हिंदू धर्माभिमान्यांसाठी...

भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता घेतलेल्या संस्था आणि संघटनानी संस्कृतीच्या स्वच्छतेसाठी काही केलेले दिसत नाही.

गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांबद्दल मी बरेच ऐकले होते पण ते फारच सौम्य होते. ते इतके भयानक आहे हे फकत परदेशी लोकांमुळे कळले.

कृपया आमीर खानच्या पुढाकाराची वाट बघू नका

अधिक काही लिहीण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. कमकुवत मनाच्या लोकांनी ही छायाचित्रे पाहू नयेत.

(खालील धाग्यावर काही हिडीस वाटतील अशी अर्धवट राहिलेल्या, कुजलेल्या प्रेतांची चित्रे आहेत. असं पाहण्याने ज्यांना त्रास होतो अशांनी ही लिंक उघडू नये - संपादक)

http://www.chinasmack.com/2010/pictures/filthy-india-photos-chinese-neti...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

चित्रे पाहण्याची तसदी घेतली नाही. Smile

असो. ती केवळ शरीरे आहेत. त्यांचे आत्मे तर अर्धवट जळलेले / कुजलेले नाहीत ना ? Smile कारण आत्म्याला जाळता येत नाही, तोडता येत नाही, त्याला भिजवता येत नाही आणि वाळवता येत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते चाचांचा प्रतिसाद रुचला नाही.

हा विषय नक्कीच हसण्यासारखा वा थट्टेचा नाही. धर्माबद्दल नाही म्हणत आहे मी.
एकंदरीत जगासमोर भारताची प्रतिमा काय जाते आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. पर्यटन क्षेत्रावर ह्या फार विपरीत आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो.

सर्व जग स्वत:ची प्रतिमा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना आपण कुठे आहोत ह्याची खरंच लाज वाटली. आणि ह्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करण्याखेरीज काहीही करू शकत नाही ह्याचा विषाद आणि खंतही वाटली. पण काहीही करू नाही ह्याचा अर्थ लगेच हा विषय थट्टेवारी नेण्यासारखाही नाहीयेय.

तूर्तास इतकेच. पुढे चर्चा कशी वळण घेते किंवा होतच नाही त्यानुसार......

- (हताश) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत रे ब्रिजेशा.असेच काही मक्का,मदिनेला घडत असेल तर थत्ते अशी थट्टा करतील का हे ही बघायला हवे.भारताची प्रतिमा तशी कधीच चांगली नव्हती सोकाजीराव.कुपोषणाने मरण पावणारी बालके,कमालिचे दारिद्र्य,३०% लोकांना दोनवेळचे जेवण नाही,कायदे,नियम धाब्यावर बसवणार्‍या लोकांचा देश अशी भारताची प्रतिमा पूर्वीपासून आहे.अगदी ५०च्या दशकापासून.
बंद गळ्याचा शर्ट्,गुलाब,सुवासिक अत्तर लावून परदेश वार्‍या अनेकांनी केल्या पण जगाला मूर्ख नाही बनवू शकत तुम्ही जास्त काळ.
(जाणती) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे हताश होऊ नका. अशी प्रतिमा जगात जाते आहे हे खरे आहे मात्र केवळा हीच प्रतिमा जगात आते आहे असे नव्हे. शिवाय अशी चित्रे जगात जाऊन परदेशी पर्यटकांचा ओघ कमी होईल की वाढेल हेही सांगणे अवघड आहे.

बाकी मुळ चित्रे २००८ मधील आहेत. मटाने ने परवा बातमी का द्यावी (ती ही बहुदा चीनचा प्रतिमा डागा़ळण्याचा प्रयत्न का अश्याच काहीशा हेडींग खाली) हे देखील कळले नाही

बाकी, भारतात सार्वजनिक अस्वच्छता आहे आणि त्याबद्दल खंत वाटते याच्याशी सहमत आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थट्टा कुठे केली?

उलट त्या चिन्यांना ठणकावून सांगितलं की आम्ही ज्याला आत्मा सोडून गेला आहे त्या शरीरांना फार महत्त्व देत नाही.

असो. त्या प्रेतांमुळे गंगेचं पाणी प्रदूषित होतं हे खरं आहे. पण अशी प्रेतं गंगेत टाकू नका; गंगेच्या काठीच अंत्यविधी करायची काय गरज आहे? वगैरे कुणाला सांगण्याची सोय उरलेली नाही. तसं सांगू गेलं तर कुणी भामाबाई "तुम्ही 'त्यां'ना तसं सांगायला जाल का?" असा प्रश्न विचारतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पर्यटन क्षेत्रावर ह्या फार विपरीत आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो.

