'माझा प्रवास'मधील काही भाग

माझा प्रवास गोडसे भटजी

'माझा प्रवास'मधील काही भाग

- गोडसे भटजी

या झांशी शहरात पूर्वी घडलेली एक विलक्षण गोष्ट ऐकिवात आली ती सांगण्यासारखी आहे. थोरले माधवराव पेशवे यांचेवेळी झांशीत पारोळकर यांचे पदरी नारायणशास्त्री म्हणून विद्वान ब्राह्मण होते. ते शृंगारशास्त्रात फार निष्णांत होते. त्यांनी एकेदिवशी शौचकूपाजवळ भंगिणीची पोर पहिली. तिच्या नेत्र, चरण, हस्त वगैरेंच्या लक्षणांवरून व अंगाच्या सुवासावरून हि पद्मिनी आहे असा शास्रीबुआचा निश्चय झाला. नंतर तिच्या आईस अनेक फुसलावण्या देऊन ती मुलगी वश करून घेऊन चांगले अन्नवस्त्र देऊन वाढविली व वयात आल्यावर शास्रीबाबा तिजशी रममाण होऊ लागले व तिला वेळोवेळी घरीही आणू लागले. त्याच स्त्रीवर शहरातील पुष्कळ लोकांचा डोळा होताच. तेव्हा त्या भंगिणीने शास्रीबुवांस विचारता त्यांनी तिला असे सांगितले कि, तुला द्रव्याची इच्छा तर नाही, तर तू प्रत्येकापासून द्रव्य न घेता एक एक यज्ञोपवीत घेत जा. याप्रमाणे काही दिवस लोटल्यावर शास्त्रीबावाचे हे वर्तमान त्यांच्या पत्नीस सहजच समजले. तिने बहुत प्रकारे त्यांची विनवणी केली. घरात बाटवाडा केल्याबद्दल आक्रोश केला, परंतु शास्रीबोवांनी मारहाण करून तिला गप्प बसविले. त्याजमुळे हि बातमी कर्णोपकर्णी पारोळकर यांस समजल्यावर त्यांनी गुप्तहेर ठेवून शास्रीबोवांस व भंगिनीस एके ठिकाणी पकडविले व आपल्यासमोर आणून निक्षून विचारता शास्रीबोवांनी उत्तर केले कि, मीच तर काय, परंतु शेकडो ब्राह्मण बाटले आहेत. असे म्हणून भंगिनीकडून यज्ञोपवीते काढून दाखविली. हे पाहताच पारोळकरास फार धास्ती पडली. कारण हे सर्व शहर बाटल्याचे वर्तमान पुण्यास समजले तर फार आकांत होईल. नंतर ताबडतोब दुसरे गावचे ब्रांह्मण आणवून त्यांजकडून शहराबाहेर पंचगव्य तयार करविले व दर एक ब्राह्मणांकडून क्षौरकर्म करवून यज्ञोपवीत व पंचगव्य देऊन शुद्ध केले. व सर्व शहरभर रस्त्यावर व घरांतून गोमूत्राचा सडा केला. खुद्द शास्रीबोवा प्रायश्चित्त घेण्यास नाखूष असल्यामुळे त्यांस भंगिनीसह हद्दपार केले…

वै. शा. विष्णुभट गोडसे, वरसइकर,
('माझा प्रवास' अथवा '१८५७ सालच्या बंडाची हकीकत' - लेखन : शके १७७९-१८०५)

***

तळटीप : मूळ प्रमाणलेखन तसेच्या तसे वापरले आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाप रे! सनसनाटी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

There are at least 3-4 more passages describing, if I may call, erotic situations, like this, in the book...they are all so wonderfully written...the most moving is how Godse-bhatji and a young woman almost embrace each other, as they are forced into a small place with the fear of death, but Godse-bhatji does not develop any feelings towards her...if you have still not, read the book NOW!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

हा हा हा! किस्सा कहर आहे. मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे बरेच उतारे आहेत त्या पुस्तकात. प्रमाणलेखन वाचताना सुरुवातीला किंचित अडखळायला झालं होतं पण नंतर गम्मतही वाटली. हा किस्सा भारीचे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

अरे माझ्या देवा ROFL स्कॅन्डल!

> खुद्द शास्रीबोवा प्रायश्चित्त घेण्यास नाखूष असल्यामुळे त्यांस भंगिनीसह हद्दपार केले… > आवडले शास्रीबुवा. पुढे काय झालं दोघांचं?

===
> ('माझा प्रवास' अथवा '१७५७ सालच्या बंडाची हकीकत' - लेखन : शके १७७९-१८०५) > १८५७, १८७९-१९०५ करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0