुढे असतात. आगरी समाजाचा विकास झालेला नाही. हा समाज मागासच आहे. पण आपल्या मागासपणाचे खापर मात्र बामणांवर फोडायला हे अतिमागास आगरी/कोळी एकदम एका पायावर तय्यार असतात. माझे रोखठोक मत - आगरी/कोळी लोक "निम्नस्तरीय" आहेत.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 12:06 | विक्रमजी, आगरी/कोळी आज (Score: 3 रोचक )
संजय सोनवणी
पुण्य: 1
विक्रमजी, आगरी/कोळी आज प्रबोधनाच्या वाटेवर आहेत. गेल्या चार महिन्यात या समाजाने १८ सामाजिक चचासत्रे घेतली. एका सत्राला मीही उपस्थित होतो. ब्राह्मणांना दोष देनारे एकही भाषण कोणी केले नाही. शिवाय तुम्ही त्या समाजाला सरसकट निम्नस्तरीय म्हनता हे तुम्हाला जरा अतीच वाटत नाही काय? प्रबोधनाच्या वाटेवर जे निघाले आहेत त्यांना अडवू पाहणारे तुमचे विधान नाही काय? मागासांना विकसीत होण्यासाठी शुभेच्छा देण्याऐवजी तुम्ही त्यांना सरळ अतिमागासांत ढकलत आहात हे योग्य आहे काय?
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 13:11 | हे योग्यच आहे. (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
<<<<<<<<मागासांना विकसीत होण्यासाठी शुभेच्छा देण्याऐवजी तुम्ही त्यांना सरळ अतिमागासांत ढकलत आहात हे योग्य आहे काय?>>>>>>>>
हेच योग्य आहे कारण त्यांना हे दाखवून देणे गरजेचे आहे की ते मागास आहेत. प्रबोधनाच्या वाटेवर असणे म्हंजे सुधारलेले नसणे म्हंजेच मागासलेले असणे. मागास लोकांनी जास्त बडबड न करता प्रथम स्वतःचा विकास घडवून आणावा व नंतर त्यांनी भारतीय संस्कृतीवर केलेल्या उपकाराचे बघू. उगीचच क्षुल्लक योगदानाच्या जोरावर संपूर्ण देशाच्या संस्कृतीवर उपकार केल्याची भाषा "अंगुष्ठोदक मात्रेण शफरी फर्फरायते" प्रमाणे वाटते. (अर्थ समजला नसेल तर विचारताना न्यून बाळगू नका.). तसेही त्यांनी केलेले मिठाचा शोध हे योगदान हे सेरेंडिपिटी जास्त वाटते.
आणि तुम्ही ब्राह्मणांचा उल्लेख लेखामधे केला नाही पण खाली केला आहे. (आ.रा. ना उत्तर देताना.). मुख्य मुद्दा म्हंजे तुम्हास फरक पडला किंवा नाही याने ब्राह्मणांना अजिबात फरक पडत नाही. तुम्ही सर्वजातसमभाव बाळगता. पण ब्राह्मण तो भाव न बाळगताही पुढारलेले व श्रेष्ठ आहेत. व याचे पुरावे ढीग भर आहेत. सगळ्या जातीच्या लोकांना उच्च आंतरजातिय व विशेषतः ब्राह्मण जोडीदार हवा असतो यातच सगळे आले. तेव्हा तुमचा उद्योग ब्राह्मणांपेक्षा इतरांचे योगदान उच्च आहे हे दाखवण्याचा असला तरी त्याने फरक अत्यंत नॉमिनल पडणार आहे.
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 15:16 | जनसामान्य (Score: 5 मार्मिक )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
कुणासाठीही लिहा. विद्वानांसाठी लिहा, जनसामान्यांसाठी लिहा. पण अवास्तव विधानांच्या आधारे कुणाला अस्मिता मिळवून देऊ असे तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे.
इतिहास व संस्कृती घडवण्यात जनसामान्यांचे योगदान राजेमहाराजांपेक्षा खूप अधिक आहे हे दाखवण्यासाठी असत्याचा आधार घेण्याची काहीच गरज नाही. उपलब्ध आणि अधिकृत इतिहासात याचे बरेच दाखले मिळतात. शिवाजीचं आख्खं चरित्र जनसामान्यांची ताकत अधोरेखीत करणारं आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा तशीच कहाणी सांगतो. मध्ययुगातील भक्ती-सूफी परंपरा या जनसामान्यांच्या महान सांस्कृतिक योगदानाचा भला मोठा पुरावा आहे. प्राचीन भारताच्या इतिहासावर दामोदर कोसंबींनी आणि त्यांच्या समविचारी इतिहासकारांनी जो प्रकाश टाकला आहे त्यातून जनसामान्यांचे इतिहासातील स्थान आणि महत्व याचे लख्ख दर्शन घडते.
हे जे लिहिलेले आहे, ते साधारण सामान्य ज्ञान असलेला कोणीही "सामान्य माणूस" (माझ्यासारखा. मी विद्वान नाही. इतिहासकारही नाही. आणि सांगायला हरकत नाही, "ब्राह्मण" ही नाही.) मान्य करणार नाही. जनसामान्य जनसामान्य करत सत्याशी तडजोड ठीक नव्हे. जनसामान्यांचा अपमान करु नका.
या लेखात आक्षेपार्ह वाटते ते हे, की कोळी-आगरी समाजाच्या सध्याच्या व्यवसायासंदर्भात जे जे काही इतिहासात घडले आहे, त्याचे त्याचे सर्व श्रेय एक्स्लिझिव्हली याच समाजाला दिलेले आहे. जसे काही मानवी संस्कृतीच्या आरंभापासून कोळी-आगरी आणि इतर अशी विभागणी होती, आणि नॉन कोळी-नॉन आगरी मंडळींचा मीठ, नौकानयन, व्यापार, विणकाम याच्याशी संबंधच नव्हता. इतिहास सर्वांचाच आहे. हे असे अस्मिता जागे करण्याच्या नादात आपण जातींचे ध्रुवीकरण करीत आहात हे ध्यानात घ्यावे.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 14:05 | कोणतीही मते खोडुन काढतांना (Score: 0 निरर्थक )
संजय सोनवणी
पुण्य: 1
कोणतीही मते खोडुन काढतांना अरविंद कोल्हटकर देतात तसे पुरावे द्यावे लागतात. याच लेखमालिकेतील बाकीचे लेखही वाचले असते तर काही व्यवसाय हे एक्सक्ल्युजिव आहेत तर काही नाहीत हे लक्षात आले असते. पण सरधोपट विधाने करणा-यांना हे कोण शिकवणार?
