जलपर्णीच्या नशिबाचा दुसरा फेरा : नेटके का इंतकाम

कथा

उपोद्घात | पहिला फेरा | दुसरा फेरा | तिसरा फेरा | साडेतिसरा फेरा

_________

जलपर्णीच्या नशिबाचा दुसरा फेरा : नेटके का इंतकाम

- आदूबाळ

सुदान चैनीजच्या गच्चीच्या कठड्याला टेकून आनंदध्वज शांतचित्ताने धूम्रवलये उडवीत होता. तयाची नजर जरी धूम्रवलयांची प्रतिरूपे पाहण्यात गुंतली होती, तरी त्याचे संपूर्ण अवधान रुद्रप्रयागाकडे होते. रुद्रप्रयागाने डोळियाला दुर्बीण लावली होती, आणि भिंगे समोरच्या बंगलियाच्या गवाक्षावर रोखलेली होती. तेयाचे अंग थरथर कापत होते. मुखावर क्षुब्ध भाव होते.

"गारू … हे रे काय! हे काही भलतेच!"

उपोद्धात

या चित्रावर क्लिक करून मोठं चित्र बघता येईल.

"भलते नाही मित्रा. वेगळे."

"चामडियाची लघुवस्त्रे, कण्टकयुक्त चर्मदण्ड, रक्तवर्णी नखाग्रे आणि हे असे बुभुक्षित व्याघ्रीचे चालणे… हे काही अनैसर्गिक नाही वाटत तुला?"

"अनैसर्गिक नव्हे. अनवट. अनघड."

"असे चारचौघांत पाहिले नाही."

"अरे, आपली आपली आवड असते," आनन्दध्वज संयमाने म्हणाला. "प्रकृतीसाठी सात्त्विक म्हणोन प्रत्येक जण वरणभात खाईल तर माझे सुदान चैनीज चालेल काय? जगात आलोकनाथ असतात, तयाप्रमाणे प्रेम चोप्रेही लागतात."

"म्हणजे गारू, तुवा म्हणायचे आहे की हे नैसर्गिकच असे?"

"होय तर! अगदी शतप्रतिशत नैसर्गिक." आनन्दध्वज म्हणाला. "मानवाच्या कामप्रेरणांचे एक गोचर असते. जसा रंगांचा गोचर म्हणजे इन्द्राचे धनुष्य, पाणियाचे गोचर म्हणजे गोठण आणि उत्कलन हे बिन्दुद्वय, तसे कामप्रेरणांचेही गोचर. साङ्ख्यिकी मध्यप्रवणतेच्या नियमाप्रमाणे जनांचा प्रवाहो गोचराच्या मध्यबिंदूपाशी असतो. गोचराच्या टोकाकडचे काही दिसले तर त्यास वेगळे समजून अगोचर सम्बोधण्याची पद्धती पडून जाते. पण ते गोचरातच असते. अनैसर्गिक नव्हे."

"गारू, नको मजवर सिद्धान्त मारू. थोडकियात मुद्दा सांग."

"तो तुला उदाहरणे पटवून देतो. तुवा सुदानीचे मनचाव सार आवडते की नाही? ते कसे बनवून घेतोस सांग बरे?"

"मिरचियांचे भरपूर तुकडे घालून…"

"बरोब्बर! आमचा थापा मज सान्गतो की इतुके कषायपेय अन्य कोणाला दिले तर तयाचे सर्व रन्ध्रातून धूम्रशलाका निघोन तयाचा अग्निबाण होईल. मग तुझी ही आवड अनैसर्गिक म्हणावी काय?"

"नव्हे. ती तर फक्त टोकाची आवड… हम्म… पटले."

"ते असो. माझा मुद्दा वेगळा होता."

" तो रे कोणता?"

