योनीच्या फनीच्या फनी गोष्टी !

जेहत्ते काळाचे ठायी ,लज्जागौरी कृपेने, ८४ लक्ष योनींच्या फेऱ्यातून मानवयोनीत जन्माला आल्याने ,ठाण्यातल्या गडकरी रंगमंचावर आमच्या टवाळ त्रिकुटाला,' योनीच्या फनीच्या फनी गोष्टी' ऐकवण्याची योजना नियतीने केली होती.हा बहुचर्चित प्रयोग फारसा चांगला जमला नाही याची कल्पना मित्रमंडळींनी दिली होती. त्यामुळे उत्तम नसेल तरी वेगळा प्रयोग बघायला आम्ही तयार होतो. सभागृहात दुसऱ्याच रांगेत आमची तिकिटे असल्याने, कान बंद केले असते तरी या गुजगोष्टी कानाआड करता येणार नव्हत्या.सभागृह एकविसोत्तर सर्व वयोगटातल्या लोकांनी ७०/८० % भरले होते. पडदा उघडण्यापूर्वी एका पात्राने नाईलाज झाल्यागत रटाळ निवेदन केले. ज्याला हा प्रयोग पाहणे शक्य नाही त्यांनी उठून जावे आणि इतरांना शांतपणे बघू द्यावा ,असे तिने सुचवल्याने आम्हाला एकदम सुचेनासे झाले.स्टेजला नाक लावून बसल्याने दंगा करण्याचीही चोरी झाली,मागे बसलो असतो तर मनमुराद हसणे तरी शक्य झाले असते. त्यामुळे तोंड दाबून हसण्याची पराकाष्ठा केली आणि सौजन्यपूर्ण , सहिष्णुतेचा आदर्श पाठ दाखवला. मध्यंतर न घेता, अखंड गजरात नुनी,योनी,चूत आणि पुच्ची वगैरे ऐकावे लागल्याने आमचे कान किट्ट झाले. आम्हालासुद्धा प्रयोग पाहून झाल्यावर हा एकमेव अवयव उरणार आहे की काय, असा काळजाचा थरकाप करणारा, भयाण विचार मेंदू कुरतडू लागला.रंगमंचावर सुरु असलेल्या हास्यास्पद आणि बालिश गोष्टी पाहून प्रचंड पण नियंत्रित हसू येऊ लागल्यावर मग मात्र आमचा जीव योनीत उप्स भांड्यात पडला.

द्वयर्थी हिंदी गाण्यांची अंताक्षरी सुरु झाली.खडा है ,बडा है,चढ गया उपर रे वगैरे गाणी आणि झिम्मा पाहून प्रेक्षक चेकाळून शिट्या वाजवू लागले.विविध वयातल्या आणि पंचखंडातल्या योन्या रंगमंचावर फेर धरून आपापल्या कहाण्या सांगू लागल्या. एक होती नुनी तिची झाली योनी आणि लागली लेस्बियन भजनी ! कधी जगभरात योनीवर होणारे अत्याचार सांगितले गेले तर कधी योनीला शिस्नापेक्षा जास्त मज्जा असल्याने मज्जाच मज्जा असते हे सांगून आमच्या ज्ञानात भर पाडली.( हा विनोद एक नंबरी आहे याबद्दल आमचे एकमत झाले.) स्टेजवर एका कोपऱ्यातली योनी, अंधारात मेणबत्ती लावून युद्धातल्या अत्याचाराबद्दल सांगण्याचा गंभीर प्रयत्न करत असताना, दुसऱ्या कोपऱ्यात एक दवणीय योनी म्हणत होती,"माझी योनी झुळझुळ पाणी " आम्ही खुर्चीवरून कोसळून पडलोच! तिला योनीतून झुळझुळ पाणी म्हणायचे होते का ? स्त्रियांना कामसुख मिळावे यासाठी कामसुखदायिनी देवी म्हणून खुद्द लेखिका अवतरली. तिने विविध प्रकारच्या स्त्रिया कामसुखाने कशा हुंकारतात ते मादक वगैरे आवाज काढले.मागच्या रांगांमधल्या डॉल्बीनिष्ठ आतुर प्रेक्षकांना ते कानठळक ऐकू आले नसावे. ते ,"आवाज ..आवाज " असे ओरडू लागले.त्यावर,देवीने ,"काय हुंकार नीट ऐकू येत नाहीयेका ?" अशी अगदी मधाळ, मादक आणि हजरजबाबी विचारपूस केली.थेट स्टेजवरून विचारणा झाल्याने प्रेक्षकांच्या परमसुखाची परमावधीच झाली. हे सादरीकरण पोर्नसुखद वाटल्याने याला प्रेक्षकांचा सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला.( कुणाला सांगू नका हं पण ,असे फेक आवाज काढून स्त्रिया सहज पुरुषाला उल्लू बनवतात असे आम्ही साईनफिल्ड सिरीयल आणि हॅरी मेट सॅली सिनेमात बघितले आहे.) आम्हाला हुंकार प्रकरणाची किळस येऊ लागली होती. स्टेजवर जे काय सुरु होते ते बालिशपणाचा कडेलोट करणारे होते.लिंग आणि योनीची पूजा करणाऱ्या देशात या प्रयोगाने खरच काही साध्य झाले असेल का असा प्रश्न पडला.सादरकर्त्या कलावंताचे धाडस कौतुकास्पद आहे यात काहीच शंका नाही फक्त त्याला अभिनय म्हणता येईल का हा प्रश्न पडला.

प्रयोग संपल्यावर, ओला झालेला कुत्रा फडफड अंग हलवून पाणी झटकतो त्याप्रमाणे फडफड केल्यावर, रस्त्यावर गोणीच्या गोणी भरून योनी सांडल्या हो योनीशप्पथ !

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

ROFL कहर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ठ्ठो!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

...आणि मार्मिक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उखाणा आवडला.

[असले उखाणे आणि गाणी मुलग्यांच्या हॉष्टेलात प्रसवल्या जाणार्‍या वाङमयात विपुल असतात. उदा. चित्रकूटके पहाडपर..... त्यामुळे असा उखाणा प्रत्यक्षात घेतला गेला आणि हिंमतराव हाष्टेलात राहिलेले असतील तर तो हिंमतरावांना ऑफेण्डिंग वाटेलच असे नाही. कदाचित अशा उखाण्यांची अंताक्षरी तिथे सुरू होण्याची शक्यता आहे. ] Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी अगदी!!!!

(जुन्या आठवणींनी अं.ह. झालेला) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असले उखाणे आणि गाणी मुलग्यांच्या हॉष्टेलात प्रसवल्या जाणार्‍या वाङमयात विपुल असतात. उदा. चित्रकूटके पहाडपर.....

अरे, हा तर मीच इथे टाकला होता! तुमच्या हॉष्टेलावरसुद्धा होता?

पण हा मुलांच्या हॉष्टेलात ऐकला जरी असला, तरी तेथे प्रसवला खासा नसावा. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदाहरणादाखल तुमचाच श्लोक घेतला होता.

हॉस्टेलवर प्रसवण्याविषयी- ती सबमिशनची फाईल पहिल्यांदा बनली त्या वर्षी हा उखाणा प्रसवला गेला असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उखाणा आवडला. कणेकरांना सुद्धा आवडेल. उखाणेच काय, श्लोकही होतील, उदा.

' योनिभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म'|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उखाणे व श्लोक आवडले.
आता एक विनोद
सासूबाई मधुचंद्रावरुन आलेल्या सुनेला विचारतातः काय सूनबाई गृहप्रवेश झाला का?
सूनबाईः (हताश आवाजात) हो गृहप्रवेश झाला पण वास्तुशांती झाली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीटर बोंबलतो.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! उसंत सखु आणि अदिती दोघींनी केलेली समिक्षा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! उसंत सखू आणि अदिती दोघींनी केलेली समिक्षा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीदा तेच तेच सांगाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकी एकदा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकी एकदा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडी उशीराच देतेय प्रतिक्रिया.
उसंत सखु आणि विक्षिप्त_आदितीचं परिक्षण आवडलं. पण ते नाटकाचा बटबटीतपणा उघड करतय म्हणून.
नाटककार आणि दिग्दर्शिका वंदना खरे यांचा एक लेख वाचला होता. प्रत्यक्ष कार्यकर्ती आणि विचित्र परिस्थितीतून गेलेली व्यक्ती लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक काही विचार मांडणारं असावं असं वाटलं होतं. पण ज्यांनी पाहिलं त्यांच्या प्रतिक्रियांवरून एक कलाकृती म्हणून हे नाटक काही फारसं बघणेबल नसावं असं वाटलं होतं त्यामुळे पाहिलं नाही. हे परिक्षण वाचून वेळ आणि पैसे वाचल्याचा आनंद झाला.

पण या धाग्यावरच्या काही प्रतिक्रियांबद्द्ल :- या नाटकाची गरज नाही किंवा हे पोर्न स्टाईल आहे वैगेरे. असेलही, पण ते आपल्या दृष्टीने. आदितीच्या प्रतिक्रियेतलं एक वाक्य "मुळात संकोच नाही ही अडचण आहे" आणि मस्त कलंदर च्या प्रतिक्रियेतलं वाक्य "आपल्याकडे काही शब्द मातृभाषेतून बोलण्यात लोकांना कसंसंच होतं, पण मग इतर भाषांतून ते बोलले जातातच". ही लक्षात घेतली की आपला मर्यादित परिघ स्पष्ट होतो. हा संकोच वा लाज आणि परभाषेतीलच काय पण काहीही बोलणंही शक्यच होत नाही अश्या परिस्थितीत असणारया स्त्रिया अजूनही आहेत आणि बहुसंख्य आहेत.

