'कर्मविपाक'आणि'पुनर्जन्म'या व्यवस्थेसंबंधी अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न

'कर्मविपाक'आणि'पुनर्जन्म'या व्यवस्थेसंबंधी अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न
१. शिवस्वरोदय शास्त्र
शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे (आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) या पाच तत्वांचा प्रवाह श्वासामार्गे होतो,श्वास म्हणजे प्राण,जर प्राणाकडे लक्ष देऊन मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनाचे कर्म जर मला समर्पित केले तर त्याचे कर्म निर्विकार होण्यास माझी मदत होते. प्राणरूपी होऊन मनुष्याला श्वासामार्फत त्याचे योग्य कर्म दाखवून आणि त्याचे भौतिक कर्म पूर्ण करून त्याला परमार्थाकडे आणून पोहोचवतो.असे शिवस्वरोदय शास्त्र मध्ये शंकर पार्वती चे संभाषण आहे

आपल्या शरीरात तीन मुख्य नाड्या आहेत.(ओंक फेम ताम्रपट्टी ची नाडी नाही). इडा(चंद्र)-नाडी(डावी नाकपुडी), पिंगळा(सुर्य)नाडी ( उजवी नाकपुडी) आणि सुषुम्ना (दोन्ही नाकपुड्या)मधून श्वासोच्छवास चालू असतो.दिवसभरात कोणत्याही वेळी एकच(इडा,पिंगळा किवा क्वचित सुषुम्ना) नाडी चालू असते.चंद्रनाडी हि घेण्याची,मिळण्याची,प्राप्त करण्याची नाडी आहे .सुर्यनाडी हि देण्याची,दान करण्याची नाडी आहे.सुषुम्ना हि विरक्ती ची नाडी आहे.दिवसाच्या त्या त्या वेळेला कोणती नाडी चालू आहे (कोणत्या नाकपुडीतून श्वासोच्छवास चालू आहे ते जाणून घेऊन त्या प्रमाणे कर्म करायचे असते)
चिकित्सक लोकांना हे प्रथमदर्शनी थोतांड वाटेल,हास्यास्पद सुद्धा वाटेल. प्रत्यक्ष अनुभव घेउन् मगच या शाश्त्राबद्दल (मी याला शास्त्र मानतो ) किवा हे जे काही आहे ते त्याबद्दल निर्णय घ्यावा.जेव्हा सुषुम्ना नाडी चालू असते तेव्हा कितीही जोर लावला तरी कामे होत नाहीत.नोकरीच्या सुरवातीच्या काळात मुलाखत देण्याची वेळ आल्यावर जेव्हा जेव्हा सुषुम्ना नाडी सुरु झाली तेव्हा तेव्हा काम झाले नाही हा माझा निश्चित अनुभव आहे. त्यामुळेच एखादे काम जेव्हा आपण हाती घेतले आहे तेव्हा ते होणार कि नाही हे आपला श्वासच आपल्याला सांगत असतो.साधारणतः चार ते पाच तासांनी नाडी बदलते (उजवी ची डावी किवा डावी ची उजवी)
बदलत असतांना सुषुम्ना नाडी चालू होते. या नाड्या (देण्याची किवा घेण्याची )हे आपल्या कर्मावर ठरत असते.आणि आपल्या विचारांनुसार आपली नाडी बदलते म्हणजे एखाद्याला प्रामाणिकपणे मदत करायची इच्छा असेल तर मदत देण्या आधी चंद्र नाडी सुरु असेल तर लगेच सुर्य नाडी सुरु होते.

