आजीबाईचा बटवा - पाठदुखी

आजकाल बैठे काम वाढल्याने बहुतेकांना, जास्त करुन स्त्रियांना पाठदुखीला सामोरे जावे लागते. कोणाला दिसत तर नाही पण त्रास तर खुप होतो. त्यावर काही उपाय :

१) बैठे काम असेल तर दर तासाने उठुन ५मि. उभ्याने चक्कर टाकावी. (कुठे? ते आम्हाला विचारु नये.)
२) ताठ बसावे, पोक काढुन बसु नये.
३) भुजंगासन शिकुन रोज सकाळी आंघोळ झाल्यावर कीमान २-३ वेळा ते करणे. फार फार तर ५-७ मि. लागतात.
४) फार तेलकट, तिखट खाउ नये त्यानेसुद्धा वाईट शरीरावर परीणाम होतो अन पाठ हा शरीरााचाच एक भाग असतो.
५) आठवड्यातुन ३ वेळा तरी तासभर चालण्याचा व्यायाम करावा. मित्र मैत्रीणींबरोबर गप्पा मारत रमतगमत चालणे हा व्यायाम नाही.
६) योगासने येत असतील तर करावीत. नसतील येत तर तज्ञाकडुन शिकुन मगच करावीत. काही आसने पाठीच्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत उदा. भुजंगासन, चक्रासन.
७) जड सामान उचलताना गुडघ्यात वाकुन अन पाठ साधारण सरळ ठेउन मग उचलावे.
८) प्रसुतीनंतर बाळापेक्षा जास्त वजनाचे काही उचलायचे असल्यास नवर्‍याचा उपयोग करावा.
९) शक्य असल्यास मसाज घ्यावा.
मला आत्ता एवढंच आठवतंय. तुम्हाला काही आठवत असेल तर ते लिहा. वरील उपयोग मी सक्सेलफुली(मराठी?) केलेले आहेत.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

काही वर्षांपूर्वी माझीही पाठ खुर्चीवर बसून चिक्कार दुखत असे. नियमितपणे सूर्यनमस्कार घातले की पाठीचा अजिबात त्रास होत नाही. सूर्यनमस्कारात एक पोझ भुजंगासनाचीही असतेच.
अजून एक म्हणजे खुर्चीवर बसताना तळपाय जमिनीला व्यवस्थित टेकलेले असले की पाठ दुखत नाही. एखाद्या वेळेस उंच खुर्ची मिळाली किंवा गुडघ्यात ९० अंशाचा कोन करून कंटाळा आला तर मी बिनदिक्कत मांडी घालून बसते... अगदी चित्रपटगृहातही! हा उपाय करणार असाल तर फक्त पायाला घाम येत नाही ना याची खात्री करा.

आपण मुद्दाम होऊन व्यायाम केला नाही तर पाठीच्या कण्याला मागच्या बाजूने वळवत नाही. त्यासाठी भुजंगासन, उष्ट्रासन, सुप्त वज्रासन, सुप्त पद्मासन इत्यादी उपयुक्त वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. आंघोळ झाल्यावरच भुजंगासन करावे असे का? हाताचे बोट हलवले तरी आम्हाला घाम येतो.
२. आमचे शरीर वाईट नाही त्यामुळे तेलकट, तिखट खाल्ल्याने काही परिणाम होणार नाही असे वाटते.
३. आमच्या आजीने कधी तिच्या आयुष्यात व्यायाम केला असेल असे वाटत नाही आणि पाठीची तक्रार सत्तर वर्षांची होईपर्यंत केल्याचेही आठवत नाही. घरकाम करणे हा आजीचा उपाय असू शकतो का? Wink

हलकेच घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरकाम करणे हा आजीचा उपाय असू शकतो का?

अगदी.
गमतीचा भाग सोडला तर: बैठे काम केल्याने पाठदुखी उद्भवते असे आम्हाला समजते. पुर्वी शारीरीक कष्ट असल्याने काहीही तेलकट , तिखट खाल्लं तरी ते उर्जा निर्माण करताना वापरलं जायचं अन घामावाटे निघुन जायचं.
फार वेळ बुड एकाजागी ठेउन फक्त बुडालाच घाम येइल अन त्याने नकोसे वाटण्यापलिकडे काहीही होणार नाही. Wink

बाकी स्त्री अन पुरुष दोघांनी मिळुन घरकाम केले पाहीजे. एकावरच भार पडत नाही अन काम लवकर होते. असो, यावर वेगळा धागा निघु शकतो त्यामुळे इथे नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बैठे काम केल्याने पाठदुखी उद्भवते असे आम्हाला समजते.

थोडी असहमती. चार घरी धुण्याभांड्याची आणि/किंवा स्वयंपाकाची कामं करणार्‍या अनेक स्त्रियांची पाठदुखीची तक्रार मला माहित आहे. त्यामुळे फार वजन न उचलणे, वाकताना कमरेतून वाकण्याऐवजी गुडघ्यातून वाकणे वगैरे उपाय लहानपणापासूनच कानावर येत आहेत.

एकेकाळी धट्ट्याकट्ट्या वाटणार्‍या आजी लोकांशी, थोडं मोठं झाल्यानंतर बोलताना असं लक्षात आलं की त्यांना कधी तक्रार करायची असते हेच माहित नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) बैठे काम असेल तर दर तासाने उठुन ५मि. उभ्याने चक्कर टाकावी. (कुठे? ते आम्हाला विचारु नये.)

- एकूण चक्कर नेमकी किती वेळ मारावी? ५ मिनिटे उभ्याने चक्कर मारल्यावर उरलेला वेळ चक्कर नेमकी कशी मारावी - रांगत, लोळत की अन्य कोणत्या प्रकारे?

३) भुजंगासन शिकुन रोज सकाळी आंघोळ झाल्यावर कीमान २-३ वेळा ते करणे. फार फार तर ५-७ मि. लागतात.