भारतात याच कारणासाठी येणारे काही पर्यटक माझ्या जपानमधल्या वास्तव्यात भेटले होते. कार्यालयातील एक जपानी महिला भारतात जाऊन आल्यानंतर सगळ्यांना फोटो दाखवत होती, त्यात रस्त्यात उभ्या असलेल्या गाई, देवळासमोर रांगेत बसलेले भिकारी, गल्ली-बोळांमधले उकीरडे असे छान-छान फोटो होते.
हे सगळं नसेल तर भारताची काहीच युएसपी राहणार नाही असे वाटते.
एकूण पर्यटकांपैकी निसर्गसौंदर्य पाहायला येणारे किती, अध्यात्मिक अफू खायला येणारे किती आणि गरीबी पाहायला येणारे किती याचा अभ्यास पर्यटनखात्याने करायला हवा म्हणजे नक्की कळेल की सगळीकडे स्वच्छता, टापटीप, शिस्त असेल तर पर्यटकांची संख्या कितीने कमी होईल ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावधान, पूर्णपणे अवांतर प्रतिसाद* :

उपोद्घात :
हे तुम्हास माहित आहे काय? ('विचित्र विश्व'च्या चालीवर)
फार पूर्वी नाही तरी वीसतीस वर्षांपूर्वी काशीचे 'पंडे' लोक गावोगावी (सर्व भारतात) आपल्या यजमानांकडे (ज्या घराण्यांच्या गोत्रावळी त्यांच्याकडे असत) दरवर्षी वर्षिली वसूल करायला चातुर्मासात जात असत - त्यांचे वंशावळीचे चोपडे आद्ययावत करून घेण्यासाठी वगैरे. या पंडे मंडळींकडून गंडे, करदोटे (मनगटास व कमरेला बांधायचे रेशमी धागे) काशीचा 'प्रसाद' म्हणून दिले जात. या व्हिजिटमध्ये त्या घराला गंगेचे पवित्र पाणी पोचवणे हाही एक महत्त्वाचा भाग असे. एक क्वॉर्टरभर (तीच -चपटी) पाणी 'गंगाजल' म्हणून दिले जाई. या घरबसल्या 'काशी' दर्शनाच्या बदल्यात या पंड्यांना निवास, सुग्रास भोजन आणि दक्षिणा मिळत असे.

एक किस्सा -
तर एका आधुनिक खेड्यात असाच एक पंड्या गंगेच्या चंबूमध्ये गंगाजल म्हणून नळाचे पाणी भरताना सापडला. त्यामुळे त्याला भीषण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. ते तोंड त्याने लगेचच काळे केले आणि नंतर पुन्हा कधीही आपले तोंड त्या गावात दाखवले नाही.

ठोकताळा -
साधारण तीन-चार महिन्यात सत्तर-ऐंशी गावांना भेटी देऊन तिथल्या सर्व यजमानांच्या घरी एक क्वॉर्टर गंगाजल आणि गंडे-दोरे पुरवायचे तर या पंड्यांना गेलाबाजार निदान पन्नास लिटर गंगाजल आणि पोतेभर गंडेदोरे घेऊन फिरावे लागले असते. तसे काही कधी दिसले नाही.

आमची पश्चातबुद्धी -
खरेतर गंगाजल म्हणून नळाचे स्वच्छ पाणी देण्यात पंड्यांचा विवेकच दिसून येतो. अन्यथा हे पंडे जिथे जातील तिथे पटकी/डायरियाची साथ आली असती.(संदर्भ : वरचे फोटो.) त्यापासून भारताला वाचवून या पंड्यांनी आपल्यावर (म्हणजे भाविक हिंदू जनतेवर आणि पर्यायाने समस्त भारत देशावर) उपकारच केले असे म्हणावेसे वाटते.

उपसंहार:
मृत्यूसमयी गंगाजल प्याल्याने या जन्मीच्या सर्व पापांचा नाश होऊन सद्गती मिळते असा हिंदू लोकांचा समज आहे. खरे-खोटे माहित होणे शक्य नाही. पण आसन्नमरण अवस्थेत गंगाजल प्यायले तर लवकरच मृत्यू होईल याची खात्री आहे.

