सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग २)

-------------
भाग १ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
-------------
क्लासला दिवाळीची सुट्टी सलग पाच दिवस दिली होती. घरी निवांत होतो. तीन चार नवीन पुस्तकं आणून ठेवली होती. त्यामुळे खुशीत होतो. दिवाळीचा फराळ करत पुस्तक वाचत बसलो होतो. ही शेजारी येउन बसली आणि अगदी हलक्या सुरात लाडीगोडीने बोलू लागली. नेहमीच्या तिच्या तारसप्तकाच्या सुराची सवय असलेल्या मला या हलक्या आवाजाने इतका धक्का बसला की मी जेंव्हा त्यातून सावरलो तोपर्यंत तिने माझ्याकडून गोव्याच्या ललित रिसोर्टच बुकिंग करून घेतलं होतं.

नाश्ता आमच्या पॅकेजमध्ये असल्याने सकाळी सातला त्यांचं restaurant सुरु व्हायच्या आधीच दरवाजाबाहेर उभ राहण्याचा बेत मी केला होता. पण हिने आणि माझ्या दोन सुपुत्रांनी माझी कल्पना ऐकून खेड्यातल्या येड्याकडे पहावं तशी प्रतिक्रिया दिल्याने मी माघार घेतली आणि सात पाचला आत जाण्याचे ठरवले. सर्व पंचतारांकित हॉटेलात असतात तसा तिथला नाश्ता अगदी भरगच्च होता.

आमची ही, ऋजुता दिवेकर वाचते. तिने सांगितलं की ऋजुता म्हणते, "सणासुदीला सर्व खा. मनात कुठलीही अपराधी भावना ठेवू नका". इतके ऐकताच, ऋजुता खाण्याबद्दल पुढे काय बोलते ते ऐकायला न थांबता मी सरळ आपली प्लेट घेऊन काउन्टर पर्यंत पोहोचलो सुद्धा. तिथून निघालो तो थेट साडेदहा वाजता. आणि मग ऋजुताला वाईट वाटू नये म्हणून हाच शिरस्ता, मी पुढचे सगळे दिवस पाळला.

अंमळ जास्त नाश्ता झाल्यामुळे जरा डोळा लावून पडतो न पडतो तोच पोहायला जाऊन आलेली मुलं, 'बाबा भूक लागली' असा घोषा लावायची. आणि मग इतक्या मोठ्या हॉटेलात त्यांना एकटं कसं सोडणार म्हणून मग त्यांच्याबरोबर जेवायला जाणं हे माझं एक रोजचंच काम झालं. माझी पोरं पण अशी बिलंदर की तिथे पाच restaurant आहेत, तर रोज वेगवेगळ्या ठिकाणी जायचा हट्ट धरायची. आता सुट्टीवर त्याचं मन कसं मोडायचं? म्हणून नाइलाजाने मला त्यांच्याबरोबर जावं लागत होतं. पानात काही पडू नये हा नियम मी जरी कटाक्षाने पळत असलो तरी अजून मुलांच्या ते लक्षात आलेले नाही त्यामुळे त्यांच्या पानात राहणारे पदार्थ देखील मलाच संपवावे लागत होते.

त्याशिवाय स्विमिंग पूलच्या तीरावर बसलो असताना तिथल्या अर्धवस्त्रांकित गौरकाय सुन्दरींकडे टक लावून बघणे चांगले दिसणार नाही म्हणून आपल्याला ज्याचे दर्शन आवडते आणि आपण त्याच्याकडे पहात असलो की बायको पण आपल्या खाली मान घालून बसलेल्या नवऱ्यावर खूष असते, अश्या माझ्या आवडीच्या विविध खाद्य पदार्थांचा समाचार घेत मी दोन जेवणातला वेळ घालवला.

या सर्वातून मला पुन्हा एक जोरदार धक्का दिला तो माझ्या पोरांनीच. शेवटच्या दिवशी ही स्पा मध्ये गेली असताना मी त्यांच्या तावडीत सापडलो आणि हॉटेलचा फेरफटका मारायचे ठरवले. बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, खुल्या आकाशाखाली मांडलेला अर्धा पुरुष उंचीच्या सोंगट्यांचा बुद्धीबळाचा डाव वगैरे बघत आमची यात्रा हॉटेलच्या आत असलेल्या जिम पर्यंत गेली. मोठा मुलगा आत शिरला म्हणून मी आणि धाकटा पण आत शिरलो. तिथली सगळी उपकरणे आणि मोठमोठ्या सौष्ठवपटूंचे फोटो बघून फार कौतुक वाटले. "काय बुवा या माणसांची दुर्दम्य इच्छाशक्ती, काय ती त्यांची मेहनत आणि काय ती त्यांची देहयष्टी !!" असे विचार माझ्या मनात येत होते. माझा स्वभावच असा आहे. कुणाचं काही चांगलं बघितलं की मला उगीच भरून येतं, मन तृप्त होतं, दयाळू देवावरचा विश्वास वाढतो, सगळीकडे चांगलं होतंय या आनंदाने मी प्रचंड खूष होऊन जातो.

त्याच खुषीत, "तुम्ही पण असाच व्यायाम करून चांगलं शरीर कमवा. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं. लोकमान्य टिळकांनी तर एक वर्ष शाळा सोडून प्रथम शरीराकडे लक्ष दिले होते. तुम्ही शाळा नका सोडू पण भरपूर व्यायाम करा"… वगैरे उपदेश मुलांना करायचे ठरवले आणि त्यांच्या मागे धावत गेलो. तर मोठा धाकट्याला म्हणत होता, " चल हट. बाबाला नाही येणार करता. त्याने तर फेब्रुवारी मध्ये घेतलेली सायकल ऑगस्ट मध्ये विकून पण टाकली. त्याचं पोट मोठं आहे. त्याला जिम पण नाही करता येणार."

तिथे जवळपास असलेल्या लोकांना ही माझीच मुले आहेत हे कळू न देता, शक्य तितके पोट आत घेऊन, त्यांच्या मागे मागे चालत मी तिथून बाहेर पडलो.

------------
भाग १ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
------------

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

संपूर्ण लेखांत 'अस्मादिक' हा शब्द न वापरल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

दि पहिला की दुसरा या गोंधळात होतो म्हणून नाही वापरला.... आता सापडलाय.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

______/\_______

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मित्रों....
और लिखू के नही?
आप पढोगे या नही?
तो बोलो
ऐसी अक्षरे की...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिहा की. बोलके आय डी प्रतिसाद देतील पण वाचतील सगळेच. बिलीव्ह मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांनी नमो म्हटलं म्हणून मला पंप्र ची आठवण झाली... ऐसी च्या जाणकार सभासदांबद्दलचा माझा विश्वास वाढलाय आताशा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोरे सरकार, मी तर असे ऐकले होते की लेखक/कविच्या आत कुठेतरी (?) काहीतरी उचंबळत वगैरे असते. ते कागदावर ( आता जालावर ) उतरवल्या शिवाय जीवाला शांतला लाभत नाही.
कोण वाचते आहे की नाही हे महत्वाचे नाही, सृजनाच्या प्रसववेदना सुरु झाल्या की लेखक्/कवि भानावर रहातोच कुठे? आणि भानावर रहावेच का? स्वताला मुक्त करुन टाकावे अनंत अवकाशात आणि शमवावा आपला निर्मीतीचा कंडु.

** वरच्या २ टुच्च्या वाक्यामधले १-२ हुच्चभुभु शब्द जे आहेत ते मनोबा आणि शुचिकडुन उधार घेतले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुशाल उधार घे. काहीच ऑब्जेक्शन नाही. मनचा उल्लेख माझ्या उल्लेखनंतर करत जा. मला जेलसी होते ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला एकदम बस लागणाऱ्या माणसाला इतरांनी दिलेला सल्ला वाचतोय अशी भावना झाली….
रच्याकने, माझे पुढचे भाग लिहून तयार आहेत…. आणि कोणी वाचो किंवा न वाचो मी ते ऐसीच्या अवकाशात सोडून देणार आहेच ….

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोरे सरकार, मनोबांचा वुडहाऊस आवडणार्‍या काकांवरचा लेख वाचा. त्यांच्या प्रमाणे इथे मारी बिस्कीटे खाउन गालातल्या गालात स्मित करणारे लोक संख्येनी जास्त आहेत. ते लेख नक्की वाचत असतील, गालातल्या गालात स्मित पण करत असतील. पण एकदम मोठ्यांदी आरडाओरडा करुन दाद वगैरे देणार नाहीत.

काही जाणकार श्रोत्यांचा लौकीक कसा असतो की ते दाद वगरे देणार नाहीत, टाळ्या वाजवणार नाहीत, पण पूर्ण मैफिल बसुन ऐकली म्हणजेच त्यांना गाणे आवडलय असं गायकानी समजुन घ्यायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद … तुम्ही कळत नकळत मला वुडहाऊस साहेबांच्या जवळ बसवलेत … किंवा तसे झाले असे मला वाटते … त्या शब्दप्रभूच्या पायाशी बसायची पण माझी योग्यता नाही…. आणि प्रतिसादांबद्दल मला निर्गुणी भजनांवर एक क्षणभर उत्सुकता जास्त दाटून आली होती… नंतर मी पूर्ववत होऊन माझ्या लेखनसमाधीत कुठल्याही विचाराचा व्यतय येऊ न देता पुन्हा गुंग झालो आहे … खरंच … अगदी माझ्या सुटलेल्या पोटाची शप्पथ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बाई तू मनोबाच्या लेखांना अगदी बाय हार्ट केलयस की. मनोबा बघ रे तुला कट्टर रसिक फॅन फॉलोइंग मिळालय. आता तरी सुधर (हे आपलं उगाचच =)))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रच्याकने, माझे पुढचे भाग लिहून तयार आहेत…. आणि कोणी वाचो किंवा न वाचो मी ते ऐसीच्या अवकाशात सोडून देणार आहेच ….

आणि हे वाचून आपणांस ग्यासिसचा त्रास होत असल्याची भावना मला झाली.

असो. त्याबद्दलही कोणी सल्ला देईलच, तेव्हा काळजी नको.

..........

आता "त्रास? I enjoy it!" असे कृपया म्हणू नका! मेहेरबानी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्यासीस चा त्रास असा नेम धरून कुठल्याही अवकाशात सोडण्याची माझी शारीरिक तयारी झालेली नाही. त्यामुळे आपली चुकीची भावना झालेली आहे असे सांगताना मला जो आनंद होतो आहे त्याबद्दल मी फक्त I enjoy it इतकेच म्हणू शकतो. आणि मी तसे म्हटले म्हणून कृपया चिडू नका. कृपया हलके घेणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFL सॉलिड!!! फार आवडला हा भागही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती ऋजुता दिवेकर आमच्याही घरात चंचुप्रवेश करू पहात होती.
गेल्या भारतभेटीच्या वेळी एका पुस्तक/व्हिडियोच्या दुकानातला आमचा संवाद...
"अरे ही, ऋजुता दिवेकर ना, हिचे व्यायाम/योगावरचे सल्ले छान असतात, आपण घेऊया," ही
सावध होत मी, "त्यापेक्षा ही शिल्पा शेट्टीची योगावरची व्हिडियो घेऊयात."
"का? शिल्पा शेट्टी का? ऋजुता दिवेकर का नको?"
"नाय म्हणजे योगासनं करायचीच असतील तर ती करतांना निदान अंमळ करमणूक तरी होईल!"
झालं. ऋजुता आणि शिल्पा दोन्ही बारगळल्या!!! ROFL
-योगभ्रष्ट डांबिस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगागागागागागा ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी जेन फोंडा बद्दल बोललो. हिला ते प्रकरण काही माहित नव्हते त्यामुळे ती हो म्हणाली आणि मी सुखी झालो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिश्किल लिखाण.
बादवे ह्यावरुन माझा रे माझ्या गळणार्‍या केसा.... हा धागा आठवला.
आणि अनु तैंनी उल्लेख केलेला माझाच अजून एक धागा -- वुडहाउस आवडणारे काका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वुडहाउस वाला धागा मी इतरत्र वाचलाय आणि त्यावर कमेंट पण केली आहे. केसांचा धागा आता वाचेन. लिंकबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0