चंदेरी:मियाजींच्या घरी जेवणाचा किस्सा

गेल्या वर्षी चंदेरीला गेलो होतो. दुपारच्या वेळी किल्याच्या भिंतीवर पत्रावळ ठेऊन जेवत असताना, खाली दूरवर पसरलेल्या चंदेरी नगरावर नजर केली. दूर कुठून ढोल ताश्यांचा आवाज येत होता, कुठली तरी मिरवणूक निघत होती. आपल्या मेहुणीला विचारल्यास कळले, आज रामापीरची जयंती आहे. रामापीरची शोभायात्रा निघत असेल. हिंदू- मुसलमान दोन्ही धर्माचे लोक रामा पीरला मानतात. हिंद-मुसलमान, सर्वजातीय लोक या शोभा यात्रेत भाग घेतात. चंदेरीची दुकाने हि आज बंद असतात. सकाळी जेवण बरोबर घेऊन अशोकनगरहून का निघालो होतो ते हि कळले.

(किल्याच्या भिंतीवरून दिसणारे चंदेरी शहर)
चंदेरी नगर
जेवत असताना, वडिलांनी सांगितलेला एक जुना किस्सा आठवला. १९६०-६२च्या दरम्यानची गोष्ट. वडील मुंबईच्या एका रंगरसायन कंपनीचे विक्रय प्रतिनिधी म्हणून दिल्लीत कार्यरत होते. चंदेरीच्या साड्या प्रसिद्ध आहेतच. पण तिथे सद्या रंगण्याचे कारखाने हि भरपूर आहेत. १९६०च्या दशकात जुने रंग सोडून नवीन रासायनिक रंगांचा वापर तेथे हि सुरु झाला होता. त्या बरोबर काही समस्या हि निर्माण झाल्या होत्या. कुठलीही नवीन तकनीक वापरताना सुरवातीला समस्या या येतातच. ऑफिसने मुंबई वरून एक तकनीकी व्यक्ती दिल्लीला पाठवला. त्याच्या सोबत वडील चंदेरीला पोहचले. तेथील डीलरच्या दुकानात तेथील रंगारी जमले, त्यांच्या सोबत चर्चा झाली. दुसर्या दिवशी पहाटे एका बुजुर्ग मियांजींच्या कारखान्यात प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले. मियांजींच्या राहत्या घराच्या एक बाजुला त्यांच्या कपडे रंगण्याचा छोटेखानी कारखाना होता. पाहुणे घरी आले, की त्यांचे यथोचित स्वागत झाले पाहिजे, हि भारतीय परंपरा आहेच. मियांजी म्हणाले, कल आ ही रहे हो तो दुपहर का भोजन हमारे घर हो जाय. वडिलांनी उत्तर दिले, काही हरकत नाही, पण जेवायला शाकाहारी पदार्थ ठेवा, कारण आम्ही शाकाहारी आहोत. मियांजी उद्गारले, काळजी करू नका, मी स्वत: जातीने लक्ष देईन.

त्या दिवशी रात्री, मुंबईहून आलेल्या तकनीशियन ने विचारले, पटाईत साहेब आपण जेवणाचे निमंत्रण स्वीकारले आहे, पण हे लोक तर मांस इत्यादी खाणारे. वडील म्हणाले, फिरतीवर असताना आपण ढाब्यावर जेवतो. अन्न कस आणि कश्यारीतीने बनविले आहे, आपल्याला माहित नसते. केवळ विश्वासावर आपण ढाब्यात जेवतो. इथे तर घर आहे, काळजी कशाला, भांडे चक्क धुऊन-पुसून स्वैपाक करतील हे लोक. कुठला हि अरुचीकर वास येणार नाही याची काळजी घेतील.

दुसर्या दिवशी काम संपल्यावर दुपारी एक दीड वाजता. मियांजींच्या घरी पोहचले. त्या काळच्या हिशोबाने घर कौलारू आणि मातीचे होते. स्वैपाकघरात ताटे मांडली होती. स्वैपाकघर हि व्यवस्थित शेणाने सारवलेले दिसत होते. चंदेरी, शिंद्यांच्या अधिकारात असल्यामुळे मराठी जेवण संस्कृतीचा प्रभाव या भागावर अजूनही आहे. अशोक नगरहून चंदेरी कडे जाताना सकाळच्या वेळी रस्त्यात ठेल्यांवर बटाटा पोहे विकताना दुकानदार दिसले होते. मियांजींच्या घरी हि वडिलांना हा प्रभाव जाणविला. वरण-भात, पापड, लोणचे, बटाट्याची सूखी भाजी आणि सेंवैया खीर हा मेनू होता. चुल्हयावर कढई, ठेवलेली होती, गर्मागर्म पुर्या तळून म्हातारी अम्मी वाढणार होती.

