मत्सर
परवा बॅटमॅनच्या स्वाक्षरीत "मत्सर(जेलसी) बद्दलचे विचार वाचनात आले अन काही गोष्टी आठवत गेल्या.
अन्य मुलींप्रमाणेच, साधारण पौगंडावस्थेत ज्या सुमारास मला प्रथम भिन्नलिंगीय सुप्त आकर्षणाची जाणीव झाली, त्याच अगदी त्याच सुमारास, मत्सर नामक अधिक क्लिष्ट अन सर्वव्यापी भावनेची देखील ओळख झाली. किंबहुना इतक्या हातात हात घालून या दोन्ही भावना जीवनात आल्या की दोन्ही गोष्टींचे मेंदूतील केंद्र एकच असावे की काय असे पश्चात, वाटून गेले. एखादा गोंडस मुलगा काय किंवा गणिताचे बुद्धीमान, शिक्षक काय जेव्हा महाविद्यालयीन आयुष्यात आवडले, तेव्हा तेव्हा त्यांच्याभोवती रुंजी घालणार्या, त्यांच्याशी मैत्री असलेल्या, माझ्या मते त्यांच्यावर प्रभाव टाकणार्या कोणा ना कोणा मुलीबद्दल तीव्र मत्सर निर्माण झालाच झाला. अन हिरव्या डोळ्याच्या राक्षसाने तो काळ मला अत्यंत पीडले असे आठवते. दर वेळेला कोणी आवडले, कोणा मुलाचे आकर्षण वाटले, की कोणीतरी मुलगी अतिशय नावडायची. तीन्ही त्रिकाळ तिच्याविषयी विचार येत. असूया, मत्सर, हेवा वाटे, राग राग येई.कोणी मुली इतक्या सुंदर, भाग्यवान कशा असू शकतात न आपणच काय घोडं मारलय आदि भावना डोकावत. एकंदर स्वतःचे स्वतःला मिझरेबल करुन घेण्याची कोणतीही संधी मी दवडत नसे.
पुढे वाचनात आले की मेंदूच्या ज्या भागाला पीडनेची, वेदनेची जाणीव होते, जो भाग वेदना आयडेंटीफाय करतो तोच भाग मत्सर नामक इन्टेन्स भावनेचे नियंत्रण करतो. त्याहीपुढे काही मानसोपचारतज्ञांकडून ही माहीती मिळाली की काही विशिष्ट मेंटल डिसॉर्डर्स (मानसिक व्याधी) मध्ये मत्सर अधिक अधोरेखीत होतो किंबहुना मत्सर हा एक सिम्प्टम असतो.
माझ्या मते, "हेवा" (एन्व्ही) या भावनेचा उत्क्रांतीमध्ये काही सकारात्मक सहभाग असूही शकतो. की मनुष्य अधिक प्रेयस प्राप्त करण्यास प्रयत्नशील व उद्युक्त होत असेल कदाचित, परंतु असूया/मत्सर या भावनेचा सकारात्मकतेशी सुतराम संबंध नसावा.
नंतर नंतर जसेजसे आत्मभान येत गेले तसेतसे अतिशय नकारात्मक छटा असलेल्या या वेदनामय भावनेच्या कचाट्यातून, पंज्यातून पूर्ण सुटका झाली. एक वेगळाच दृष्टीकोन मिळत गेला. कालांतराने "जोलीन" नावाचे "डॉली पॅट्रनचे" नितांत सुंदर गाणे ऐकण्यात आले. एका रुपगर्वितेला, एका सामान्य विवाहीतेने केलेली व्याकुळ विनवणी शब्दांकीत करणारे हे गाणे.मला इतके आवडले कारण यात आहे ना मत्सर ना हेवा फक्त एक रोखठोक विनंती की माझ्या नवर्यावर गारुड घालू नकोस. तुला असे छपन्न मिळतील मी मात्र जर तो मिळाला नाही तर प्रेमाशिवायच राहीन. तू सुंदर आहेस तुला हवा तो पुरुष मिळेल, पण तेवढा माझा नवरा सोड. त्याच्या मागे लागू नकोस.
https://www.youtube.com/watch?v=qGEubdH8m0s
आजही हे गाणे ऐकते अन पावले आपोआप ठेका तर धरतातच शिवाय हे गाणे लिहीणार्या कवीचे कौतुक वाटते.
प्रतिक्रिया
व्याकुळ विनवणी शब्दांकीत
तुम्ही जरा जास्तच विचार करता का?
स्वतःच्या नवर्यावर तेव्हडा विश्वास पाहिजे. वेळप्रसंगी फाट्यावर मारणे, हेसुद्धा शिका. थोडी वेगळ्या प्रकारची गाणी पण ऐका, असे सुचवावेसे वाटते.
तुम्ही जरा जास्तच विचार करता
आपला गैरसमज होतोय एवढेच म्हणेन. एक अजून एक गाणे आठवले की पोस्ट करीन. तेसुद्धा आवडते. ते "जोलीन" गाण्याच्या अगदी विरुद्ध आहे.
_____
सापडलं - https://www.youtube.com/watch?v=p1kT4u_D5PA&feature=kp (अॅश्टन शेफर्ड चं लुक इट अप!!! अमेझिंग आहे.)
फाटा
असं कसं शक्य आहे? (नवर्याच्या) निष्ठा या अभेदनीय असतात का?
हे कसे. म्हणजे आत्ताच्या नवर्याला नि अजून एक दोघांना घटस्फोट देऊन?
कि काय झाल्यावर फाटा द्यायचा याची अगोदरच यादी बनवून?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हेवा वाटण्यातून काही प्रमाणात
हेवा वाटण्यातून काही प्रमाणात सकस स्पर्धा निर्माण होत असेल काय?
(जोलीन गाणं अलिकडेच ऐकलं आणि आवडलं. शब्द अंमळ जुन्या संस्कृतीचे आहेत, पण धून आवडल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतं.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझ्या नवर्यावरच गारुड घाल.
माझ्या नवर्यावरच गारुड घाल. तुला असे छपन्न मिळतील मी मात्र जर तो दूर गेलाच नाही तर प्रेमामधे सफोकेट होत राहीन. तू सुंदर आहेस तुला हवा तो पुरुष मिळेल, पण तेवढा माझा नवराच धर. त्याच्या मागे लाग. लै पकवतोय तिज्यायला.
असे कोणते गाणे नाही का?
...
याच्या अखेरीस, 'माझ्या सद्भावना आणि सहानुभूती' असे लिहावयाचे राहून गेले काय?
('सूनर यू द्यान मी' याही पर्यायाचा कदाचित विचार करता येईल.)
नाही मी म्हणते तूच असे गाणे
नाही मी म्हणते तूच असे गाणे लिही!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
मस्त!
छानच लिहिलंय!
अशी वेगळी वाक्यं लेखनाला अधिक प्रभावी करत आहेत.
आत्मभान शब्द सुद्धा कित्ती दिवसांनी वाचला.
नेमकी शब्दयोजना आणि स्वतःकडे त्रयस्थपणे पाहत आलेले हे स्वगत आवडले.. अजून येऊ द्या
-----
समांतरः
बाकी एकट्या अपत्यांना "असुया" या भावनेवर कंट्रोल ठेवणं भावंडांबरोबर वाढलेल्या अपत्यापेक्षा कठीण जात असावं का? किंबहुना लहानपणी ज्याला "सिबलिंग रायव्हर्ली" म्हटले जाते त्याकडे निरोगीपणे कसे बघावे याचे "ऑन-जॉब ट्रेनिंग" आपोआप मिळते / पालक व/वा समाज देत असतो. तुलनेने एकटी अपत्यांना या जाणीवेला उशीरा तोंड द्यावे लागत असल्याने काहीशी अधीक हट्टी व लक्ष्यकेंद्रीत मनोवृत्तीची होतात का? माझ्या परिचयात माझ्या पिढीत एकटे वाढलेले फारच कमी आहेत त्यामुळे याबद्दल काहीच मत नाही पण नव्या पिढीकडे बघुन हा विचार मनात येतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
?
हे नेमके काय असते ब्वॉ?
'न'व्या बाजूने ते समजणार नै.
'न'व्या बाजूने ते समजणार नै.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दुसरं मुल का असावे याच्या
दुसरं मुल का असावे याच्या गचाळ कारणांमधे हे एक कारण बर्याचदा ऐकले आहे. जे मला अजीबात पटत नाही. मत्सर कमी होतो, वाटून घ्यायची सवय लागते, ब्लाब्लाब्ला. असे काही अजीबात होत नाही. बालकपालकावर सर्व अवलंबून असते.
बरोब्बर!
बरोब्बर!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
भा.पो.
भा.पो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भिन्न लिंगी वगैरे सगळे मरो.
भिन्न लिंगी वगैरे सगळे मरो.
माझ्या जवळच्या मैत्रिणीला जर अजून कोणी मित्र/मैत्रीण मिळाले आणि ती त्यांच्याशी पण शेअरिंग करतेय असे तिच्या बोलण्यात यायला लागले तर माझी जळ्जळ व्हायची, अजूनही होते!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
सहमत!
सहमत!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सविता तू बरी मी नणंद सासूला
सविता तू बरी मी नणंद सासूला जवळची म्हणून नणदेचा हेवा करतेय
काय म्हणावं या YZपणाला 
हात् साला!
शीर्षक चुकून 'मच्छर' (मस्कीटो१) असे वाचले, नि मोठ्या अपेक्षेने धागा उघडला. (म्हटले, तेवढीच आडून दूरान्वयाने पाल-अॅडवोकसी करता येईल!) मात्र, खिशात२ घोर निराशा पडली.
..............................................................................................
१ 'आमच्या'त अस्साच उच्चार करण्याची पद्धत आहे.
२ पदरी पडायला आम्ही काय बालगंधर्व आहोत?
छान लेख. नंतर नंतर जसेजसे
छान लेख.
वॉव!!! थोडासा हेवा वाटलाच.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
असेच
हेच म्हणतो :tired:
प(ण)न इंटेंडेड
प(ण)न इंटेंडेड
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
योगायोग!
योगायोग आहे .

गेल्याच आठवड्यात आम्ही 'मत्सर' ला समानार्थी कानडी शब्दं शोधत होतं कारण नणंदेला मला असं बिचारायचं होतं की 'तुला कुणाचा मत्सर का वाटत नाही'
पण तिला 'एदी उरतद' म्हणजे 'छाती जळणे' याशिवाय दुसरा शब्दं सुचत नव्हता आणि माझ्या लक्षात येत नव्हतं.
मग शब्दकोश बघितल्यावर मत्सर/ईर्षा हेच शब्दं सापडले.
गंमत म्हणजे लहानपणापासून कुणाचा मत्सर वाटलाच नाही.
असणारं कुणी दिसलं तरी मला एकतर बर्याचदा रजिस्टरच होत नाही किंवा लक्षात आलंच तर काही वाटत नाही.

अगदी जास्तं मार्क्स मिळवणारी मैत्रीण असो की पहिल्याच अटेंप्टमध्ये पीजी मिळवणारी क्लासमेट.
आताही चांगली माडी,चांगली गाडी आणि चांगला गडी
याचं आमच्या सासरच्या मंडळीना खूप म्हणजे खूपच आश्चर्य वाटतं कारण त्यांच्यामते कुणाचातरी मत्सर वाटल्याशिवाय माणसाचा उत्कर्ष होत नाही. तुमच्यात काही करून दाखवायची काही मिळवून दाखवायची उर्मी उत्पन्न होत नाही.
खरोखरच नशीबवान आहात. माझं
खरोखरच नशीबवान आहात.
माझं अगदी उलटं आहे. मला कशाचा नि कोणाचा मत्सर वाटला नाही ते आठवतच नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कौतुकास्पद आहे साती. खरच. मी
कौतुकास्पद आहे साती. खरच. मी विरुद्ध आहे .... अजूनही आहे असे परवाच लक्षात आले.
पिंक - Religion has screwed
पिंक - Religion has screwed our lives so much that it has condemned it (मत्सर) to be a sin.
Almost everything that you want to do in limitless fashion, (e.g. sex), religion wants to ban it by labeling it as a sin. The only thing that religion would like you to do almost unlimited is altruism. (असं आमचा एक क्लायंट म्हणात होता. सुमारे दीड वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका अनौपचारिक संभाषणात. व Client is always correct. म्हणून मी त्याचे म्हणणे मान्य करतो व माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महराष्ट्र.)
मला मत्सर या शब्दाची पहिली
मला मत्सर या शब्दाची पहिली ओळख उलट बाजुने झाली. माझ्याबद्दल कोणाला तरी मत्सर वाटत होता.
अजूनही हा शब्द मला असाच अधिक भेटतो.
क्वचित काही मित्र रात्री अचानक अगदी कमी नोटीसवर (थोडक्यात मनात येईल तेव्हा)भेटतात, रात्री उशीरापर्यंत गप्पा हाकत बसतात नी आम्हाला वर मेसजवून जळवतात तेव्हा मात्र त्यांच्या "सिंगल" असण्याचा किंवा लग्न होऊनही अपत्य नसण्याचा मला यथेच्छ मत्सर वाटतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आँ?
मात्र त्यांच्या "सिंगल" असण्याचा किंवा लग्न होऊनही अपत्य नसण्याचा मला यथेच्छ मत्सर वाटतो.

सुख टोचणं ह्यालाच म्हणत असावेत काय ?
न जाणो, रात्री उशीरापर्यंत चाललेल्या गप्पांत मित्रांनी "मला ऋषीकेशचा हेवा वाटतो" वगैरे विषयावरच गप्पा मारल्या असतील!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
क्वचित काही मित्र रात्री
अगदी अगदी! कुडण्ट अग्री मोअर!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ग्रेस यांची कविता - एका
ग्रेस यांची कविता - एका ब्लॉगवर वाचली
.
स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफडाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्णकळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीकप्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी --राधा
हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!