दुसरे, तुम्ही ब्राह्मण आहात कि ढोर समाजाचे, मला काही फरक पडत नाही कारण मी सर्व जातींचा सन्मान करतो. शेवटी जाती कशाही निर्माण झालेल्या असोत...त्या होत्या आणि आहेत आणि राहणार आहेत. जातींचे ध्रुवीकरण नव्हे तर प्रत्येक जातीसमुहाचे संस्कृती घडवण्यातील योगदान मला अभिप्रेत आहे कि ज्यामुळे जाती एकमेकांकडे अधिक सन्मानाने पाहतील.
राहिले मी जनसामान्यांचा अवमान करतोय कि नाही...त्याचे उत्तर जनसामान्यांवरच सोडलेले बरे. त्याचे उत्तर मी तुमच्यासारख्या असामान्यांकडुन मागितलेले नाही. किंवा जनसामान्यही तुमच्याकडे तक्रार घेवुन आलेले नाहीत. मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही. वाकड्यात घुसण्यातच ज्यांना विकृत मौज वाटते त्यांच्यासाठी माझ्याकडे काही मनोरुग्णालयांची/मानसोपचार तज्ञांची यादी आहे..गरज भासलयास ती मी पुरवू शकेल.
तुम्ही म्हनता तुम्ही "सामान्य" आहात. नव्हे तुमच्याएवढ्या सामान्य प्रतीचा माणुस मी क्वचितच पाहिला असेल. त्यामुळेच तर तुम्ही "असामान्य" ठरता.
माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.
धन्यवाद.
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 16:11 | माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्यान(Score: -1 खोडसाळ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
<<<<<<<<<<<<<माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.>>>>>>>>
सोनवणी, तुम्हास ही म्हण ठाऊक आहे का - अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 20:51 | संजय सोनवणी, श्री आळशांचा (Score: 5 मार्मिक )
अर्धवट
पुण्य: 2
संजय सोनवणी,
श्री आळशांचा राजा हे बहुतेक सर्वच संकेतस्थळांवर संयत व सामंजस्याची भूमिका मांडताना दिसतात, त्यांच्या वरील प्रतिसादातही मला काहिच आक्षेपार्ह आढळले नाही. आपला आक्रस्ताळेपणाचा प्रतिसाद व असभ्य भाषा यांचे या सदस्यांच्याबाबत या प्रतिसादात तरी वापरण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.
संस्थळावर लेखन करायचे असेल तर त्यावर जे काही प्रतिसाद येणार ते वाचण्याची, समजुन घेण्याची, व त्याचा सभ्यपणाने प्रतिवाद करण्याची तयारी असणे हे आवश्यक ठरतेच.
तुमच्या लेखनाचा उदोउदो करणार्या लोकांसाठीच तुमचे लेखन असेल तर तसा फोरम निवडायला हवा.
केवळ कोणी विरोधी मत मांडले म्हणून असा आकांडतांडव कराल, तर काही दिवसांनी केवळ एकांगी विचार करणार्यांची फौज भोवताली जमा होउन, आपली मते तपासून बघण्याची क्षमताच नव्हे शक्यताही नाहीशी होईल.
असो...
श्री आळश्यांचा राजा यांच्या संदर्भात वापरलेल्या अनुचित आणि असभ्य भाषेचा तीव्र निषेध.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 16:22 | खिक्... (Score: 5 मार्मिक )
श्रावण मोडक
पुण्य: 2
माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.
खिक्... गरज? खुल्या संकेतस्थळांवर ती कधीच नसते. तसे तुम्हाला कोणी भासवून दिले असेल तर तो त्याचा मूर्खपणा आहे इतकेच.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 14:33 | मी ही लेखमाकिका विद्वानांसाठी (Score: 4 मार्मिक )
बिपिन कार्यकर्ते
पुण्य: 1
मी ही लेखमाकिका विद्वानांसाठी लिहित नाहीहे. अस्मितेच्या शोधात असलेल्या जनसामान्यांसाठी लिहित आहे.
असं असेल तर मग, मला वाटतं की स्वीपिंग स्टेटमेंट्स अथवा गुणी लेखनाबद्दल वर जे काही म्हणले गेले आहे ते अधिकच महत्वाचे ठरते.
काय म्हणता?
· प्रतिसाद
बिपिन कार्यकर्ते
Sat, 21/07/2012 - 14:06 | कार्यकर्ते...गुणी लेखनाचा (Score: 1 )
संजय सोनवणी
पुण्य: 1
कार्यकर्ते...गुणी लेखनाचा क्लास काढा कि राव...पहिला विद्यार्थी मी होतो. पक्कं.
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· संपादन
· प्रतिसाद
Mon, 16/07/2012 - 08:53 | मीठाच्या व्यापारासंदर्भात (Score: 1 )
३_१४ विक्षिप्त अदिती
पुण्य: 2
मीठाच्या व्यापारासंदर्भात 'बखर अंत़काळाची' (का 'अंताजीची बखर') मधे रोचक माहिती आहे. तपशील फारसा आठवत नाही, पण कादंबरीतल्या मुख्य पात्राचे वडील कोकणातून मीठ विकत घेऊन त्यात माती मिसळून मीठ बरंच महाग विकत असत. त्या काळात मातकट, काळपट मीठ फार महाग असे.
ठाणे शहराच्या आसपास रहाणार्या आगरी लोकांची भाषा ऐकत रहावी अशी गोड वाटते, अगदी शिव्यापण. या बायका प्रेमाने बोलताना, कौतुक करतानाही अस्सल शिव्या देतात त्याचे संस्कार अगदी लहान वयापासून झाल्यामुळेही असेल.
(लेखाबद्दल अधिक लिहीत नाही. आ.रा आणि मुक्तसुनीत यांच्या प्रतिक्रियेत अधिक भर घालण्याएवढं काही सुचलं नाही.)
· प्रतिसाद
Mon, 16/07/2012 - 06:13 | बैठक (Score: 5 मार्मिक )
मुक्तसुनीत
पुण्य: 2
हा लेख वाचला. या लेखमालिकेतील इतर लेख वाचण्याचा प्रयत्न केला.
