"Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता - भाग १

कामुकता/लैंगिकता हा विषयच असा आहे की तो घृणा अन लाज या दोहोंच्या पात्यात भरडला गेलेला आहे. इतका प्रत्येकाशी निगडीत, प्रत्येकास जवळचा अन तरीही टाळला गेलेला दुसरा विषय नसेल. कामोत्तेजना किंवा परमोच्च सुखाचा क्षण याबद्दल प्रत्येकाच्या काही कल्पना असतात. या शब्दांनी मनावर तरंग उमटतात - भावनिक बंध, मीलन, अध्यात्मिक डूब, एकरुपता शारीरीक नाते, प्रेमिकांचा संवाद, मत्सर व राग, वासना, इच्छा, aggression, सळसळता उत्साह-उमदेपण असे अनेक शब्द व संकल्पना डोक्यात येतात अन तरीही काहीतरी पकडीतून निसटते. हे म्हणजे ४ आंधळे व हत्ती या गोष्टीसारखे होते, कधी सोंड तर कधी पाय तर कधी शेपूट हाती लागते. पण पूर्ण हत्ती कोणालाच उमगत नाही.

संभोग व अतृप्त इच्छा/कामना/वासना यांचे तसे बरेच जवळचे नाते आहे. किंबहुना ज्या विशेषांचे दमन आपण करतो, तेच विशेष दुपटीने उफाळून आपल्यासमोर येतात हे म्हणणे संभोग क्रियेस्/संकल्पनेस लागू पडते.

"केला जरी पोत बळेची खाली
ज्वाला तरी ते ते वरी उफाळी"

अर्थात निसर्ग त्याचे काम चोख बजावतो.

परवा एका धाग्यात पोर्नोग्राफी विरुद्ध मत मांडले होते. हेतू अर्थातच judge करणे, उपदेश करणे हा नव्हता. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असू शकते. पण मला तरी असे वाटते की एकदा भडक, सवंग, यांत्रिक, compulsive अन abusive (परत पोर्न सवंग वगैरे आहे हे कशावरुन असा सवाल येणारच) sensory bombardment झाल्यानंतर, अन मुख्य म्हणजे अशा bombardment ची सवय लागल्यानंतर एक प्रकारचा numbness येतच असणार (येतो. अनुभव आहे : )) subtle, तरल cues कडे दुर्लक्ष होऊ शकते, ते cues तितकेसे appeal करेनासे होतात.

मला स्वतःला कविता, पोर्नोग्राफीपेक्षा अधिक पटींनी Turn On करतात. अनाहत (हृदय) चक्र उत्तेजित करण्याची क्षमता कवितेत असते असे माझे मत आहे.अन ते अनाहत चक्र अन सगळं नाजूक-साजूक वर्णन जाऊ देत, अनेक अनेक कविता खरच वाचकाला गरम करु शकतात, अंगावर शिरशिरी आणू शकतात. असो. फुलांच्या पाकळीचे थरथरत उमलणे, फांकणे हे कोणा कवीमनास अत्यंत उत्कट अन कामुक वाटू शकते तर स्त्री (ची योनी) ही एक हिरा असून आपण एखाद्या प्रकाशकिरणासारखे तिला भेदून, तिच्यामध्ये explode होतो ही अन्य एखाद्या संवेदनशील मनाची fantasy असू शकते.

"Linda alexander" यांच्या "Thirst" या कवितेतील, कवीने, स्वतःला गवताच्या पात्याची दिलेली पुढील तरल उपमा (की रुपक) पहा -

Like a blade of summer grass
turning towards a fragrance
of rain caught in the air's
cooling, I come back to you.

कविता अन लैंगिकता/कामुकता यांचेमध्येही काही साधर्म्य आहेत. ज्याप्रमाणे संभोगाच्या परमोच्च क्षणी व्यक्ती देहभान विसरते तीच उन्मनी अवस्था अतिशय आवडती कविता वाचताना येऊ शकते. संभोगास लय, ताल, प्रवाहीपण असते, आत्मा असतो जे की कवितलाही असते. कामोत्तेजित, उन्मनी अवस्थेत इंद्रियांचा गोंधळ होऊ शकतो, असाच इंद्रियजन्य गोंधळ, कवितेमध्ये रुपके, उपमांतून उलगडू शकतो.

मी "Wendy Maltz" याचे "Intimate Kisses" हे पुस्तक अनेकदा वाचले आहे. आजही परत पुनर्वाचनाचा आनंद लुटते आहे. या पुस्तकातील काही कवितांच्या ओळी व माझी टिप्पणी या लेखाद्वारे मांडू इच्छिते. कोणत्याही पोर्न पेक्षा प्रभावी, अधिक उत्तेजित करणार्‍या अतिशय उत्कट व तरलही, रुपकांतून उलगडणार्‍या या कविता अपार समाधान व ecstatic आनंद देतात. वेगवेगळ्या कविता, वेगळ्या कोनातून प्रेमिकांचे उत्कट क्षण, क्वचित एकरुपता साधायची struggle दाखवतात.

