Disneyland मध्ये फाफे

बन्या अर्थात आपल्या फ़ास्टर फेणे अन मालाला अमेरिकेत येउन तब्बल एक आठवडा झालेला होता अन दोघे आता अमेरिकेस अतिशय सरावले होते, त्यांना अमेरीकन अ‍ॅक्सेन्ट देखील नीट समजू लागला होता. दोघांना अमेरीका तशी बर्‍यापैकी आवडली होती. पण अर्थात तिला फुरसुंगीची सर नव्हती. असो.
त्यात आजचा दिवस तर विशेष होता कारण मामा-मामी दोघे माला अन फाफेला घेउन डिस्नेलँडला जाणार होते. सकाळपासून मालाची जी लगबग लगबग चालली होती ती पाहून फाफे खूप तिला चिडवत होता. "काय मग माले एवढी कसली घाई गं? डिस्नेलँड का कुठे पळून चाललय?" यावर मालाही नेहमीप्रमाणे फ़णकार्‍याने उत्तर देण्याऐवजी दुर्लक्ष करत होती. मामा-मामी, फाफे, मालूही सर्व फलटण शेवटी एकदाची ११ वाजता Disneyland ला पोचली.
___
आता शिरताच फाफे अन माला यांना स्वप्नसृष्टीत शिरल्याचा भास झाला. मोठ्ठे मोठ्ठे राजवाडे, उंच अन पोटात गोळे आणणार्‍या सैरी, ऐकू येणारी गाणी , रंगांची बरसात अन एक स्वप्नमय वातावरण. कुठे डोनाल्ड डक तर कुठे मिकी अन मिनी माउस कुठे स्नो व्हाईट तर कुठे ब्युटी अन बीस्ट चे पोशाख घातलेल्या सजीव बाहुल्या. मज्जा अन काय. फाफे अन माला दोघे पार मंत्रमुग्ध होऊन गेले. "Pirates of the Caribbean " सैर तर वेड लावणारी निघाली. नंतरही बराच वेळ Scream , teacups , water dragon , "Its a beautiful Life ", Astro Orbiter अशा सैरी करुन खूप दमल्यानंतर मामा-मामीन च्या सांगण्यावरुन जवळ जवळ २ वाजता चौघे खाउ गल्लीकडे निघाले. थोडी विश्रांती घेतल्यानंतर दोघांनी "Haunted Mansion" ची सैर करण्याचे ठरविले. मामा-मामी दमले असल्याने एका बाकावर बसले अन फाफे-मालाला, तुम्ही दोघांनीच जा असे त्यांनी सुचविले. मात्र cell phones ऑन ठेवा अशी ताकीद द्यायला विसरले नाहीत.
_____
"Haunted Mansion " ही तर एकदम साहसी सैर निघाली. कोणत्याही गाडीत वगैरे न बसता, प्रेक्षकांनी देखाव्याचा धांडोळा त्यांच्या मर्जीप्रमाणे घ्यायचा असे काहीसे या सैरीचे स्वरुप होते. अतिशय अंधुक प्रकाशात, लाल निखार्‍याच्या डोळ्याचे सापळे, वरती लटकलेल्या वटवाघळांच्या प्रतिकृती, भूते, चेटकिणी, जखिणी अन कोळीष्टके असा सगळा अचकट विचकट देखावा होता तिथे. कुठे पडदा दूर केला की चेटकिणीची कृत्रिम प्रतिकृती भेसूर हसत खिदळत निघत होती तर कुठे मानवी हातापायाच्या खोट्या हाडांनी भरलेला पेटारा होता. एखादं भूत एकदम अंगावर येउन पाणी उडवत असे तर कुठे कळ दाबली जाउन फ़ट्ट्कन प्रेक्षक खाली मऊमऊ गादीवर कोसळत असे तर कुठुन एक हडाडलेला हात बाहेर येऊन, भेसूर आवाजात शेकहँड करावयास सांगत असे. मागे भेसूर अन कर्कश्श्य पार्श्वसंगीताचा मारा तर सतत चालू होताच, त्यात भर म्हणून कुत्र्या-लांडग्यांचे रात्रीचे रडणे देखील घातलेले होते. एवढ्या धबडग्यात अन मज्जेमज्जेच्या देखाव्याताही फाफेने त्याच्या चौकस स्वभावास अनुसरून हाडांच्या पेटार्‍यातील एक कळ नेमकी हेरली होती अन तो विचारच करत होता त्या कळीचा तेथे काय उपयोग असावा की त्याला एका बाईच्या व्याकुळ आवाज ऐकू आला - "Mary Lou....Mary Lou where are you dear. Come to me at once." अन ती बाई एवढ्या गदारोळात तिच्या लहान मुलीला शोधते आहे हे फाफेने ताबडतोब जाणले. त्याने त्या बाईकडे पृच्छा केली की तिने मेरी ला शेवटी कुठे पाहीले. त्या बाईने पेटार्‍याकडे हात करताच फाफेच्या डोळ्यात एक चमक चमकून गेली जी मालाच्या लक्षात आल्यावाचून राहीली नाही. मग फाफेने मालाला खूण केली - मला वाटतं मला ती चिमुकली कुठे गायब झाली आहे ते माहीत आहे. मात्र तू मामामामी कडे जाण्यास त्वरेने निघ अन माझ्या मेसेज ची वाट पहा. माला ने अनिच्छेनेच का होईना, पण पडत्या फळाची आज्ञा घेतली. तिला फाफेच्या आवाजातील गांभीर्य समजले होते. इकडे फाफे स्वत: त्वरेने त्या पेटार्‍याकडे निघाला.