लेखनामागचा हेतू जरी प्रशंसनीय असला तरी लिखाणामधे एकंदर शिस्तीचा अभाव जाणवला. अनेक विधाने अशी एकामागोमाग एक येत जातात ज्यांची संगती लावणे अशक्य बनते. एका विशिष्ट समाजाचे एका विशिष्ट संस्कृतीमधे काय आणि कसे योगदान होते हे समजून घेण्याकरता आणि समजावून सांगण्याकरता लिखाणाची बैठक, विषयाची शिस्तशीर मांडणी , संदर्भांची यादी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या त्या संदर्भांची योजना हे मूलभूत नियम पाळले गेले असं दिसलं नाही.
कदाचित लिखाणामागची भूमिका आणि त्याचं स्वरूप हे एखादा ससंदर्भ निबंध लिहिणे असे नसून, विषयाची रंजक तोंडओळख करून देणे असा असू शकतो. हे करतानाही विषयाची रंजक मांडणी , शैलीबद्धता हे गुण अभावानेच जाणवले. मुख्य म्हणजे रंजन करणे याचा अर्थ तर्कागत संगतीला रामराम ठोकणे नव्हेच.
असो. लेखकाने या आधीच्या लिखाणात आपल्या वाचनाची चुणूक दाखवलेली आहे. या सखोल वाचनाचं, संदर्भ शोधण्याचं रूपांतर यथायोग्य रीतीने गुणी लिखाणात व्हावे या सदिच्छेपोटी प्रस्तुत अभिप्राय दिला आहे. कलोअहेवि,
· प्रतिसाद
"हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर ते फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता कोणते फुटावयाचे - मातीचे की लोखंडाचे - हे ठरलेले आहे" - वासुदेवशास्त्री खरे
Mon, 16/07/2012 - 05:35 | हा हा (Score: 3 रोचक )
सन्जोप राव
पुण्य: 2
फार मनोरंजक लेख. 'राघूनानांची कन्येस पत्रे' आठवली
· प्रतिसाद
बक रहा हूं जुनूं में क्या क्या कुछ
कुछ न समझे खुदा करे कोई
Sun, 15/07/2012 - 23:41 | स्वीपिंग स्टेटमेंट्स (Score: 4 मार्मिक )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
एखाद्या समाजाचा इतिहास लिहिताना त्यातील गौरवस्थाने अधोरेखीत करणे इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणून एवढी स्वीपिंग स्टेट्मेंट्स करणे योग्य नाही. ज्या पद्धतीने हा लेख लिहिला आहे, त्याच पद्धतीने अजून एक (अशीच सांगोवांगीची) भर घालतो - सध्याच्या ओरीसामध्ये पूर्वीची काही राज्ये येत - ओड्र, कोशल, उत्कळ, कलिंग ही महत्त्वाची. त्यातील उत्कळ आणि कलिंग ही नावे "कोल" या सध्या अस्तित्वात असलेल्या आदिवासींवरुन पडलेली आहेत.
तर असे आहे, की जिथे जिथे कोल, कोलीय सापडते तिथे तिथे आपण कोळी आगरी मंडळींना जोडू शकतो. मला वाटते कोळशाचा शोधही कोलीय मानववंशानेच लावला असावा.
· प्रतिसाद
मी माझ्या सर्वच प्रतिक्रिया येथे घेतलेल्या नाहीत. मुळ दुव्यावर त्या आहेतच. येथे चर्चेसाठी अन्यांच्या सर्वच प्रतिक्रिया जशा आहेत तशा घेतल्या आहेत.
काय दिसते यातुन?
१. बहुजनांबद्दलचा पराकोटीचा उपहास. बहुजन करतात ती स्वीपींग स्टेटमेंटस आणि या संस्थळावरील महाभाग करतात ती असते विद्वत्तेची झेप!
२. यांना इतरांकडुन पुरावे/संदर्भ/ तळटीपा वगैरे हव्या असतात. हेही देतात...काय तर नेटवरील (बव्हंशी विकीपीडिया) चे संदर्भ. त्यात त्यांना आपली विद्वत्ता दिसते.
३. प्रत्येक लेखात काय असावे आणि काय नसावे या अपेक्षा झाल्या. अपेक्षा म्हणजे समीक्षण नव्हे. जे आहे त्याचे विवेचन करत मग त्रुटींबद्दल लिहिले तर त्याला समीक्षा म्हनतात.
४. एका महाभागाने कारण नसतांना, तसा विषयही नसतांना "मी ब्राह्मनही नाही" हे सांगायचा उद्य्योग का केला असेल हे मी समजु शकतो. "मी ब्राह्मण आहे पण ब्राह्मण्यवादी नाही" असे वावदुकपणे काही लोक बोलतात त्यातलाच हा प्रकार.
असो. वाचक सुज्ञ आहेत. हे लोक, काही उघड तर काही छुपे" जातीयवादी कसे आहेत याकडे वळतो.
विक्रम देशपांडे म्हणतात: "माझे रोखठोक मत - आगरी/कोळी लोक "निम्नस्तरीय" आहेत."
पुढे ते म्हणतात: "हेच योग्य आहे कारण त्यांना हे दाखवून देणे गरजेचे आहे की ते मागास आहेत. प्रबोधनाच्या वाटेवर असणे म्हंजे सुधारलेले नसणे म्हंजेच मागासलेले असणे. मागास लोकांनी जास्त बडबड न करता प्रथम स्वतःचा विकास घडवून आणावा व नंतर त्यांनी भारतीय संस्कृतीवर केलेल्या उपकाराचे बघू. उगीचच क्षुल्लक योगदानाच्या जोरावर संपूर्ण देशाच्या संस्कृतीवर उपकार केल्याची भाषा "अंगुष्ठोदक मात्रेण शफरी फर्फरायते" प्रमाणे वाटते. (अर्थ समजला नसेल तर विचारताना न्यून बाळगू नका.). तसेही त्यांनी केलेले मिठाचा शोध हे योगदान हे सेरेंडिपिटी जास्त वाटते.
"तुम्हास एकदोन क्षुल्लक पुरावे मिळाले तर तुम्ही ढोर हेच ब्राह्मण होते व ब्राह्मण च अस्पृश्य होते हे दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. जसं ती बरखा दत्त - हिंदू हेच देशद्रोही आहेत व मुसलमान हेच सर्वात जास्त देशभक्त आहेत हे दाखवायचा उद्योग करत असते तसा. अत्यंत क्षुल्लक योगदान असलेल्या जातींचे डोंगरा-यवढे योगदान आहे असे दाखवायचा उद्योग तुम्ही चालवलेला आहे. कोळी/आगरी यांनी मीठ शोधून काढले म्हंजे अमृत शोधून काढले या आवेशात तुम्ही लेख लिहिलेला दिसतो. "
विक्रम देशपांडे पुढे म्हणतात: "शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू."