चुंबन हे फक्त ओठांनी अनुभवायचे असते या माझ्या कल्पनेस या कवितांनी वेगळा दृष्टीकोन दिला. कोणी नजरेने चुंबेल तर कोणी स्पर्शाने, कोणी नजरेने प्रेमिकेस विवस्त्र करेल तर कोणी मनाने."octavio paz" यांची " touch" ही अशीच बेमिसाल कविता -


My hands
open the curtains of your being
clothe you in a further nudity
uncover the bodies of your body
My hands
invent another body for your body

या कवितेचा मला लागलेला अर्थ हा की - कवि प्रेमिकेला निव्वळ निर्वस्त्र करत नाही तर त्यांची एकरुपता ही तिचं अंतरंग प्रकट करण्यास catalyst ठरते. म्हणजे कदाचित ती खर्‍या आयुष्यात अत्यंत inhibited अन भित्री असेल पण त्यांच्या मीलनात ती पुढाकार घेत असेल किंवा वरचढ ठरत असेल, कुठेतरी ती स्वतःचे खरे रुप(अंतरंग) विना संकोच उघड करु शकते, "open the curtains of your being" यातून मला तोच अर्थ लागतो.

"The moth's kiss, first" या "Robert Browning" यांच्या कवितेमध्ये, चुंबनाच्या काही प्रकारांचे रुपकात्मक वर्णन येते. पैकी पतंग ज्याप्रमाणे फुलाच्या पाकळीवर भिरभिरत , पाकळीच्या कोमल रेषा, पाकळीच्या घड्यांची चाहूल घेत इकडे तिकडे चुकारपणा चुंबत रहातो, त्याचे वर्णन या पहील्या कडव्यात येते. त्या पतंगाचे फुल हे निद्रीतावस्थेतही असू शकते, जेव्हा पतंग त्याच्या पाकळीवर भिरभिरतो तेव्हा कदाचित फुलास जाग येते अन एकदा आपण कोणाला तरी हवेसे आहोत हे जाणवल्यानंतर ज्या कोमल तीव्रतेने(fierce) फूल उमलते, प्रतिसाद देते त्या वर्णनाने वाचकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

The moth's kiss, first!
Kiss me as if you made me believe
You were not sure, this eve,
How my face, your flower, had pursed
Its petals up; so, here and there
You brush it, till I grow aware
Who wants me, and wide open I burst.

"Robin Jacobson" यांची एक कविता आहे जिच्यात sweet anticipation अर्थात मीलनाच्या अधीर पण मुद्दाम ताणलेल्या प्रतीक्षेचे सुरेख वर्णन येते. ज्याप्रमाणे असे म्हणतात की वाईन ही प्रथम दृष्टीने नंतर नाकाने व शेवटी जीभेने उपभोगायची असते तसेच काहीसे वाट बघत, आतुरता वाढवत शेवटी उपभोगण्याचे प्रेमाचे वर्णन या कवितेत येते. या कवितेचे नावच "The Dance" आहे. अर्थात हा slow अन sensual असा पदन्यास आहे. एक balancing act आहे.


we touch and kiss, your hand cups
the long smooth muscle of my back,
we move to the pulse of valve and blood.
Our bodies urge us, they say
yes, and oh yes. But the waiting
is so sweet we choose it, we linger
at each brush of lip on lip as if it were
new wine, to be rolled around the mouth
before we swallow.

"Debra Pennington Davis" यांची ""Shaving Night Sonnet"" तर इतकी मस्त कविता आहे. म्हणजे तिच्या पुरषाने अगदी दाढी करणे ही mundane कृतीही कोणा स्त्रीच्या मनात व्याकुळ कामुक भावना जागृत करु शकते. मला प्रचंड, अतिशय आवडते ही कविता. अन तिची पंच लाइनही सुरेख आहे. ही कविता मला खरच "Turn on" करते.

I can't help but watch the blade reveal
the face behind the man. Each careful stroke
reshapes the curves my fingers itch to feel.
I'd trace--So soft--Your jaw, your lips, your nose
and never nick or scratch your tender skin
if you'd abandon that cold blade for me.

अशीच रुटीन क्षणामध्ये "ती" जादू शोधणारी अजून एक कविता "Michael S. Smith" यांची "Breakfast In Bed". "milky heat" अन "Breakfast" काय सांगड आहे खरच सुंदर, मस्त! म्हणजे कोणता Breakfast दोघंजणं आज सकाळी devour/enjoy करणार आहेत याची आपण कल्पना करु शकतो.

