नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
ठराविक तासांची ड्यूटी नसणे,
ठराविक तासांची ड्यूटी नसणे, २४ तास कधीही आणि मध्यरात्रीसुद्धा अगदी नेहमी इमर्जन्सी केसेस येणे, तांबारलेल्या डोळ्यांनी तातडीच्या शस्त्रक्रिया करणे, प्रचंड तणाव असलेल्या स्थितीत बराच काळ उभे राहून शरीराच्या नाजूक अवयवांना कापणे अन शिवणे अन तेही जिवंत ठेवून हे सर्व अधिकच्या प्रिमियमला पात्र ठरत असावं.
कमी पैशातही हीच सर्जरी इतरत्र होत असेल. अमुक डॉक्टरची फी जास्त असणे हे कमावलेल्या कौशल्याचं, ब्रँडनेमचं लक्षण असतं. अमुक लाख मोजल्याशिवाय कुठेही सोयच उपलब्ध नसेल तर कदाचित अन्याय म्हणता येईल.. बट नॉट शुअर.
बसवाल्या ड्रायव्हरशी केलेली तुलना कामाशी बांधिलकी या दृष्टीने योग्यच आहे, त्यामुळे आदर दोन्हींचा असावा, पण कामाची "आर्थिक किंमत" त्या पॅरामीटरने ठरत नाही.
+१
किम्बहुना बस ड्रायवरला सिस्टीम सुरळीत ठेवायची जबाबदारी असते तर डॉक्टरला ती पुन्हा सुरळीत बनवायचीही जबाबदारी असते व ते जास्त जबाबदारी अन कौशल्याचे काम आहे.
अर्थात मनमानी फिज मलाही पटत नाहीत पण मी दागदर असतो तर हमखास रेटुन फी वसुल केली असती आणी माझ्या एकुणच व्यावसायिक कौशल्याचा एक ठरावीक भाग मात्र आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजोपयोगासाठी वापरला असता ०.०० रुपये फि घेउन.
चुकीचे समर्थन वाटते
ठराविक तासांची ड्युटी नसणे, २४ तास इमर्जन्सी केसेस येणे, तांबारलेल्या डोळ्यांनी तातडीची हालचाल करणे वगैरे अडचणी पोलीस हवालदारांनाही आहेत. आजकाल तर हे सर्व प्रकार बँका-आयटी वगैरे क्षेत्रातही आले आहेत. निव्वळ या कारणास्तव डॉक्टरांचे इतके जास्त प्रीमियम समर्थनीय वाटत नाही.
कोणताही क्ष डॉक्टर उठून ७०
कोणताही क्ष डॉक्टर उठून ७० हजार फी मागायला लागला तर ती मिळत नाही हा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल.
एका लेव्हलपर्यंत अपरात्री आणि अनिश्चित काम हा एक प्रीमियम आहे. पण तेवढाच नव्हे. त्या डॉक्टरने नाव कमावले असते ते त्याचे शैक्षणिक मेरिट आणि प्रत्यक्ष सक्सेस रेशो यांच्यामधून.
जर ७० हजार मागून मिळतच नसतील तर कोणताही डॉक्टर त्या मागणीवर चिकटून राहून व्यावसायिक नुकसान सोसणार नाही. म्हणून ब्रँड व्हॅल्यू हा शब्द वापरला. मर्सिडिजही उदा. ५० लाखाला विकली जाईनाशी झाली तर ते लो एन्ड व्हर्शन्स काढतात किंवा सवलती / सुलभ हप्ते जाहीर करतातच. तरीही ती ५० लाखाला जात असली तर इट मीन्स की देअर आर टेकर्स..
अार्थिक किंमत
कामाची अार्थिक किंमत कशाने ठरते, असं तुंम्हाला वाटतं? तोच तर प्रश्न अाहे, अार्थिक किंमतीत एवढी मोठी तफावत असावी का?