- रोज सकाळी आंघोळीआधी भुजंगासन शिकण्याऐवजी ते एकदाच शिकून लक्षात ठेवल्यास उपायाचा प्रभाव कमी होतो काय?

४) फार तेलकट, तिखट खाउ नये त्यानेसुद्धा वाईट शरीरावर परीणाम होतो अन पाठ हा शरीरााचाच एक भाग असतो.

- फार तेलकट, तिखट खाण्याचा चांगल्या शरीरावर परिणाम होत नाही, असे यावरून समजता यावे काय? पक्षी, शरीर चांगले असल्यास तेलकट, तिखट दाबून हाणण्यास हरकत नसावी काय? (मुळात, चांगले शरीर म्हणजे नेमके काय?)

- फार तेलकट, तिखट न खाल्ल्याने पाठ हा शरीराचा भाग राहत नाही काय?

८) प्रसुतीनंतर बाळापेक्षा जास्त वजनाचे काही उचलायचे असल्यास नवर्‍याचा उपयोग करावा.

- टेकू (fulcrum) म्हणून नेमके काय वापरावे? बाळ? की अन्य काही?

(कृपया पार्सिंग, वाक्यरचना, तसेच काही ठिकाणी तपशील यांचेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी नम्र सुचवण.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) बैठे काम असेल तर दर तासाने उठुन ५मि. उभ्याने चक्कर टाकावी. (कुठे? ते आम्हाला विचारु नये.)
- एकूण चक्कर नेमकी किती वेळ मारावी? ५ मिनिटे उभ्याने चक्कर मारल्यावर उरलेला वेळ चक्कर नेमकी कशी मारावी - रांगत, लोळत की अन्य कोणत्या प्रकारे?

उरलेला वेळ चक्कर मारू नये हे स्पष्टच आहे नाही का? किती वेळ आणि कशी चक्कर मारावी हे शिल्पाने स्पष्ट लिहीलेले आहे.

३) भुजंगासन शिकुन रोज सकाळी आंघोळ झाल्यावर कीमान २-३ वेळा ते करणे. फार फार तर ५-७ मि. लागतात.
- रोज सकाळी आंघोळीआधी भुजंगासन शिकण्याऐवजी ते एकदाच शिकून लक्षात ठेवल्यास उपायाचा प्रभाव कमी होतो काय?

"रोज सकाळी भुजंगासन शिकून ..." असं लिहीलेलं नसल्यामुळे हा प्रश्नही बाद. रोज सकाळी होण्याच्या अगोदरच काय ते भुजंगासन शिकून घ्या आणि रोज सकाळी आंघोळ करा. आता प्रश्न सकाळी आंघोळ करावीच का असा असेल तर मला उत्तर विचारून ते न मिळाल्यास मी जबाबदार नाही.

८) प्रसुतीनंतर बाळापेक्षा जास्त वजनाचे काही उचलायचे असल्यास नवर्‍याचा उपयोग करावा.
- टेकू (fulcrum) म्हणून नेमके काय वापरावे? बाळ? की अन्य काही?

बाळापेक्षा कमी वजनाचे काही उचलताना जे वापरता तेच ... प्रसूतीआधी जे वापरता तेच ... इ.इ.

(कृपया पार्सिंग, वाक्यरचना, तसेच काही ठिकाणी तपशील यांचेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी नम्र सुचवण.)

याबद्दल घाऊक सहमती. याकडे सगळ्यांनीच लक्ष द्यावे, जे लोकं लक्ष देतात त्यांनी माझी सूचना आधीच ऐकली आहे, त्यांचे आभार. आणि जे लोकं देत नाहीत त्यांनी पुन्हा एकदा माझी सूचना गंभीरपणे घ्यावी ही विनंती.

अवांतरः 'सुचवण' हा शब्द अजिबात आवडलेला नाही. त्या जागी सूचना असा शब्द वापरावा असे सुचवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उरलेला वेळ चक्कर मारू नये हे स्पष्टच आहे नाही का?

पुरेसे स्पष्ट नाही, असे प्रतिपादू इच्छितो. To make it absolutely clear to the meanest intelligence, - viz., mine, - शब्दयोजना करताना पुरेशी काळजी घ्यावी, या मतावर आम्ही अजूनही ठाम आहोत.

"रोज सकाळी भुजंगासन शिकून ..." असं लिहीलेलं नसल्यामुळे हा प्रश्नही बाद.

Moot point. "भुजंगासन शिकणे" आणि "रोज सकाळी आंघोळ करणे" या दोन संज्ञांच्या एकाच वाक्प्रचारातील निकटसान्निध्यामुळे एकंदर वाक्प्रचार हा अन्वयार्थ लावण्याच्या दृष्टीने अतिशय क्लिष्ट होऊन, प्रस्तुत वाक्प्रचार हा वाचनाच्या ओघात चटकन वाचला असता संदेहास आणि अनर्थास भरपूर जागा निर्माण होते, जी अनावश्यक आहे, अशी आमची नम्र (परंतु तितकीच ठाम) भूमिका आहे. (थोडक्यातच सांगायचे, तर वाक्यरचना अत्यंत clumsy आहे - अगदी आमच्या स्वतःच्या average वाक्यरचनांहूनही clumsy - असे म्हणता येईल.)

रोज सकाळी होण्याच्या अगोदरच काय ते भुजंगासन शिकून घ्या आणि रोज सकाळी आंघोळ करा.

वाक्यरचना नेमकी अशीच सुस्पष्ट आणि समजण्यास सुलभ असावी, हेच सुचवायचे होते. आमचा मुद्दा अत्यंत थोडक्यात आणि स्पष्टपणे मांडल्याबद्दल आभारी आहोत.

बाळापेक्षा कमी वजनाचे काही उचलताना जे वापरता तेच ... प्रसूतीआधी जे वापरता तेच ... इ.इ.

हम्म्म्म्... लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहोत.

'गरज ही शोधाची जननी आहे' असे ऐकले होते. याचेच किंचित वेरिएशन 'जननीच्या गरजातून शोध प्रसवतात' हेही तितकेच सत्य आहे, हे नजरेस आणून दिल्याबद्दल आभार.