*अवांतर अशासाठी की- कोणीही याबाबत संदर्भ मागू नये. तसेच या प्रतिसादास 'कायच्या काय' समजून कोणीही मनावर घेऊ नये.तसेच मीही जन्माने एक हिंदू असल्याने आपल्यातलाच एक समजून माफ करावे. तसेच काशीच्या पंड्या लोकांनी हा प्रतिसाद मनाला लावून घेऊ नये. तसेच येथील संपादकांस हा प्रतिसाद अयोग्य वाटत असेल तर उडवून टाकावा. तसेच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

परिस्थिती बदलावी असं म्हणणं फार सोपं असतं. तीर्थक्षेत्रं वगैरे फार दूरची बात आहे. सोसायटीतला ओला कचरा सोसायटीतच जिरवावा असं पुणे महानगरपालिका काही वर्षांपासून म्हणते आहे. पण तेवढं करायलासुद्धा लोक तयार होत नाहीत. अशा मानसिकतेचं काय करायचं?

>>एकंदरीत जगासमोर भारताची प्रतिमा काय जाते आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. पर्यटन क्षेत्रावर ह्या फार विपरीत आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो.<<

भारत कसा प्रगतीपथावर आहे आणि तिथल्या मॉल्स आणि तिथला वाढता मध्यमवर्ग अशा बातम्यांनासुद्धा प्रसिद्धी मिळते; आणि ती खाप पंचायतींविषयीच्या किंवा अशा पद्धतीच्या वार्तांकनालाही मिळते. आपल्या देशात या सगळ्या गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात आहेत. त्यामुळे तशी प्रतिमासुद्धा निर्माण होणार यात नवल काय? पर्यटन क्षेत्राचं म्हणायचं तर कुंभमेळे आणि वाराणसी वगैरे पाहायला परदेशी पर्यटक हौशीनं जातात आणि अनेक ट्रॅव्हल कंपन्या त्याविषयी प्रसिद्धीपत्रकं वगैरे प्रकाशित करतात असं दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारत कसा प्रगतीपथावर आहे आणि तिथल्या मॉल्स आणि तिथला वाढता मध्यमवर्ग अशा बातम्यांनासुद्धा प्रसिद्धी मिळते; आणि ती खाप पंचायतींविषयीच्या किंवा अशा पद्धतीच्या वार्तांकनालाही मिळते. आपल्या देशात या सगळ्या गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात आहेत.
भारत एकाच वेळी तीन शतकात जगतो म्हणतात. बहुतांश पब्लिक मागच्या शतकातच असते असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लिडींग व फेसबूक स्टाईल धागा, गंगेच्या स्वच्छतेसाठी काय काय प्रयत्न चालू आहेत हे जाणून घेतलेत काय? साईट्ची लिंक आणि तुमची भावनात्मक प्रतिक्रिया ह्याव्यतिरीक्त काय सांगितलेत?

काही संदर्भ -
१. वर्ल्ड बँक
२. एनजीआरबीए
३. एनजीआरबीए प्रोजेक्ट स्टेटस
४. महा-अनुभवच्या (मार्च २०१२) अंकात समीर कुलकर्णींचा लेख गंगेवरील शवदहन करणार्‍या मुलांशी निगडीत आहे, तो वाचा, अधिक माहिती मिळेल. - हा लेख गंगा स्वच्छतेशी निगडीत नसून गंगेवर चालणार्‍या शवदहनाच्या वास्तवाची माहिती देणारा आहे.

ह्यातले वाचल्यावर चायनास्मॅकवर गंगा स्वच्छतेचे प्रयत्न काय चालू आहेत हे पोस्ट कराल अशी आशा करतो, आणि धर्म नष्ट केल्यावर हे संपेल अशी आशा असल्यास निरीक्षण वाढविल्यास मदत होईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एव्हढे सगळे प्रोजेक्ट्स असून ही जर ही चित्रे बघायला मिळत असतील तर आपण सपशेल हरलो आहोत. मी धर्म नष्ट करायला सांगितले नाही तर धर्मामुळे निर्माण होणारा गलिच्छपणा संपवायला धर्माभिमानी पुढे का येत नाहीत, असा प्रश्न विचारत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एव्हढे सगळे प्रोजेक्ट्स असून ही जर ही चित्रे बघायला मिळत असतील
दिलेले दुवे नीट वाचलेत तर तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचे उत्तर मिळेल! NGRBA ची स्थापना २००९ साली झाली तर तुम्ही दिलेले फोटो २००८ सालचे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्मामुळे निर्माण होणारा गलिच्छपणा संपवायला धर्माभिमानी पुढे का येत नाहीत

सोप्पंय. धर्माभिमानी लोकं अशा गोष्टी करणार्‍यांना 'आपले' मानत नाहीत.

