उदरभरण नोहे : हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले ?

आपण रोजच मेसमधे, कँटीनमधे किंवा हॉटेलात (किंवा घराबाहेर म्हणा) एका दिवसात किमान एक वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त वेळाही जेवतोच. घरुन डबा आणायला विसरलो की सहकार्‍यांच्या डब्यातले थोडे थोडे खातो. यापैकी काहीच शक्य नाही झाले तर कुणाचा लग्नसमारंभ असेल, वाढदिवसाची पार्टी असेल तर तिथेही जेवतो. हा धागा आपण घरी किंवा घरचे शेवटचे कधी जेवलो ? काय जेवलो ? जेवण स्वादिष्ट होते काय ? जेवण बनविताना बायकोचा (इन रेअर केस स्वयंपाक बनविणार्‍या नवर्‍याचा) मुड कसा होता ? तो पदार्थ तुम्हाला आवडला काय ? आवडला नसेल तर बायकोला तसे स्पष्ट सांगण्याची तुमची हिंमत झाली काय ? किंवा तो पदार्थ न आवडल्यामुळे तुम्ही तो तुमच्या सहकार्‍याला / मित्राला खाऊ घातला आणि रोज रोज मेसमधे जेवणार्‍या तुमच्या सहकार्‍याला / मित्राला ते जेवण दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने रुचकर लागला काय ? भाजीत आज केस निघाला काय ? चपात्या (पोळ्या) तोडल्यामुळे तुमच्या दातांचा व्यायाम झाला काय ? नवविवाहित दांपत्यापैकी स्वयंपाक बनविणार्‍या भिडूने आज चपात्यांमधे कोणत्या देशाचा नकाशा बनविला होता ते तुम्हाला अचूक ओळखता आले काय ? यावर दळण दळण्यासाठी हा धागा आहे.
अर्थात हे खाण्याबद्दलच नाही तर पिण्याबद्द्लही आहे.
आधी या प्रकारचा रुचकर विषय ऐसीवर न आढळल्याने हा नवीन धागा सुरु करत आहोत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

हा हा, मुटके साहेब, छान विडंबन.
आजच बायकोच्या हातचं पालक पनीर खाल्लं. बरं होतं. पनीर कडक होतं, हाटेल्यातल्यासारखं मऊ नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले ?

शिव्या. कारण उत्साहाने पुदिन्याची चटणी (हुच्चभ्रू भाषेत मिंट सॉस) बनवला, आणि त्यात नेहेमीच्या मिठाच्या मापाने शेंदेलोण (हु.भ्रू.भा. रॉक सॉल्ट) घातलं. Tongue

[अवांतरः hooch-brew असा नवीण समास करता येईल!]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उत्साहाने ..त्यात नेहेमीच्या मिठाच्या मापाने शेंदेलोण (हु.भ्रू.भा. रॉक सॉल्ट) घातलं

हाहाहाहाहाहा ROFL ROFL कसली हसतेय राव!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल "गोले के आमटे" खाल्ले. गोले के आमटे म्हणजे गोळ्यांची आमटी. भन्नाट झालेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असा प्रश्न ज्यांना पडत असेल त्यांची मला फारच दया येते. तर काही नोकरी करणारे {दोघे} शनिवार रविवार बाहेरच जेवायचे ठरवून हॉटेलांच्या बाहेर रांगेत बसलेले पाहतो तेही विचित्र वाटते. खूपच विचार करायला लावणारा विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्कृष्ट धागा! हा प्रश्न कुणीतरी विचारायलाच हवा होता- की च्यायला लोक घरी खातात तरी कधी आणि कसें ? Biggrin
बरं, अस्वलीणकाकूंच्या कृपेने परवा घरात मेलेली कोंबडी शिजवली होती. बरीच वर्षं परदेशात राहूनही जितपत झणझणीत होऊ शकेल तितपत झाली होती. तक्रारीला वाव नाही.
"डबा-एक संपवणे" हा संपूर्ण लेखाचाच विषय असल्याने ते जाऊ द्या. भावुक होतोय मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तूर्त आमच्याच हातचे खातो आहोत. लै एक्स्पेरिमेंट करीत नसल्याने खाववते. आजच डाळ खिचडीत सांबार मसाला आणि चिंचेचा कोळ घालून कालवून खाल्ले. मज्या आली. मसाला हपिसातील परिचिताने खास तमिऴनाडूहून आणलेला दिला होता. त्याचे वेगळेपण जाणवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विडंबन असेलही, मात्र स्वतंत्र विषय म्हणूनही जिव्हाळ्याचा.
रोज घरचेच खातो. त्यात काल रुची पालट म्हणून आमटीमध्ये लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची आणि कसुरीमेथी घातली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले ?

कोणाच्या घरी?

(शीर्षकात "कोठे" घालायचा राहून गेला काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.