ब्लेम इट ऑन फिडेल (फ्रेंच चित्रपट)

काही चित्रपट यासाठी महत्वाचे असतात की त्यांनी वेगळे विषय हाताळलेले असतात आणि काही यासाठी की त्यांनी नेहमीच्या विषयांची वेगळी हाताळणी केलेली असते. ‘ब्लेम इट ऑन फिडेल’ (मूळ फ्रेंच मध्ये La faute à Fidel) हा चित्रपट काही अंशी वरील दोन्ही मुद्द्यांसाठी महत्वाचा आहें. दोनेक वर्षांपूर्वी पाहिलेला हा सुंदर चित्रपट परवा पुन्हा पाहिला आणि त्याबद्दल इथे लिहावेसे वाटले. वरवर पहिले तर हा विषय डाव्या विचारसरणीतील ध्येयवादाचा, बाल्यातून पौगंडावस्थेत शिरणाऱ्या एका मुलीवर कसा परिणाम होतो हे दाखवतो. ज्याला ‘कमिंग ऑफ एज’ प्रकारचा चित्रपट म्हणतात त्यात याची ढोबळ विभागणी करायची म्हटली तर करता येईल पण हा चित्रपट त्याच्या बराच पुढे जातो. राजकारण, समाजकारण, धर्म, क्रांती, ध्येयवाद वगैरे सर्व गोष्टींकडे एका नऊ वर्षीय मुलीच्या नजरेने पाहून या साऱ्यातल्या विसंगतींवर भाष्य करत हा चित्रपट शेवटी एका वेगळ्याच उंचीवर येऊन पोहोचतो.
‍‌अ‍ॅना ही एक चटपटीत ९ वर्षांची मुलगी आपल्या आई, वडील आणि लहान भावाबरोबर आपलं उच्च मध्यमवर्गीय अस्तित्व आनंदात घालवत असते. अचानक तिच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळते कारण तिचे आई-वडील ध्येयवादाने भारून जाऊन आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवितात. वडील आपली वकिली सोडून चिलीच्या लाल क्रांतीला फ्रान्समधून पाठींबा द्यायला वाहून घेतात. आईही आपली पत्रकारिता स्त्रियांच्या समस्यांसाठी वापरायला लागते. या सगळ्या अमुलाग्र बदलांमुळे कुटुंबाची मिळकत आणि एकूण जीवनस्तर खूपच बदलतो. मोठ्या घरातून छोट्या फ्लॅटमध्ये रहायला जाण्यापासून ते नेहमी बदलत राहणाऱ्या तिच्या निर्वासित आयां आणि त्यांनी बनविलेल्या वेगवेगळ्या परदेशी पदार्थांपर्यंत झालेल्या बदलांनी अ‍ॅनाच्या बूर्ज्वा अस्तित्वावर मोठे घाले होतात. अ‍ॅना लहान असली तरी बंडखोर आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिप्रश्न करणारी असल्याने सहाजिकच आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध ती बंड पुकारते. तिची एक क्युबन आया फिडेल कॅस्ट्रोविरुद्ध शंख करीत असल्याने अ‍ॅनालाही आपल्या सर्व समस्यांना हा फिडेलच कारणीभूत आहें असं वाटायला लागतं. त्यात तिच्या श्रीमंत आजी-आजोबांच्या घरातील उच्चवर्गीय, धार्मिक आणि बूर्ज्वा वातावरणामुळे ती अधिकच गोंधळून जाते. तिच्या आयुष्यातली प्रत्येक प्रौढ व्यक्ती तिला स्वतःच्या तत्वांबद्दल सांगत असताना त्या सर्वांच्याच बोलण्यातल्या विसंगती तिच्या हळूहळू यायला लागतात. तिची गोंधळलेली अवस्था, तिची बंडखोरी, तिच्या आई-वडीलांशी तिचे नाते यात चित्रपटाच्या शेवटपर्यंत काय बदल होतात हे जाणून घ्यायला हा चित्रपट पहायलाच हवा.
मला वैयक्तिक दृष्ट्या या चित्रपटाने काय दिलं असेल तर एका पालकाच्या नात्याने मुलांना वाढवताना त्यांच्याशी चाललेला संवाद अखंड चालू ठेवण्याची गरज मला हा चित्रपट पहिल्याने प्रकर्षाने जाणवली. आपल्या वागण्यातल्या विसंगती मुले सतत टिपत असतात आणि त्यानुसार त्यांचे व्यक्तीमत्व घडत असते. जिथे आपणच गोंधळलेले असतो अशा ठिकाणी आपण मुलांना काय सांगायचे असे वाटून मी अनेकदा पलायनवादी भूमिका स्वीकारत असे पण आता लक्षात येतंय की त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतील तरीही त्यांच्याशी संवाद चालू ठेवणे फार गरजेचे आहें. गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर वैचारिक गोंधळ टाळता येत नसेल तरीही आयुष्याकडे पहाण्याचा एक सुजाण दृष्टीकोन त्यांच्यात निर्माण करायचा असेल तर त्यांनाच विचार करायला प्रवृत्त करायला हवे.
प्रख्यात फ्रेंच दिग्दर्शक कोस्टा गॅव्र्हास यांची कन्या ज्युली गॅव्र्हास यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात दाखवलेली ही समज अतिशय उल्लेखनीय आहें. मूळ फ्रेंच चित्रपट सब टायटल्स वाचून पाहिल्यानेही समजण्यात किंवा पहाण्यात काही व्यत्यय येत नाही.
 
 

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

चित्रपट ओळख आवडली. योग्य तेवढंच दाखवलं की उत्सुकता चाळवते तसं Wink नेटफ्लिक्सच्या इन्स्टंट क्यूमधेही चित्रपट आहे, यादीत टाकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी असंच म्हणतो.

उतरवायला लावला आहे. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

मुलांशीच नव्हे तर एकुणच संवादाचं महत्त्व अधोरेखित करण्याची गरज अनेकदा जाणवते.. चित्रपट बघायलाच पाहिजे.
ओखळ छान करुन दिलीये.. उत्सुकता वाढली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परीक्षण वाचून चित्रपट वेगळा वाटतोच आहे. दबंग आणि दबंग -२ बघण्यापेक्षा हा बघायला जास्त आवडेल.
चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

रुची, चित्रपटाची थोडक्यात ओळख आवडली. लवकरच डाऊनलोड करून बघेन.
बर्‍याच वेळा घरातल्या लहान मुलांना कोणत्याही बदलाचा विशेष फरक पडणार नाही असं गृहित धरलं जातं. अश्या वेळी त्या मुलांना कराव्या लागणार्‍या तडजोडी आणि त्यांची भावनिक ओढाताण यावर हा चित्रपट भाष्य करत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

स्मिता, भावनिक ओढाताणीपेक्षा वैचारीक जडण-घडणीवर चित्रपटात जास्त भर आहे. आपल्या तत्वनिष्ठा आणि आपल्या विचारप्रणाली आपल्या मुलांना देताना त्यांच्यातील वस्तुनिष्ठतेला कमी न लेखता त्यांच्याशी बरोबरीच्या नात्यानं संवाद साधत राहण्यावर भर आहे.
ओळ्ख करून देताना एका मुद्द्याचा उल्लेख राहून गेला तो म्ह्णजे विसंगती दाखवताना त्यातून निर्माण होणारा हलकासा विनोद! हा विनोद मोठे हशे पिकवणारा नाही पण विसंगती लक्षात येऊन चेहेऱ्यावर हलकेसे हसू उमटणारा आहे. मला हा चित्रपट अनेक पातळ्यांवर आवडला पण सर्वात जास्त भावला तो यातला संयम (Restraint). कोठेही किंचितही वहावत न जाता, भावनिक न होता अतिशय परीणामकारक सादरीकरण केले गेले आहे. अर्थात हे सगळे माझ्या मर्यादित बुद्धीचे निष्कर्ष आहेत. इतरांना चित्रपट पाहून काय वाटलं हे जाणून घ्यायची उत्सुकता आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद वाचून इन्स्टंट क्यूमधे हा चित्रपट वर ढकलला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बघेन, बघेन म्हणताना शेवटी परवा हा चित्रपट पाहिला. आवडला.

संपूर्ण लेख आणि प्रतिसादाशी सहमत. सबटायटल्स वाचताना थोडी धांदल झाली. पण चांगल्या चित्रपटाची शिफारस करण्याबद्दल धन्यवाद, रूची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्रपटओळख आवडली
नक्कीच बघेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मोजक्या शब्दात चित्रपटाचा आशय आणि शक्तिस्थानं सांगणारं लेखन आवडलं.

ज्याला ‘कमिंग ऑफ एज’ प्रकारचा चित्रपट म्हणतात त्यात याची ढोबळ विभागणी करायची म्हटली तर करता येईल पण हा चित्रपट त्याच्या बराच पुढे जातो. राजकारण, समाजकारण, धर्म, क्रांती, ध्येयवाद वगैरे सर्व गोष्टींकडे एका नऊ वर्षीय मुलीच्या नजरेने पाहून या साऱ्यातल्या विसंगतींवर भाष्य करत हा चित्रपट शेवटी एका वेगळ्याच उंचीवर येऊन पोहोचतो.

मोठं होताना कुठच्या अडचणी येतात, त्यावर कशी मात केली जाते, आणि त्या प्रवासातून खरोखरचा विकास कसा होतो यावर कमिंग ऑफ एज प्रकारचे चित्रपट केंद्रित झालेले असतात. तुम्ही दिलेल्या कथानकावरून चित्रपटात या मुलीचा वापर तिचा आंतरिक विकास दाखवण्यासाठी करण्याऐवजी एक स्वच्छ, पूर्वग्रहाचे डाग न पडलेला भोवतालच्या समाजाचा आरसा म्हणून केला आहे असं वाटतं.

तुमच्या हातून अजून समीक्षा व इतरही लेखन वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोजक्य शब्दात चांगली ओळख. चित्रपट बघायला हवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुची, परीक्षण खूप आवडले. ऋषीकेष संवादाचे महत्त्व अधोरेखीत करतात तसे मलाही हेच म्हणायचे आहे की - There is no such thing as too much of communication.
परीक्षणामध्ये मला सर्वात आवडलेला मुद्दा हा की तुम्ही तुमचा "टेक अवे" मांडला आहे. तुम्हाला या सिनेमामधून काय मिळाले. त्यामुळे परीक्षण रूक्ष न राहता, त्याला व्यक्तीगत ट्च आला आहे तो खासच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगल्या विषयावर सिनेमा सुचवल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0