अवांतरः 'सुचवण' हा शब्द अजिबात आवडलेला नाही. त्या जागी सूचना असा शब्द वापरावा असे सुचवते.

'सूचना' हा शब्द मराठीत वेगळ्या अर्थाने अगोदरच जर सामान्य वापरात नसता, तर आपल्या सुचवणीचा कदाचित विचार करता आला असता. दुर्दैवाने, 'सूचना' हा शब्द मराठीत 'instruction' अशा अर्थाने रूढ आहे. 'Suggestion' अशा अर्थीही तो वापरता येण्यासारखा असला, तरी सामान्य वाचकास त्यातून हा अर्थ सर्वप्रथम सूचित होत नाही. त्यामुळे या शब्दाच्या अशा वापरातून संदेहास आणि म्हणूनच गैरसमजास जागा आहे, अत एव या पर्यायाचा आम्ही विचार करू शकत नाही. ('Instruction' आणि 'suggestion' यांमध्ये, आमच्या मते, 'अमूकअमूक करा' आणि 'अमूकअमूक करून पहा, हं' - किंवा, 'कृपया अमूकअमूक करून पाहता का जरा?' - यांत जो फरक आहे, तोच फरक आहे. पैकी, दुसरा पर्याय जर कोणी एखाद्या संदर्भात आम्हाजवळ वापरला, तर ती गोष्ट आम्ही कदाचित करून पाहण्याची शक्यता आम्ही नाकारू शकत नाही. उलटपक्षी, पहिला पर्याय वापरल्यास, तो पर्याय वापरणारास 'तुझ्या बैलाला घो' असे सुनविण्याची ऊर्मी आम्हांत प्रबळ होते. आमची जी प्रतिक्रिया, तीच सामान्य वाचकाची प्रतिक्रिया असावी, याबाबत आमच्या मनात संदेह नाही.)

'सुचवण' हा शब्द आपल्याप्रमाणेच आम्हांसही आवडत नाही. परंतु अन्य एखाद्या सुयोग्य पर्यायाच्या अभावी हाच शब्द वापरणे निदान तूर्तास तरी आम्हांस प्राप्त आहे. अन्य एखादा उचित पर्याय आपल्याला सुचत असल्यास आपण तो जरूर सुचवावा. ('सुचवणूक' हा आम्हांस सुचत असलेला आणखी एक पर्याय सर्वपक्षी कितपत रुचण्यासारखा आहे याबद्दल आम्ही साशंक आहोत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरेसे स्पष्ट नाही, असे प्रतिपादू इच्छितो. To make it absolutely clear to the meanest intelligence, - viz., mine, - शब्दयोजना करताना पुरेशी काळजी घ्यावी, या मतावर आम्ही अजूनही ठाम आहोत.

इतर सूचना नाहीत तेव्हा पूर्वीची सूचनाच पाळत रहावी असा, साधारणत: रस्त्यावरच्या दिशादर्शनात वापरला जाणारा नियम इथेही उपयुक्त आहे. उदा: कॅपिटॉल बिल्डींग सरळ रेषेत असण्याची खूण असेल तर पुढची खूण किंवा प्रत्यक्षात ती इमारत येईपर्यंत सरळ दिशेतच जात रहावे. तिठा, चौक, किंवा इतर मोठे जंक्शन आले तरीही इकडे तिकडे वळू नये. तद्वत, ५ मिनीटे उभ्याने चक्कर मारावी याचा अर्थ पाच मिनीटे उभ्याने चक्कर मारावी आणि उरलेला वेळ खुर्चीत बसून आपापले किंवा इतरांचे किंवा कसेही काम करावे.

"भुजंगासन शिकणे" आणि "रोज सकाळी आंघोळ करणे" या दोन संज्ञांच्या एकाच वाक्प्रचारातील निकटसान्निध्यामुळे एकंदर वाक्प्रचार ...

"भुजंगासन शिकून, रोज सकाळी ... " अशी वाक्यरचना आपणांस कमी क्लिष्ट किंवा अनर्थकारक वाटते का?

'गरज ही शोधाची जननी आहे' असे ऐकले होते. याचेच किंचित वेरिएशन 'जननीच्या गरजातून शोध प्रसवतात' हेही तितकेच सत्य आहे, हे नजरेस आणून दिल्याबद्दल आभार.

इथे मी तुमच्यावर काही किंचित तुच्छतावादाचा आरोप करावा का, अशा संभ्रमात आहे. गरज ही शोधाची जननी आहेच. पण जननीच्याही गरजा असू शकतात हे तुम्हांस मुद्दाम होऊन नजरेस आणून द्यावं लागलं असं तुम्हीच म्हणत आहात; होऊ घातलेल्या आणि असणार्‍या मातांसाठीच खास दुकानंही आहेत, अगदी (तुमच्या-आमच्या) पुण्यातही आहेत. हे मातांकडे होणारं दुर्लक्ष म्हणावं का त्यांच्याप्रती असणारा तुच्छतावाद?

दुर्दैवाने, 'सूचना' हा शब्द मराठीत 'instruction' अशा अर्थाने रूढ आहे. 'Suggestion' अशा अर्थीही तो वापरता येण्यासारखा असला, तरी सामान्य वाचकास त्यातून हा अर्थ सर्वप्रथम सूचित होत नाही.

मराठीत असे अनेक द्व्यर्थी शब्द आहेत त्यात एकाची भर पडली असे समजा! पण सुचवण हा शब्द अगदीच केळवण आणि *गवण यांची आठवण करून देणारा असल्यामुळे तो नकोच. त्यातून सूचना देणे (instruct) आणि सूचना करणे (suggest) असे पाठभेद चालतील का? सुचवणी हा शब्द कुठेतरी वाचनात आलेला आहे. तसा अगदीच 'हा' वाटला नाही तरी पुरवणी आणि गवसणी यांची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतर सूचना नाहीत तेव्हा पूर्वीची सूचनाच पाळत रहावी असा, साधारणत: रस्त्यावरच्या दिशादर्शनात वापरला जाणारा नियम इथेही उपयुक्त आहे. उदा: कॅपिटॉल बिल्डींग सरळ रेषेत असण्याची खूण असेल तर पुढची खूण किंवा प्रत्यक्षात ती इमारत येईपर्यंत सरळ दिशेतच जात रहावे. तिठा, चौक, किंवा इतर मोठे जंक्शन आले तरीही इकडे तिकडे वळू नये.

आता दिशादर्शनाचाच विषय काढलात, तर एकदोन ष्टोर्‍या सांगतो. (अन्यथा सांगितल्या नसत्या. भोगा आता आपल्या कर्माची फळे.)

(कथा क्रमांक १.)

जीपीएस वगैरे आधुनिक सुविधा सर्रास वापरात नसतानाच्या काळातली ही कथा आहे. किंबहुना आंतरजालावरून मार्गक्रमणिका मिळवण्याची सुविधाही त्या काळात उपलब्ध असली, तरी बाल्यावस्थेत होती, आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पूर्णतः विश्वसनीय असेलच, याची खात्री नसे. सबब, अमेरिकन ऑटोमोबील अ‍ॅसोसिएशनकडून 'ट्रिपटिक' बनवून घेणे, हा राजमार्ग असे.

'ट्रिपल ए'च्या कार्यालयात जाऊन आपल्या प्रवासाचा साधारण कार्यक्रम सांगितला असता ही ट्रिपटिक बनवून मिळते. या ट्रिपटिकमध्ये, प्रवासाच्या एकूण मार्गाच्या विविध टप्प्यांच्या नकाशांची तयार सुटी पाने ट्रिपटिक बनवणारा कर्मचारी उचित क्रमाने एकत्र जोडतो, आणि प्रवासाची दिशा दाखवणारे शिक्के त्या वेगवेगळ्या पानांवर हाताने मारत जातो. तसेच, प्रवासाच्या एखाद्या टप्प्याबद्दल काही विशेष सूचना ('या भागात जरा जपून चालवा; पोलीस मागावर असतात' वगैरे) असल्यास त्या टप्प्याशी निगडित पानावर त्याबद्दल नोंदी करतो. एकंदरीत, मोठा नकाशा उघडून बसण्यापेक्षा छोट्या टप्प्यापुरते एक लहानसे पान उघडून काम भागते. टप्पा संपला, की पान उलटले. तत्कालीन परिस्थितीत छान सोय, वगैरे वगैरे.

तर अशीच एकदा आम्ही आमच्या गावापासून पार देशाच्या दुसर्‍या टोकापर्यंत आणि सीमापार अशी सहकुटुंब सह-विस्तृत-परिवार मोहीम काढली होती. (जाऊनयेऊन जवळपास अडीच हजार मैल.) छानपैकी मजल दरमजल करीत चाललो होतो. जातानाचा अर्धाअधिक रस्ता काटून झाला होता आणि मधला एक टप्पा ओलांडून झाल्यावर मध्ये विश्रांतीसाठी, भोजनासाठी वगैरे थांबलो होतो. पुढल्या टप्प्यात नेमके कसेकसे जायचे आहे ते पाहण्यासाठी ट्रिपटिकचे पुढचे पान उघडले, आणि दिलेल्या नकाशावरून काहीही अर्थबोध होईना. 'त्या महामूर्ख बयेने* काय गोंधळ घातलाय, काही कळत नाही' म्हणून पुन्हापुन्हा नकाशा तपासला, तरी डोक्यात काही प्रकाश पडेना. (*ट्रिपटिक बनवून देणारी व्यक्ती ही स्त्रीलिंगी होती, हा निव्वळ योगायोग. केवळ त्या यद्दृच्छेची कृपा. अन्यथा 'त्या महामूर्ख गधड्याने' म्हटले असते. तर ते एक असो.) त्यात मागच्या सीटवर बसून आमचे श्वशुर हे केवळ आमच्या टक लावून नकाशाचा एकाग्रतेने अभ्यास करण्याची खिल्ली उडवण्यापलीकडे कोणतेही सकारात्मक योगदान करीत नसल्याने**, त्यांचीही फारशी मदत होत नव्हती. (**श्वशुरांवर तोंडसुख घेणे हे आमच्या कल्पनेप्रमाणे अमेरिकेच्या पहिल्या घटनादुरुस्तीच्या अन्वये 'प्रोटेक्टेड फ्री स्पीच'खाली बसते. नसल्यास चूभूद्याघ्या. तर तेही एक असो.) कोठे आहोत याचा नीट पत्ता नाही. आणि पुढे कसे जायचे ते नीट कळत नाही. सहप्रवासीही तितकेच अनभिज्ञ. डोके पिकले होते.

शेवटी अर्धापाऊण तास नकाशाची मागचीपुढची पाने उलटीसुलटी करून झाल्यावर नेमके काय झाले याचा एकदाचा पत्ता लागला. आता नक्की आठवत नाही, पण, ट्रिपटिक बनवून देणार्‍या व्यक्तीच्या चुकीमुळे (१) प्रवासाची दिशा दाखवणारा शिक्का उलटा पडणे, किंवा (२) पाने एकत्र करताना क्रम चुकणे, यांपैकी काहीतरी घोळ झाला होता. आणि त्या चुकीने आम्हाला अर्ध्या रस्त्यावर आणून भंजाळवून सोडले होते.

फार कशाला, आम्हीही स्वतः एकदा कोणा अनोळखी इसमास पत्ता सांगताना काहीतरी गडबड करून त्याची 'जाते थे जापान पहुंच गये चीन' अवस्था केल्याचे आठवते. (कथा क्रमांक २.) झाले असे, की दादर (प.रे.) स्टेशनावर लोकलमधून उतरल्यावर स्टेशनातून बाहेर पडण्यासाठी जिना चढत असताना कोण्या इसमाने हटकून हिंदू कॉलनीच्या रस्त्याची चौकशी केली. आम्हीही मोठ्या परोपकारी भावनेने, 'दादर-स्टेशनपासून-हिंदू-कॉलनी-म्हणजे-दादर-टीटी-म्हणजे-पूर्वेकडे-म्हणजे-चर्चगेटकडे-तोंड-करून-डाव्या-हाताला-नि-आपण-आत्ताच-उतरलो-ती-गाडी-चर्चगेटकडे-चालली-होती-म्हणजे-गाडीच्या-प्रवासाच्या-दिशेने-तोंड-करून-डाव्या-हाताला असा मनातच झटपट हिशेब करून, त्यास स्टेशनातून बाहेर पडण्याकरिता आम्हाला आमच्या हिशेबाने जी योग्य वाटली ती दिशा मोठ्या आत्मविश्वासाने सांगितली. वर 'तेथून बाहेर पडल्यावर जवळच आहे' हेही सांगितले. इसममजकूर आमचे आभार मानून गर्दीत दिसेनासा झाल्यावर सहजच फलाटाकडे बघितले, तर आम्ही सोडून दिलेली लोकल पुढील मार्गक्रमणाकरिता प्रस्थान करताना दिसली - नेमकी आम्ही समजत होतो त्याच्या विरुद्ध दिशेने. झाला गोंधळ लगेच लक्षात आला. आम्ही जिच्यातून उतरलो ती गाडी कोणत्या दिशेने चालली होती याबद्दल आम्ही पूर्णपणे विसरून गेलो होतो, आणि तंद्रीत अधिक परोपकाराच्या उत्साहात आमच्या 'आठवणी'त आमची (फार नाही, पण) फक्त एकशेऐशी अंशांची चूक झाली होती.

पुढे त्या इसममजकुराचे काय झाले, कोण जाणे.

असो. तर सांगायचा मुद्दा, (१) दिशादर्शन करणार्‍या मनुष्याची चूक होण्याची शक्यता नगण्य नसते, आणि (२) चूक जरी दिशादर्शन करणार्‍या व्यक्तीची असली, तरी त्या चुकीचे परिणाम त्या दिशांवर विसंबून राहणार्‍या व्यक्तीस भोगावे लागतात; उलटपक्षी, दिशादर्शन करणार्‍या व्यक्तीच्या (हयात अथवा दिवंगत) तीर्थरूपांस त्याने कोणतीही क्षती पोहोचत नाही, हे दोन महत्त्वाचे धडे या अनुभवांतून शिकलो. आणि 'सांगितलेल्या दिशा या कधीही ट अक्षरापर्यंत काटेकोरपणे पाळायच्या नाहीत', आणि 'दिशा सांगणारी व्यक्ती ही (अन्य कोणत्याही पुराव्याअभावी) भांग अथवा तत्सम अमली पदार्थांच्या अमलाखालीच दिशा सांगत आहे, हे सर्वप्रथम गृहीत धरून मगच त्यावर विसंबून राहायचे', असे दोन खडे कानाला लावले.

या दोन 'खड्यां'नी आयुष्यात आम्हांस खूप मोलाची साथ दिलेली आहे, हे येथे आवर्जून सांगू इच्छितो. इतके की, आजकाल आम्ही जीपीएसवरदेखील पूर्ण विश्वास टाकत नाही. आणि जीपीएसवर अनेकदा समोर जो रस्ता अस्तित्वातच नाही, त्या रस्त्यावर डावीकडे (किंवा उजवीकडे) वळण्याच्या सूचना जीपीएसमधली बाई केवळ आपली फिरकी घेण्यासाठी जी अधूनमधून सांगत असते, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून खुशाल आपल्याला हव्या त्याच मार्गाने जातो. बाई*** आपोआप लायनीवर येते, असा अनुभव आहे.

***(जीपीएसमधली.)

"भुजंगासन शिकून, रोज सकाळी ... " अशी वाक्यरचना आपणांस कमी क्लिष्ट किंवा अनर्थकारक वाटते का?

१. हो. (कमी क्लिष्ट वाटते.)
२. नाही. (अनर्थकारक वाटत नाही.)

जननीच्याही गरजा असू शकतात हे तुम्हांस मुद्दाम होऊन नजरेस आणून द्यावं लागलं असं तुम्हीच म्हणत आहात

'जननीच्या गरजा असू शकतात' हे नजरेस आणून द्यावे लागले नाही. 'जननीच्या गरजांतून शोध प्रसवतात' हे नजरेस आणून दिल्याबद्दल आभार मानले होते. फरक आहे.

('जननीच्या गरजांतून शोध प्रसवतात', पक्षी, 'जननीच्या गरजांतून 'शोध' म्हणून क्वालिफाय होऊ शकतील अशा ग्रेटग्रेट कल्पना (उदा. 'बाळापेक्षा कमी वजनाचे काही उचलताना जो वापरायचा तोच टेकू बाळापेक्षा अधिक वजनाच्या वस्तू उचलण्यासाठीही वापरता येतो' किंवा 'प्रसूतीआधी वापरण्याचा टेकू प्रसूतीनंतरही वापरता येतो'. आपल्याला नसते बॉ सुचले!) जन्माला येतात' याची कल्पना नव्हती, याची ही प्रांजळ कबुली-अधिक-तारीफ आहे. आणि कशी कल्पना असणार? आजवर 'ट्रेड सीक्रेट' असल्याप्रमाणे 'आतील गोटा'त राखून ठेवल्यावर गोटाबाहेर या ग्रेटग्रेट कल्पनांचा थांगपत्ता तरी कसा लागणार? ही वस्तुतः त्या शोधांची अधिक त्या गोपनीयता राखण्याच्या कौशल्याची तारीफ आहे.

पण तारीफ केली तरीही त्यात तुच्छताच पाहायची म्हटल्यावर आम्ही आपल्यासाठी काहीही करू शकत नाही. क्षमस्व.)

मराठीत असे अनेक द्व्यर्थी शब्द आहेत त्यात एकाची भर पडली असे समजा!

द्व्यर्थी शब्दांचे बाबतीत नेमका अनपेक्षित अर्थ प्रतीत होऊन हमखास गैरसमज निर्माण होतात, हे लक्षात घेऊन, नेमके हेच टाळण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तेव्हा, अमान्य.

पण सुचवण हा शब्द अगदीच केळवण आणि *गवण यांची आठवण करून देणारा असल्यामुळे तो नकोच.

आम्हांस साठवण आणि लागवण यांची आठवण झाली. असो. कोणाला कशाने कशाची आठवण होईल, हे सांगवत नाही, एवढेच म्हणून सोडून देतो.

त्यातून सूचना देणे (instruct) आणि सूचना करणे (suggest) असे पाठभेद चालतील का?

नको. पुरेसे सुटसुटीत होत नाहीत. त्यापेक्षा सुचवण बरा. (आपलेच घोडे दामटीत.)

सुचवणी हा शब्द कुठेतरी वाचनात आलेला आहे. तसा अगदीच 'हा' वाटला नाही तरी पुरवणी आणि गवसणी यांची आठवण झाली.

आम्हाला शिकवणीची आठवण येते. (पुन्हा, कोणाला कशाने कशाची, वगैरे वगैरे.) नकोच ते.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तस्मात, आपण कोणे एके काळी मुंबई नगरी निवास करत होतात अन आपल्याला त्या नगरीची व्यवस्थित माहीती आहे असा एक समज होता. तद्नंतर आपण अमेरीकादेशी प्रस्थान केलेत अन भरपुर पैसा गाठीशी बांधुन नातेवाईक मंडळींना घेउन गाडीतुन दोन एक हजार मैल सफर केलीत हे वाचुन आनंद झाला. तर ते एक असो.

पण आपण पाठदुखी या विषयावर विवेचन ते केले नाहीच. काय उपाय करावेत, काळजी घ्यावी याविषयी आपले अमुल्य ज्ञान (मुंबई घटनेप्रमाणे नव्हे) इतरांस वाटावे हीच काय ती इच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>प्रसुतीनंतर बाळापेक्षा जास्त वजनाचे काही उचलायचे असल्यास नवर्‍याचा उपयोग करावा.
पण फक्त प्रसूतीनंतरच का? नवरा हा जन्मभर ऑफिशियल हमाल कम ड्रायव्हर असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाडी (स्कूटर, चारचाकी इ.) हे क्लिष्ट यंत्र आहे. अशी क्लिष्ट यंत्र चालवण्यासाठी जी बौद्धीक क्षमता लागते, ती स्त्रियांकडे नसल्यामुळे अशी उच्च, बौद्धीक कामं पुरूषांनी करावीत. साधी सोपी कामं, उदाहरणार्थ पैसे कुठे गुंतवावे, कोणता टीव्ही विकत घ्यावा, डीव्हीडी प्लेयरला वाय-फाय सुविधा बनवलेली असावी का यूएसबीमधून वायफाय येईल असा प्लेयर घ्यावा अशी कमी किंवा निम्नबुद्धीची कामं स्त्रियांनी करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उपाय तर ठिकच आहेत, पण पाठदुखीची मुळ कारणे कोणती? जर कळाली तर उपाययोजना करणे सोपे होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

असला एक खेळ आम्ही अन तुम्ही लहानपणापासून खेळत असू.
तू डॉक्टर. मी पेशंट. मग तपासणे. इंजेक्शन देणे वै. मग मोठ्यांनी बाळाचे पाय पाळण्यात पहाणे इत्यादि.
ही सवय, -डॉक्टर डॉक्टर खेळण्याची- जात नाही. मरेपर्यंत एकमेकांना औषधे सांगणे हा एक छंद लोकांना असतो. विनाकारण. त्यातलं काही समजो वा ना समजो.
साधी स्कूटर बिघडली, किक मारून सुरू होत नसेल तर सल्ले देणारे १४ लोक रस्त्यात जमा होतात. थोडं तसलंच काहीसं.
ते शरीर नामक यंत्र बिघडलंय.
१४ लोक किक मारणे, चोक देणे, इ. उद्योग करताहेत. हे सगळे "टाईम टेस्टेड" उपाय आहेत. आजीबाईच्या बटव्यातही तसंच आहे. "टाईम टेस्टेड" उपाय.
पण. १४ वेळा, १४ लोकांनी किका मारून १२ वेळा गाडी ग्यारेजला न्यावी लागते.
एक हातरुमाल विकत घेताना आपण ५ दुकाने शोधतो, तसे ५ ग्यारेज शोधून झालेले असतात.
तर मला पडलेला प्रश्नः
पाठ, पोट, हात, बोट किंवा काहीही दुखत असताना -या सगळ्या हातरुमालापेक्षा जास्त किंमती वस्तू आहेत हे 'कंटेन्शन'- डॉक्टरा ऐवजी बटवे का शोधतात लोक????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बरेच दिवस बाजूला ठेवल्यामुळे स्कूटर सुरू होत नसेल तर किक मारून बॅटरी चार्ज केली की पुरतं हे बर्‍याच लोकांना माहित असतं, म्हणून!
"एवढंसं काही झालं की माझ्याकडे येऊ नको", किंवा "घसा दुखतोय तर आधी गरम पाणी पिऊन किती फरक पडतोय ते पहा!" असं काहीसं लहानपणीच डॉक्टरांनी अनेकदा ऐकवलेलं असतं, म्हणून!
तगून रहाण्याच्या, टिकून रहाण्याच्या शरीराच्या नैसर्गिक क्षमतेचा लहानपणासून अनुभव आलेला असतो, म्हणून!

... जेव्हा हे दुखणं एवढंसं नाही, शरीर यात टिकाव धरू शकत नाही, कितीही किक मारून बॅटरी चार्ज होत नाही हे लक्षात येतं तेव्हा आपोआप तज्ञाकडे जाणं होतंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाठ, पोट, हात, बोट किंवा काहीही दुखत असताना -या सगळ्या हातरुमालापेक्षा जास्त किंमती वस्तू आहेत हे 'कंटेन्शन'- डॉक्टरा ऐवजी बटवे का शोधतात लोक????

कारण स्वस्त अन खात्रीशीर उपाय असतात अन गोळ्यांचं गिनिपीग होणं वाचतं म्हणुन सुद्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असला एक खेळ आम्ही अन तुम्ही लहानपणापासून खेळत असू.
तू डॉक्टर. मी पेशंट. मग तपासणे. इंजेक्शन देणे वै. मग मोठ्यांनी बाळाचे पाय पाळण्यात पहाणे इत्यादि.

आमच्या चिरंजीवांच्या बाललीला पाहून आम्हीही असेच 'हा मोठा झाल्यावर (१) डॉक्टर, (२) न्हावी, (३) शिक्षक, (४) कुत्रा आणि (५) राजकारणी* यांपैकी काहीतरी होणार - नक्की!' हे भाकीत वर्तवले होते.

*(कारण चिरंजीव दिसतील ती नाणी तोंडात टाकत असत, म्हणून. सुदैवाने पुढे ती फेज़ गेली.)

पाहू या कितपत खरे ठरते ते. (अजून बरीच वर्षे आहेत म्हणा त्याला.)

(बादवे, आम्ही अन तुम्ही? तू डॉक्टर मी पेशंट? आठवत नाही बॉ.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किती वेळा भाकीतं बदलणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाकीत बदललेले नाही. (फक्त, आजूबाजूचे अलंकरण बदललेले आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलंकरण बदलून अनर्थ झाला तर? वरती तुम्हीच नाही का तक्रार केलेली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अलंकरणातून अर्थ केवळ अधोरेखित (अत एव सुस्पष्ट) होण्यापलीकडे काहीही फेरफार होणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे.

याहीउपर अनर्थ होत असल्याचे जाणवत असल्यास झालेला अनर्थ दाखवून द्यावा. अन्यथा आरोप तथा निषेध आम्हांस स्वीकारार्ह नाही.


अतिअवांतरः या निमित्ताने, एका प्रचलित वाक्प्रचाराची सुचलेली एक नवीन सुधारित आवृत्ती रसिकांच्या सेवेसि सादर करण्याचा मोह अनावर होतो. सदर आवृत्ती ही फक्त रसिकांच्या आस्वादासाठी पेश-ए-ख़िदमत केलेली असून, आपणांस वा अन्य कोणासही ती उद्देशून नाही, तिच्या सादरीकरणातून आपल्या वा अन्य कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही, केवळ या प्रतिसादाच्या अनुषंगाने आठवल्याने येथे ती मांडलेली आहे, याची कृपया आपण व अन्य सर्वांनी नोंद घ्यावी, ही कळकळीची विनंती. तरीही, आत्यंतिक दक्षता म्हणून, याहीउपर कोणाच्या भावना यातून दुखावल्यास आगाऊ क्षमाप्रार्थना करू इच्छितो.

या नव्या आवृत्तीची प्रेरणा एका ऐतिहासिक थोर समाजसुधारकाच्या एका जुन्या प्रबोधनपर लेखात उल्लेखिलेल्या एका त्रयस्थाच्या उक्तीच्या आजही लोकप्रिय अशा उद्धरणातून घेतलेली आहे. त्या उक्तीतील विचारधारेच्या आधारे उपरोल्लेखित वाक्प्रचारातील आशयास त्याच्या तार्किक अंतापर्यंत नेऊन निर्माण होणार्‍या उत्पादास औपचारिक भाषेच्या वेष्टनातून सादर करण्याचा हा खटाटोप आहे.

यामागील प्रेरणा असलेल्या उक्तीतील भाषा तथा विचारधारा ही आधुनिक आंतरजालीय शिष्टाचाराच्या नियमांप्रमाणे केवळ सभ्यच ('पार्लमेंटरी' अशा अर्थाने) नसून प्रशंसनीयही आहे, असे खात्रीलायकरीत्या कळते. सबब, तीच भाषा आणि तीच विचारधारा वापरून सादर केलेल्या आमच्याही कृतीस तोच निकष लावला जाऊन, आमचीही कृती तितकीच सभ्य मानली जाईल, इतकेच नव्हे, तर रसिकांच्याही नजरेत ती किमान तितकीच प्रशंसनीय ठरेल, अशी आमची माफक अपेक्षा आणि आशा आहे. अर्थात, तशी ती न ठरल्यास चूभूद्याघ्या; रसिकांचा निर्णय आम्ही फायनल मानतो.

'कृपया तीर्थरूपांस सादर करावे, अन्यथा मातु:श्रींस भटाकडे*पाठवण्याची व्यवस्था करावी', असा तो नवीन वाक्प्रचार आहे.**

*येथे 'भट' या शब्दाचा अर्थ 'पुरोहित' - पक्षी: 'पौरोहित्य करणारी व्यक्ती' - असा घेतला जावा, ''भट' अथवा 'पुरोहित' असे आडनाव असलेली व्यक्ती' असा घेतला जाऊ नये, असे केवळ अनर्थभयास्तव स्पष्ट करणे प्राप्त आहे. अन्यथा, 'I don't owe the world an explanation' या आमच्या ब्रीदाशी आम्ही ठाम आहोत.

**प्रस्तुत नवीन वाक्प्रचार हा प्रशंसनीय - किवा किमानपक्षी सभ्य अथवा स्वीकारार्ह - म्हणून रसिकमान्यताप्राप्त झाल्यास, पुढेमागे एखाद्या वादात आम्हीही तो कोणा ना कोणाच्या विरुद्ध वापरावा म्हणतो. तेव्हा, रसिकांनी कृपया आपला निर्णय शक्य तितक्या लवकर कळवावा, ही नम्र विनंती, आणि आगाऊ धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंतर वाद घालायला आवडले असते. पण ...

या नव्या आवृत्तीची प्रेरणा एका ऐतिहासिक थोर समाजसुधारकाच्या एका जुन्या प्रबोधनपर लेखात उल्लेखिलेल्या एका त्रयस्थाच्या उक्तीच्या आजही लोकप्रिय अशा उद्धरणातून घेतलेली आहे. त्या उक्तीतील विचारधारेच्या आधारे उपरोल्लेखित वाक्प्रचारातील आशयास त्याच्या तार्किक अंतापर्यंत नेऊन निर्माण होणार्‍या उत्पादास औपचारिक भाषेच्या वेष्टनातून सादर करण्याचा हा खटाटोप आहे.

'न'वी बाजू यांच्या शब्दवैचित्र्यात अडकून रस्ता हरवल्यामुळे शेपूट घालण्यात आलेली आहे.

कुठून आणता हो एवढे शब्द आणि अशी वाक्यरचना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेपूट घालण्यात,
घालून देण्यात,
तसेच फाट्यावर मारण्यातही येते..
तेच करण्यात आलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अदिती आणि 'न'वी बाजू यांची बोधप्रद चर्चा वाचून (म्हणजे मूळ लेखापेक्षा १० पट मोठ्या प्रतिक्रिया) ज्ञानात खूऽप भर पडली आहे.

'न'वी बाजू यांचे लिखाण पाहता मला मिसळपाव संस्थळावरच्या एका आवडत्या आयडीची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंगा या आयडीची आठवण झाली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

म्हणूनच फाट्यावर मारण्यात आलेले आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

म्हणूनच फाट्यावर मारण्यात आलेले आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धाग्यातील मजकूर वाचुन "बटवा" कुठे आहे हे समजले नाही म्हणून प्रतिक्रिया वाचायला घेतल्या. प्रतिक्रिया वाचून इथले कंपू लगेच लक्षात आले पण धाग्याचे प्रयोजन गुलदस्त्यातच राहीले. असो... "पैसा" यांनी म्हटल्याप्रमाणे ज्ञानात प्रचंड भर पडली आहे. तेव्हां पु. धा. शु.
(आज धागा काढायचाच अशी सुपारी घेऊन काढल्यासारखा वाटतोय. SmileSmile )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझे काही उपाय

पाठीचा वरचा भाग दुखतो तेव्हा भुजंगासनासारखी वरचा भाग मागे वाकवण्याची आसनं अतिशय उपयुक्त असतात.
माझी पाठ खालच्या बाजूला दुखते. त्यावेळी मात्र पुढे वाकल्यानेच मला बरं वाटतं.
कायम पाय आवळणारी उंच टाचांची पादत्राणं घातल्यानेही पाठीवर ताण येऊ शकतो.
गरम पाण्याच्या टबात बसणं, शेकायच्या पिशवीने पाठ शेकणं इ उपायांनी तात्पुरता आराम मिळू शकतो. गरम शेकापेक्षा अशा वेळी गार शेक जास्त आतपर्यंत वेदना शमवतो. पण वर्चेवर पाठ दुखात असेल तर मुळातलं कारण शोधून उपाय करणं इष्ट.
बसून पुष्कळ वेळ काम करताना खुर्चीची उंची, पाठीच्या आधाराची उंची इ आपल्या शरीरानुरूप लावून घेतलेलं नसेल तर त्यानेही पाठदुखी उद्बवते.
बहुतेक वेळा उभं राहण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे पाठदुखी सुरू होते. पाठ, पोट आणि बाजूंचे स्नायू मिळून (कॉर्सेट्प्रमाणे) धडाला आधार देत असतात. व्यायाम सुटला, रोजचं चलनवलनही कमी झालं की एकंदरीतच शरीरातल्या स्नायूंची शक्ती घटू लागते. हात इ. चे स्नायू कमजोर झाल्याच जितक्या सहज लक्षात येतं तितकं पोटाचे, पाठीचे स्नायू कमजोर झाल्याचं येत नाही. त्यातून चुकीच्या प्द्धतीने बसणं, उभं राहणं सुरू होतं. म्हणजे, बसून काम करताना वरची पाठ खूप वाकवून बसणं किंवा खालच्या पाठीचा बाक जास्त वाढवून उभं राहणं इत्यादी. तसंच पोट सुटल्यामुळे आणि/ अथवा पोटाचे स्नायूही कमजोर झाल्यामुळे पोट पुढे काढून उभं राहण्याची सवय लागते. त्याचा पाठीवर ताण पडतो. पाठदुखीसाठी पाठीबरोबर्च पोट आणि बाजूंच्या स्नायूंचे व्यायाम करणही गरजेचं असतं.
तूर्तास एवढच. बाकी नंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला. वाक्यावाक्याशी सहमत आहे. बरेचदा माझ्या पाठीचा खालचा भाग दुखतो तेव्हा पुढील - आसन ज्याला "मार्जारासन" म्हणतात ते खरच फार उपयोगी पडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लिंकवरचं टेक्स्ट पूर्ण वाचलं नाही. पण मार्जारासनाच्या दोन स्थिती आहेत. चित्रात आहे ती एक आहे. दुसरी स्थिती पाठीचा कणा आतल्या बाजूला ताणण्याची स्थिती असते, बाकी असंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो, कॅट अँड कॅमल म्हणजे आधी कॅट अन मग कॅमल असा संच ५ वेळा करायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. कालच ऑफीसमधून नेट चाळले - मुख्यत्वेकरून माझी समस्या तरी लक्षात आली. पोटावर झोपल्याने डोक्याची पोझिशन खूप काळ कण्याला तिरकी अशी राहून पाठदुखी संभवते असे नमूद केले आहे. हे अक्षरक्षः १०१% खरे आहे. तेव्हा कुशीवर अथवा पाठीवर झोपावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम हो शिल्पा.
अवांतर- वैद्य रावसाहेब बडवे तुझे नातेवाईक का गं? आमच्यावेळी कोणालाही दुखले,खुपले की सल्ला द्यायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0