आपण मुळातील त्यांची व अन्यांची विधाने वाचलेली आहेतच दोन जणांनी निषेधाचे कसे ढोग केले आहे हेही तपासुन पाहु.
"देशपांडे यांना सुचवतो की त्यांचं लिखाण हे जातिवाचक लिखाणाचा एक अत्यंत वाईट नमुना आहे. आपल्या मतांचा त्यांनी पुनर्विचार करावा. जन्माधिष्ठित वर्चस्व, विशिष्ट जातींचं de facto वरचढ असणं वगैरे वगैरे मतं ही असमर्थनीय आणि बुरसटलेली आहेत. "ब्राह्मणांवर अन्याय होतो, त्यांना अकारण झोडपले जाते" या अर्थाचे प्रतिपादन हमो मराठे आणि इतरांनी केलेलं आहे त्या अंगाने त्यांना मांडायचे तर मांडावे. अन्यथा त्यांच्या मतांचा तीव्र निषेध मी नोंदवतो."
हा झाला मुक्त सुनीत यांचा निषेध...(?)
तर आधी देशपांडेंच्या प्रतिसादाला गलीच्छ-हिडीस वगैरे म्हणुन "मन" म्हणतात- "कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात."
लक्षात आला का यांचाच गेम प्ल्यन? हमोंच्या भाषेत लिहिलेले यांना चालणार आहे. त्यांचा निषेध हा सशर्त आहे. मन म्हणतात ही आयडीच बोगस आहे. आयडी खरी असो कि खोटी, ते हस्तक असोत कि अन्य कोणी, निषेध करायलाच हवा होता. या दोघांनीच नव्हे तर या दुव्यावर ज्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी व अन्य वाचकांनीही. पण तसे झालेले दिसत नाही याचाच अर्थ या जातीयवादी विधानांन यांचा पाठिंबा आहे.
आणि असा निषेध झालेला नाही, वा या संस्थळाच्या व्यवस्थापनाने, जसे माझ्या संतप्त प्रतिसादाला लगोलग नियम/अटी दाखवते...तेच देशपांडेंबाबत दाखवलेले नाही याचाच अर्थ व्यवस्थापनच मुळत जातीय रोगाने ग्रस्त आहे
सर्वात महत्वाच्या बाबी येथे लक्षात घ्यायला हव्यात त्या ह्या:-
१. विक्रम देशपांडे नामक माणसाने (त्याचे खरे-खोटे नांव/जात काहीही असो) आगरी समाजाचा (आणि तदनुषंगिक सर्वच ओबीसी/बीसी/भटक्या विमुक्तांचा) घोर अवमान केलेला आहे.
२. आगरी लोकांनी मीठाचा शोध वा पुरातन कालापासुन व्यवसाय केलेला नसुन ते श्रेय आगरी लोकांचे नाही असा एकुणातील आविर्भाव आहे. थोडक्यात यांच्या मते मीठ काय आणि कातडे कमवायचा काय, शोध यांच्याच पुर्वजांनी लावला...
३. आगरी लोक हे मातृसत्ताक पद्धतीचे असुन वेदांपेक्षा पुरातन आहेत हे सत्य नाकारत ते श्रेय स्वत:कडेच ठेवायचे आहे. किंबहुना आगरी लोक वैदिकांपेक्षा पुरातन ठरतात हे सत्य त्यांना पुरेपुर अमान्य आहे.
४. त्यांनी अन्य जातीयांच्या इतिहासाबाबत मी लिहिलेल्या अन्य एकाही लेखाला एकही, कसल्याही दर्जाचा, प्रतिसाद दिलेला नाही. आगरी लोकांच्या बाबतीत मात्र त्यांना "निम्नस्तरीय", अतिमागासादि विशेषणे बहाल करत "ब्राह्मण हेच श्रेष्ठ आहेत" व बहुदा जगातील सारे काही त्यांनीच शोधले आहे असा या संस्थळावरील लोकांचा अप्रत्यक्ष अभिप्राय दिसतो. किंबहुना हा उपक्रम मी हातातच कशाला घेतला येथुनच यांचे आक्षेप आहेत. मी करतोय ते काम माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्याने व प्रामाणिकपणे करायला यांना कोणी अडवले नव्हते. ते केले नाही म्हणुन यथाशक्ती मला करावे लागत आहे.
अन्य लेखांवर कसलाही अभिप्राय नाही कारण तेथे मी वैदिक ऋचांचे वा तत्कालीन सम्स्कृतीचे उल्लेख केलेले आहेत. आग-यांचा लेखात नाही. यामुळे यांचा कसा पोटशुळ उठला असेल हे मी समजु शकतो...पण सत्य हे शेवटी सत्य असते.
५. अरविंद कोल्हटकर म्हनतात कि आगरी स्माजाचे मीठ उद्योगात मला त्यांचे फारसे योगदान दिसत नाही. त्यांच्यासाठी मी सांगतो कि आधी सिद्दी व नंतर ब्रिटिशांनी मीठागरे कशी ताब्यात घेत आग-यंची वाट लावली ते व नंतर तटरक्षक दलांनी समुद्राकाठचे बांध फोडुन मीठागरेच नष्ट केलीत, त्यामुळे हा धंदा कसा कोसळला हेही तपासायला हवे. एवढेच नाही तर बांध फोडल्याने किनारच्या जमीनी नापीकही बनवल्या. त्याबाबत आपला समाज कधी तोंड उघडत नाही. त्यांच्या या शोषनाबाबत आपण गप्प बसतो आणि त्यांच्यातील अडानीपणा...दारिद्र्य आणि त्यामुळे आलेला उद्दामपना यालाच लक्ष करतो आणि निम्नच आणि अतीमागासवर्गात ढकलत त्यांचा उपहास करतो...हा कोणता न्याय झाला? स्पष्टच विचारायचे तर ही कोनती विकृत ब्राह्मणी सम्स्कृती दाखवत ब्राह्मण समाजाचाही अवमान करत आहात?
६. सर्वच ब्राह्मणेतर समाजांना तुच्छ समजण्याची ही ऐसी अक्षरेची झुंडशाहीची प्रवृत्ती समाजविघातक आहे. समाजात दरी निर्माण करनारी आहे. वर्णव्यवस्थावादाचे भुत या संस्थळाचे मालक ते अनुयायी ब्राह्मणवादीच आहेत. हे सिद्ध करायला माझ्याकडे या संस्थलाबाबत इतरही अनेक पुरावे आहेत, पण ते मी सध्या न्यायालयासाठी राखुन ठेवतो.