They make me think of you,
My hands on your
Spread thighs, your hands in my hair,
My tongue at work,
Your rising milky heat.

"Nikki giovanni" यांच्या " The day" सारखी एखादी कविता खूप रोखठोकपणेही सामोरी येते अगदी explicite रुपक घेऊन. न शिवाय कदाचित मला जाणवले त्याहून बरीच खोलीही त्या रुपकास असू शकते. रसग्रहण शेवटी वाचकावर आहे-

if you've got the dough
then I've got the heat
we can use my oven
til it's warm and sweet

पुस्तकातील जवळजवळ सर्वच कविता आवडल्या आहेत. पण प्रत्येक कवितेचा गाभा हा २-४ ओळीत मांडता येत नाहीये त्यामुळे थोड्याच कविता सर्वांपर्यंत पोहोचवता येताहेत. असो. पुढील भागात अधिक काही कवितांच्या ओळींचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करेन : )

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

ऐसी वर मोदीद्वेश, हिंदु-मुस्लिम, पुराणकाळातील विमाने आणि गणिते ह्या गोष्टी सोडुन काहीतरी दुसरे आले म्हणुन आनंद झाला.

पण दुर्दैवाने एक दोन पॅरा नंतर वाचण्याचा कंटाळा आला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्पष्ट प्रतिसादाबद्दल आभारी आहे. खरं आहे उगाच ओढून-ताणून पोर्न Vs कविता अशी एकदम विजोड मॅच लावली आहे. हा धागा फसला आहे हे मान्य.
पण त्यातही उधृत केलेल्या कविता फार सुंदर आहेत हेही तितकेच खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंग्रजीतलं काही कळत नाही. इरॉटिक आहे म्हणून अर्थ समजतो, पण "मजा" नाही.
मराठीत अशा कविता कुणी लिहिल्यात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात है मिळाली -

” संध्या राधा तांबूस गोरी उन्मद्पद गतिमंद
यमुना-स्नाना धापत आली जपत मनी गोविंद
न सहुनी मोहनदाह सोडिता श्वास कंचुकी बंध
सहज तिच्या चाळ्यातुन सुटले वाळ्याचे रतिगंध
अंचल उडता कंपित स्तंभित चंचल पवन-कदंब
धर्मचलाने सचैल भिजला झाला ओलाचिंब
यमुना वदली नको राधिके उघडी टाकू पाठ
लोचन पापी सोडवु दे मज कचभाराची गाठ
हरीप्रतिबिंबे लहरत होती यमुना उतट तुडुंब
डुंबत होती धुंद राधिका पिळीत पिवळे लिंब
वंशवनातुन व्यंकट लोचन तिमिर चोरटा कृष्ण
उष्ण उसासे टाकीत खिळला बघत तिला सतृष्ण
निळी होउनी उठली राधा पिळू लागली केश
मोर होउनी गिळू लागला जलमौक्तिक हृषीकेश
पिसापिसातुन फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र
या चित्राने रात्र जाहली अक्षय मीलन-क्षेत्र. ”
__________

https://maitri2012.wordpress.com/2012/04/07/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%...

हा दुवा खासच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चौरपंचाशिका.

http://www.misalpav.com/node/13683

प्राचीन मराठी कवींचा नाद नै करायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समजायला, अवघड वाटतय पण Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडलं.
पण मग हे असं अजून का लिहित नाही कुणी? अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेचा इथे संबंध येत नसावा. "लोकांना आवडत नाही" हे कारण तर अज्याबातच बाद!
शृंगारिक लिहिणं कठीण असावं बहुधा Smile किंवा आजकालचे साहित्यिकच अरसिक. साहित्याची वगैरे कोंडी फोडताना अशा गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवं त्यांनी.
कळकळीची विनंती आहे ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचा अर्वाचीन (म्हंजे अल्पिष्टनानें शनवारवाड्यावर इंग्रजी निशाण फडकावल्यानंतरचा काळ) साहित्याचा अभ्यास अंमळ कमी आहे. तेव्हा आम्ही याचे उत्तर देण्यास तसे असमर्थ आहोत. परंतु व्हिक्तुरियन मूल्यारोपण हे एक महत्त्वाचे कारण त्यामागे असावे असे वाटते. बाकी जाणकार सांगतीलच. पण इन जण्रलच आम्हांला प्राचीन वर्णनेच अतिशय आवडतात. व्युत्पन्ना शैलीचे माधुर्य आणि जानपद शैलीचे सहज सौंदर्य या दोहोंमुळे प्राचीन साहित्यात हे दोन्ही प्रकार एकदम कल्ला करून जातात.