यावरून अाठवलं. एकदा गणपतीच्या दिवसात स्वारगेटवरून रात्री सांगलीला चाललो होतो. सगऴ्या गाड्या अारक्षित. जागा मिळूच न शकलेले माझ्यासारखे १०-२० जण कंट्रोलरकडे गेलो. त्यांनी जादा गाडी सोडली. नुकत्याच ६ तासांची फेरी करून अालेल्या ड्रायव्हर-कंडक्टरला झोपेतून उठवून जादा फेरीला पिटाळलं. साळवी म्हणून कंट्रोलर होते. तेव्हा ते म्हणाले, काय सांगू तुम्हाला, अामचे ड्रायव्हर-कंडक्टर ४५व्या वर्षीच म्हातारे होतात. धड खायला मिळत नाही, नीट झोप नाही, कुटुंबासोबत वेळ घालवता येत नाही, अन एवढं असूनही पब्लीककडून सन्मान तर सोडा, साधा कौतुकाचा शब्दही नाही. तेव्हापासून ड्रायव्हर दिसला, तर खरंच म्हातारा अाहे का ते बघायला लागलो. अाता इथे ड्रायव्हर काढा, अन प्राथमिक शिक्षक घाला, नर्स घाला. किती अार्थिक किंमत कराल नर्सच्या कामाची? डाॅक्टरच्या एक दशांश? की एक शतांश?
- स्वधर्म
मला वाटतं जास्त कौशल्यपूर्ण
मला वाटतं जास्त कौशल्यपूर्ण काम अन कमी कौशल्यपूर्ण काम या मुद्द्यामुळे असमानता असावी.
किंमत मागणी पुरवठा तत्त्वाने
किंमत मागणी पुरवठा तत्त्वाने ठरली आहे असे वाटते. त्यात काही गैर नसावी
जर काही ठिकाणी मुद्दाम (काही कट करून वगैरे) पुरवठा कमी केला गेला तर तक्रार योग्य आहे, पण तसे दिसत नाही
किंमत मागणी पुरवठा तत्त्वाने
किंमत मागणी पुरवठा तत्त्वाने ठरली आहे असे वाटते. त्यात काही गैर नसावी
अगदी.
पेशंट ला सर्जरी आधी दुसर्या डॉक्टर कडे जाण्याची संधी होती की नव्हती ?? - हा कळीचा प्रश्न.
एकंदर खर्च मार्केटदरानुसारच आहे
माझ्या नात्यातील एका व्यक्तीची बायपास सर्जरी १० वर्षापूर्वी झाली होती. तेव्हा एकूण खर्च ५०००० रुपयाच्या आसपास आला होता. मेडिकल'सेवे'चे इन्फ्लेशन बघितले तर दहा वर्षात ही किंमत पाचपट झाली आहे हे सहज लक्षात येईल. त्यामुळे अडीच लाख रुपये खर्च हा सद्य बाजाराच्या दरानुसारच वाटतो आहे. हा दर योग्यच आहे असे मला म्हणायचे नाही.
उदा. आजकाल मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रियांचा खर्च सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत गेला आहे.
एकंदर किंमत बाजाराच्या दरानुसार असल्याने त्याच्या अंतर्गत आयटमायझेशन कसे केले आहे याने पेशंटला तत्त्वतः काहीही फरक पडत नाही. माझा असा अंदाज आहे की इन्शुरन्स कंपनीच्या नियमांना वळसा घालण्यासाठी हॉस्पिटले सोयीस्कर आयटमायझेशन करतात. उदा. इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसार सलाईनच्या बाटलीचे पैसे देणार पण बाटली अडकवण्याच्या स्टँडचे भाडे नाही असे काही असेल तर बाटली व स्टँड असे मिळून सर्व पैसे बाटलीला लावले जात असावेत. त्याचप्रमाणे डॉक्टरची फी इन्शुरन्स कंपन्यांना एक्स्क्लुड करता येत नसल्याने जो खर्च मिळण्याची शक्यता कमी आहे तो डॉक्टरच्या फीमध्ये पकडला जात असावा.
तुम्ही इन्शुरन्स क्लेम केले की नाही याचा यात फरक पडू नये. बिलिंग सिस्टम सोपी ठेवण्यासाठी सर्वच पेशंटला एकाच प्रकारचे दर लावण्याचा हॉस्पिटलचा हेतू असावा.
पुन्हा एकदा हॉस्पिटलचा दर व एकंदर सिकनेस केअर व्यवस्थेचे मला चुकूनही समर्थन करायचे नाही. भरमसाट पैसे घेऊनही अत्यंत कमी अकाऊंटॅबिलिटी असलेली ही व्यवस्था आहे. दुर्दैवाने आपल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही व तुलनेने भंकस असे घरवापसी, गोहत्याबंदी वगैरे विषयांवर वेळखाऊपणा चालतो याचे वाईट वाटते.
