अणूउर्जा - दोन परस्परविरोधी भूमिका

१७ मेच्या लोकसत्ताच्या अंकात राजीव साने यांचा चेटकीण ठरवलेली अणुऊर्जा हा लेख प्रकाशित झाला. त्यात आणि एका पत्रात असलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद आजच्या लोकसत्तामध्ये 'गैरप्रचाराचे अणू..' ह्या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या प्रदीप इंदुलकर यांच्या लेखात आहे. इंदुलकरांचा दावा असा आहे की राजीव साने यांच्यासारखे लोक अवैज्ञानिक विधानं करून धूळफेक करत आहेत. ह्या दाव्यात कितपत तथ्य आहे यावर जाणकार लोकांनी प्रकाश टाकावा.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

माझ्याकडे भर घालण्यासारखं काहीही नाही. पण धागा वर आला, तर कुणीतरी काहीतरी लिहील, या आशेनं हा प्रतिसाद देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दोन वर्षांपलिकडे डॉनमधील एका बातमीवरून याच विषयावर इथेच एक चर्चा घडवायचा प्रयत्न केला होता.
ती चर्चा इथे वाचता येईल.

बाकी, भारतासारख्या विकसनशील देशाने आरोग्यावरील परिणाम लक्षात घेऊनही ५-१०% उर्जा आण्विक पद्धतीने मिळवल्यास फार आतबट्ट्याचा व्यवहार वाटत नाही. या पेक्षा अधिक धोका जल-वायु प्रदुषणामुळे, रासायनिक खतांवर वाढलेल्या भाज्यांमुळे वगैरे आहे व तिथेही लक्ष देण्याची गरज आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंदुलकरांच्या लेखात आयनायझिंग असा शब्दप्रयोग आहे. पाठ्यपुस्तक आणि अन्य अनेक ठिकाणी तो शब्द आयनायझेशन (ionisation) किंवा "शुद्ध" मराठीत आयनीकरण असा पाहिलेला आहे.

सानेंच्या लेखातली एक त्रुटी, इंदुलकरांनी लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात दाखवलेली आहेच. अजून एक मुद्दा असेल अशी अपेक्षा होती, तो मुद्दा असा की नैसर्गिकरित्या किरणोत्सारी अणूगर्भांची संहती (concentration) अणुभट्टीत असेल तेवढी नसते. वीज बनवायला (आणि पुढे अस्त्रही बनवण्यासाठी) युरेनियमचं संहती वाढवावी लागते. काही एक कारणाने हा साठा उघडा झाला तर बरीच हानी होऊ शकते. चेर्नोबिलच्या दुर्घटनेत प्रत्यक्ष मृत्यु ६००० च्या आसपास असावेत. पण त्यातून पुढे होणारी म्यूटेशन्स, आणि अन्य हानी प्रचंड जास्त होती. Deaths due to the Chernobyl disaster

सानेंच्या चुका काढताना इंदुलकरांचा लेखही दोषरहित नाही. ते म्हणतातः

आज निसर्गात केवळ एकच मूलद्रव्य असे सापडते की, ज्याचे भंजन होऊ शकते. ते म्हणजे युरेनिअमचे एक समस्थानक 'युरेनिअम-२३५'.

(यात २३५ याचा अर्थ असा की अणूकेंद्रात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून २३५ कण असतात.) इंदुलकरांचं वरचं वाक्य अगदीच चूक आहे.
१. युरेनियम-२३८ आणि युरेनियम-२३५ या दोन्ही अणूकेंद्रांचं भंजन होऊ शकतं. पैकी यु-२३८ चं भंजन करण्यासाठी त्यावर धीम्या न्यूट्रॉनचा मारा करावा लागतो. (या क्रियेत प्लुटोनियम मिळतं, त्याचंही भंजन होतं.)
२. रेडीयम हे मूलद्रव्य पिचब्लेंड या ore (मराठी?) वेगळं करण्यासाठी मेरी क्यूरीला रसायनशास्त्रातलं आणि तिचा दुसरा नोबेल पुरस्कार मिळाला. फार कमी प्रमाणात का होईना, रेडीयम नैसर्गिकरित्या आढळतं. पोलोनियमच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. (नोबेलबद्दल चटकन आठवत नाही.) अ‍ॅक्टीनाईड सिरीजमधली अन्य मूलद्रव्यही कमी प्रमाणात मिळतात आणि किरणोत्सारी आहेत.