_____
पेटार्‍यापाशी येताच, त्याने ती विविक्षित कळ दाबली अन त्याच्या अपेक्षेप्रमाणेच घडले. तो पेटारा दुभंगला व खाली जीना दिसू लागला. फाफे जिन्यावरून खाली जाउ लागला पण तो पेटारा बंद करायला विसरला नाही. काही एक अंतर गेल्यावर त्याला अंधुक प्रकाशात २ आकृती दिसल्या एक बाई अन एक पुरुष अन जमिनीवर लहान मुलीला तोंडात बोळा घालून बांधलेले त्याला दिसले. दोघेही काहीतरी सल्लामसलत, खलबत करत होते. ताबडतोब त्याने मालाला टेक्स्ट मेसेज पाठवला - Trunk is fishy. Knob pressed leads to girl." त्याला कुठूनसे "It's a beautiful Life" गाणे पुसट ऐकू येत होते त्यावर त्याने निष्कर्ष काढला की हे भुयाराचे दुसरे तोंड "It's a beautiful Life" राइडपाशॆ उघडत असावे. व त्याने दुसरा मेसेज पाठवला - "Second opening @ It's a beautiful life ride "
माला हुशार होतीच तिने ९११ ला फोन करून हे मेसेजेस दिलेच वर फाफेला मेसेज पाठवला की "Informed police. Stay put "
_____
फाफेच्या तैलबुद्धीची अन साहसाची आता खरी कसोटी लागणार होती. कारण पोलीस येईपर्यंत त्या अपहरण कर्त्यांना गुंतवून ठेवणे भाग होते. अन हे देखील माहीत नव्हते की त्यांच्याकडे पिस्तुल आहे की चाकू? यावर फाफेच्या तैल बुद्धीने ते दोघे गुन्हेगार बेसावध असल्याचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला . त्याने लपतछपत जाउन तेथेच असलेल्या एका काठीने एकाच्या डोक्यावरच जोरात म्हणजे एकदम जोरात काठीचा प्रहार केला आणि त्याच काठीने दिवा फोडला. आता काळामिट्ट अंधार होता अन त्या पहिल्या व्यक्तीचे जो पुरुष होता व्हिवळणे ऐकू येत होते. दुसरी जी बाई होती तिला कळले की काहीतरी दगाफटका आहे पण तिला अंधारामुळे सुधारत नव्हते. अन ती फक्त एवढेच ओरडत होती - "Bryce, let's run. We gotta run.". आता काठी हातात ठेवून फाफेने त्याच्या cell वरील "Flash light " चे app ऑन केले व त्या बाईच्या डोळ्यावर प्रकाश मारला. व काठी परत तिच्या डोक्यातही हाणली. या झटापटीला वेगळे अनिष्ट वळण लागणारच होते कदाचित, पण आता बराच वेळ गेला होता अन वरून धाडधाड पोलिस जीना उतरत असल्याचा आवाज आला. अन पोलिसांनी यथास्थित त्या दोघा ब्राइस व कोण ती दुसरी बाई तिला चवदावे रत्न दाखविले.
____
मामा-मामी अन मालू अर्थातच फाफे ला भेटले व मालूचे अन फाफेचे पोलिसांनी भरघोस कौतुक तर केलेच अन बक्षीसही दिले वर CNN वर दोघांच्या पराक्रमाची मोठी बातमी झाली जी की सुभाष देसाई व फ़ाफ़ेच्या अन्य मित्रांनी भारतातून पाहिली. अशा रीतीने फाफेची अमेरीका मोहीमही फत्ते झाली म्हणा की.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडली. Smile विशेषतः डिस्नेलँडचे वर्णन अतुत्तम आले आहे. पण जरा अजुन वर्णन आले असते विशेषतः कारंजी, फुलांचे ताटवे अन रंगीबेरंगी कपड्यातील लोकं , अमेरीकेत बरेचदा न सापडणारी गर्दी लहान मुलांचा ओसंडून वहाणारा उत्साह तर वर्णनाला अजुन चार चांद लागले असते. अन कथावस्तु तर फुलली असतीच पण कथा मोठी झाली असती.
.
मात्र फाफेने पेटारा उघडताच अन्य लोकांनी पाहीले कसे नाही? ही मात्र कथेतील विसंगती जाणवते. असेही असू शकेल की सर्व लोक हे त्या बाईच्या भोवती जमा झाले असून कुतूहलाने "rubbernecking" करत असावेत. पण तसे उधृत करणे अगत्याचे होते.
पण एक स्तुत्य प्रयत्न व गंमतीशीर कथा असे मी म्ह्णेन.
.
"Haunted Mansion" चे वर्णन एकदम चोक्कस छे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण अर्थात तिला फुरसुंगीची सर नव्हती ? असो...

मला गोष्ट आवडली जरा... त्रोटक होती पण आवडली Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

तुमच्या 'असो...' ला असोसोसोसोसोसोसस्स्स्स...................... Biggrin
बाकी फुरसुंगीला तॉड नाही .....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट खूपच त्रोटक निघाली. फा.फे.ला ही पुरेसा वाव मिळाला नाही.
शुद्धलेखनाचा आग्रह नाही, पण थोडेसे लक्ष पुरवल्यास बरे, असे मत. फलटण आणि पलटण या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

छान! वर काहीजणांनी सुचवल्याप्रमाणे अजून फुलवता येऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0