"आता तुझिया लक्षात आले असेल की जलपर्णी रामनाथची तप्त स्फोटक मिसळिका असे." धूम्रकाण्डीस हेलकावे देत आनन्दध्वज म्हणाला. "तू पडलास कैलास जीवन. तुवा ते झेपेल काय? झेपवून घ्यावयाची इच्छा आहे काय?"

"मी करेन, गारू. मी तयार आहे. मजला मदत करा." रुद्रप्रयाग गडबडीने म्हणाला.

"हेच ते मद्यसार!" आपली नितम्बसुराकुपी चाचपत आनन्दध्वज म्हणाला. "आताच मधुकशेस लघुसन्देश धाडला आहे. तुजला मदत तियेकडोनच होईल."

"ही मधुकशा कोण?"

"येथेच थांब, ती तुजला याच सौधावर भेटेल."

खालून कोणा वाहनाच्या आरोधरम्भांचा कर्णकटू आवाज आला. आनन्दध्वजाने वाकून पाहिले. दचकोन तयाच्या हातातून धूम्रवल्ली निसटली.

--x--

आनन्दध्वज आपल्या शरीराला न शोभेलशा चपळाईने तळमजल्यावर उतरला. त्याचे भालावर चिंतेच्या रेषा उमटू लागल्या होत्या.

समोरून मरहठ्ठदेशीचा दण्डपाणी, दख्खनस्थानकाचा उपनेता, सदांचा रक्षक आणि खलांचा निग्राहक दमदार मर्दानी पावले टाकीत येत होता. मत्त स्कन्धावर अधिकारदर्शक पट्टिका होत्या. कपिलखाकी गणवेषावर एकही सुरकुती नव्हती. डोळियांवर किरणप्रतिबन्धक उपनेत्र होते. तयाखालचे डोळे आनन्दध्वजाला दिसत नसले, तरी चोहीकडचा वेध घेत होते. उपनाम नेटके. भांबुर्डियाचा दबङ्ग.

"यावे, महोदय." आनन्दध्वज वाणीस नियन्त्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

आतापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या ध्यानी आले असेल की आनन्दध्वज हा सामान्यजनांप्रमाणे जीविकेला जुंपलेला जन्तू नव्हता. नितम्बकुपीत सुरा आणि धूम्रशलाकेत मेघवल्ली ठेवण्यासाठी जे करावे लागेल, ते तो करीतसे. समाजाच्या नियमांत ते बसेच ऐसे नाही. साहजिकच समाजाच्या सुवर्तनाचे व्रत (अंधतेने न) घेतलेल्या काही अधिकार्‍यांच्या रडारिकेवर आनन्दध्वजाचा बिंदु लुकलुकत असे. न्यायाचे लंबबाहू आनन्दध्वजास वेळोवेळी कवटाळू पाहत. आपल्या लाघवी स्वभावाने, अतलस्पर्श मधुघटांनी आणि शिथिलरज्जू धनपेटिकेने या संकटांवर त्याने विजय मिळविला होता.

परन्तु दबङ्ग नेटकेवर ही मात्रा आजवर चालली नव्हती. आक्षेप घ्यावा असेही काही त्यास सापडले नव्हते, पण थोडे खोदकाम करिता ते सापडणे अशक्य नव्हते. त्या उत्खननासाठीच तो आला असावा असा आनन्दध्वजाचा होरा होता.

"महोदय, अलभ्य लाभ. पामर काय सेवा करू शकतो आपली?" आनन्दध्वज लीनतेने वदला.

उत्तरादाखल नेटकेने 'खचाखच गचागच'चा दीपावली विशेषाङ्क आनन्दध्वजासमोर फेकला.

"छी: छी:!" आनन्दध्वजाने कानावर हात ठेवले. "काय हे गालिच्छ्य! कोणा कीटकाच्या मनःकर्दमातून हे निघते? हे सर्व कोठून येते?"

"ते तेण्डुलकरांना विचार. परन्तु हे बघ..." नेटकेने एक पान उघडले. तयांत 'दाणेआळीतली दाणादाण' ही कथा सोबतच्या चित्रासह शीर्षकासह होती.