किरणोत्साराचे प्रमाण कोकणात ३०००, पुण्यात १२०० तर अणुकेंद्रात फक्त ५० असते' (म्हणजे नेमके काय असते? या आकडय़ांचे एकक काय? असो.) - यातून त्यांचा सांगायचा मुद्दा इथे लक्षात येतो तो असा की, नसर्गिक किरणोत्सारापेक्षा अणुभट्टीतला किरणोत्सार कमी असतो. हाच एक मोठा गैरसमज सातत्याने समाजात पसरवला जात आहे. समजा, लेखक म्हणतात त्याप्रमाणे आज कोकणात नैसर्गिक किरणोत्सार (खरा शब्द आहे बॅकग्राऊंड रेडिएशन) जर ३००० एकक असेल आणि उद्या दुर्दैवाने तिथे अणुभट्टी बांधली गेली तर त्या ठिकाणी आज जो ३००० एकक किरणोत्सार आहे तो शून्यावर येणार आणि फक्त अणुभट्टीतलाच ५० एकक किरणोत्सार राहणार आहे का? अणुभट्टीत असे कोणते तंत्रज्ञान आहे, जे 'बॅकग्राऊंड रेडिएशन' शून्यावर आणते? म्हणजेच मूळच्या बॅकग्राऊंड रेडिएशनमध्ये अणुभट्टीतल्या किरणोत्साराची भरच पडणार आहे.

पहिलं वाक्य वगळता हा संपूर्ण परिच्छेद विज्ञानाच्या नावाने शंख आहे; स्वतःच काहीतरी चुकीचे ग्रह करून घ्यायचे आणि ते कसे चूक म्हणून ओरडायचं. सानेंच्या लेखात किंवा या संदर्भातल्या कोणत्याही लिखाणात कोणीही, नैसर्गिक किरणोत्सार अणूभट्ट्यांमुळे बंद/कमी होईल, असा दावा केला जात नाही. मग "अणुभट्टीत असे कोणते तंत्रज्ञान आहे, जे 'बॅकग्राऊंड रेडिएशन' शून्यावर आणते?" या प्रश्नाचा हेतू भावना भडकावण्यापलिकडे असेल असं वाटत नाही.

सानेंनी एकक दिलेलं नाही हीच एक गफलत आहे; पण एकाच एककात ३००० आणि ५० मोजले असतील असं मानण्यास जागा आहे. तसं असेल तर मानवी शरीर, पृथ्वीवरचे जीवजंतू जर ३००० एकक एवढा किरणोत्सार सहन करू शकतात तर ३०५० ने किती फरक पडेल हा प्रश्न महत्त्वाचा आहे. (उत्तर मला माहित नाही.) टक्केवारीत हा फरक १.६% एवढा आहे. या मोजमापातली त्रुटीच मुळात १% असण्याची दाट शक्यता आहे. (पुन्हा, मला आकडे नक्की माहित नाही. शोधले पाहिजेत.)

अजून बरंच काही लिहीता येईल. या दोन्ही लेखांवर माझा मुख्य आक्षेप त्रोटक असण्याचा आहे. विज्ञानाबद्दल असूनही इंदुलकरांच्या लेखात ना आकडे, ना भौतिकशास्त्रासंबंधी चर्चा! भौतिकशास्त्र शिकूनही, पुरेशी स्मरणशक्ती नसल्यामुळे, मला या लोकांची गृहितकं समजण्यासाठी त्रास होतो आहे. (टेक्स्टबुकं, विकीपिडीया उघडून तपशीलात नंतर लिहीते.) म्हणून ज्या टार्गेट ऑडीयन्ससाठी हा लेख लिहीलेला आहे त्यांच्या भावना भडकवणे हा मुख्य हेतू असल्याची शंका येते आहे.

एका वेगळ्या प्रकारचा आक्षेप इंदुलकरांच्या लेखावर किंवा या प्रकारच्या विचारसरणीवर आहे तो म्हणजे, अणूउर्जेला नाही म्हणायचं तर काय पर्याय उपलब्ध आहेत? त्याबद्दल विस्तृत नाही पण निदान किंचित काही कल्पना तरी द्यावी. दुसरं असं की भूतकाळातल्या अप्रिय अनुभवांनंतर अणूभट्ट्यांमधे जे काही बदल होत गेले असतील त्याबद्दल एकही अवाक्षर एकही लेख काढत नाही. मागच्या दुर्घटनेतून शिकणे आणि मुख्यत: त्याची माहितीपूर्ण जाहिरात, स्मिथसोनियन, हिस्टरी अशा चॅनल्सवर करणे याबाबत विमानउद्योगाचा आदर्श घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बॅकग्राऊंड रेडिएशन आहे आणि त्यात फार काही फरक पडणार नाही म्हणून अणूभट्टी उभारण्यास प्रत्यवाय नसावा हे सामान्य परिस्थितीत तर्कसुसंगत वाटते. त्यामुळे सदासर्वकाळ सामान्य परिस्थिती राहील असे गृहीत धरल्यास इंदुलकरांचा युक्तिवाद बाद ठरतो.
माझ्या ऐकीव माहिती नुसार, अणुभट्टीत चेन रिअ‍ॅक्शन नियंत्रित करण्यासाठी बोरॉनच्या कांड्या वापरलेल्या असतात. अतिरिक्त किरणोत्सार शोषून घेण्याचे काम या बोरॉनच्या कांड्या करतात. शिवाय रिअ‍ॅक्टरच्या शिशाच्या जाड भिंती किरणोत्सार अडवण्यास पुरेशा सक्षम असतात. त्यामुळे जोवर भूकंपवगैरे सारखा मोठा धक्का बसून रिअ‍ॅक्टर फुटत नाही तोवर फार काही धोका नसतो. वापरून झालेल्या अतितप्त इंधनकांड्या थंड व्हाव्यात म्हणून कृत्रिमरीत्या थंड केलेल्या पाण्याचे तलाव अणुभट्टीच्या परिसरात असतात म्हणे. या तलावातले पाणी थंड ठेवण्यासाठी अणुभट्टीचीच ऊर्जा व रासायनिक कूलंट वापरले जातात. खरी जोखीम आहे ती इथे. समजा काही कारणाने अणुभट्टी बंद पडली अथवा कूलंटचा पुरवठा झाला नाही तर या इंधनकांड्यांमधून होणारे रेडिएशन बॅकग्राऊंड पातळीपेक्षा खूपच जास्त असेल.
नंतरही ते थंड झाल्यावर जमिनीत गाडले जाते. त्याचा पुढे काय परिणाम होतो यावर काही अभ्यास झाला आहे की नाही कोण जाणे?
सध्या अपल्या ऊर्जेचा फार कमी भाग अणूऊर्जेतून येतो पण भविष्यात खनिज इंधन ऊर्जेवरून अणूऊर्जेवर जायचे असेल तर अशा हजारो अणुभट्ट्या उभाराव्या लागतील आणि आज गंभीर न वाटणारे प्रश्न तेव्हा गंभीर होतील; पण वेळ निघून गेलेली असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'टेड'वर आण्विक उर्जा विरुद्ध अन्य हरित उर्जा अशी चर्चा असणारा एक व्हीडीओ आहे. जरूर पहा:
Debate: Does the world need nuclear energy?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

perpetual वाद आणि चर्चा ह्याचा लै कंटाळायेतो राव आजकाल.
सगळ्यांच्या आपल्या आपल्या template भूमिका ठरलेल्या असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लोकसत्ता मध्ये आलेला याच मालिकेतील तिसरा लेख, गैरप्रचार की अज्ञान?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0