ज्यावेळीस सर्व समाज निरलसपणे एकत्र यावा, जाती-जातींतील संघर्ष संपावा यासाठी काही प्रयत्न करत असतात तेंव्हा जाणीवपुर्वक असे लोक त्यात अडथळा निर्माण करतात आणि भरल्या खंडीत मुतत्तात. स्वत:ला काही जमत नसेल तर आपापल्या शैल्या/विचार यातच क्लोज ग्रुपमद्धेच गुंगावे, संस्थळे ही पब्लिक फोरम बनवु नयेत.
थोडक्यात:
मी ऐसी अक्षरे, देशपांडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करने, जातीयवादाचे समर्थन करणे, प्रोत्साहन देणे, जातीनिदर्शक हीणकस विधाने करणे आदि गुन्हेगारी कलमांखाली माझ्या वकीलाच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करत आहे याची नोंद घ्यावी. मग दोषी ख-या नांवाचे असोत कि खोट्या, भारतात रहात असोत कि विदेशात, त्यांना जेरबंद केले जाईल.
तसेच या "ऐशी अक्षरे" संस्थळावर कायमस्वरुपी बंदी आणण्यासाठीची मागणी केली जात आहे.
समाजात ऐक्य हवेय. हे असले उद्योग करना-यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. सुसंस्कृतततेच्या नांवाखाली असंस्कृत वागणारे लोक समाजाला एकुणात परवडणारे नाहीत.
- 9924 reads
प्रतिक्रिया
ऐसीअक्षरेचे अभिनंदन
ऐसीअक्षरेचे आणि ऐसीअक्षरेंच्या मालकांचे अभिनंदन. यानिमीत्ताने भरपुर फोकट प्रसिद्धी होणारसे दिसत्येय. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
मला उधळायला फार फार आवडतं
तमाम ऐशी अक्षरे करांना
तमाम ऐशी अक्षरे करांना पहिल्यांदा नागपंचमिच्या हार्दिक शुभेच्छा! तर संजय यांनी चांगला लेख लिहीला आहे. आगरी समाजाबद्दलची माहिती वाचून आनंद झाला. पण संजयजी आपणास एक सांगावयाचे आहे की आगरी समाज हा बौध्द नसुन हिँदू आहे. शिवाय एकविरादेवीचे मंदिरही हिँदू आहे. आता आपणावर टीका का झाली हेच मला कळत नाही? देशपांडेजीँना काय हवे आहे? मला देशपांडेजीँना सांगावेसे वाटते की वैदिक धर्माचे सर्वात जास्त कुणी नुकसान केले असेल तर याच " ब्राम्हण " मंडळीँनी ! यांनीच भेदाभेद माजवून गरीब हरिजन जनता बौध्द धर्मात घालविली. आणि आता आपल्या धर्मात दुफळी माजवताहेत. शिवाय भारताचा ज्वलंत प्रश्न - "काश्मिर" झाला नसता. कारण बाटवलेली काश्मिरी जनता पुन्हा हिँदू व्हायला उत्सुक होती. काश्मिरच्या हिँदू राजानी सर्व तयारी केली पण ऐणवेळी हिच " ब्राम्हण " मंडळी पुढे आली व विरोध करू लागली की तुम्ही त्यांना परत घेतले तर आम्ही आत्मदहन करु. झाले, काश्मिरी जनता मुस्लिम राहिली व आता काय परिस्थिती काय आहे ते आपण जाणता . म्हणून सांगतो संघटित रहा. संजयजीँना विनंती काही मुठभर लोकांमुळे त्रासून संकेतस्थळावर बंदिची मागणी घालू नका! नमस्कार. जय हिँद!
+१ सहमत आहे
धनंजय वैद्य यांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे.
येथे थोडी भर घालू इच्छितो.
देशपांडेंसारख्या व्यक्तींना त्यांचा ज्ञातिभिमान असेन तर तो असणे काही गैर नाहीये. पण आम्हीच श्रेष्ठ आहोत असा दंभ भरणे ही जातीयवादाकडे नेणारी विचारसरणी आहे. तसा मला स्वतःलाही हा गर्व वा अभिमान आहेच. पण मी सर्व जातींचा सन्मान करतो व समता या एकाच निकषावर व्यक्तींकडे पाहतो. तेव्हा अशा जाहीर प्रतिक्रियांना तत्काळ प्रतिउत्तर देऊन योग्य ती समज देणे ही जबाबदारी सर्वच सदस्यांनी (किमान ऐसी अक्षरे च्या संचालकांनी) स्वत:हून घेतली तर असे प्रवाद टाळले जातील.
माझे सदस्यत्व रद्द करा वा ऐसी अक्षरेवर बंदीची मागणी या लेखनामागची श्री. सोनवणींची वेदना मी समजू शकतो. आणि ती चुकीची आहे असे मला अजिबात वाटत नाही.
जेव्हा एखाद्या विचारवंताला कोणी स्पष्ट पणे सांगत असेल (ते ही त्या सदस्यांचा तेवढा अभ्यास आहे की नाही हे माहित नसताना) की आमचीच जात श्रेष्ठ आहे. (असेल वा नसेल हा वेगळा वादाचा मुद्दा आहे) तर अशा जाहीर स्टेटमेंट्सना वेळीच बांध घालणे आवश्यक आहे. देशपांडे काही कोणी समस्त ब्राह्मणांनी अधिकृतपणे वकीलपत्र दिलेली व्यक्ती नव्हे की तिने असे थेट स्टेटमेंट करावे.
तेव्हा माझी देशपांडेंनाही व ज्ञातिभिमान बाळगणार्या सर्वांनाही नम्र विनंती आहे की आपापला अभिमान, अहंकार स्वतःपुरता ठेवावा व अशी स्टेटमेंट्स करणे टाळावे.
सोनवणींनी जी लेखमाला लिहिलेली आहे ती त्या त्या समाजाची माहिती देण्यासाठी व त्यातील अभिमान वाटावा असे मुद्दे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहेत. यात काही चूक आहे असे मला अजिबात वाटत नाही.
हाच निकष तुम्ही १८ पुराणांनाही लावाल काय? जो एक दुसर्याशी ताळमेळ ठेवत नाही? विष्णु पुराणात विष्णु श्रेष्ठ. शिव पुराणात शिव श्रेष्ठ, ब्रह्म पुराणात ब्रह्म श्रेष्ठ. एखाद्याचे श्रेष्ठत्त्व अधोरेखित करणे ही पूर्वापार चालत आलेली लेखनपरंपरा आहे. तुम्हाला सोनवणींवर टीका करायची असेल तर या १८ पुराणांतील विसंगतीबद्दल तुमचे मत काय आहे ते माहिती करुन घ्यायला आवडेल.
मी सोनवणींना व्यक्तीशः ओळखतो त्यामुळे त्यांच्याशी या विषयावर संयम बाळगण्याची विनंती मी त्यांना माझ्याकडून करणारच आहे. पण बाकीच्या सर्वांनीही सोनवणी हे विचारवंत आहेत, त्यांचा या विषयांतील अभ्यास गाढा आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी ही नम्र विनंती.
सकारात्मक दिशेने वाद-विवाद (वैयक्तीक नव्हे तर मुद्द्यांच्या अनुषंगाने) झाले तर त्याबद्दल त्यांचीही काही हरकत नसावी. एखाद्या चर्चेतून त्यांचे मत चुकीचे आहे असे सिद्ध झाले तर ते मान्य करण्याइतका खिलाडूपणा त्यांच्यात आहे हे मी स्वतः अनुभवले आहे म्हणून निश्चितपणे सांगू शकतो.
तेव्हा ऐसी अक्षरे च्या प्रवर्तकांना विनंती की आपण सर्व बौद्धीक चर्चा करण्यासाठी येतो तेव्हा दोन्ही बाजूंनी सामोपचाराची भूमिका घेण्यासाठी आपण लक्ष घालावे.
मला आज जर प्रवर्तकांपैकी एकाचा फोन आला नसता तर कदाचित मला याबाबतीत काही कळालेही नसते. तेव्हा त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.
सोनवणी साहेब, सद्स्यत्व सोडू
सोनवणी साहेब, सद्स्यत्व सोडू नका. तुमची भूमीका योग्य आहे.
माझे मत ब्लॉक केले गेले!
माझे मत ब्लॉक केले गेले!
'ऐसी अक्षरे' च्या
'ऐसी अक्षरे' च्या उद्दिष्टांपैकी 'सकस चर्चांतून विचारांना चालना मिळावी' हे एक आहे. अशी चर्चा कशी करावी याबाबत मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे:
- जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल.
- अशा मर्यादांची जाणीव ठेवण्याची जबाबदारी लेखकांची व प्रतिसादकांची आहे.
यातून हे स्पष्टच होतं की 'ऐसी अक्षरे' संस्थळाच्या धोरणांतच जातीयवादी, कोणत्याही प्रकारे भेदभाव करणार्या, कायदेबाह्य लेखनाला बंदी आहे. विवेकवादी विचारसरणीला अनुसरून या व्यासपीठाचा उपयोग असत्य आणि अन्यायाचा विरोध करण्यासाठी व्हावा त्या मर्यादेत रहाणाऱ्या सदस्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला प्रोत्साहनही आहे. आत्तापर्यंत संस्थळावर मोजक्या काही प्रतिसादाचे अपवाद वगळता लेखनाची अभिव्यक्ती संतुलित आहे. आक्षेपार्ह प्रतिसादांना वाईट श्रेणी देण्याची सोय 'ऐसी अक्षरे'वर आहे. संस्थळाचे शंभराहून अधिक लेखक-सदस्य श्रेणीदाते आहेत. आक्षेपार्ह प्रतिसादांना त्यांची जागा दाखवण्याचं काम सदस्यांनी श्रेणीपद्धत वापरून नेहेमीच केलेले आहे.
निव्वळ आक्षेपार्ह काय आणि प्रतिबंधित करण्याजोगे काय याची जाण संपादन मंडळाने वेळोवेळी दाखवलेली आहे. मॉडरेटर्स, श्रेणीदाते आणि इतर अनेक सदस्यांनी वेळोवेळी जात्यंध लिखाणाचा निषेध केलेला आहे. संस्थळावरील नियमित लेखकही जातीयतावादाचे विरोधकच आहेत हे त्यांच्या लिखाणातून स्पष्ट दिसत आहे. इतके असूनही एका अपवादात्मक प्रतिसादावरून संस्थळ, व्यवस्थापक, संस्थळावर नियमितपणे चर्चा घडवून आणणारे आणि त्यात भाग घेणार्या सदस्यांवर झालेला जातीयतावादाचा आरोप अविचारी आहे.
सर्व सदस्यांना नम्र विनंती अशी की त्यांनी ऐसी अक्षरे ची ध्येयधोरणे, उद्दिष्टे व मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा एकदा वाचावीत. "मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो की निव्वळ मनोरंजनात्मक - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे." आपल्या संस्थळावरील वागणुकीतून वाचकांचे जीवन समृद्ध व्हायला मदत होत आहे का हे स्वतःलाच विचारून पहावे. लेखन व प्रतिसाद देताना तारतम्य बाळगावे. द्वेष आणि हिंसा पसरवणार्या लिखाणाला 'ऐसी अक्षरे'वर स्थान नाही.
जागा चुकली आहे
हा प्रतिसाद "त्या" प्रतिसादांच्या खाली हवा होता असे वाटते.
श्रेणी देण्याच्या सिस्टिममध्ये भडकावू श्रेणी मिळालेले प्रतिसाद (काही संख्येने तशी श्रेणी मिळाल्यावर) उडतात असे वाटत नाही.
त्यावर अधिक काही उपायांची आवश्यकता आहे. आज ते प्रतिसाद उडालेले दिसत आहेत. ते पाहण्यापूर्वी हे वाक्य लिहिले होते. त्यामुळे खालच्या करड्या रंगातली वाक्ये अवांतर ठरू शकतील. तरी त्यांच्यातला मुद्दा समोर रहावा म्हणून तशीच ठेवतो आहे.[या प्रतिसादात लिहिलेले आर्ग्युमेंट लीगली टेनेबल नाही असे वाटते. अर्थात संस्थळचालकांनी खातरजमा केली असण्याची शक्यता आहेच]
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
संजयजी, हा लेख वाचून आश्चर्य
संजयजी, हा लेख वाचून आश्चर्य वाटलं.