"येयाचे काय, महोदय?"

"येयाचे काय विचारतोस भौसड्या? सांगतो. काल वेल्कम लौजगृहावर छापा घातला. तेथली सर्व पाखरे पकडिली. लौजगृहाचे स्वागतकक्षात अनेक कामप्रदीपक प्रकाशने सापडली. स्वागतकक्षाचे मंजुषेत या कथेचा एक खर्डा सापडलासे. मुद्रकांचे भाषेत तेयाला 'प्रुफ' ऐसे म्हणितात."

आनन्दध्वजाचे उदरात खड्डा पडला. वेल्कम लौजगृहाचा मालक म्हणजेच 'खचाखच गचागच'चा मुद्रक. आनन्दध्वजाचे आणि वेल्कम लौजगृहाचे काही इतर व्यावसायिक संबंधही होते.

"त्या प्रुफावर नीलमषीने काही सुधारणा केल्या होत्या." नेटके पुढे सांगू लागला. "तळाशी दोन भ्रमणध्वनिक्रमांक लिहिले होते. अन् काय चमत्कार! हा एक क्रमाङ्क परिचयाचा निघाला! मग म्हटले, तुज काही ठावे असेल तर बघावे..."

त्यातला एक आनन्दध्वजाचा होता.

"महोदय, मी पडलो जगमित्र. तयातून माझा व्यवसाय क्षुधापीडितांच्या पोटी चैन्यखाद्य घालावयाचा. माझा क्रमाङ्क आणि डेङ्गियाचा मशक कोठेही सापडू शकतात." आनन्दध्वज साळसूदपणे म्हणाला.

"वेड पांघरून पेडगावी गमूं नकोस, भाटकभक्षका!" नेटके क्रोधावेगाने म्हणाला. "हे मासिक ताजीराते हिंदच्या दफा दोनशे ब्याण्णवान्तर्गत येते. अश्लील वाङ्मयाचा प्रसार. याचे मागे जो असेल तयास श्वशुरगृही मोठा मुक्काम करणेस धाडणे आहे."

"महोदय, मजला काय ठावे..."

"खामोश! कथेचे प्रुफ सापडते, आणि सुचविलेल्या सुधारणांसकट कथा प्रकाशित होते. खाली तुझा क्रमाङ्क असतो. मजला चौतिया समजू नकोस. येयाचा अर्थ तुझा काही संबंध आहे. तूच तर याचा चालक-मालक नव्हेस?" नेटके म्हणाला. "पण मालक नसावास, नाहीतर असल्या भिकार उपाहारगृहात मोलाने नोकरी करतास ना."

"बरोबर, महोदय. माझा क्रमाङ्क तेथे असणे हा योगायोगच असावा."

"तुझी दन्तवीणा जास्त छेडू नकोस. भ्रमणध्वनि दाखीव मजला." नेटके उग्र स्वरात म्हणाला. नाविलाजाला मनुक्षमात्राचा विलाज नसल्याने आनन्दध्वजाने भ्रमणध्वनि नेटकेच्या हाती दिला. दुसरा विकल्प त्याचेसमोर नव्हता. भ्रमणध्वनि देणेस नकार म्हणजे जणू अपराधाची कबुलीच.

नेटके भ्रमणध्वनि तपासू लागला.

--x--

आनन्दध्वजाने आजूबाजूला पाहिले. भाळीचा तनुरस टिपला. एकीकडे खप कमी म्हणून मालक क्रोधित झालेलासे. रुद्रप्रयागासारखे सिद्धहस्त लेखक लेखनसीमा घालून बसले होते. मदत करायला जावे तर रुद्रप्रयाग स्वप्नींच्या फळांची आस धरून बसला होता. आधीच सङ्कटे कमी होती की काय, म्हणून हा कपिलखाकी साण्ड 'खचाखच गचागच'चे राशीस बसावयाला आलेला.

डोळियाच्या कोपरियातून तयाला हालचाल दिसली. वामांगी एक शेलाटी, लहानखुरी पण आकर्षक स्त्रीमूर्ती होती. सोबतच्या रुद्रप्रयागाचे पीनोपनेत्र चमकले! आनन्दध्वजाने तेथेच थांबण्यासाठी इशारा केला. त्या सीमन्तिनीस इशार्‍याची गरज नव्हती. कोतवालाचे सेवक तिजला अन्धारातही अचूक ओळखू येत. हा तर गणवेषधारी होता. तिने रुद्रप्रयागाचे मनगट धरावयाचा यत्न केला.

परन्तु पीनोपनेत्रधारी लेखक एककल्ली असावेत असा काही ईश्वरी सङ्केत आहे. लेखकांचे मस्तकात सतत कथाबीजांचा गुंजारव. त्यांचेसाठी कथेचे अमूर्त विश्व आणि वावरण्याचे मूर्त विश्व यांच्या सीमारेषा स्पष्ट असतातच असे नाही. त्यात पीनोपनेत्रधारी लोकांची दृष्टी उपनेत्राच्या काचेच्या आजूबाजूचे स्पष्ट पाहू शकत नाही. दृष्टी चौफेर न राहता समोरच्या एका चौकटीपुरतीच मर्यादित होते. त्यापलीकडेही जग आहे येयाचा विसर पडितो.

आनन्दध्वजास पाहून रुद्रप्रयागास एकदम कृतज्ञतेचे भरते आले. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेविता गारू आपल्यास मदत करीत आहे हे तयाचे हृदयांस हात घालून गेले होते. आनन्दध्वजगारूने मधुकशेस शिक्षिका म्हणून पाठविले होते. बालपणापासून रुद्रप्रयाग उत्तम विद्यार्थी होता. शिकविल्या गेलेल्या गोष्टी सॅनिट्रीय नॅपकिनाच्या शोषणक्षमतेने ग्रहण करत असे. तयांस जलपर्णीला जिंकावयाचे होते, तयासाठी मधुकशेकडून ज्ञान मिळवायचे होते, तिच्या परीक्षा उत्तीर्ण व्हावयाच्या होत्या. हे सगळे त्याला आनन्दध्वजाला सांगावयाचे होते. आनन्दाचे घट त्याचे हृदयात फुटत होते.

मनगटावरच्या हाताला न जुमानता रुद्रप्रयाग पुढे सरसावला.

"गारू! जमलं! मधुकशा मला शिकविणार आहे. जलपर्णीला घेतो आता..."

"जलपर्णी?" नेटकेची मान झटक्यात वर आली. रुद्रप्रयागाच्या ढापणधारी मूर्तीचा वेध नेटकेच्या नजरेने घेतला. "कोण रे तू? जलपर्णीला कसा ओळखतोस?"

आनन्दध्वजाचे मस्तक हळूहळू गरगरायला लागले होते. "महोदय, आपण ओळखता का जलपर्णीला?"

"चांगलाच!" नेटके म्हणाला, आणि त्याच्या निबर मुखावर कोवळेपणाच्या काही छटा उमलल्या. "अर्धदशकापूर्वी जलपर्णीचे वडील माझे वरिष्ठ अधिकारी होते. कानडिया मुलुखांत. तेयांच्या घरी जायचा योग येत असे, तेव्हा ती कनिष्ठ महाविद्यालयात होती. माझे तियेवर..."

"महोदय, कदाचित ही निराळी जलपर्णी असेल..." आनन्दध्वज आशेने म्हणाला.

"अरे श्रोणिप्रबुद्ध मूर्खा, जलपर्णी हे सुदुर्लभ नाम धारण करणारी अन्य कोणी असू शकेल? ती होती मालतीच्या पुष्पासारखी नवयौवना, अमलताशासारखी प्रफुल्ला आणि केतकीसारखी सुगंधा."

"... पक्वाम्रफलवक्षिणी, दाडिमओष्ठधारिणी आणि ..." रुद्रप्रयागाने इथे मुखाचे कवाड वासायचे काही कारण नव्हते, पण त्यास राहवेना. "...आणि नारिकेलनितंबिनी... अशी ती एकच..."

काळ थांबला. नेटकेने आपले किरणप्रतिबन्धक उपनेत्र काढून आपली आरक्त दृष्टी रुद्रप्रयागावर रोखिली. आनन्दध्वजाने विस्मयाने मुख वासले आणि विषादाने आपली मुष्टिका त्यात कोंबली.

पण मागून मधुकशा विद्युल्लतेसारखी पुढे झाली आणि रुद्रप्रयागाला बिलगली. "रुद्रप्रयागा, प्रियवरा, इतकी प्रीती असली मजवर, तरी चारचौघांत माझं असं वर्णन करणं योग्य नव्हे!" एक हात रुद्रप्रयागाच्या कटीभोवती होता, आणि दुसरा तयाच्या केशसंभारात रुतला.

रुद्रप्रयागाच्या चेहर्‍यावर गोंधळल्याचे भाव आले, पण शरीराने निराळीच साद घातली. यौवनाचे शूल रुद्रप्रयागाच्या उरात घुसले आणि कटिवस्त्रात हालचाल झाली. तयानेही आवेगाने प्रतिसाद दिला.

ओटीपोटात ईक्षुदण्ड बोचताच मधुकशेने आश्चर्याने वर पाहिले. तिच्या नेत्रातल्या संभ्रमाला आवाहन समजत रुद्रप्रयागाने तिचे अधरांवर आपले अधर टेकविले.

इकडे त्या प्रुफात सापडलेला दुसरा क्रमाङ्क नेटकेला आनन्दध्वजाच्या भ्रमणध्वनिच्या कोषात सापडला होता. त्याने आपले बोट भ्रमणध्वनिच्या स्पर्शपटलावर टेकविले.

मधुकशेच्या नितम्बावर थरार जाणवला आणि कोण्या पारू नामे पापिणीला पप्पी हवी असल्याची सुवार्ता आसमंतात सुरेलपणे उधळली गेली. मधुकशा रुद्रप्रयागाच्या आलिङ्गनात रममाण झाल्याची संधी साधून नेटकेने झटक्यात तो लवलवता भ्रमणध्वनि हस्तगत केला. 'आनन्दध्वज कॉलिंग' असा संदेश त्यावर झळकला होता.

नेटकेचे मस्तक आधी भिरभिरले. मग तिरमिरले. मनातला जलपर्णीने व्यापलेला हळवा कोपरा तयाने आजवर जपून ठेविला होता. तयाची बदली कन्नडिगांच्या वारुळांतून मरहठ्ठ्यांच्या राउळांत झाली तेव्हा जलपर्णी ऐन षोडशवर्षिणी होती, आणि वरिष्ठ अधिकार्‍याची कन्या असल्याने तयाच्या पोहोचेपल्याड होती. तरी जलपर्णीची यौवनोन्मेषशालिनी मूर्ती तेव्हापासून तयाच्या मनाच्या लेणीत कोरली गेली होती. कोण्या एकांड्या रात्रीच्या स्वप्नात हळूच तिचा प्रवेश होई, आणि दुसरे प्रभाती आपल्या श्लेष्मण पैजाम्याला फेकून देणेशिवाय नेटकेपुढे पर्याय उरत नसे.

आपले मनीची देवी जलपर्णी पुण्यनगरीत आल्याचे तयाने ऐकले होते, पण तिला शोधून थेट तियेसमोर उभे राहायचे धैर्य नव्हते. नेटकेच्या दाबङ्गितेसमोर अखिल पुणक क्रमाङ्क चारचे पापजीवी चळाचळा कापत आणि फळाफळा मुतत. पण जलपर्णीस वश करण्यास दाबङ्ग्य कामाचे नसून सौकुमार्याची गरज असावी अशी आशङ्का तयास होती. म्हणून क्ष-वरिष्ठ पुण्यपत्तनी येऊन तियेशी ओळख करून देण्याची तो प्रतीक्षा करत होता.

... आणि आज अचानक आनन्दध्वजासारखा केवळ कूपनलिकेतला कर्दमकीटक असलेला जंतुमात्र आपले हृदयस्वामिनीला ओळखितो, तयाचा नारीलम्पट चोम्या सुहृद् तिजला 'घ्यायाची' भाषा करितो, आणि त्या चोमियास चिकटणार्‍या रण्डिकेचा भ्रमणध्वनिक्रमाङ्क एके आरक्तदीपांकित लौजगृहात मिळतो, हा सर्व घटनाक्रम नेटकेच्या कण्ठास तातासम काचला.

"मातृगमन्यांनो..." तो गरजला. "तुम्हां सर्वांस गर्भगृही घेवोन तृतीयमात्रा न देईन तर नावचा नेटके नव्हे!"

जलपर्णीच्या नशिबाचा दुसरा फेरा पूर्ण झाला होता.

क्रमश:

_______________
Law of central tendency
That's the spirit!
Ray ban
अशी वनस्पती जिचे सेवन करिता मेघांवर गमन करता येते. अर्थात … (वाचकांनी आपापल्या मगदुराप्रमाणे अर्थान्वयन करावे.)
भाटक म्हणजे भाडे. अर्थात … (वा०आ०म०अ०क०)
गंदी नाली का कीडा

_______________

चित्रश्रेय : अमुक

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

यावेळेचा भाग अवघड तरी आहे किंवा माझी एकाग्रता तरी होत नाहीये.
__________
हां आता वाचला. फार छान आहे हा भाग.

कोण्या पारू नामे पापिणीला पप्पी हवी असल्याची सुवार्ता आसमंतात सुरेलपणे उधळली गेली.

हे कोणतं गाणं आबा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां आबांनी खफवर मला सांगीतलेलं हे गाणं. मग पाहीलं मी. पण धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

__/\__

नितम्बसुराकुपी काय, भौसड्य काय, चौतिया काय.. तुस्सी पुरुष नही हो थोर्पुरुष हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हायला जब्बरदस्तच.
प्रत्येकी पार्टाचिया हिसाबाने दोन अर्कचित्रे येतील असे वाटलेले,
रेब्यानातला दबंगराव नेटक्या पाहण्यास मिळता अवर्णणीय आनंद झाला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबहरी!

हरी काळूस्करची आठवण आली. उपनेत्र शब्द आणि इतर डायलॉग वाचून!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा ही भाग छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"मातृगमन्यांनो..."
ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

भाटकभक्षक काय, भौसड्या काय, सॅनिट्रीय काय... अरे काय कम्माल आहे... ROFL

ह्या खालच्या दोन शब्दांचे अर्थ काय नेमके?
श्रोणिप्रबुद्ध
श्वशुरगृही (जेल/तुरुंग का?)

(मला संस्कृत येत नाही आणि मराठीही बोलीभाषेइतकंच माहिती आहे त्यामुळे हे कदाचित साधं असूनही समजलं नसावं)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी माणूस. श्रोणी म्हणजे पार्श्वभाग. श्रोणीप्रबुद्ध म्हणजे ज्याच्या ज्ञानाचा उगम पार्श्वभागातून आहे तो. (म्हणजे गुडघ्यात मेंदू असणारा कसा असतो तसा कुल्यांत मेंदू असलेला.)

- यू आर रैट - श्वशुरगृह = ससुराल = तुरुंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

:D:D:D
अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0