अण्णा हजारे यान्नी काल मिडीयासमोर केलेले "एकही मारा?" हे वक्तव्य ऐकुन/पाहून/वाचून तुम्हाला काय वाटले / वाटते?

शरद पवार यांना झालेल्या मारहाणिबद्दल पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता उत्तरादाखल अण्णा हजारे प्रतिप्रश्न विचारते झाले की "एकही मारा?"
महाराष्ट्रिय म्हणून अण्णान्च्या उद्गाराबद्दल आपल्याला काय वाटते?
या कौलामधे एकाचवेळेस अनेक पर्यायान्ना मत देण्याची सोय आहे

प्रतिक्रिया

तुम्ही जरा कामधंदा शोधा मग असले प्रश्न पडणार नैत.

कुठेतरी सावरकरान्च्या साहित्यात वाचल्याच स्मरतय.... कीडामुन्गीजीवजन्तू इत्यादिन्ना देखिल असले प्रश्न पडत नाहीत-ते त्यान्च्या जन्मापासुन मरेपर्यन्त फक्त अन फक्त पोटाची खळगी भरण्याचे व पुनरुत्पत्तीचे येवढेच काम आयुष्यभर करत अस्तात. मी कीडामुन्गीजीवजन्तू पेक्षा वेगळा असा मानव असल्याने मला प्रश्न पडतात व त्यास माझा नाईलाज आहे.
जाताजाता: कीडामुन्गीजीवजन्तू दुसर्‍याकुणाला सूचना देखिल करीत नाहीत Biggrin

जे स्वत:चं डोकं वापरतात अन विचार करु शकतात त्यांनासुद्धा असे प्रश्न पडत नैत...आता आपण स्वत:ला मानव म्हणत आहाच तर तसं वागायचा प्रयत्न करुन पहा. इथे लागलीच तर आम्ही सगळे मदतीला आहोतच.

इथे लागलीच तर आम्ही सगळे मदतीला आहोतच.

वा वा वा, तुम्ही आणि दुसर्‍याच्या मदतीला? आतंरजालावरील भोळ्याभाळ्या साध्यासुध्या सदस्यांच्या लेखांना, प्रतिसादांना खुसपट काढून कुजकट प्रतिसाद देण्यात तुम्ही पटाईत आहात असा तुमचा एकूण आंतरजालीय वावर सांगतो.

------------------------
घणघणतो घंटानाद

आतंरजालावरील भोळ्याभाळ्या साध्यासुध्या सदस्यांच्या लेखांना, प्रतिसादांना खुसपट काढून कुजकट प्रतिसाद देण्यात तुम्ही पटाईत आहात असा तुमचा एकूण आंतरजालीय वावर सांगतो.

मग आपला वावर वाढवा म्हणजे अभ्यास वाढेल (कदाचित).

त्याच वाढलेल्या अभ्यासावरूनच आम्ही हा निष्कर्ष काढत आहोत.

------------------------
घणघणतो घंटानाद

काल बऱ्याच बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर निषेधाचे सूर ऐकले पण का कोणास ठाऊक एकूणच बेगडी वाटले, एखादा माणूस मनातून म्हणतो कि झाले हे चांगल झालं पण दाखवता येत नाही, तसंच काहीस. ऑफिस मध्ये पण हीच चर्चा पण ऑफिस मध्ये कोणी राजकारणी नसल्यामुळे उघड उघड बोलत होते, बेगडी काही नव्हत. ऐसी अक्षरे वर नवीन कौल काढावासा वाटला कि खरंच किती टक्के लोकांना मनातून बर वाटलं.

देशात मराठी माणसाबाबत येवढी घृणास्पद घटना घडलेली असताना आज बंद न पाळता हे संस्थळ चालू ठेवणार्‍या ऐसीअक्षरे च्या प्रशासनाचा मी तिव्र शब्दात निषेध करतो !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

साहेबांनी बंद पाळू नये असे आवाहन केले आहे. Wink

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ये लाल रंग कब तुझे छोडेगा?

कँन्सर झालेल्या ठिकाणीच मार बसला तर, डॉरमंट सेल पुन्हा अ‍ॅक्टीव्ह होतात का हो? वैद्यकशास्त्रवाल्यांनी प्रकाश टाकावा.

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अण्णांचे वक्तव्य दर्जाहीन आहे.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अण्णा आणि ठाकरे कंपनी यांच्यात काहीच फरक नाही असे वाटले.

बाकी त्यांनी नंतर जी सारवासारव केली आहे त्याचा काही उपयोग नाही. कारण व्हिडोमध्ये ते एवढेच बोलून उठून गेल्याचे स्पष्ट दिसले.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.