फक्त ऐसी अक्षरे वर आलेलं लेखन किती आहे?

ऐसी अक्षरे वर इतर संस्थळांवर प्रसिद्ध झालेलं लेखन येण्याविषयी वेगवेगळी मतं आहेत. आधीच्या कौलात सुमारे २/३ मतं इतरत्र प्रकाशित झालेलं लेखन आलं तरी हरकत नाही या पर्यायाला मिळाली होती. तेव्हा हा कौल त्यासाठी नाही. मुळात किती प्रमाणात मूळ लिखाण इथे होतं हे शोधून काढण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. सॅंपलिंग स्कीम खालीलप्रमाणे.

१. तुमचा ऐसी अक्षरेवरील आयडी क्रमांक घ्या.
२. त्यातल्या आकड्यांची बेरीज करा.
३. ही बेरीज दहापेक्षा जास्त आली तर पुन्हा बेरीज करा.
४. आता तुमच्याकडे १ ते १० पैकी काहीतरी आकडा असेल. हा तुमचा पान क्रमांक.
५. 'नवीन लेखन' वर जा. तिथे लेखांच्या यादीखाली पानक्रमांक दिसतात. तुमच्या पानक्रमांकावर क्लिक करा.
६. तुम्हाला त्या पानावर २५ लेख दिसतील.
७. त्यापैकी किती टक्के लेख फक्त ऐसी अक्षरेवर प्रसिद्ध झाले आहेत ते तपासा. (१२ किंवा १३ असतील तर ५०% वगैरे)
८. खालील पर्यायांपैकी सर्वात जवळचा पर्याय निवडा.

ज्या लेखांबद्दल खात्री नसेल त्यांना हिशोबातून वेगळं काढायला हरकत नाही. म्हणजे ५ विषयी खात्री नसेल, आणि १२ लेख ऐअ वरचेच असतील तर ६०% (विसातले १२ म्हणून) तुम्ही तपासलेलं पान इतरही लोक तपासणार आहेत, तेव्हा ही गणती अतिरेकी अचूक असण्याची गरज नाही. आपल्याला साधारण ठोकताळा काढायचा आहे. कोणा एकाने हे मोजण्यापेक्षा अनेकांनी मोजून सरासरी काढल्यास उत्तर जास्त बरोबर येईल यात शंका नाही.

प्रतिक्रिया

४०% आहेत.

नुसते धागे मोजूयात की 'लेखन'?

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तूर्तास नुसते धागे मोजू. ते सोपं जाईल.

पान क्रमांक दहावर सध्या फक्त २१ लेख आहेत हे लक्षात ठेवा. जसजशी लेखांची भर पडेल तसे तिथले लेख वाढतील, तेव्हा एकूण लेख मोजणं इष्ट.

ह्यातुन काय साध्य होणार आहे? वेळ जात नाही म्हणून झाडावरचे कावळे मोजण्या सारखे हे वाटते आगे. ही माहिती गोळा करण्याचा नेमका उद्देश काय? हे कौलाच्या पार्श्वभुमीत न देता सदस्यांना असे कामाला लावणे योग्य आहे का? हे साक्षात गुर्जींना सांगावे लागावे ह्याचा खेद वाटतो.
--
बहुतांश लोक चांगल्या हेतूने येतात हे गृहितक आहे, तर सर्वांनाच श्रेणी देण्याचा व धाग्यांना तारे देण्याचा अधिकार नको काय?

ह्यातुन काय साध्य होणार आहे?

हेच म्हणतो

- (बुचकळ्यात पडलेला) सोकाजी

कौलाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे किती प्रमाणात मूळ लिखाण इथे होतं हे शोधून काढण्याचा प्रयत्न आहे. इथे येणाऱ्या लिखाणापैकी काही लिखाण पूर्वप्रकाशित व इतरत्र प्रकाशित असतं हे उघड आहे. मात्र हा प्रश्न फक्त ऐसी अक्षरे वरच प्रभावाने दिसतो का? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बेंचमार्किंग करायला हवं.

उदाहरण देतो. समजा एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या काहींनी तक्रार केली इथे अबक प्रश्न आहे. तर एकंदरीत अबकची व्याप्ती किती हे शोधून काढणं भाग आहे. तसंच त्याच इंडस्ट्रीतल्या इतर कंपन्यांत अबक प्रश्न कितपत आहे हे शोधून बघावं लागतं. मग हा फक्त या कंपनीचा प्रश्न आहे की इंडस्ट्रीचाच प्रश्न आहे हे कळू शकतं. एकंदरीत प्रश्न योग्य पर्स्पेक्टिव्हमध्ये ठेवून बघितला तर काही उत्तरं आपोआपच मिळतात. त्यासाठी हे मोजमाप.

मात्र हा प्रश्न फक्त ऐसी अक्षरे वरच प्रभावाने दिसतो का?

ह्या प्रश्नाचे उत्तर फक्त 'इथेच' सर्वे करुन कसे काढणार बॉ? मिपा किंवा मनोगत इथे असा कौल दिसला नाही.

ऐसी अक्षरेचे वेगळेपण आहे, असे म्हटले तर काय होईल? सेल्फ असेस्मेंट देखिल महत्वाची असते ना?

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

साधरण २०% लेख निघाले. मत दिले आहे.
बाकी याचा फायदा असा झाला की काहि सुटलेले धागे वाचता आले! Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मत दिले आहे. पान ९ धागे १४/२५ (६०%).
संस्थळाचे धोरण वगैरे बद्दलचे लेख धरले नाहीत. विडंबनांचे मोजले आहेत.