हा व्हिडीओ पाहून मोदी निर्दोष आहेत असे आपणाला वाटते का ?

आशीष खेतन या पत्रकाराने आपला जीव धोक्यात घालून मिळवलेली माहिती
खालील लिंकवर व्हिडिओ उपलब्ध आहे-

(http://www.youtube.com/watch?v=OFZBNUnG5pI)

प्रतिक्रिया

घरी जाउन विडियो पाहतो.
मोदी निर्दोष आहेत हे आधीच ठरवून झाले असल्याने कुणी काय वाटेल ते दाखवले तरी पब्लिक निर्दोषी असण्याचं सर्टिफिकेट देणारच.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मोदी दोषी नसण्याची सुतराम शक्यता नाही असे ठासून सांगितले गेलेले असल्याने एका पत्रकाराच्या व्हिडिओ चा परिणाम काय होईल ते सांगता येणे कठिण आहे.

राज्याचा मुख्यमंत्री राज्यातील घटनांसाठी जबाबदार असतोच त्यामुळे मोदी त्याअर्थी स्पष्टपणे दोषी आहेतच, पण ते 'मुख्यमंत्री' आहेत हि बाब लक्षात न घेतल्यास हि चित्रफीत त्यांना दोषी ठरविण्यास अपुरी आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

या. विडीयोत मोदी कुठेच नाही आहे. सत्यता बद्धल काही सांगता येणार नाही. हा पत्रकार कसा आहे, हे सांगण्यात अर्थ नाही.

बाकी घटनाक्रमा बाबत म्हणाल तर १००% टक्के सत्य आहे दंगल आई एस आई आणि बाबरी मस्जिद तुटल्या मुळे नाराज लोकांच्या मदतीने या दंगलीला सुरवात झाली. आणि त्याची प्रतिक्रिया. एक मुख्य मंत्री या नात्याने नरेंद्र मोदीने १०० अधिक दंगल करणाऱ्या लोकांना त्यात ९०% हिंदू होते यमसदनी पाठविले. जर नरेंद्र मोदी दुसरा मुख्यमंत्री असता तर मरणाऱ्यांची संख्या किती तरीपट जास्त असती.आणि अल्पसंख्याकांना मरू दिले असते आपली धर्मनिरपेक्ष पोळी भाजण्या साठी, आत्ताच उत्तर प्रदेशात मुजफ्फर नगर येथे असेच घडले. दिल्लीत ही ३५०० सिख मारल्या गेले आणि एक ही दंगाई मेला नाही.

मोदी हे जबाबदार नाही. उलटपक्षी अल्पसंख्यक जमाती साठी ते देवदूतच होते. हेच सत्य आहे.

विश्वास नसेल तर RTI माध्यमातून देशात गेल्या ३० वर्षातील दंगलींच्या आणि सरकारी कृती किती दंगे खोर मारले गेले कितीना दंड मिळाला या बाबत माहिती घ्या, सत्य स्पष्ट होईल.

याविषयी अधिक माहिती
http://en.wikipedia.org/wiki/The_Truth:_Gujarat_2002_-_Tehelka_report आणि
http://en.wikipedia.org/wiki/Naroda_Patiya_massacre मिळेल.

२००७ मधले तहेलकाचे हे ध्वनीचित्रमुद्रण आआपच्या लोकांनी राजकीय स्वार्थासाठी अपलोड केले असावेत यात शंका नाही. पत्रकारीतेची नैतिकता त्यावेळी पायदळी तुडवली गेली हेही तितकेच खरे. यांत दाखविलेल्यांवर गुजरात बाहेर न्यायालयिन खटलेही चालवले गेले आणि मोदी निर्दोष असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. "innocent until proven guilty" हा आपला कायदा आहे. यात दाखवलेल्या बाबू बजरंगीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठवली गेली आणि माया कोडनानी यांनाही २८ वर्षांची शिक्षा झाली. यापूर्वी या दोघांना (आणि इतर बर्‍याच जणांना) वाचविण्याचे प्रयत्न झाले. संपूर्ण गुजरात दंगलीवर, अकार्यक्षम चौकशीवर कोर्टाने मारलेले ताशेरे दखल घेण्याजोगे आहेत. The court added that: "No doubt, it was an elephantine task to investigate the kind of crimes, but then it cannot be believed that the senior Investigating Officers, having experience, do not know what should be the priorities in such kind of investigation. But, it seems that they must have been over-shadowed by some element" यातलं सम इलिमेंट काय आहे हे चतुर वाचकांच्या लक्षात आले असेलच.