तदुपरि अर्वाचीन काळात मचाक नामक जालीय प्रकार परिचयाचा असेलच. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@विक्टोरियन मूल्यं - हा इंग्रजांनी केलेला सर्वात मोठा अत्याचार म्हणावा लागेल!
मचाक - नाही हो. शेन वॉर्नची बॉलिंग बघाविशी वाटली तर मुरली कार्तिक किंवा वेंकटपथी राजू कसा चालेल? कायतरीच!
प्राचीनावरच भागवावं लागेल म्हणता, ठीक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राचीनावरच भागवावं लागेल असं काही नाही. अर्वाचीनात काय आहे ते आम्हांला ठाऊक नाही इतकेच. जमल्यास गीतगोविंदही वाचून पहावा. डिसप्वाइंट होणेच अशक्य. शक्यतोवर मराठी भाषांतर पहा. विंग्रजीही चालेल पण मराठीची लज्जत वेगळीच.

तदुपरि व्हिक्टोरियन मूल्ये रोपणे हा लै मोठा अत्याचार आहेच. सवालच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"बुगडी माझी सांडली ग" - सुंदर लावणी आहे. मुख्य म्हणजे अशी गाणी - they builds up tension

"घरात नव्हते तेव्हां बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तोबा तोबा !
वितळू लागे ग लोणी बाई, बघता निखार्‍याला"

_________

ओढ लागली संगतीची, नजरभेटिच्या गमतीची
आज मला हे गुपीत कळलं जत्रंमधल्या धक्क्याचं

हे तरी काय. सूचक अन अतिशय शृंगारीकच आहे.
_____
खालच्या ओळीही खासच!

अंगा-अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फिदा
उडंल भडका, चढंल धुंदी
जीव जीवा फसला, ग बाई बाई जीव जीवा फसला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही घ्या मीच आपली जाहिरात करतो :
"रविकर"

ही जरा बोजड शब्दातली :
"उद्या सकाळी"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहेत. Smile

"उद्या सकाळी" कवितेतील "वाटे जो रुबाब मजला, आता न काही हवे..." ही भावना अतिशय सुंदर आहे अन "रविकर" मधील मत्सराची भावना तर खासम खास. ती भावना वाचून पुढील सुंदर ओळी आठवल्या :)-

मैं

कैसे खुदा हाफ़िज़ कह दूँ
मुझको तो किसी का यकीन नहीं
छुप जाओ हमारी आँखों में
भगवान की नीयत ठीक नहीं

खरच आवडल्या कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतातल्या रेखा की सुरेखा नामक कवयित्रीची लेस्बियनिजमवर कविता वाचली होती पण इथे देऊ शकतो की नाही ते माहित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्या हो ननि. नंतरचं नंतर बघू.
किंवा मग काही ओळी द्या ज्यातून कवितेचा गाभा कळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I graze all over these arching slopes
Up to your breast I climb
Plant my lips on the pinnacle.
The pink trail of teeth proves I am the first
To come this way.
.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख लेख.
-------------
कवन मला कोणत्याही भाषेतलं झेपत नाही पण सोबतीला रसग्रहण असेल तर छान वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद अजो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कनकधारा स्तोत्राचा अनुवाद (अनुवादच कारण संस्कृत पूर्ण कळत नाही) वाचताना अंगावर फक्त काटा येतो.

मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि .
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले या
सा मे श्रियं दिशतु सागरसंभवायाः .. २..
The shy love-laden sidelong glance of the beauteous dark eyes of the daughter of the Milky Ocean, returns again and again to the beauteous lotus face of Murari, just like the black bee constantly returning and flitting about the beautiful blue lotus flower. I pray that these glances be bestowed upon me to bless me with prosperity.

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दं
आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् .
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः .. ३..
The eyes of Mukunda remain closed in ecstasy. The beauteous dark eyes of Lakshmi remain fixed on Mukunda in love and
wonder and remain open without blinking. May these eyes of Mahalakshmi fall on me and bless me with prosperity and happiness..

साभार - http://sanskritdocuments.org/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू तलम अग्नीची पात’नाही आठवले कुणाला मलिका अमरशेखांची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आजच पहील्यांदा वाचली. सुंदर आहे.

तू अल्लड नवथर, थरथर देही जसे थरथरे पाणी
त्या पाण्यावरला तरंग मी अन्‌ भास वेगळा राणी
रानात बहर, अंगात बहरले धुंदफुंदले श्वास
मीलनी मग्‍न ते सर्प जसे की टाकतात नि:श्वास
तू तलम अग्‍नीची पात..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0