हेल्थकेअर ही इंडस्ट्री आहे
हेल्थकेअर ही इंडस्ट्री आहे यातच सर्व काही आले. शिवाय यात ऑटोमेशन फारसं नाही त्यामुळे मानवी कौशल्याला अतोनात महत्त्व आहे; पण एकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले रोबॉट डॉक्टर आले की मानवी डॉक्टरचे काम फक्त निदान करण्यापुरते उरेल.
शिवाय माणसांची शरीरं जितकी स्टॅन्डर्ड असतील तेवढा उपचारावरचा खर्च कमी होईल. त्यामुळे सहज बदलता येण्याजोगे कृत्रिम, स्वस्त अवयवही बाजारात यायला लागतील. दर काही वर्षांनी बदलले की झाले.
मानवी अवयवाचा व्यापार
हेल्थ केअर इंडस्ट्रीत मानवी अवयव मूल्यवान आहेत. मग एखाद्याला वाटल की बास झाल जगण आपण आपले शरीर वैद्यकीय क्शेत्राला डिसमेंटल करुन द्याव. त्याची किंमत आपल्या कुटुंबियांना द्यावी. थोडकयात म्हणजे मानवी अवयवाचा व्यापार वैध असू द्यावा. शरीर माझ आहे त्याच काय करायच हे मला ठरवू द्यात. मरण येत नाही म्हणुन जगताहेत असे कित्येक लोक असतात. तसा शरीर विक्रय करायच्या ऐवजी असा शरीर विक्रय करु. अनेक गरीब कुटुंबात आर्थिक हातभार मिळेल. पुर्वी रक्त देउन पैसे मिळण्याची सोय होती. दान द्यायच्या ऐवजी विकत देउ! काय बिघडल.
असा विचारप्रवाह भविश्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुर्वी रक्त देउन पैसे
पुर्वी रक्त देउन पैसे मिळण्याची सोय होती. दान द्यायच्या ऐवजी विकत देउ! काय बिघडल. असा विचारप्रवाह भविश्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही
स्वागतम.
व्यक्तीला आपले अवयव विकायचा विकल्प अवश्य असावा.
गब्बर मिनेसोटा मध्ये तरी
गब्बर मिनेसोटा मध्ये तरी अजुनही 'प्लाझ्मा" विकल्यास पैसे मिळतात.
असा विचारप्रवाह भविश्यात
सहमत आहे; पण असे झाल्यास गरीब कुटुंबांमधल्या वृद्धांची अवस्था मात्र बिकट होईल. त्यामुळे खर्या अवयवांच्या बाजारापेक्षा कृत्रिम अवयवांचा बाजार बरा पडेल.
. त्यामुळे खर्या अवयवांच्या
यातून पुरेसे स्पष्ट होत नाही.
पण असे झाल्यास गरीब
ननि तुमचे विचार नेहमीच आवडतात अन सहानुभूतीपूर्ण वाटतात.
डॉ संजीव मंगरुळकरांचा ब्लॉग
डॉ संजीव मंगरुळकरांचा ब्लॉग जरुर वाचा.
http://svmangrulkar.blogspot.in/
थोडाफार वाचला. रोचक वाटतो
थोडाफार वाचला. रोचक वाटतो आहे. सावकाशीने सवड काढून वाचावा असा.
पाहिला
नक्की वाचतो.
मानसिक आरोग्य हे शारिरिक
मानसिक आरोग्य हे शारिरिक आरोग्या इतकेच महत्वाचे आहे. मानसोपचार तज्ञांच्या फीया व त्यांची सेशन्सची संख्या, तसेच मानसोपचार तज्ञांची संख्या पहाता अंधश्रद्धेला बळी पडलेल्या गरीब लोकांना कुठल्या तोंडाने सांगणार की बाबा बुवांकडे न जाता मानसोपचार तज्ञाकडे जा म्हणून! अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात त्यामुळे समस्या अधिकच अवघड बनते.
जास्तच
वैद्यकिय खर्च अफाट आहे यात वाद नाही. मागणी-पुरवठा ब्रँडनेम वगैरेंबाबत फारसा सहमत नाही. हृदरोगासंबंधीच बोलायचं तर, माझ्या ओळखीचे नात्यातले जे काही हार्ट सर्जन आहेत त्यांचं म्हणणं अगदी साधं आहे. आधुनिक उपकरणं, दवाखाने, स्टाफ इत्यादीचा खर्च इतका अफाट आहे की त्याचे हफ्ते भरण्याकरता डॉक्टरकडे दुसरा पर्याय नाही. असो.