हा व्हिडियो ९ मार्च २०१४ ला पब्लिश केला आहे. त्याआधी का नाही केला असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे व्हिडियो बनवणार्‍यांची बाजू/भूमिका का म्हणून खरी/प्रामाणिक मानायची असे वाटते.
कोर्टाच्या बाहेरच दोषी दोषी म्हणून एखाद्याला 'लिंच' करणारं अराजक चालेल असा काहीसा शीर्षकातून सूर जाणवतो.

माझ्या लेखि दंगल आटोक्यात न आणणारे मोदि प्रशासन दोषि आहे. हा माझा वैयक्तिक निकष आहे. न्यायालयाने मोदिंचा अमृताने अभिषेक घातला तरि हा निकष बदलण्याचि मला गरज वाटत नाहि.

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

असले व्हिडिओ बघून कोणी दोषी की निर्दोष असली अनुमाने काढणे म्हणजे मूर्खपणा आहे. व्हिडिओमधून आपल्याला सोयीस्कर असेल तीच माहिती वारंवार ठासून दाखवली की आपल्या बाजूचे मत बनवायला मदत होते.न्यायालयाने आणि एस.आय.टी या दोन्हींनी मोदी निर्दोष आहेत हे सांगितले ना मग आमच्यासाठी ते पुरेसे आहे.न्यायालय आणि एस.आय.टी ने सगळ्या बाजूंचा विचार करूनच निकाल दिला असे न म्हणायला काहीही कारण नाही.त्यामुळे आमचा त्याचावर विश्वास आहे. बाकी फुकाचे डावे आणि पेड मिडियावाले गेले खड्ड्यात.कोण विचारतो त्यांना?

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

तसे तर सज्जनकुमार सुद्धा निर्दोष ठरले आहेत.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या प्रतिसादाला खोडसाळ अशी श्रेणी मिळालेली पाहून गंमत वाटल्या गेली आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोदी दोषी आहेत असं वैयक्तिक मत असेल (असंच बनवलेलं) तर व्हिडिओ पाहून दोषी म्हणा..

वैयक्तिक मताने मोदींवर विश्वास असेल तर व्हिडिओ खोटा आहे, वेळ पाहून काढला आहे इतक्या वर्षांनी बरोब्बर निवडणूकांच्या वेळी, हे कुठेही सिद्ध झालेलं नाही आणि न्यायसंस्था झोपली आहे का, तुमची मतं ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा योग्य आहेत का वगैरे मुद्दे येतील..

दोन्ही बाजूंनी कायमच मदरहूड विधाने येतात. जो केवळ मतामतांचा गलबला आहे. -- Gut Feel..
जो शेवटी प्रत्येक ब्रँडची आपापली आवड असते तसा शिल्लक राहतो.. कोणाला कोक आवडतो तर कोणाला पेप्सी.. शेवटी कोलाच..

नमो म्हणजे जर 'चायवाला', तर मग त्या न्यायाने नमोंच्या फ्याक्षनीस 'भारतीय टी पार्टी' म्हणता यावे काय?

अन त्याचे बोधवाक्यही वामनपंडितप्रणीत टीपार्टी असावे काय?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डोक्यावरून गेले. Sad

कृपया संस्प देऊ शकाल काय?