१. इथे लिहीणारे, वाचणारे सर्व लोक (अगदी मोजके अपवाद असतीलही) मराठी भाषिक आहोत. आपल्यापैकी किती लोकं स्वतःला शिवसैनिक आणि/किंवा मनसैनिक म्हणवून घेतात?
आपल्यापैकी बहुसंख्य लोक हिंदू घरांमधे जन्माला आलेले असणार आणि त्यामुळे जन्मामुळे काही एक जात आपल्या सगळ्यांना चिकटलेली आहे. काही लोक कष्टपूर्वक ती जात काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, काही लोक जातीकडे साफ दुर्लक्ष करतात, काही लोक उच्च-नीचतेला लाथ मारून फक्त जातींमधून आलेल्या सवयी तेवढ्या आपल्या असं म्हणतात. पण जाती-पातींवरून गोंधळ घालणारे जन्माने आपल्या जातीतले असले तरीही त्यांना किती लोकं आपले म्हणतात?
इथे, 'ऐसी अक्षरे' किंवा इतर कोणत्या अशा संस्थळावर लिहीणार्‍यांतले सगळेच लोकं तुम्हाला 'आपले' वाटतात का?

२. हिंदू म्हणवणारे लोकं या-या ठराविक गोष्टी करतातच असं अजिबात नाही.
मरताना गंगाजल तोंडात घालण्याबद्दल उदासीन असणारे हिंदू मला माहित होते (ते मेले म्हणून भूतकाळ), आहेत. मी मेल्यानंतर मला भडाग्नी द्या, कर्मकांड नको, पण प्रेत जाळा कारण प्रेतामुळे रोगराई पसरते असं बोलणारे आणि स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक मला माहित होते (आता हे लोकं मेले).

३. मी स्वतःला धर्माभिमानी वगैरे म्हणवत नाही. मग त्या धर्माभिमान्यांनी काय करावं हे सांगण्याचा हक्क मला कुठून आला? मी फारतर स्वतःबद्दल किंवा ज्यांना आपलं समजते त्यांच्याबद्दल बोलावं. ज्यांचे विचार अजिबातच पटत नाहीत त्यांच्या चुका काढण्यात काय हशील?

---

या फोटोंबद्दल एवढा आवाज व्हावा हे माझ्यासाठी अगम्य आहे. एकेकाळी अशा प्रकारच्या बातम्या पेपरांमधे वाचल्या आहेत. त्यात गलिच्छपणाची पुरेशी वर्णनं होती. (उलट 'वॉटर' चित्रपटात एवढी स्वच्छ नदी आली कशी असा प्रश्न पडला.) हे फोटो पाहून काही वेगळं गलिच्छ वगैरे वाटलं नाही. दोन दिवसांपूर्वी प्रकटलेल्या राजापूरच्या गंगेवरची अस्वच्छता, घाण आणि किळसवाणे प्रकार एकेकाळी पाहिलेले आहेत. ते पाहून काय उलटी यायची होती भावना होती ती पण मेली. ही तर खरी गंगा ... जेवढं अधिक पावित्र्य तेवढे अधिक बलात्कार.

---

ही सगळी घाण आहे, रोगराई पसरवणारी परिस्थिती आहे आणि हे होऊ नये हे सगळं मान्य आहे. पण ढेंगेवरच्या वाण्याकडून दूध आणतानाही आपली पिशवी न्यायची नाही, महत्त्वाच्या प्रत्येक गोष्टीला पातळ प्लॅस्टीकमधे गुंडाळून ठेवायचं असल्या सवयी असणार्‍या जवळच्या लोकांच्या सवयीही मी बदलू शकत नाही तर कोणा सोम्या-गोम्याने काय करावं हे सांगण्याचा मला हक्क आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे फोटो पाहून काही वेगळं गलिच्छ वगैरे वाटलं नाही

तुमचा बोथटपणा किंवा संवेदनशून्यता स्तूतीच्याही पलिकडची आहे...

जेवढं अधिक पावित्र्य तेवढे अधिक बलात्कार.

हे मात्र आवडलं आबि पटलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही मुद्यांशी सहमत!

- (संदेवनाशील) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागच्या शंभर वर्षांत बांधलेली सर्व प्रार्थनास्थळे पाडून तेथे स्वच्छतागृहे बांधली जावीत, हे आवडीचे मत पुन्हा नोंदवावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रार्थनास्थळं नाही पाडली तरी चालतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....