ताटावर बसल्यावर वडिलांना एक जाणवले. पितळेचे ताट, वाटी, पेला, चुल्ह्यावर ठेवलेली पितळी कढई सर्व भांडे नवीन होते. वडिलांनी सहज विचारले, मियांजी, भांडे नवीन विकत घेतलली आहेत का. हां, आप लोक आने वाले थे, इसलिए अम्मीजीने कहा, नए बर्तन ले आओ. मियांजीचे उत्तर ऐकून, वडिलांना कसे-कसे वाटले, काहीवेळ त्याना काय बोलावे काही सुचले नाही. थोड्यावेळ विचार करून ते म्हणाले, अम्मीजी इसकी क्या जरुरत थी. म्हातारी अम्मीने लगेच उत्तर दिले, कैसे जरुरत नहीं थी. बामन आदमी को घर पर खाने को बुलाया है. बर्तन कितना भी मांजो कहीं न कहीं बास रही जाती है. ऐसे बर्तन में खाना खिलाकर आपका धर्मभ्रष्ट थोड़े ना करना है. फिर मुझे भी तो अल्लाताला को जवाब देना है. त्या भोळ्या अशिक्षित म्हातारी अम्मीचे उत्तर ऐकून, वडिलांनी डोळ्यातून ओघळणार्या अश्रुंना बामुश्कील थांबविले. दुसर्यांच्या धार्मिक विचारांबाबत किती काळजी होती तिला. त्या दिवशीच्या जेवणाची गोडी काही औरच होती.

२००७ मध्ये, वृद्धावस्था आणि आजारी असताना, वडिलांनी हा किस्सा सांगितला होता. जवळपास पन्नास वर्षानंतर हि त्यांच्या जिभेवर अम्मीच्या हातच्या जेवणाची चव होती. त्या दिवशी रात्री घरी सेंवैया खीर केली हे सांगणे नकोच.

वडील नेहमी म्हणायचे, तो काळ वेगळा होता. लोक ढोंगी नव्हते. त्या काळी लोक, अलग-अलग थाळीत जेवत होते, पिण्याचे पेले हि वेगळे होते. पण एका दुसर्याच्या प्रती प्रेम होत. दुसर्याच्या भावनांचा सम्मान कसा करायचा, हे अडाणी लोकांना हि कळायचे. सांगायचे नको, त्या नंतर २-३ वेळा चंदेरी जाण्याचा वडिलांना योग आला. प्रत्येक वेळी अम्मीच्या हातचे जेवायला, ते हक्काने जात होते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

आत्ता हे वाचत होतो तर या लेखाची आठवण झाली

अस्पृश्यतेच्या संदर्भात सुभेदारसाहेबांची अनाचक गाठ पडली. 'गुड इव्हिनिंग सुभेदार साहेब' म्हणून सलाम केला. सुभेदारसाहेबांनी 'गुड इव्हनिंग' करुन शेकहँडसाठी हात पुढे केला आणि मीही झटकन त्या हाताचा सन्मान केला नि संभाषणाचा पहिला धागा पकडला.''

शेवटी घराकडे नमस्कार करुन चालताना सुभेदारीण म्हणाल्या, ''आमच्या घरी या की एकदा, असे म्हणायची आम्हाला सोय नाही अन् विचारलंच तसं तर तुम्ही थोडेच येणार?''
प्रबोधनकारांनी खाडकन उत्तर दिले, का नाही येणार? आत्ता येतो तुमच्या घरी. काय आहे त्यात एवढे? पण ही आहे माझ्या चहाची वेळ. द्याल मला तुम्ही चहा?

सुभेदाराची सून हळूच म्हणाली, 'महाराच्या हातचा चहा तुम्ही कसा घ्याल? बाटाल ना? वाळीत टाकील जात तुमची,’

त्यावर 'झक मारते जात नि पात. आज घेणारच मी तुमच्या घरी चहा.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> 'झक मारते जात नि पात. आज घेणारच मी तुमच्या घरी चहा.' <<

'सामान्य माणसांच्या गोष्टी' आणि 'इमानाची इज्जत' वगैरेंनी पावन झालेल्या ह्या धाग्यावर तुम्ही चक्क असल्या गोष्टी फाट्यावर मारणाऱ्या प्रबोधनकारांचं कौतुक करताय? हे अस्थानी तर आहेच आणि शिवाय अब्रह्मण्यम् ते वेगळंच! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आमचे वडील फिरतीवर राहणारे. बाहेर जे काही वेज म्हणून धाब्यांवर मिळते, वेज समजून गटकणारे, पण अम्मी ईमान वाली. आता ईमान म्हणजे काय.