ही एक बातमी इतरांकरता.
एक तर हे डॉक्टर रोज एखादीच
एक तर हे डॉक्टर रोज एखादीच शस्त्रक्रीया करत असतात.
त्यात डॉक्टर ला हार्ट ची शस्त्रक्रीया करण्या इतके प्राविण्य मिळवायचे असेल तर वयाची ३०-३२ वर्षे शिकत रहावे लागते. बाकीची जनता २१-२२ वर्षी कमवायला लागते तेंव्हा हे डॉक्टर जवळजवळ फुकट काम करत असतात.
आयटी मधे फक्त पाट्या टाकुन ८ तासाला सहा सात हजार मिळवणारे हजारो आहेत. तर इतकी मोठी शत्रक्रीया करणार्याने ८०००० घेतले तर कमीच आहेत.
त्यात आजारी, मरणाच्या दारात असलेले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक बघणे आणि त्यांच्याशी डील करणे हे कीती मानसिक श्रमाचे काम आहे हे फक्त डॉक्टरलाच समजु शकते.
रोचक चर्चा. वाचतो आहे.
रोचक चर्चा.
वाचतो आहे.
पण सिटी बसच्या चालकानेही
पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का?
प्रश्न ठीक आहे.
सिटी बसेस अनेक (हजारो) आहेत.
तसेच सिटी बस मधे ड्रायव्हर म्हणून नोकरी करायला तयार असणारे कोट्यावधी आहेत. व म्हणूनच त्यांचा "मेहेनताना" डॉक्टरांच्या मानाने क्षुल्लक आहे. त्यांनी जास्त पैसे हवे असतील तर ड्रायव्हरकी सोडून डॉक्टर व्हायचा यत्न करावा. (हे इतके सोपे नाही, गब्बर. अशी संधीच उपलब्ध नसेल तर काय करायचे ??). प्रचंड लोकसंख्येचा अर्थ हा देखील आहे की - There is abundant supply of bodies. पण याचा अर्थ हा नाही की - There is abundant supply of seats in medical colleges.
खरंतर सिटी बस च्या ड्रायव्हर चा मेहेनताना मार्केट रेट पेक्षा जास्तच असेल कदाचित.
------
आता लगेच - गब्बर, त्यातले काही/अनेक डॉक्टर कॅपिटेशन फी भरून डॉक्टर झालेले आहेत - त्याचे काय ?? ते कुठे "मेरिटॉक्रसी" मधून आलेले आहेत ????? असा आविर्भाव असेलच अनेकांचा.
गब्बरभाऊ, एक विचारू का?
गब्बरभाऊ, एक विचारू का? ‘सांभाव्य अाक्षेप’ तुंम्हीच लिहीले, म्हणून ते अाता संपले, तुमचा दृष्टीकोन वादातीत झाला, असा तर तुमचा समज नाही ना? असो.
बस ड्रायव्हर अाणि डाॅक्टर, यांची काही पातळीवर तुलना होऊ शकत नाही, पण काही पातळीवर नक्कीच होऊ शकते. दोघेही समाजाचाच घटक अाहेत, समाजाचीच सेवा करतात, त्यातूनच पैसे मिळवतात. एका पातळीवर दोघांचे काम समाजासाठी थोड्याफार फरकाने सारखेच ‘जीवाशी खेळ’ असलेले नाही का? त्यांच्या कौशल्य पातळीत, दुर्मिळतेत बराच फरक अाहे, पण त्याचा मेहेनतान्यावर ईतका फरक पडावा? २००/ ३०० पट? कुठेतरी काही ताळमेळ असावा की नाही? असा तो प्रश्न अाहे.
- स्वधर्म
गब्बरभाऊ, एक विचारू का?
गब्बरभाऊ, एक विचारू का? ‘सांभाव्य अाक्षेप’ तुंम्हीच लिहीले, म्हणून ते अाता संपले, तुमचा दृष्टीकोन वादातीत झाला, असा तर तुमचा समज नाही ना?
नाय ओ.
ऐसी अक्षरे वर चर्चेची पातळी अतिबेसिक आहे असे काहींचे निरिक्षण आहे. म्हणून अतिबेसिक प्रश्न आधीच नोंदवून ठेवले की जरा अग्रवर्ती (अॅडव्हान्स्ड) मुद्द्यांना जागा मिळते. (आता यातून - गब्बर स्वतःलाच अॅडव्हान्स्ड विचार करणारा समजतो की काय ?? असा प्रश्न उपस्थित होईलच.)
पण अधिक महत्वाचा प्रश्न हा आहे - की - तुमचा हा प्रश्न माझ्यासाठी अपेक्षित होता की अनपेक्षित ??
------------
एका पातळीवर दोघांचे काम समाजासाठी थोड्याफार फरकाने सारखेच ‘जीवाशी खेळ’ असलेले नाही का? त्यांच्या कौशल्य पातळीत, दुर्मिळतेत बराच फरक अाहे, पण त्याचा मेहेनतान्यावर ईतका फरक पडावा? २००/ ३०० पट? कुठेतरी काही ताळमेळ असावा की नाही? असा तो प्रश्न अाहे.
कोणी कुणाला कोणत्या कामासाठी किती पैसे द्यावेत ह्याचा निर्णय प्रामुख्याने प्राईस सिस्टिम करते (हे एक अति अॅकेडेमिक उत्तर झाले.).
पण हे सांगा की ड्रायव्हर च्या मेहेनतान्यात व डॉक्टर च्या मेहेनतान्यात नेमका किती फरक असायला हवा ?? एखादी रेंज सांगा. किती पट फरक असायला हवा ?? व ह्या तुम्हास इष्ट वाटणार्या फरकापेक्षा जास्त मेहेनताना देणारा एखादा पेशंट (किंवा कमी मेहेनताना मागणारा डॉक्टर) असेल तर त्यास तुम्ही कसे रोखणार ??
२०० पट की ३०० पट मेहेनताना हा परिणाम आहे. व त्यामागचा कार्यकारणभाव (फॅक्टर्स) लक्षात घेणे आवश्यक आहे. व म्हणूनच मी वर त्यातले काही फॅक्टर्स लिहिलेले होते. उदा. लोकसंख्या, मेडिकल कॉलेजातील सीट्स. इतर बाबी सुद्धा आहेत - उदा कौशल्य, कामाचे स्वरूप, कौशल्य विकसीत करण्यासाठी लागणारी गुंतवणूक वगैरे. एवढे सगळे झाल्यावरही काही कामं अशी असतात की ज्यात - इनिशियल कंडीशन्स ह्या अंतिम परिणामांवर विशेष (डिसप्रपोर्शनेट) प्रभाव टाकू शकतात.
!!
बापरे!
बेसिकमध्येच इतका लोचा आहे, पुढे जायलाच नको :P ;)
नाय ओ. ऐसी अक्षरे वर चर्चेची
= )) = )) = ))
.
आज का दिन इतना तूफानी गया है और कल शुक्रवार है| तो कल क्या होगा? :)
आज का दिन इतना तूफानी गया है
आज का दिन इतना तूफानी गया है और कल शुक्रवार है| तो कल क्या होगा?
है जो ये शाम का आलम तो रात क्या होगी
मै खुश हूं और तुम मदहोष ... तो बात क्या होगी.
नको ना अजुन तेल ओतूस आगीत.
नको ना अजुन तेल ओतूस आगीत. आधीच मला "गुरुवार" चढलाय :)
१) डॉक्टर चा व्यवसाय करायला
१) डॉक्टर चा व्यवसाय करायला लायसन्स लागते. अर्थात ट्रेनिंग, लर्निंग, एज्युकेशन, इंटर्नशीप हे सुद्धा करावे लागते. हे सगळे बारावीनंतर किमान ४ ते ८ वर्षे चालते. पण हे सगळे त्या लायसन्स साठी केलेले असते. म्हंजे ते लायसन्स मिळाल्याशिवाय डॉक्टर चा व्यवसाय करता येत नाही.
२) ड्रायव्हर बनण्यासाठी सुद्धा लायसन्स लागते. लायसन्स असल्याशिवाय सिटिबस चालवता येत नाही.
आता या दोन पैकी प्रत्येक लायसन्स साठी किती माणसं किती महिने परिश्रम करतात याचे विश्लेषण केलेत तर तुमच्या प्रश्नाचे किमान ५०% उत्तर तुम्हास मिळेल.
हिंट देतो - ज्या लायसन्स चा पुरवठा कमी त्याची किंमत जास्त.