अर्थात हे नाटक अश्या स्त्रियांपर्यंत कितपत पोचत असेल आणि त्यातल्या बटबटीतपणामुळे त्यांना अपिल किंवा उपयोगी किती होत असेल हा मुद्दा आहेच.

अनुप ढेरेंची प्रतिक्रिया +१.

वर ज्या लेखाचा उल्लेख केला तो हा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाटक आपल्यासाठी नाही याची कल्पना आम्हांला तिकीट काढतानाही होती.

ज्यांच्यासाठी हे नाटक आहे त्यांच्या चष्म्यातून नाटक बघण्याचा प्रयत्न सुरू होताच. म्हणूनच "योनी, योनी, योनी" म्हणून काही 'शष्प' फरक पडत नाही, असा माझा दावा नाही. प्रेक्षकांमध्ये कोणीतरी असतील ज्यांचा संकोच कमी झाला असेल, कुठेतरी सकारात्मक फरक पडला असेलही! पण हे करण्यासाठी वापरलेली बाळबोध पद्धत आणि आजूबाजूच्या पुरुषांच्या शौकीन प्रतिक्रियांचा विचार करता ते ही फार खरं वाटत नाही. योनीशुचिता हा विषय ऑप्शनला टाकणं, अपशब्द वापरणं म्हणजे काहीतरी विनोद केला असं समजणं, यामुळे मुळात हा विषय आणि त्याची व्याप्ती याबद्दल कितपत सखोल विचार केला आहे, असा प्रश्न पडला.

ही एक सुरुवात आहे आणि पुढे यातून चर्चा वाढत जाईल हे सगळं मान्य. स्त्रीवादी पुस्तकांनी, 'द सेकंड सेक्स' किंवा 'द फेमिनीन मिस्टीक', जशी त्या-त्या समाजाला, आपापल्या काळात (आणि आजही काही प्रमाणात) योग्य दिशा दिली तसं काही या नाटकाबद्दल म्हणता येत नाही. हा प्रयोग मराठीत गेली पाच वर्षं सुरू आहे, त्यात एवढीच प्रगती. 'त्यांचा हेतूतर अगदी वाईट नव्हता ना' इतपतच त्याचं महत्त्व उरतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या पुर्वी उपक्रमावर चर्चा झाल्याचे आठवते. http://mr.upakram.org/node/2204#comment-35120

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कोणीतरी कसलीतरी कोंडी फोडण्यासाठी कसा का होईना पण प्रयत्न तर करतंय. कधीकधी बर्फ फुटणं हे इतकं आवश्यक असतं की तो कोणत्या शेपमधे फुटतोय आणि फुटल्यावर त्याचे नक्षीदार स्फटिक होताहेत की वेडेवाकडे तुकडे की चुरा याला महत्व नसतं. पहिला घाव महत्वाचा. चर्चा तर झाली.

नाटक बघितलेलं नाही आणि बघण्याची शक्यता कमी आहे. ते फसलेलं असावं हे वर्णनावरुन दिसतंय. पण कदाचित यातून पुढे अधिक नजाकत असलेले काहीतरी सुरु होऊ शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर खरेबाईसुद्धा अशा फसल्या आहेत, तर शक्यता कमी वाटते. मी "खरेबाईसुद्धा" अशासाठी म्हणतोय की त्यांची मुलाखत वाचली होती त्यात त्याना काय काय प्रसंगांचा सामना करावा लागला होता त्याबद्दल सांगितलं होतं. एव्हढे टक्के-टोणपे पचवलेल्या बाईंकडून स्त्रियाना मदत करण्यासाठी काहितरी ठोस होईल इतपत अपेक्षा करायला हरकत नसावी - माझी तरी आहे/होती. "काहितरी ठोस" म्हणजे त्यानी त्यांचे अनुभव अजून अशा चार जणींबरोबर प्रयोगातून मांडले, "एव्हढं सगळं माझ्या वाट्याला येउनसुद्धा मी मोडले नाही असा 'pep talk' चा कार्यक्रम केला तरी खूप फायदा होईल असं वाटतं. (तसं काही करावंच अशी अपेक्षा नाही पण केलं तर स्वानुभवावर आधारीत खरोखरच काहीतरी बाकीच्याना मदत होईल असं करू शकतील असं वाटतं)

त्याऐवजी भारताशी काहिहि संबंध नसलेल्या समाजात मांडण्यासाठी तयार केलेली संहिता सादर करण्याचा हा प्रकार म्हणजे योग्य हेतूसाठी सर्वस्वी फसलेला प्रयत्न वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मला खरच शंका आहे - एकदम संस्कृत "योनी" शब्द अन एकदम चावट्/ग्राम्य अन्य शब्द ROFL
यांच्या मधे एखादा सभ्य शब्दच नाही का?
गुप्तांग हादेखील संस्कृत शब्द झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

पाने