गोविंदाग्रजांनी खालील श्लोकास वामनपंडितांची टीपार्टी असे संबोधिल्याचे अंधुकसे स्मरते. तदुपरि स्कॉलरशिपच्या परीक्षेतही खालील श्लोकात टी कितीवेळा आलाय अशी पृच्छा करणारा प्रश्न असे. (१७ वेळा)

वंशी नादनटी तिला कटितटी खोवोनि पोटी पटी
कक्षे वामपुटी स्वशृंग निकटी वेताटिही गोमटी
जेवीं नीर तटी तरू तळवटी श्रीश्यामदेही उटी
दाटी व्योमघटी सुरा सुखलुटी घेती जटी धूर्जटी ||

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हम्म्म्म... कल्पना रोचक आहे.

(म्हणजे वामनपंडित हे महाराष्ट्रातील टी पार्टीचे आद्यप्रवर्तक म्हणायचे तर!

बादवे, इतक्या 'टी'मध्ये पोहणार्‍या वामनपंडितांना 'टीचर' म्हणून संबोधता यावे काय?)

ळॉळ @ टीचर ROFL खत्री उपमा.

बाकी ह्रस्व-दीर्घ भेद नजरेआड करूनच ते १७ वेळा टी येते. तो मुद्दा स्कॉलरशिपवाल्यांस लक्षात आला नसावा. अन ऊंझाजोडणी म्ह. काय?

अन वामनपंडित हे मराठीतल्या टी पार्टीचेच नव्हे, तर पंडिती चावटपणाचेही आद्यप्रवर्तक म्हणता यावेत-यद्यपि तो मान एकनाथदौहित्र मुक्तेश्वरांस दिला जावा असेही म्हटल्या जाते, पण त्यांचे वाङ्मय कधी वाचण्याचा योग आला नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऊंझा नामक गुजरातेतील गावी गुजराती लिपीतील र्‍हस्वदीर्घातील फरकास फाट्यावर मारून इ-वर्गातील आणि उ-वर्गातील प्रत्येकी कोणतातरी एकच चिन्हसंच अमलात आणावा (आणि दुसरा निकालात काढावा), असा काही लोकोत्तर ठराव पारित करण्यात आला, असे काही उडतउडत ऐकून आहोत ब्वॉ. (अर्थात, याला प्रत्यक्ष जनमान्यता कितपत आहे नि अंमलबजावणी किंवा सामान्यवापर कितपत आहे, याबद्दल साशंक आहे.)

('जोडणी' म्हणजे बहुधा 'लेखनपद्धती' असे काही असावे, अशी शंका येते. 'ऊंझा येथे ठरविण्यात आलेली जोडणी' म्हणून ती 'ऊंझाजोडणी' असावी, असा अंदाज.)

रोचक! बहुत धन्यवाद. नवीन माहिती कळली.

बाकी उंझाजोडणीचा नीयम नाही, पण 'मूर्धॉन्नो नॉ-दॉन्तो न्नो' मध्ये उच्चारात फरक नसल्याने दोहोंसाठीची शेप्रेट चिन्हे काढून एकच एक 'न' सुरू करावे असा काहीसा नियम बंगाल्यांनी सुरू केल्याचे एका मित्राकडून ऐकले होते. पाहिले पाहिजे.

हे त्या नीयमानुसारच आहे.

हेपण.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१७ वेळा कसे? र्‍हस्वदीर्घाची ऊंझाजोडणी केली काय?

(पहा, वामनपंडितांचा ऊंझाजोडणीमार्गे व्हाया गुजरात नमोंशी संबंध जोडून दाखवलाच की नाही? हो, उगाच कोणी 'अतिअवांतर, अतिअवांतर' म्हणून ओरडायला नको. कसें?)

द्विरुक्तीमुळे.

वरील विधानाचे फेसबुक राईट्स मिळतील काय? Smile

.

नमो म्हणजे जर 'चायवाला', तर मग त्या न्यायाने नमोंच्या फ्याक्षनीस 'भारतीय टी पार्टी' म्हणता यावे काय?

नाय नाय.

आशिष खेतन हे आआप पक्षाचे दिल्ली मधील एका मतदार संघाचे लोकसभा निवडणूकी साठीचे उमेदवार आहेत बहुदा ...

**********

राम का गुनगान करिये |
रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये ||

आमच्या काही डाव्या मित्रांनी नुकताच एक व्हिडिओ सर्क्युलेट केला होता. गोध्रा घटनेनंतर मोदींनी दूरदर्शनवरून केलेल्या भाषणाचा. त्यात एके ठिकाणी गुन्हेगारांना पुन्हा असे कृत्य करण्याचे स्वप्नातही येणार नाही असा धडा शिकवू असे एक वाक्य होते. ओव्हरऑल भाषण लोकांनी शांतता राखावी अशा टोनचे आहे.

हे भाषण दूरदर्शनवरून केले होते असा त्यांचा दावा आहे. पण त्या व्हिडिओमध्ये दूरदर्शनचा लोगो कुठे दिसत नाही असे मी निदर्शनास आणले असता दूरदर्शनच्या आर्काइव्ह्ज मध्ये हा व्हिडिओ मिळेल असे उत्तर मला मिळाले.

यूट्यूबवर ज्याने ते भाषण अपलोड केले आहे त्याने तो मोदीच्या निर्दोषत्वाचा पुरावा म्हणून दाखवला आहे. Smile

पॉइंट इजः काहीतरी व्हिडिओ दाखवून काही सिद्ध/असिद्ध करणे अवघड असते.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

२००९ मध्ये सीबीआय ने मूळ चित्रफितीची सत्यता पडताळल्यावर आणि न्यायालयात पुरावा म्हणून वापरायला परवानगी मिळाल्यावर, उत्साहाच्या भरात स्तुतिपाठकानेच आपल्याला गोत्यात आणल्यावर जी अवस्था होईल ती मोदीसाहेबांची झाली असावी. (शिवराळ भाषेत गोट्यौ भाले आगतौ असे काहीसे म्हणतात, भाषापंडित दुरुस्ती करतीलच) "कागदोपत्री" मोदी नरोदा मध्ये नव्हतेच गेले, त्यामुळे "उत्साह बढाने के लिये आये थे|" हे बाबूभाई चे म्हणणे खोटे पडले. एनीवे, मोदींना क्लिन चिट मिळाल्यामुळे या सगळ्यावर आता पडदा पडला आहे.

विकासाचं सोडा, तो ४% नाहीतर ८%ने होतच राहील. पण सामाजिक न्यायासाठी दुसर्‍या राज्यात जावे लागणे, पाठीशी घातलेल्या नराधमांना शिक्षा होणे, ह्यासारखी लाजिरवाणी बाब नाही. त्याची साधी नैतिक जबाबदारीही न स्विकारणे हा तर माझ्या मते कळस आहे. मोदींचे निकटवर्तिय अमित शाह तर आत्तापासूनच द्वेषाची विषवल्ली पेरण्याचे राजकारण करताना "दिसत आहेत". देशातली बहुतेक जनता मोदीस्तुतीत मग्न आहे. मोदीच पंतप्रधान व्हावे असा जनमानसाचा कौल असेल तर तसेच होईल. माझे वैयक्तिक मत, लोकशाहीच्या यशासाठी सत्तांतर म्हणून "अबकी बार भाजप सरकार" असं कुणी म्हटलं तर +१; पण कुणी "अबकी बार मोदी सरकार" म्हटलं तर -१००...

अतिव अवांतरः अलिकडेच शक्ती मिलचा निकाल लागला. आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याचे कळले. फाशीची शिक्षा झालेल्या नराधमांमध्ये आणि गुन्हा करूनही निर्दोष सुटका झाल्यामुळे समाजात ताठ मानेने फिरणार्‍यांमध्ये "सबळ पुराव्याचेच" अंतर असते.

.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जे आपल्याला पित्यासमान असल्याचं मोदी कबूल करतो त्या शास्त्रीबुवांबद्दलचा हा लेख मोदीबद्दलही काही सांगतो ते ह्या संदर्भात रोचक वाटावं.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दुवा इथून उघडत नाही.
वाचण्याची इच्छा आहे.
आख्खा लेख इथे चिटकवता किंवा व्यनि करता येइल का?
(त्या संस्थळाचा नामोल्लेख असल्याने कॉपी-पेस्ट केले तरी अडचण येउ नये; असा अंदाज)

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars