वृत्त संग्रह

दोधक!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

उल्लेखानेच दिल वृत्त वृत्त हो गया. आपटे संस्कृत डिक्शनरी पार्ट २ च्या परिशिष्टात अशी चिकार वृत्ते दिलेली आहेत. वृत्तदर्पणाशी परिचय नंतर झाला. तोवर ही अशी एग्झॉटिक वृत्ते त्यातच पाहून ठाऊक होती. नेहमीचे अनुष्टुप, इंद्रवज्रा-उपेंद्रवज्रा-उपजाति, इंद्रवंशा, रथोद्धता, वंशस्थ, स्रग्विणी, भुजंगप्रयात, गीति, शार्दूलविक्रीडित, मंदाक्रांता, वसंततिलका, मंदारमाला, सुमंदारमाला, पृथ्वी, इ. नंतर बोर होत असे. त्यावर उतारा म्हणून दोधक, तोटक, स्वागता, कामदा, श्येनिका, यूथिका, मेघविस्फूर्जिता, प्रमाणिका, समानिका, चामर, पंचचामर, लीलाखेल, शशिकला, झालेच तर प्रहर्षिणी, मंजुभाषिणी, हरिणी, ही समवृत्ते, झालंच तर वैतालीय (हे नक्की अर्धसमवृत्त आहे का? चेकवले पाहिजे.) पुष्पिताग्रा वगैरे अर्धसमवृत्ते, आणि आपटे डिक्शनरीत दिलेले एकच विषमवृत्त पाहून लय भारी वाटायचे. त्यातली वृत्तलक्षणेही संस्कृतात असल्याने खूप मजा येत असे, उदा. तोटकाच्या उदाहरणार्थाची ओळ- 'वद तोटकमब्धिसकारयुतम्|' उगीचच लक्षात राहिलेली आहे. या दुर्मिळ वृत्तांच्या चाली माहिती नसल्याने त्यांना स्वतःच चाली लावीत असे. झालंच तर सर्वांत मोठे वृत्त म्हणजे 'दंडक' तेही वाचून उगीचच भारी वाटत असे. गेले ते दिन........

पुढे अनेक वर्षांनी अन्य भाषांतील छंदःशास्त्रादि गोष्टींबद्दल वाचन करीत असताना येल युनिव्हर्सिटीतील अश्विनी देव यांचा एक पेपर हाती लागला. आणि इतके दिवस जे अप्रत्यक्षपणे जाणवत होते ते आणि नेमके तेच त्याच नीट विवेचन करून सांगितले असल्यामुळे खूप बरे वाटले.

===

व्यवस्थापक: यानिमित्ताने विविध प्रकारची वृत्त, त्यांच्या मराठी व/वा संस्कृत लक्षणांच्या ओळी, मराठी काव्यांत त्याचा झालेला वापर, अल्पपरिचित वृत्तांच्या सदस्यांनी लावलेल्या चाली इत्यादी वृत्तांशी संबांधित चर्चा करण्यासाठी/गप्पा मारण्यासाठी धागा वेगळा काढत आहोत

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

येस आता येतय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गझलेतल्या शब्दांचे मराठी उच्चारांनुसार संधी केले (गझल्सळ्सळूदे वगैरे) तर बसेल हे भुजंगप्रयातात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लगावली>>>>>रोफल ROFL ROFL ROFL

कुणाला नि कुठे लगावली? ROFL

बाकी भुजंगप्रयात बिनचूक आहे. फक्त

अता दोर उरला कुणाच्यान हाती
भरारे गझल ही पतंगाप्रमाणे

अशा काव्यपंक्तींमध्ये पाहिले तर प्यूरिस्ट लोक अक्षरे मोजतील. डिस्टिंक्ट फोनीम्स मोजणार नाहीत. यद्यपि मराठीचे उच्चारशास्त्र पाहिले तर त्याप्रमाणे ते बसायला हवे. असे असूनही प्यूरिस्ट लोकांकडून शिकल्यामुळे भुजंगप्रयात रचताना असे रचवत नाही. फोनीम्स आणि अक्षरे दोन्हीही एकसमान संख्येची असावीत असेच अजूनही वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL ROFL ROFL

धन्यवाद सार ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यास 'गलात्कार' असेही संबोधता येईल, पाहिजे तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो ROFL ROFL

इंडीड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने