विवाह जुळवताना पत्रिकेला किती महत्व देता?

कुणाच्याही आयुष्यात विवाह ही मोठी घटना असते. एखादे स्थळ आल्यावर हा निर्णय घेताना ती व्यक्ती व कुटुंब अनेक बाबी विचारात घेते. त्यापैकी पत्रिका जुळणे हा एक मुद्दा असतो. आपण स्वत:च्या किंवा मुलामुलीच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्रिकेला किती महत्व देतो हे जाणुन घेणे हा उद्देश या कौलाचा आहे.
शिवाय समाजात लग्नाच्या वेळी पत्रिका पहायचे प्रमाण किती टक्के आहे असे आपणास वाटते? याविषयीही भाष्य करावे.

प्रतिक्रिया

स्वतःच्या लग्नात पत्रिका बघितली नव्हती. (कै वाईट झालं नै, अद्यापतरी!!)

अपत्याची पत्रिकाच बनवलेली नाही!!

+१

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>(कै वाईट झालं नै, अद्यापतरी!!)

असं म्हणणं तुमच्या पत्रिकेत असणार !!! Wink

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आवरा! ROFL

सेम हियर.

पत्रिकाच बनवलेली नाही

यासाठी योग्य पर्याय उपलब्ध नाही या पोलमधे Smile

एव्हडेच पुरे असते एखादा चाळा करून बघायला. माझा यावर विश्वास नसयायचे कारण स्वानुभव. आजतागायत माझी पत्रिका बघणारे एकदाही योग्य विवेचन करू शकले नाहित.

परंतु गुण जुळवणे हां वेगळा प्रकार आहे. जर तुमच्या घरात सतत कलह वगैरे होत असतील तर पत्रिका जूळत असेल तरच निर्णय घ्या अन्यथा नकोअसे म्हणतो यामागे पत्रिका तर जुळली हां एक आपलाच तयार झालेला सकारात्मक विचार पुढचे निर्णय सोपे करतो एव्हडिच भूमिका आहे. याला वैज्ञानिक तथ्याची जोड़ नाही.

actions not reactions..!...!

प्रेम विवाह, त्यात पळून असल्याने पत्रिका पाहण्याचा योग आला नाही. जे पदरात पडलेय तेच दोघे हसतमुखाने उपभोगतो आहे. पत्रिकेत पुढील आयुष्याचे गुपित कसे आणि कुठे दडलेले असते हे एक न कळणारे कोडे आहे.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

प्रेम विवाह, त्यात पळून

आंतरजातीय/आंतरप्रांतीय/आंतरभाषिक/आंतरलैंगिक?

या पैकी कोणतेही नाही, आता बोला....

बायको मोठी असल्याने प्रोब्लेम झालेला. Biggrin

बट एव्रीथिंग वर्क्ड आउट इन दि एंड

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

बाकी कै नसले तरी आंतरलैंगिक तर आहेच असे दिसतेय.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरेरे टिकलु साहेब, तुम्ही ऐसीवर आमच्यासारखे सर्वसामान्य म्हणुनच जगणार.

अरेरे टिकलु साहेब, तुम्ही ऐसीवर आमच्यासारखे सर्वसामान्य म्हणुनच जगणार.

मग मी काय करावं अशी अपेक्षा बाळगलीय? अबकी बार (ऐसीवर) टिकलू सरकार वैगेरे?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

BiggrinBiggrinBiggrin

तुम्ही समलैंगिक असता तर तुम्हाला ऐसीवर उच्च दर्जा मिळाला असता. तुम्ही कीतीही भिकार लिहीले असते तरी तुम्हाला साहीत्यातले नोबेल मिळावे असे कौतुकाचे प्रतिसाद मिळाले असते. तुम्ही कीतीही मूर्खासारखी प्रतिक्रीया दिली असती तरी ८ मार्मिक श्रेण्या मिळाल्या असत्या.

अनु तै,
अर्रर्रर्रर्र , काय हि खात्री आणि काय हि चिडचिड ... म्हणजे आता तुम्ही ऐसी मधल्या श्रेणी देणाऱ्यांना ' विचारजंत , प्रेस्टिट्यूट , सिक्युलर ' वगैरे पुरस्कार देणार बहुधा !!! या अवॉर्ड ची वापसी करण्याकरिता काय लिहावे लागेल ? ' मी विजेता होणारच ' , ' फडतुसविमोचन मंत्र ' का ' सनातन व्यवस्थेमुळे अजून टिकलेले विश्व ' ?

ता. क .: थंड घ्या , मी श्रेणी देण्याच्या पदवीला अजून अपात्र आहे. माझा व्हेस्टेड इंटरेस्ट नाही

म्हणजे आता तुम्ही ऐसी मधल्या श्रेणी देणाऱ्यांना ' विचारजंत , प्रेस्टिट्यूट , सिक्युलर ' वगैरे पुरस्कार देणार बहुधा !!! या अवॉर्ड ची वापसी करण्याकरिता काय लिहावे लागेल ?

तूर्तास फुकाचं फिअरमॉन्गरींग टाळा. ज्युनिअर आहात हे तुम्हीच मान्य करताय ना मग, अभ्यास वाढवा. या धाग्यापासून सुरुवात केली तरी चालेल.

ऑ , का हो मामी ,सक्काळी सक्काळी झोडताय ? अहो चेष्टेत लिहिलं होतं, कसलं फिअर मोंगेरिन्ग आणि कसलं काय.

Smile कुल!!
.
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQgw4jrtHttaYIEb7_HNRFMYIT7XbkYI3bh6kNRKo8UNFw76OZH

तुम्ही समलैंगिक असता तर तुम्हाला ऐसीवर उच्च दर्जा मिळाला असता. तुम्ही कीतीही भिकार लिहीले असते तरी तुम्हाला साहीत्यातले नोबेल मिळावे असे कौतुकाचे प्रतिसाद मिळाले असते. तुम्ही कीतीही मूर्खासारखी प्रतिक्रीया दिली असती तरी ८ मार्मिक श्रेण्या मिळाल्या असत्या.

श्रेणीचे कसले भलते वेड. श्रेण्या विकून वाण्याकडून एक्ष्ट्रा लोणी मिळते काय?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

पण श्रेण्यांनी मेंदूतील रिवॉर्डस सेंटर्स (brain reward pathway) उत्तेजित होतात हो ज्यामुळे फेक का होइना पण काहीतरी अचिव्ह केल्याचे समाधान मिळते ROFL
___

एक्ष्ट्रा लोणी मिळते

एक्स्ट्रा लोणी मिळणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे का काय? आता तुम्ही विचाराल की मग काय श्रेण्या मिळणे हे अंतिम ध्येय आहे का? तर होय!! आहे Smile

एक्स्ट्रा लोणी मिळणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे का काय?

पु.लंच्या मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर मधले वाक्य आठवले - "खा लेको मटार-उसळ खा, शिकरण खा" इथे पुणेकराची चैनीची परिभाषा संपते. त्यावरून सुचलं, माझ्या वाक्याचं सार्थक झालं.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

Smile

श्रेण्या मिळणे हे अंतिम ध्येय आहे का? तर होय!! आहे

चूक!!!!!!

वाटेल तिथे वाटेल त्या श्रेण्या आणि त्याही उगाच देता येणे यातच जीवनाची खरी इतिकर्तव्यता आहे.

तुम्ही वाण्याकडून लोणी घेता? (नाक उडवत)

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

होय स्किम्ड मिल्क घेतलं की लोणी विकतच घ्यावं लागतं Wink

तुम्ही स्किम्ड मिल्क घेता? (नाक उडवत)

आजकाल अनहेल्थचं कोणाला काही राहिलं नाहीच!

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुम्ही वाण्याकडून लोणी घेता? (नाक उडवत)

मग लोणी वाण्याकडून नाही घेऊ तर काय लोण्याकरता मुक्ती मोर्चे काढू?

पंचची शब्दरचना काही विचित्र झालीय? :~

-- मग लोणी वाण्याकडून नाही घ्यायचे तर काय त्या करता मुक्ती मोर्चे काढायचे?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

त्यापेक्षा हे कसे वाटेल - मग वाण्याकडुन घेऊ नको तर काय दरोडे घालू?
___
आता समंकडून समन्स येऊन समज मिळण्याच्या आत डिक्लेअर करते की "माझा उथळपणाचा आजच कोटा पुरा झालाय" Wink

त्यापेक्षा हे कसे वाटेल - मग वाण्याकडुन घेऊ नको तर काय दरोडे घालू?

छान !!

आता समंकडून समन्स येऊन समज मिळण्याच्या आत डिक्लेअर करते की "माझा उथळपणाचा आजच कोटा पुरा झालाय" (डोळा मारत)

हात्तेज्या मायला हिथं बी कोटा हाईच का !?!!

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मार्मिक!! कंटाळा आला होता मला तर. आणि बाय द वे ज्यांचं इतकं कौतुक केलं ते परत ऐसीवर फिरकलेही नाहीत. ते त्यांच्या अभ्यासात मग्न होऊन गेले. आपणच उगाच उत्साहाने मारे ....

आंतरजातीय/आंतरप्रांतीय/आंतरभाषिक/आंतरलैंगिक?

आंतरलैंगिक ला कुठल्या आई-बापाचा का विरोध असावा? तुम्हाला समलैंगिक असं विचारायचं होतं का?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

नबा नेहमी थट्टा करतात. तुम्हाला रुळल्यावर एकेकाचा स्वभाव कळेल.

नबा नेहमी थट्टा करतात. तुम्हाला रुळल्यावर एकेकाचा स्वभाव कळेल.

हो छान, नबा -
कोणत्याही गोष्टीला 'न' बाजू असू शकतात, या श्रद्धेतून (मला जाणवलेली, पण) इतरांना सहसा (स्वार्थापोटी, सोयिस्करपणे, सवयीने अथवा परंपरेने) 'न' दिसणारी 'न'वी बाजू प्रकाशात आणण्याचा आपला एक प्रयत्न, झाले. जमले, तर घ्या, नाहीतर...

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मुळात पत्रिका म्हणजे काय हे समजून घेतले तर, पत्रिका पहाण्याचा आग्रह कमी कमी होत जाईल. जन्माच्या वेळी, कोणत्या ग्रहांची काय स्थिती होती, यावर पत्रिका तयार करतात म्हणे ! जन्मवेळ कोणती ग्रूहीत धरावी इथुनच वादाला सुरवात होत असते.
बाळाचा जन्म नेमका कोणत्या वेळेला झाला म्हणजे या जगात आल्याची वेळ की पहिला श्वास घेतल्याची वेळ्, की त्याच्या ही अगोदर आई-बापाच्या मिलनाची वेळ ? ? यावर कधीच कुणाचेही एकमत होणे शक्य नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हे जे तथाकथित 'ग्रह' ( एका अर्थाने दगड-मातीचे गोळेच ) आहेत, हे माणसाच्या भविष्यावर परिणाम करतात, तेही इतक्या प्रचंड दूर अंतरावरून, ही काही शास्त्रसंमत गोष्ट नाही, तेंव्हा ग्रह गोलकांची स्थिती पाहून, नशीब बदलणारे नाही. तसे असते तर अलिकडे सरसकट बाळंतपणे ' सिझरीन ' पध्दतीने करतात, ते करतांना अशा ' शुभ ' मुहुर्तावर करा, अशी लोकांनीच, डॉक्टरांना विनंती केली असती ! आणखी एक गोष्ट... ' जुळणारी ' पत्रिका तयार करणारे ह्याच भारतात सहज मिळतात.फक्त पैसे मोजण्याची तुमची तयारी मात्र हवी ! ! मग ३६ च्या ३६ गुण सुद्धा जुळतील हो ! !
विवाह जमवितांना,वर-वधूचा स्वभाव, आवडी-निवडी, छंद, एकमेकांना समजावून घेण्याची व्रुत्ती,घरातील इतर नातेवाईकांशी जुळवून घेण्याची व्रुत्ती, तसेच त्या त्या घराण्यांची आर्थिक स्थिती, भाऊबंदकी ह्या महत्वाच्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी जर तपासून घेतल्या, तर ते विवाह यशस्वी होण्यात काही अडचण येऊ नये असे वाटते.
मी माझ्या दोन्ही मुलांच्या ' जन्मपत्रिका ' बनविल्या नव्हत्या आणि व्याह्यांना सरळ व स्पष्ट शब्दात सांगितले होते की आमचा जन्मपत्रिकेवर विश्वास नाही. आम्हाला मुलीची सुद्धा पत्रिक बघायची नाही. निसर्गक्रुपेने,दोघांचे संसार सुरळीत सुरु आहेत.
या उलट, समोरचे स्थळ पसंत नसेल तर खुशाल ' पत्रिका जुळत नाही असे आमचे गुरुजी म्हणतात ' असे सांगून नकार देणारे, पत्रिकेचा वापर करायला मागे-पुढे पहात नाही.

अक्षरमित्र या विषयावर आपण माझ्या ब्लॉग ला भेट द्यावी. याच विषयावर असलेले यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक आपण डाउनलोड करुन घेउ शकतो.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आई ग्ग!!!
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2011/01/blog-post.html#more

कसला खुसखुशीत किस्सा आहे ROFL प्रचंड हसले Smile
___

वरील ब्लॉगमधील वाक्य -

असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित!

सॉलिड्ड!!

पुढच्या वेळी विवाहा संदर्भात पत्रिका जुळताना समलैंगिकता हा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल असे दिसते. माझ्या परिचयाच्या एका ज्योतिषांनी यावर अभ्यास चालू केला आहे,

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पत्रिला पाहून प्रेमविवाह शक्य आहे का?

म्हणजे जसं या मुलाकडे चांगला मोठा फ्लॅट आहे, गाडी आहे. म्हणून जसं लग्न केलं जातं तसं याची/हिची पत्रिका जुळते आहे म्हणून याच्यावर/हिच्यावर प्रेम करूया असं ठरवता येईल का?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ट्रूथ इज डेंजर द्यान फिक्शन! काही सांगता येत नाही.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबांना नवीन कथेची बीजं थत्त्यांनी दिलेली आहेत. झाड वाढवण्याचं काम आबांकडे.

(अवांतराबद्दल - पब्लिकला विनोदी वाटेल असं अवांतर करायला ना नाही आपली. वाचून करमणूक झाली पाहिजे, व्यक्तिगत संदर्भहीन आणि निर्विष विनोद सहसा जनरल पब्लिकला आवडतात.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झी मराठीची सिरीयल व्हायचं सामर्थ्य आहे यात.

नाव: "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं"

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.