वन नाईट स्टँड - तुम्ही घ्याल काय? (क्र. १)

कृपया आपला कौल धागा क्र. दोनवर (http://www.aisiakshare.com/node/3172) पुन्हा द्या. कौलाच्या सेटींग्ज नीट न सेट केल्यामुळे वाचकांना संभ्रम निर्माण झाला होता. त्याबद्दल दिलगीरी.
----------------------
वन नाईट स्टँड वर धागा निघाला आहे त्या निमित्ताने हा पोल घेत आहे.
-----------------
इथे होय/नाही आणि तत्त्वतः होय/ तत्त्वतः नाही असे not exactly mutually exclusive वाटणारे पर्याय आहेत. आपण जर होय वा नाही चे उत्तर थेट देऊ शकत नसाल किंवा थेट वर्तन महत्त्वाचे नसेल तर तत्त्वतःचा पर्याय निवडा.
-------------------
मला अभिप्रेत असलेला प्रश्न खालिलप्रमाणे आहे.
१. संबंधांमधे भावनिक, वैवाहिक, आर्थिक, लांबपल्ल्याच्या इ इ बाबी अभिप्रेत नाहीत.
२. व्यक्तिंमधे पूर्वीचे वा नंतरचे लैंगिकेतर संबंध असावेतच वा नसावेतच याला काहीही महत्त्व नाही.
३. संपूर्ण जोर क्षणिक वासनापूर्तीवर आहे. इथे क्षणिक व वासना शब्दांना कोणतीही धन वा ऋण टींज नाही.
४. वन म्हणजे एकच एक असे स्ट्रीक्टली नाही. सबजेक्ट टू १.
५. नाईट म्हणजे रात्रच असे नाही. पण शक्य तितका कमी नि वासनेने भारलेला हवा.
६. व्यक्ति परिचित वा अपरिचित असू शकते.
७. सर्व प्रकारचा संबंध (फोन सेक्स, ऑनलाइन सेक्स) ज्यात दोघे एकमेकांच्या माहितीने एकरत होतात ते सारे व्हॅलिड आहेत.
८. सर्वसाधारणपणे आपले विचार बदलत असतील तर हा सर्वे होत असतानाचे उत्तर द्यायचे आहे. कृपया लक्षात घ्या कि विचार बदलत असणे वेगळे नि या विषयावर निश्चित विचार नसणे वेगळे.
९. या पोलवर वैचारिक मत द्यायचे आहे. म्हणजे वैचारिकतेच्या खेरीज अन्य कारणांनी (लाँग टर्म साथीदाराकडून लैंगिक समाधान झाले नाही, साथीदाराशी परंपरेमुळे नैतिक प्रतारणा ठरेल, संतती हवी किंवा क्षक्षबाईसोबत झोपलो म्हणून सांगताना प्रतिष्ठा वाढते इ इ हेतू असतील तर ते वैचारिक मत ठरणार नाही.) मूलतः समाजामधे शुष्क संभोगास बढावा मिळावा का, मान्यता असावी का, चालवून घेतले जावे का, इ इ दिशेने हा प्रश्न आहे, जो व्यक्तिगत रित्या उत्तरायचा आहे. वन नाईट स्टँड पार्टनर कसा असावा (सुंदर, निरोगी, मॉडेल, इ इ)याबद्दल काहीही गृहितक करता येईल.
----------------
पर्याय -
१. वर ९ मधल्या बाबींच्या फंदात न पडता वर्तन काय आहे ते सांगायचे असेल तर होय वा नाही.
२. वर्तन काय असेल याच्या फंदात न पडता तत्त्वतः काय मत आहे ते तत्त्वतः होय नि तत्त्वतः नाही असे म्हणून सांगायचे आहे.
३. अर्थातच इथे स्वतःचे वर्तन महत्त्वाचे कि तत्त्व महत्त्वाचे हे अगोदर ठरवूनच मग मत द्यायचे आहे.
४. उत्तर देता येईल इतका समाधानकारक विचार केला नसेल तर 'निश्चित माहीत नाही.' ( संभ्रम टाळण्यासाठी- पण याचा अर्थ ऐनवेळी आपण निश्चित नकार देणार आहात असा होत नाही.)

खाली पर्यायांची सिक्वेंस नीट दिसत नाही आहे. तर खरा क्रम खालीलप्रमाणे आहे.
१. होय.
२. नाही.
३. तत्त्वतः होय.
४. तत्त्वतः नाही.
५. होय आणि तत्त्वतः होय.
६. नाही आणि तत्त्वतः नाही.
७. निश्चित माहित नाही.

--------------------
या स्पष्टीकरणांनंतर कौलाचे स्वरुप प्रचंडच वेगळे निघत असेल तर वेगळा धागा काढू का?
------------------
यानंतर (मी प्रचंड प्रतिगामी असल्याने*) वेळोवेळी कलियुग* इंडेक्स = (होय*५+तत्त्वतः होय*३+ होय आणि तत्त्वतः होय्*१०+ तत्त्वतः नाही*३)/(नाही आणि तत्त्वतः नाही*१० + नाही*५ + तत्त्वतः नाही*१) प्रकाशित करेन.

मौजमजा म्हणून. No offense intended in the word Kaliyug. Just telling time by the old method.
------------------

प्रतिक्रिया

एकूण मते ६ दिसायला हवीत. २ च दिसताहेत.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकापेक्षा जास्त पर्याय निवडल्यास प्रत्येक पर्यायाचं एक मत मोजलं जातं.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कौलाची सेटिंग्ज Maximum choices: Limits the total number of choices voters may select.
याचा वापर नविन कौल टाकताना करावा.

धन्यवाद. बदल केला आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सगळेच पर्याय चेकवल्याने स्त्रियांच्या दिर्घकालीन रडारवरून तू गायब झाला आहेस ROFL

ROFL

That blip on the radar didn't last even for four hours...

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

निश्चित नाही ला मत दिलय. कारणं कॉम्प्लिकेटेड आहेत. अर्थात "होलीअर दॅन दाऊ" भूमिका अज्जिबात नाही. इच ऑन हिज ओन. मला झेपणार नाही हे माहीत आहे म्हणून नाही Smile

निश्चीत नाही मंजे surely not की not sure/don't know?

प्रश्न वाच टिंक्स. तुम्ही वन नाईट स्टँड घ्याल का? या प्रश्नाचं ते उत्तर आहे.
आत्ता लक्षात आलं - तुझा प्रश्न बरोबर आहे ग.
शुअरली नॉट!!! (मी तरी तसा अर्थ घेतेय)

माझ्या मते तू चूकीचा अर्थ घेतला आहेस. अजोंनी not sure या अर्थाने तो पर्याय दिलाय. तू 'नाही' हा पर्याय निवडायला हवा होता.

ऊप्स!! असेलही मग Sad
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

फार गृहितकं आणि/किंवा भाषेचं दौर्बल्य आहे बुवा!

आधीच करून सवरून मोकळे झालेल्यांना काही जागा द्याल का नाही?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशा व्यक्तिंना पश्चात्ताप वा प्रचंडानंद झालेला असू शकतो. प्रश्न उत्तर देण्याच्या घडीसाठी आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पश्चात्ताप वा प्रचंडानंद एवढेच नै कै. कुणाला कपभर चहा/कॉफी किंवा फ्रुट ज्यूस पिउन कसं जरासं छान वाटलं असेल; तितकच छानही वाटलेलं असू शकतो. कपभर चहा पिऊन छान वाटलं, तरी तो काही प्रचंडानंदच दरवेळी असेल असे नव्हे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दिले आहे (प्रत्यक्षात काहीच झेपणार नाही निदान कौलावर हो म्हणायला आप्ल्या बापाच काय जातय? Smile

"चारित्र्य म्हणजे काय? तर जे गमावण्याची संधीच मिळत नाही म्हणून टिकतं ते"
~एक महात्मा

अरूणरावांनी भाषिकरित्या का होईना, ती संधी दिलेली असूनही फक्त ३ जणांनीच लाभ घेतलेला आहे.
वाईट वाटलं, वाचकांचं दौर्बल्य, दुसरं काय?

आमच्यात सगळं दिवसाढवळ्या होतं
आणि रात्रि झोपतात
तरी पण होला हो केलंय
नंदिबैलासारखं

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

आमच्यात सगळं दिवसाढवळ्या होतं

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो.

म्हणून तुम्हाला अंधार आवडतो काय?

अवांतरः येऊ द्या आणखी एक चर्चाप्रस्ताव. सगळं दिवसाढवळ्या होऊ शकत असतानाही अंधार का आवडतो?

वन नाईट स्टँड म्हणजे काय भोपळ्याची भाजी आहे का द्यायला अन घ्यायला?

बाकी, ज्या लेखावरून हा कौल घेतला आहे त्यालेखातला प्रसंग हा (घसा खाकरून) आमच्या मते वन नाईट स्टँड नाही. क्लासिकल (?) वन नाईट स्टँड मध्ये सहभागी व्यक्तींची त्या दिवसा आधी ओळख वगैरे नसते आणि त्या दिवसानंतर कोणताही संपर्क नसतो. त्या लेखातील 'कनेक्शन'ला आम्ही कॅज्युअल रिलेशनशिप म्हणू.

निळोबा,

तुम्ही म्हणयात ते Anonymous sex. तो वन नाईट स्टँडचा एक प्रकार आहे.
वन नाईट स्टँड मध्ये सहभागी व्यक्तींची त्या दिवसा आधी ओळख असू शकते आणि त्या दिवसानंतर त्यांचा संपर्क असू शकतो जो शारिरीक पातळीवरचा किंवा सेक्शुअल नसतो.

- (कमिटेड) सोकाजी

हा सोयीस्कर लावला गेलेला अर्थ आहे. आम्ही प्युरीस्ट असल्याने आम्हाला तो मान्य नाही.

वन नाईट स्टँड ह्या वाकप्रचाराचा उगम एकाच रात्री करता होणार्‍या शोज मुळे आहे. इथे सेक्शुअल रिलेशन संबंधात स्टँड म्हणजे कन्फ्रंटेशन. लैंगिक संबंधानंतर निर्माण होणारी परस्पर संबंधातील गुंतागुंत नसलेले कंन्फ्रंटेशन म्हणजे वन नाईट स्टँड. त्यानंतर संपर्क जर असेल तर पुन्हा लैंगिक संबंध येणारच नाहीत याची काही खात्री नाहीच शिवाय पूर्वीच्या लैंगिंक संबंधामुळे नात्यात होणारे बदल वगैरे कॉम्प्लिकेशन्स वन नाईट स्टँड मध्ये नसतात. असो.

हा सोयीस्कर लावला गेलेला अर्थ आहे

कोणाची सोय?
असोच!

- (सोयीस्कर) सोकाजी

ऑनलाईट डेटिंग कम्युनिटींमध्ये हे विषय वादाचे आहेत. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. म्हणून जोतो सोयीस्कर रित्या आपापला काऊंट वाढवायचा प्रयत्न करत असतो. असो, अधिक काय लिहणे!

अरे सोत्रि.. तू तरी नीट वाचायचेस..

वन नाईट स्टँड - तुम्ही घ्याल काय?

म्हणजे वन नाईट स्टॅंडच्या वेळी तुम्ही "घ्याल" काय..

माझ्यामते एकदोन लहान पेग घ्यायला हरकत नसावी. त्याने फायदाच व्हावा.

पण फार जास्त घेतल्यास मात्र नाईट स्टॅंडचा बट्ट्याबोळ होऊन एस्टी स्टॅंडवर रात्र काढावी लागू शकते.

धाग्यातच कोणती घ्याल असाही कौल असता तर ब्र्यांड सर्व्हेही होऊन गेला असता.

-(वोमिटेड) गवि .

त्या लेखावरून हा प्रश्न सुचला आहे. प्रश्न लेखाच्या संदर्भात नाही.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दर पाचदहा मिनिटांनी जोशीशेठनी वोटिंग कुठवर आलंय आणि कुणाचं स्टँडिंग कुठंय हे सांगायला पाहिजे बॉ.

रेकॉर्ड ठेवणं चालू असल्याने, मला मत देण्याच्या ऑप्शनच दिसलेला नाही. पण मताचा काऊंट दिसतोय, म्हणजे माझ्या बाजूने मतदान झालेलं असावं. हे काय गौडबंगाल आहे काही माहित नाही. गुप्त मतदान असल्याने काय मत दिले असते असे कोणी आगावू पणे विचारू नये.

आमच्यात तर दिवसा केलं तरी माणसं रात्रीच म्हणतात. आता काय बोंबलायचं ह्यांच्यापुढं? बरं बोंबललं तरी यांच्या कानावरून जातं (अल्ट्रासॉनिक). अन्यायाची हद्द आहे!!!

-(संत्रस्त) वाल्गुदप्रतिनिधी.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरं तर हा मतप्रस्ताव 'वन नाईट स्टँड - घेणार काय?' अशी स्टँडविक्रेत्याची जाहिरातही वाटते आहे.

तोही बहुधा सेकण्डह्याण्ड!

(गराज सेल काढा म्हणावे.)

तोही बहुधा सेकण्डह्याण्ड!
का म्हणे?

निश्चित नाही म्हणजे नक्की नाही की सांगता येत नाही?
हे स्पष्ट करा मग मत देऊ

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गंडलाय सगळाच कौल. ३६ मत आणि २६ मतदार दिसतायत.
अॅडमिन राईट्समधून शक्य असेल तर एकच पर्याय निवडणे आणि ज्यांनी जास्त पर्याय निवडलेत ती मते रिव्हर्ट ब्याक करता येईल का?

तसे नाही करता येणार, शिवाय अकोणते मत ठेवायचे हे अ‍ॅडमिन नै ना ठरवू शकत.
एकच पर्याय निवडायचा रेडीयोबटन वाला कौल बदलला तर आधीची मते पुसली जातील

जौ दे! हा कौल वन नाईट स्टँड होता असे समजू .. रात गयी कौल गया Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरेरे गंडल वाटतं सगळच ROFL
अॅडमिननी सगळीच मतं शून्य करावीत आणि पुन्हा मतदान घ्यावे.
मला वाटत होय, नाही, माहीत नाही, may be असे पर्याय पुरेसे होतील.

तुम्हाला बरा हो या कौलाच्या औटकमात भारी रस? Wink

औटकमात

बर्‍याच कोट्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या अन (नेहमीप्रमाणेच) डॉळॅ पाणावलॅ.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजो, हा धागा वाचनमात्र करु काय?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय. धन्यवाद.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.