'ध' चा 'मा'

आमची प्रेरणा:

सर्व ध्यानप्रेमींची व ध्यानपुरस्कर्त्यांची क्षमा मागून या लेखातील विमा ऐवजी ध्यान हा शब्द घालून लेखात काही सूक्त बदल केल्यास काय होईल, हे मांडण्याचा प्रयत्न. लेखिका व समस्त वाचक हा उपद्व्याप sportively घेतील अशी अपेक्षा. (वाचकांच्या सोईसाठी जे बदल केले आहेत ते तांबड्या अक्षरात लिहिले आहेत.)

ध्यान नव्हे, मनःशांती

"मनाची उभारी आणि ताणतणाव याचा परस्परसंबंध वेगळा सांगायलाच नको. सर्व आघाडीवर सगळं व्यवस्थित असेल तर डोकं किती शांत रहातं. त्यातून आजच्या धकाधकीच्या जीवनात ... हा शब्दप्रयोग आलाच पाहिजे बरं का, नाहीतर फाऊल समजला जातो... वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव असतात. आपण ते सगळे टाळू शकत नाही. काहींचं फारतर व्यवस्थापन करता येतं. या ताणतणावांमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग असे वेगवेगळे विकार मनुष्याचा कुरतडून कुरतडून जीव घेतात. यातले काही तणाव आपण जरूर दूर करू शकतो........

एकदा का ध्यान करायला शिकले की कसलीही चिंता नाही." पूजा हेमाला समजावून सांगत होती. "अगं हेमे, ध्यानधारणा तसं सोपं नाही. पण आपण मध्यमवर्गीय लोकांसाठी ध्यानमार्गदर्शक बनायचं. उगाच श्रीमंतांच्या मागे जायचं नाही किंवा गरीबांवरही वेळ खर्च करायचा नाही. या मध्यमवर्गीय लोकांना सगळं तोलूनमापून करायला आवडतं. आपणही नाही का अशाच घरांमधे रहात? आपल्याला कसली भीती वाटते, तीच भीती आपल्यासारख्या इतरांनाही वाटते. त्याच भीतीचा थोडा आणखी मोठा बागुलबुवा करायचा ..... त्यासाठी काही कळीचे शब्द आहेत. आजकाल लोकं चमत्कार वगैरे शब्दांना भुलत नाहीत. सगळ्यांना शाळेत विज्ञान शिकवलं जातंच. तसं आजकाल एक गोष्ट फक्त एकच गोष्ट करते असं सांगून लोक भुलत नाहीत. ध्यानधारणा हा फक्त मनःशांतीसाठी आहे, असं म्हटलं की अर्ध काम होतंच. मनःशांती हा आजचा मोठा कीवर्ड आहे गं. हे आजूबाजूचे फॅन्सी जिम पहातेस ना? मध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिश्रीमंत जिथे जाऊन वजनं कमी करतात, तिथेही आजकाल योगा आणि कपालभाती वगैरे विकतात. मनःशांतीसाठी लोकं फार कष्ट घेतात आजकाल. आज विकली जाणारी वस्तू म्हणजे मनःशांती (व अनुभव)."

गेले काही महिने हेमाला काहीतरी वेगळं करायचं होतं. आपल्यात आणखी काही नवीन कौशल्य आहे का ते आजमावायचं होतं. आणि पूजाशी हा विषय काढल्यावर तिने लगेच "तू रॉकेट सिंग बन. तो 'सेल्समन ऑफ द इयर' झाला, तू 'यशस्वी ध्यानमार्गदर्शक होऊ शकतेस. मी आहे ना तुला हे सगळं शिकवायला!" आज त्यांच्या ट्रेनिंगचा पहिलाच दिवस होता. ध्यान का, कशासाठी याच्याशी हेमाचा काहीही संबंध नव्हता. "पण म्हणून काय बिघडलं?", पूजाने ट्रेनिंग सुरूच ठेवलं. "तू काय विकत घेतलं आहेस, का विकत घेतलं आहेस याला महत्त्व नाही. आता तू गोल्ड फेशियल घेतलंस काय आणि घरच्याघरी साय तोंडाला चोपडून दुपारी लवंडलीस काय, तू आणि तुझी बेस्ट फ्रेंड, म्हणजे मी, वगळता तिसर्‍या कोणालाही फरक समजत नाही. ध्यानाचंही तेच आहे. तू कुठला ध्यानप्रकार करत आहेस , त्याचा तुला काय फायदा होतो हे महत्त्वाचं नाही. तू ते कसं मांडते आहेस याला महत्त्व आहे. जमाना जाहिरातीचा आहे, dear!"

"ध्यान करणार्‍या लोकांचा खरंच काय, किती आणि कसा फायदा होतो किंवा होईल याची काही गणितं तरी दाखव गं. कोणी विचारलं तर अगदीच तोंडघशी नको पडायला!!" हेमाच्या शंका कमी होण्याची काहीही लक्षणं दिसत नव्हती. हे पाहून पूजाला आणखी उत्साह चढला. "हे पहा हेमा, गणितं काय करायची आहेत? मला सांग, तू आणि तुझा नवरा रोज ध्यान करता ना? त्यातून तुझं डोकं शांत रहातं ना! मग झालं तर. ध्यान हा फक्त ध्यान नाही, ध्यान ही डोक्याची शांतताही आहे. आत्ता पहा तू, मध्यमवयीन आहेस. या वयात अयोग्य जीवनपद्धतीमुळे किती काय-काय होतं हे तुला माहित्ये ना! समजा उद्या तुला किंवा नवर्‍याला आला एखादा हार्टअटॅक, आणि त्यातून नोकरी गेली तर? म्हणजे, तुझं असं व्हावं असं नाही, पण कोणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं ना? असं झालं तर पोरांच्या शिक्षणाचं काय? तुमच्या म्हातारवयाच्या देखभालीचं काय? आणि ही सगळी काळजी आत्ता काही झालेलं नसतानाच नको का करायला? परवाच तुला सांगते, माझ्या एका मैत्रिणीच्या नवर्‍याला आला ना हार्टअटॅक. त्यातून तो खासगी कंपनीत नोकरीला...... तसा तो म्हणे फार जाडा आहे आणि म्हणे सिग्रेट, दारू, खाण्यावर ताबा नाही ... सगळंच. हे मी तुला म्हणून सांगत्ये गो. पण समजा असं काही आपल्यालाही झालं तर?"

हेमाचा चेहेरा थोडा चिंताक्रांत झाला. नुकती दहावी-बारावी झालेली पोरं तिच्या डोळ्यासमोर आली. "बघ, तुलाही वाटली ना काळजी पोरांची!

"अगं पण पोरांची काळजी आ..." हेमाची वाक्य तोंडातच राहिली. "हे बघ, मी तुला ट्रेनिंग दिलेलं आहे. तू ध्यानाचे मार्गदर्शन तरी करून बघ. केल्याशिवाय तुला कळणार कसं तुझ्यात हे कौशल्य आहे का नाही ते! आपण थोडीच ध्यानाचे विज्ञान शिकायला-शिकवायला बसलो आहोत? आपल्याला मतलब कशाशी आहे, डोक्याला असणार्‍या शांततेशी. तुला नवीन काहीतरी करून मनःशांती मिळेल...... तेवढी मनःशांती मिळाली की काम झालं. ..... मनःशांती मिळाली हे काय कमी वाटतं का काय तुला? या मन:शांतीअभावी आज किती लोकांना तरूण वयात रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह होतात तुला माहित आहे ना! तुम आम खाओ, गुठलियां क्यू गिनती हो?"

हेमाचा चेहेरा थोडा खुलला. "लोकं मानतील का गं हे?" तिने शेवटची शंका विचारून घेतली. पूजा तयारीचीच असावी, "अगं, हीच वाक्य तिथेही वापरायची. मोठमोठे वैज्ञानिकांनी शोध केलेली आहेतच असं सांगायचं. विज्ञानाच नाव काढलं की बहुतेक लोकं शंका घेत नाहीत ना!"

परवा स्टॉपवर बसची वाट पहात बसले होते तेव्हा हा संवाद कानावर आला. हेमा आणि पूजा कोण हे मला माहित नाही. स्टॉपवरच्या अन्य प्रवाशांची आणखी किती माहिती काढायची?

(मूळ लेखातील आर्थिक विषयाचे संदर्भ गाळलेले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

!
अदिती, बरी आहेस ना? थोडी घेच आज. तशीही होळी आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम झकास लेख.
रॅशनल लोकांनी ध्यान करणं हे कसे वैज्ञानिक दृष्टीकोणात बसते ही पण त्यात भर घालता येईल. मनःस्वास्थ्यासाठी अन्य कोठलीही योजना उपलब्ध नाही.सगळा हवाला देवावर व दैवावर ठेउन चालणार आहे का? बघ बाई हेमा तू जर खरी रॅशनल असशील ना तर ध्यान करशीलच. नाहीतर सगळे पैसे बाबा बुवांच्यावर उधळणार्‍या लोकांपैकी तू एक ठरशील.

Wink

स्वगतः चक्क नानावटींकडुन मौजमजा.. धमालेय! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Biggrin आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थ्री ईडीयट मधील अमीर खान ने केलेला धन च्या ऐवजी स्तन चा केलेला उद्योग आठवला. जाम हसलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/