२. मुद्राशास्त्र
या शास्त्रानुसार आपल्या शरीराचे कार्य संतुलितपणे पार पडण्यासाठी पंचप्राण (प्राण,अपान,व्यान,उदान ,समान ),पंचतत्वे(आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) आणि त्रिदोष (वात,कफ,पित्त) यांमध्ये संतुलन आवश्यक आहे. संतुलन साधण्याची आपल्या शरीरातच योजना असून आपल्या हाताच्या निरनिराळ्या ठिकाणी दाब देऊन आपल्या शरीराचे कार्य संतुलित करता येते. मुद्राशास्त्र हा योगाचाच एक प्रकार आहे या शास्त्रानुसार आपल्या हाताच्या पाच बोटात पाच तत्वे आहेत व हि पाचही तत्वे आपण आपल्या हाताच्या बोटांची वेगवेगळ्या प्रकारे रचना(मुद्रा) करून तत्व संतुलित करता येते. ( या संबंधी पण माझा एक अनुभव आहे. एका स्नेह्यांना छातीमध्ये दुखण्याचा त्रास होत होता,त्यासाठी ते डॉक्टरांना भेटून आले, E.C.G. काढला पण normal आला. दोन दिवस वाट पाहूनही दुखण्यात काही फरक पडला नाही डॉक्टरांनी पुन्हा angiography व गरज पडल्यास angeoplasti करण्याचा सल्ला दिला. हृदयाच्या दुखण्यावर अपान-वायू मुद्रा गुणकारी असते हे वाचून माहित होते,मी त्यांना अपान-वायू मुद्रा करण्यासाठी सांगितले आणि दहाव्या मिनिटाला त्यांचे छातीत दुखणे कमी झाले,पुढचे ५-६ दिवस रोज कमीत कमी चाळीस मिनिटे व जास्तीत जास्त २ तास हि मुद्रा केल्याने त्यांचा छातीत दुखण्याचा त्रास एकदम बंद झाला )
भगवान बुद्ध,भगवान महावीर यांच्या ज्या ज्या प्रतिमा सापडल्या आहेत त्या मध्ये सुद्धा ते ज्ञान मुद्रा करताना दर्शविले आहेत
शरीर हे आत्म्याचे परम तत्वाकडे जाण्याचे साधन आहे त्याच्या healing आणि well-functioning
साठी योगाभ्यास,आयुर्वेद आणि मुद्राशास्त्र, शिवस्वरोदयशास्त्र आदि शास्त्रे आहेत असे मानायचे का?
या शास्त्रांचे अस्तित्व दिसत आहे आणि ते मान्य केले तर कर्मविपाक सिद्धांत,पुनर्जन्म वगैरे या गोष्टी ज्यांचे अस्तित्व हि शास्त्रे मान्य करतात त्या सत्य आहेत असे आपण मानायचे का?

नसेल तर या शास्त्रांमध्ये ज्या बारकाई ने मनुष्य शरीराचा विचार,अभ्यास केलेला आहे तो खोटा मानायचा का?

आपले संत हे योगाचा आणि मुद्रा शास्त्राचा अभ्यास करून मनाची सॊहम अवस्था प्राप्त केली का?

कबीर म्हणतो"अडसठ तीरथ घटके भीतर,यूँही मैं मलमल नहाऊ,
गंगा न जाओ जमना न जाओ न कोई तीरथ नहाओ जी "

हे अडसठ तीरथ कोणते ?

(अर्थात कबीर-कुमार गंधर्व-निर्गुण भजन हे एका स्वंतंत्र लेखाचा विषय आहे हे नक्की )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

(सिद्धार्थ गौतम*) बुद्धाचा पुनर्जन्म झाल्याची परंपरा नाही. त्याच्या महापरिनिर्वाणानंतर पुनर्जन्म झाला नाही, अशी पारंपरिक कथा आहे. जैन सिद्धांचासुद्धा पुनर्जन्म होत नाही, अशी परंपरा आहे.

बाकी चालू द्या.

(*"सिद्धार्थ गौतम" असे म्हटले, पण बहुधा कोणाचाही निर्वाण झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, अशी परंपरा आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच प्रश्न आहेत; सुरूवातीला थोडेसेच विचारते. हे सगळं वाचून सुटे-सुटे शब्द माहित आहेत पण एकत्र काहीही अर्थबोध होत नाही अशी अडचण जाणवते आहे.

शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे (आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) या पाच तत्वांचा प्रवाह श्वासामार्गे होतो,श्वास म्हणजे प्राण,जर प्राणाकडे लक्ष देऊन मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनाचे कर्म जर मला समर्पित केले तर त्याचे कर्म निर्विकार होण्यास माझी मदत होते.

१. वायूरूपातला कार्बन शरीरात घेऊन झाडं जे (स्वतःचं आणि प्राण्यांचं) अन्न निर्माण करतात ते माझ्या शरीरात तोंडावाटे जातं. शरीराचं तापमान नियमित करण्याचं काम त्वचा करते, त्यासाठी पाण्याचा प्रवाह त्वचेतूनही असतो. वगैरे वगैरे. त्याचा इथे हिशोब लावला जातो का?
२. मला समर्पित करायचं म्हणजे नक्की कोणाला?
३. कर्म समर्पित करायचं म्हणजे नक्की काय करायचं?
४. कर्म निर्विकार होतं म्हणजे नक्की काय होतं?

स्वतःपुरत्या या गोष्टींना शास्त्र समजण्यात फार अडचण नाही; इतरांनीही याला शास्त्र अशी मान्यता द्यावी असा आग्रह असेल तर मग वैज्ञानिक कसोट्या वगैरे विचार करावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. वायूरूपातला कार्बन शरीरात घेऊन झाडं जे (स्वतःचं आणि प्राण्यांचं) अन्न निर्माण करतात ते माझ्या शरीरात तोंडावाटे जातं. शरीराचं तापमान नियमित करण्याचं काम त्वचा करते, त्यासाठी पाण्याचा प्रवाह त्वचेतूनही असतो. वगैरे वगैरे. त्याचा इथे हिशोब लावला जातो का?

पंचतत्वे(आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) मध्ये हे सर्व आलेच

२. मला समर्पित करायचं म्हणजे नक्की कोणाला?
३. कर्म समर्पित करायचं म्हणजे नक्की काय करायचं?
४. कर्म निर्विकार होतं म्हणजे नक्की काय होतं?

अंतर्जालावर शिवस्वरोदय या नावाने शोध घेतल्यावर काही माहिती मिळाली हा सुरवातीचा उतारा त्यातील आहे ,याचा प्रश्नांची उत्तरे मला पण हवी आहेत

स्वतःपुरत्या या गोष्टींना शास्त्र समजण्यात फार अडचण नाही; इतरांनीही याला शास्त्र अशी मान्यता द्यावी असा आग्रह असेल तर मग वैज्ञानिक कसोट्या वगैरे विचार करावा लागतो.

इतरांनी याला मान्यता द्यायची कि नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यादृष्टीने वैचारिक मंथन ,मुद्यांचा उहापोह झालेला आवडेल.
लक्षात घ्या येथे वादासाठी वाद घालण्याचा किं धाग्याचा ट्यार्पी वाढवायचा म्हणून नाहीतर हे प्रश्न मला या तंत्राच्या अनुषंगाने पडलेले आहेत. त्यांची उत्तरे मिळण्याची,Hint मिळण्याची मी अपेक्षा करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता ऐसीवरसुद्धा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१ हेच माझ्याही मनात आलं.. "असो. चालु द्या!" ही प्रतिक्रीया इथेही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता ऐसीवरसुद्धा...

प्रतिसादाचे स्वागत आहे

कोणत्याही बाबा किवा पंथाचा प्रचार/प्रसार करण्याचा हेतू नाही,पण अंतर्जालावर या विषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे

…… या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे मिळण्याच्या प्रतीक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कीनई खारे दाणे, छोले भटूरे, रगडा प्याटी, वाटाण्याची उसळ इत्यादी खाद्यपदार्थ फार आवडतात; पण ते खाताना मी नेहमी वज्रासनात बसून अपानवायूमुद्रा करूनच खातो. शिवाय खाऊन झाल्यावर एक-दीड तासाने न चुकता पवनमुक्तासन करतो. Smile
जोक्स अपार्ट, इतर 'शास्त्रां'बद्दल माहित नाही पण योगाभ्यासावर माझा विश्वास आहे (कारण तो एक चांगला व्यायामप्रकार आहे (पण ते अष्टांग वगैरे प्रकरण माहित नाही)).
नुसते कोणत्या नाकपुडीतून श्वास चालू आहे त्यावरून काम होणार की नाही वगैरे अतिरंजित वाटते. माणसाच्या मूडशी याचा संबंध लावला जाऊ शकतो फारतर, पण त्यावर अधिक संशोधन हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण त्यावर अधिक संशोधन हवे.

हेच म्हणतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यात वापरलेल्या शब्दांच्या व्याख्या दिल्या तर त्यानंतर विचार सुरू करता येईल.

नाही म्हणजे नंतर..... इडा(चंद्र) नाडी यातला चंद्र म्हणजे पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र नवे असा खुलासा नंतर व्हायला नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.