आपल्या समाजात वेगवेगळी मतं आहेत लोकांची - असं का घडतं यामागे सामाजिक, सांस्कृतिक कारणं जशी असतात तसा व्यक्तिगत चॉईसही असतो. हे सगळं का असतं याची चर्चा करण्याची आत्ता वेळ नाही - आणि मलाही तेवढा वेळ नाही सध्या.
सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्याला न आवडणा-या मतांना आणि आपल्या विरोधकांना तोंड देण्याची गरज असते, त्यांचा वैचारिक आणि व्यावहरिक प्रतिवाद करण्याचीही गरज असते याबाबत दुमत नाही. पण असे करताना 'हे किंवा ते' यातले एकच निवडा असे म्हणण्याने, तुम्ही 'अ' निवडले नाही, त्याला पाठिंबा दिला नाही म्हणजे तुम्ही 'अ' चे विरोधक आहात (आणि पर्यायाने कोणत्यातरी 'लेबल'चे अनुयायी आहात) असे म्हणण्याने प्रश्न सुटत तर नाहीच, उलट गुंतागुंत वाढते. अनेकदा 'हेही आणि तेही' अशा परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो. अशा वेळी समोरच्या सगळ्या समुहाला एका 'गटात' टाकण्याची घाई माझ्या मते अकारण वातावरण गढूळ करणारी ठरते, ती अनेकांवर अन्याय करणारी असते.
असो, तुमचा निर्णय झाला आहे त्यामुळे अधिक काही लिहिण्यात अर्थ नाही. हेही लिहायची गरज नव्हती पण वाटले लिहावे, म्हणून लिहिले.
(माझा हा प्रतिसाद वाचून तुम्ही मला एखाद्या अतिरेकी विचारसरणीचे लेबल लावले नाही तर मला आनंद होईल. पण तसे तुम्ही केलेत तर त्यासह मी पुढे जाईन.)
या विषयावर हे इतकंच.
***
अब्द शब्द
जातीअंताचा लढा
अशाच प्रकारच्या चर्चा वा लेखन भाषिक, वांशिक, प्रांतिक इ. वादात दिसून येतात. हळूहळू अधिक द्वेषाकडून कमी द्वेषाकडे असा प्रवास करत या भुमिका बोथट होत जातील. या निमित्ताने मला संजोपरावांच्या या लेखाची आठवण झाली.
स़ंजयजी आपण संवेदनशील आहात. थोडे सोशिकही व्हा! ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर अशा चर्चा निकोप वातावरणात झाल्यास त्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शकच ठरतील. ऐसी अक्षरे मला जातीयवादी संकेतस्थळ वाटत नाही.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
माझ्या या लेखामुळे अनेकांना
माझ्या या लेखामुळे अनेकांना खेद वाटला असेल, रागही आला असेल वा काहींना मौजही वाटली असेल. मी एक येथे स्पष्ट करु इच्छितो कि मी सृजनावर विश्वास ठेवतो...विध्वंसकतेवर नाही. परंतु कधी कधी एखादा मतप्रवाह एकांगी होत अतिरेकी टोकाला जायला निघतो तेंव्हा कटु निर्णय घ्यावे लागतात. बोलावे लागते. आगरी-कोळीच काय, अन्य कोणत्याही जातीच्या, अगदी ब्राह्मणांविरुद्धही एकांगी हल्ले चढवले आहेत तेंव्हा मी व माझे मित्र नुसती टंकने करत नव्हे तर प्रसंगी जीवावरचेही धोके पत्करत अशा हल्ले चढवणा-यांच्या विरोधात ठाम भुमिका घेत उभे राहिलेलो आहोत. राहु. आम्ही आणि इतर हा विभेद नष्ट कसा करता येईल यावर आमचा भर होता व राहील. प्रत्येक समाजघटकाला इतिहास होता व राहील. कोणीही आकाशातुन एकाएकी पडलेले नाही. कोणी एक समाज सर्वांचा स्वयंभु नेता झाला, त्यानेच संस्कृती बनवली आणि इतर सारे आपसुक गुलाम झाले हे समाजेतिहास मान्य करत नाही. ते वास्तव नाही. आजचे सारे ब्राह्मण हे पुरातन काळातील ब्राह्मनांचेच वंशज आहेत हेही खरे नाही. कारण पुरातन काळी वर्ण-जात ही काही जन्मावरुन ठरत नव्हती. हीच बाब सर्व जातीयांना लागु पडते. आम्हाला आमचे जन्मश्रेष्ठ स्थान अबाधित ठेवत इतर जातींची काय चिकित्सा करायची ती करा, आमच्याच विचारपद्धती आणि शैल्यांचे अनुसरण करा हा दंभवाद आजवर टिकला असेल...भविष्यात तो टिकनार नाही. सागर भंडारे म्हनतात त्यानुसार जर खुद्द पुराणेच काय हमो काय किंवा सतीश कुलकर्णी काय (अगदी अखिल भारतीय ब्राह्मण सम्मेलने काय) नवी पुराणे रचत जातात तेंव्हा ब्राह्मण समाजाच्या एकुणातील प्रवृत्तींबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. येथे देशपांडेंसारखे महाभाग "ब्राह्मण हे श्रेष्ठच आहेत" असे स्पष्ट विधान करतात. या संस्थळाच्या व्यवस्थापनाने त्यांचे प्रतिसाद वगळले, पण त्यांची निंदा केलेली नाही, हेही स्पष्ट आहे. मी येथे नमुद करु इच्छितो कि प्रवृत्ती ज्याच्या त्याच्या संस्कारांवर अवलंबुन असतात हे खरे असले तरी अपवृत्ती काय आणि सुवृत्ती काय यात फरक करण्याचे ज्यांत सामर्थ्य नाही ते एक दिवस रसातळाला जावून पोहोचनार हे नक्की. बहुजन समाजाच्या अस्तित्वाखेरीज तुमचेही अस्तित्व बेकार आहे, निरर्थक आहे हे समजावून घेण्याची गरज आहे. पणजोबाच्या चुकीची शिक्षा नातवाला देणे हा महामुढपणा आहे हे खरेच आहे. पण किमान अपेक्षा अशी कि ती चुक तुम्ही पुन्हा करु नका. परंतु वर्चस्ववादी भावना काही केल्या जात नाही. तुमची विद्वत्ता...(जिचा तसा जगाला-समाजाला काही उपयोग नाही...) जी केवळ बौद्धिक स्वरंजनाच्या कामी येते आणि ती तुम्हालाही प्रगल्भ करत नाही कि अन्य कोणालाही. तसेही नरहर कुरुंदकर म्हनालेच होते...ब्राह्मनांनी आपले ज्ञान पार उधळुन वाटले असते तरी त्याचा समाजाला काही उपयोग झाला नसता कारण त्यात मुळात ज्ञानच नव्हते. (येथे मी संदर्भ देत नाही. हवे त्यांनी समग्र कुरुंदकर साहित्य वाचायचे कष्ट घ्यावेत.) आजही तीच स्थिती आहे. झुंडशाही कळप वृत्ती याने ग्रसित ही मंडळी कसलेही ज्ञान निर्माण करत नाहीत...करुही शकत नाहीत,. सुनिता विल्यम्स अवकाशात गेली कि येथे सर्वांचा उर अभिमानाने भरुन येतो...पण ती ना भारतीय आहे ना समजत...असेल भारतीय वंशाची...भारतियांना नाचा-बागडायचे कारण काय? ही आत्मवंचना कोठे थांबनार आहे?
आमचे मित्र सतीश कुलकर्णी दर वर्षी वैदिक विज्ञान दिन साजरा करत आर्यत्वाचा व त्या विज्ञ्नानाचा टेंभा मिरवतात. असो. मी जास्तच भावनिक झालो असेल कदाचित. हा माझा दोषच आहे. असो. मीही मनुष्यच आहे.
मी माझ्या सर्व बांधवांना (वर्चस्ववादी सोडुन...कारण वर्चस्ववाद्यांना कोणी बांधव असुच शकत नाहीत) विनंती करतो कि आज कोणत्याही समाजाची परिस्थिती काहीही असो, तुम्ही त्यांच्या उत्थानासाठी सहयोगी बनु शकत नसाल तरी चालेल...किमान अदथळे बनु नका. आम्ही बहुजनीय उदार मनाचेच आहोत आणि राहणार. पण उदारतेमुळे आजवर ज्या संकटात कोसळलो त्यांत पुन्हा पडन्याची आमची इच्छा नाही.
आम्ही नसतो तर ना पुरोहित असते ना पुजारी.
आमच्या अस्तित्वामुळे तुमचे अस्तित्व होते व आहे... तुमच्यामुळे आमचे नाही हे मी येथे स्पष्टपने नोंदवून ठेवतो. राग आला तरी चालेल. आत्मपरिक्षण करायची तुम्हाला कधीच गरज नसते हे आम्हाला कळुन चुकले आहे. पुरोहित वर्गाला जगवायचे कार्य आम्ही पुरातन काळापासुन पार पाडलेले आहे. आता संदर्भ बदललेलेत. तुम्ही आम्हाला जगवू शकत नाही...किमान आमची मानसिकता ठार मारायचा प्रयत्न करु नका...फार अंगलट येईल.
असो. मी ऐसी अक्षरे वा तो देशपांडे यांच्यावरील कायदेशीर कारवाई तसेच उद्या मी ठरवलेली पत्रकार परिषद तुर्तास रद्द केली आहे. पण म्हणुन हेच नव्हे, अन्यही जातीयवादी संस्थळांनी त्यामुळे मुक्ततेचा श्वास घेवू नये. कायदा आमचे काय वाकडे करणार या भ्रमातही राहु नये. उदा. मी देशपांडेचा पार घरचा पत्ताही मिळवला आहे. मी आता तरी त्याचा उपयोग करणार नाही. करण्याची इच्छहे नाही. देशपांडॆंनी जसा उदारपणा जसा आगरी समाजाने दाखवला तसा दाखवावा आणि आपल्या उद्दाम विधानांबाबत माफी मागावी. ते मागणार नाहीत कदाचित. पण अशा विकृतांना कोणी पाठीशी घलु नये अशी माझे कळकळीची विनंती आहे.
एवढे लिहून मी माझे विचार संपवतो आणि आपला या संस्थळावरुन निरोप घेतो.
मी आतिवास, सागर भंडारे, अरविंद कोल्हटकर, प्रकाश घाटपांडे, विक्षिप्त अदिती यांचे आभार मानतो ज्यांना कसलाही अतिरेक मान्य नाही. खरे तर हा वाद खुप पुढे गेला असता प॑ण सागर, जो माझा धाकटा भाउच जसा...त्याने मला शांत केले.
धन्यवाद. गुडबाय.
सोनवणीसाहेब मी तुमचा ब्लॉग
सोनवणीसाहेब मी तुमचा ब्लॉग नियमीत वाचतो. तुमचे विचार स्पृहनीय आहेत किंबहूना मी तुमच्या लेखांचा चाहता आहे. तुमचे लेख प्रचंड माहीतीपूर्ण असतात. त्यातून तुमचा व्यासंगच दिसून येतो.
ऐशी अक्षरेवर लिहीणे बंद करु नका. तुम्ही नशीबवान आहात. हेच तुम्ही मायबोलीवर लिहीले असते तर आतापर्यंत तुमच्या आयडीला ढगात पाठवले असते. माबोचा अनुभव तुम्ही मधुकरला विचारा. सध्यस्थीतीत पराकोटीची जातीयवादी (ब्राह्मणवादी) साईट आहे ती. या बाबतीत मिसळपाव एकदम निस्पृह आणि खेळीमेळीचे वातावरण असलेली साईट आहे.
आंजावर, मिडीयामधे अजुन ब्राह्म्ण बहुसंख्य आहेत. त्यांची प्रत्यक्ष जीवनात होणारी मुस्कटदाबीच्या निराशा ते इथे अशाप्रकारे काढतात्.इथे सरसकटीकरण करता येणार नाही. सत्यमेवमधल्या धर्माधिकारींसारखी माणसेही यत्र तत्र सर्वत्र आहेत.
बहुजणांमधे इतिहासाभ्यासक, लेखक निर्माण होणे गरजेचे आहे. तुमच्यावर टिका करण्यांची माणसिकता ती आहे जीने सावित्रीबाईंच्या अंगावर शेणामातीचे गोळे फेकले. त्यांना रस्त्याने चालणे अशक्य केले. शाहूमहाराजांवर नसते खटले भरले.
त्यांच्या तुलनेत हा त्रास काहीच नाही. फुले-आंबेडकर्-शाहूंनी आपापले जीवन मातीत घातले म्हणून किमान आपण लिहू वाचू लागलो. जातीयवाद्यांची सद्दी संपवायची असेल तर आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपली मते न डगमगता हिरीरीने मांडत राहीले पाहीजे.
बहुजण हिताय.. बहुजण सुखाय..