प्रतिसाद देणारे, बहुतेक लोक जुन्या दिल्ली सारख्या मिश्र वस्तीत राहिलेले नाही. एक लक्ष्यात ठेवा आम मुसलमान धर्मनिष्ठ असतो. रोज एकवेळा तरी तो नमाज पढतो. त्याच बरोबर तो दुसर्यांच्या विश्वासांचा हि सम्मान करतो. समजा मी ब्राह्मण आहे, नॉनव्हेज न खाणारा. ( जो नॉनव्हेज खात नाही तोच खरा पंडित). आपल्या मुसलमान मित्राला घरी बोलवून त्याच्या साठी नॉनव्हेज करेल. परिणाम, (या ब्राह्मणाने नॉनव्हेज घरात बनवून आपला ईमान सोडला, फक्त एका माणसाला खुश करण्यासाठी). माझ्यावरून त्याचा विश्वास उडून जाईल. त्या पेक्षा माझ्या घरी मी त्याला वेज पदार्थ खाऊ घालेल, तर मी आपल्या ईमानवर कायम राहणारा व्यक्ती आहे, त्याचा विश्वास माझ्यावर वाढेल). खरा मुसलमान अर्थात ईमान पालन करणारा, कधीच वेज खाणार्या हिंदूला नॉनव्हेज खाण्यासाठी म्हणणार नाही. जाउद्या तुम्हाला सामान्य माणसांच्या या गोष्टी समजणार नाही. त्या साठी अश्या भागांत राहणे गरजेचे व मुसलमान लोकांशी संबंध असणे हि गरजेचे. हे कळले तर समजेल त्या अम्मीनी नवीन भांडे का घेतले. कारण तिला स्वत:चा ईमान कायम राखून दुसर्याच्या ईमानची इज्जत करायची होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जो नॉनव्हेज खात नाही तोच खरा पंडित).

पटाईत काका , तुम्हाला आ बैल मुझे मार असे वागायला फार आवडते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सहमत, आमच्या घरी मुसलमान मोलकरीण येत असे तिने एकदा मटन रस्सा- राईस असे वाढलेले- ते अर्थात निषिद्ध नसल्याची खात्री झाल्यावरच.

माझ्या वडिलांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहान गावात गेले, तिथे ब्राह्मणांची घरे खूप कमी होती. बहुतेक सगळे मराठाच. ते अनेकदा घरी केलेले चिकन/मटन आणून देत असत असे वडील सांगतात.

अर्थात अशी उदाहरणे अपवादात्मकच मानायला हवीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जो नॉनव्हेज खात नाही तोच खरा पंडित).

कळफलकाच्या एका फटक्यात (१) सारस्वत ब्राह्मण, (२) बंगाली ब्राह्मण (आणि बहुधा (३) कश्मीरी 'पंडित'सुद्धा? चूभूद्याघ्या.) यांचे ब्राह्मणत्व खारिज केलेत.

ह्याटट्रिक!!! मान गये, पंडितजी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यादीत ४) उडिया आणि ५) असमिया ब्राह्मणांचाही समावेश करायला हरकत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय चावटपणा चाललाय लोकांचा!
पटाईतकाका, मला गोष्ट खूप खूप आवडली.

मांसाहारी लोकांच्या घरातही कुणी शाकाहारी/ माळकरी वगैरे असतील तर त्यांची भांडी वेगळी ठेवलेली असतात.

माझ्या माहेरी तर आम्ही कट्टर मिश्राहारी असूनही वरणाच्या भांड्यात पापलेटची आमटी करत नाही किंवा उलटही.

(वास लागतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असंच म्हणतो.एका व्यक्तीला आलेल्या अनुभवाची हृद्य कथा आहे. एका समाजातल्या व्यक्तीने दुसर्या समाजातल्या व्यक्तीच्या भावनांची कदर करण्याचा प्रयत्न केला. प्रतिसादांतला टीकेचा स्वर योग्य वाटला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहेरी तर आम्ही कट्टर मिश्राहारी असूनही वरणाच्या भांड्यात पापलेटची आमटी करत नाही किंवा उलटही.
(वास लागतो.)

चांगले आहे. मिश्राहार्‍यांमध्ये अशी (बोले तो, प्रामाणिक) माणसे कमी आहेत. (सर्टिफिकेट.) Wink

("स्वातंत्र्यपूर्व काळात...")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(प्रतिसाद योग्य ठिकाणी हलविला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(प्रतिसाद योग्य ठिकाणी हलविला आहे.)

कुणी व कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नबांनी फाट्यावर हलवला आहे. Wink
नबा, ह घ्या हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने