मून कंपनी

एके काळी चंद्र हा केवळ लांबूनच दिसणारा पांढरा, आकार बदलणारा गोळा होता. सुरूवातीला लोकांनी त्याला देव मानलं. नंतर त्याविषयी हळूहळू माहिती कळत गेली. टेक्नॉलॉजी सुधारली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रॉकेट्सचा बराच अभ्यास झाला. त्यानंतर कोल्ड वॉरच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांची स्पेस रेस सुरू झाली. सुरूवातीला रशिया आघाडीवर होती. पण नंतर अमेरिकेने त्यांना गाठलं. लवकरच चंद्रावर प्रत्यक्ष लॅंड होणं शक्य झालं.

अमेरिकेने मून लॅंडिंग करून चाळीस वर्षं होऊन गेली. त्यानंतरही अनेक लॅंडिंग मिशन्स झाली. नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ ऑल्ड्रिननंतर चंद्रावर इतरही लोक पाऊल ठेवून आले. चीनने चॅंग आणि भारतानेही चांद्रयान पाठवलं. अमेरिकेनेही पुन्हा चांद्रमोहिमांमध्ये रस घ्यायला सुरूवात केली आहे. कमीतकमी खर्चात स्पेसमध्ये जाणारी यानं बनवण्याचा प्रयत्न नासामध्येच नाही तर अनेक देशांत, अनेक प्रायव्हेट कंपन्यांतर्फे चालू आहे.

आता चार शतकं मागे जाऊ.

सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकाच्या सुरूवातीला अशीच काहीशी परिस्थिती युरोपात होती. स्पेसमध्ये जाण्यासाठी जशी आत्ता अनेक देशांत स्पर्धा आहे तशीच पूर्वेकडे जाण्यात होती. कुप्रसिद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तेव्हाच झाली. तिचा चार्टर होता तो म्हणजे 'अरबी समुद्रातील काही महत्त्वाच्या देशांशी व्यापार करण्याची मुभा (मोनोपोली)' त्या जोरावर कंपनीने मोठं भांडवल उभं केलं. डच ईस्ट इंडिया कंपनी आधीच हा व्यापार करत होती.

आता तुम्ही म्हणाल की याचा मूनलॅंडिंगशी काय संबंध? सांगतो.

सध्या चंद्रावरचे दगड फक्त म्यूझियममध्ये दिसतात. किंवा अगदी मोजक्या शास्त्रज्ञांना हाताळायला मिळतात. पण जर कोणी चंद्रावरून काही दगड आणले आणि विकले तर ते हजारो किंवा लाख डॉलर्सना सहज विकले जातील. जगातल्या सहाशे कोटी लोकांपैकी टॉप वन पर्सेंट - म्हणजे सहा कोटी लोकांना लाख डॉलर म्हणजे काहीच नाही. म्हणजे हे मार्केट ट्रिलियन डॉलरच्या घरात आहे. मग अशी एखादी मून कंपनी कोणी का काढत नाही? हा मालकी हक्काचा प्रश्न नाही. कारण चंद्रावर मालकी हक्क कोणाचा आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला इंग्लंडच्या राणीकडून चार्टर घ्यावा लागला होता. कारण अर्थातच व्यापार करण्यासाठी मुख्य बाजारपेठ इंग्लंडच होती. समजा अशी मून कंपनी कोणी काढली तर त्यांना कोणाकडून चार्टर घ्यावा लागेल? जागतिकीकरण झालेलं असताना नक्की कुठचं राष्ट्र याला बंदी घालू शकेल? अमेरिका? पण कंपनीची खरेदी विक्री सिंगापूरमध्ये किंवा हॉंगकॉंगमध्ये झाली तर? समजा अशी कंपनी तयार झाली तर चंद्रावरून दगड आणणं आणि ते आम जनतेसाठी विकायला काढणं योग्य का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

रोचक कल्पना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग अशी एखादी मून कंपनी कोणी का काढत नाही? हा मालकी हक्काचा प्रश्न नाही
हक्काचा प्रश्न कसा नाही? चंद्रावरच्या जागेचे प्लॉट्स पाडून ते विकायला ऑलरेडी सुरवात झालेली आहे...
http://www.lunarlandowner.com/

आम्ही बरे आमच्या प्लॉटमधले दगड कुणा ऐर्‍यागैर्‍याला हलवून परस्पर विकू देऊ!!!!!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्र विकला गेला का? आता पटकन जाऊन मंगळ माझ्या मालकीचा आहे हे जाहीर करायला पाहिजे.

बाकी धंद्याची आयड्या आवडली नाही. चंद्रावरचे दगडगोटे विकत घ्यायला एक लाख डॉलर्स देण्यापेक्षा हे तुमचे सहा कोटी दगडगोटे स्वतःच चंद्रावर जाऊन दगड गोळा करायला दहा-दहा लाख डॉलर्स देतील की. एवीतेवी तुम्ही चंद्रावर जायचा खर्च करणारच आहात ना?
पण तुम्हाला घाई करावी लागेल. रिचर्ड ब्रॅन्सन साहेबांनी हा धंदा आधीच सुरु केलाय म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्रावरचे दगडगोटे विकत घ्यायला एक लाख डॉलर्स देण्यापेक्षा हे तुमचे सहा कोटी दगडगोटे स्वतःच चंद्रावर जाऊन दगड गोळा करायला दहा-दहा लाख डॉलर्स देतील की.

या धंद्यात वजन फार महत्त्वाचं आहे भाऊ. एक किलोचा दगड एकदाच आणण्यासाठी जर लाख डॉलर्स मिळत असतील तर तेच रिटर्न मिळण्यासाठी प्रत्येकी दहा मिलियन चार्ज पडेल. त्यात माणसं नेऊन जिवंत परत आणायची म्हणजे रिस्क ओव्हरहेड्स वाढतात की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----
आम्ही चर्चा करणारे ... चर्चिल!

तुमच्या जागेतले दगड घेण्याचं डेरिंग कोणी करेल असं वाटत नाही. न जाणो, तुम्ही मानगुटीवर बसलात तर?

पण खरोखर स्वतः नासाच का दगड विकत नाही हे मला कळत नाही. अमेरिकेचं सर्व स्पेस रीसर्चचं बजेट अमेरिकन मध्यमवर्गीय टॅक्सपेयरच्या टॅक्समधून येण्याऐवजी श्रीमंतांच्या खिशातून येईल. मग श्रीमंतांवर जास्त टॅक्स वाढवण्याचीही गरज रहाणार नाही. म्हणजे मध्यमवर्गीय खुष, टॅक्स न वाढल्याने श्रीमंत खुष, नासाला पैसे मिळाल्याने नासा खुष, टॉप वन पर्सेंट वाल्यांना आपल्या पैशाचं काय करायचं हा प्रश्न थोडा सुकर झाल्यामुळे तेही खुष. एव्हरीबडी विन्स! मार्केट सोल्यूशनने प्रश्न सुटले म्हणून शिवाय कॅपिटॅलिझमच्या देखण्या शिरपेचातही एक मानाचा तुरा चढेल. एखाद्या रिपब्लिकनाने थोडा चहा वगैरे पिऊन हा मुद्दा मांडायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----
आम्ही चर्चा करणारे ... चर्चिल!

नासाने दगड विकायला जर रिपब्लिकनांची संमती हवी असेल तर पहिल्यांदा नासाची लिमिटेड कंपनी करावी लागेल. कारण रिपब्लिकनांचा कुठल्याही गव्हर्न्मेंट डिपार्टमेंटने असले उद्योग करायला रास्त विरोध असतो. आणि नासाचं प्रायव्हेटायझेशन करायचं सरकारने ठरवलं तर सगळे रिपब्लिकन जोरदार पाठिंबा देतील, त्यानिमित्ताने तरी नासाची फॅट झडेल!!!!:)

टॉप वन पर्सेंट वाल्यांना आपल्या पैशाचं काय करायचं हा प्रश्न थोडा सुकर झाल्यामुळे तेही खुष.
टॉप वन पर्सेंटवाल्यांना आपल्या पैशाचं काय करायचं हा कधीच प्रश्न पडलेला नसतो हो! त्यांच्याकडे गुंतवणुकीच्या विविध योजना तयार असतात. प्रश्न बाकीच्या ९९ पर्सेंटवाल्यांना पडलेला असतो की कसे या १ पर्सेंटवाल्यांकडचे जास्तीतजास्त पैसे काढून घ्यायचे आणि सरकारी योजनांवर बरबाद करायचे? काय खरं ना? Wink
(यानिमित्ताने कोणीतरी जर रिपब्लिकन्-डेमोक्रॅट धागा सुरु करेल तर काय धमाल येईल!!!)

आणि नगरीनिरंजन, मंगळावर जायचंच असेल तर जा बुवा पण तिथे आमच्या चंद्रासारखं नाही हो की रिकामी जमीन पडलीये, प्लॉट पाडले आणि विकले. तिथे स्थानिक वस्ती आहे. म्हणजे तुम्हाला तिथे तुर्कमानगेट सारखं काहीतरी करून ती वस्ती ऊठवून मग तिथे कंपाऊंड घालून सातबारा घ्यायला लागेल!!! त्यापेक्षा आमच्याबरोबर चंद्रावर का येत नाही? आमच्या शेजारचाच प्लॉट विकायला आहे, मूळ मालक ग्रीक होता, त्यांच्या मायदेशात काहीतरी प्रॉब्लेम आलाय म्हणे!!!:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नासाचं प्रायव्हेटायझेशन करायचं सरकारने ठरवलं तर सगळे रिपब्लिकन जोरदार पाठिंबा देतील, त्यानिमित्ताने तरी नासाची फॅट झडेल!!!!

घ्या!! म्हणजे नासाची पार वॉलस्ट्रीट करणार तर हे लोक! (अन दिवस रात्र आकाशातला बाप आहे अन ग्लोबल वॉर्मिंग इज बिकाज आफ आर सीन्स हे ऐकत बसावं लागणार आम्हाला!) अरे जीजसा, असलं काहीतरी व्हायच्या आधी मला उचलून घे रे बाबा! Wink
-पूर्वाश्रमीचा एअरोस्पेस विंजीनीअर

(यानिमित्ताने कोणीतरी जर रिपब्लिकन्-डेमोक्रॅट धागा सुरु करेल तर काय धमाल येईल!!!)

असा धागा इथल्या १% (रिपब्लिकनां)पैकी असलेल्या डांबिसकाकांनीच सुरु करावा अशी, ९९% (म्हणजेच सामान्य बरंका) पैकी असलेल्या, माझ्यातर्फे विनंती! Wink

(मरतोय आता मी... दोन चार दिवस संस्थळावर चक्कर टाकायला नको!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

असा धागा इथल्या रिपब्लिकनांपैकी असलेल्या डांबिसकाकांनीच सुरु करावा अशी माझ्यातर्फे विनंती!
भले!
म्हणजे सारं 'ऐसी अक्षरे' एक तरफ (तप्तकोटीश्वर नंदनसकट!!) आणि एकटा पिवळा डांबिस एक तरफ असा सामना होईल!!!
हॅ हॅ, आमी काय इतके सेरा पेलिन नाय आहोत!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे सारं 'ऐसी अक्षरे' एक तरफ (तप्तकोटीश्वर नंदनसकट!!) आणि एकटा पिवळा डांबिस एक तरफ असा सामना होईल!!!

असं काही नाहीए बरंका! इथे भरपुर लोक आहेत तुमच्या बाजूने, आणि मजबूत लोक आहेत.

उदाहरणंच घ्यायचं झालं तर रिक पेरी समर्थक आणि मीट रॉमनीच्या चाहत्या विक्षिप्तकाकू टेक्सनकर यांचं घ्या. रेड नेक टेक्सन नसतील इतक्या कट्टर रिपब्लिकन आहेत त्या. अजून एक म्हणजे आपले राजधानीश्वर मुसु. वॉशिंग्टनात असल्यामुळे ते बाय पार्टीसनगिरी दाखवत असले तर त्यांचा तुम्हाला बाहेरून पाठिंबा आहे. ग्लोबल वार्मिंगवरती विश्वास नसणारे घासू गूर्जी पण तुमच्याच पारड्यात पडणार बघा. Wink

घ्या, आख्खं संस्थळंच तुमच्याबाजूने आहे. आता धागा काढाच, म्हणजे अजून कोण कोण आहेत हे ही कळेल.

आमी काय इतके सेरा पेलिन नाय आहोत!!!!

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आमचे लाडके पिडाकाका यांची तुलना सेरा पेलिनशी केल्याबद्दल पिडाकाकांचा निषेध.

असो. आमचा लाडका रिक सँटोरम आहे. त्याच्याएवढा विनोदी राजकारणी शोधूनही सापडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>> असो. आमचा लाडका रिक सँटोरम आहे. त्याच्याएवढा विनोदी राजकारणी शोधूनही सापडणार नाही.
यावर तीव्र आक्षेप! आमचे मत रिक पेरीला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर तीव्र आक्षेप! आमचे मत रिक पेरीला.

सहमत! पेरीसमर्थक अन टेक्सासप्रेमींनी रिक पेरी पदरात घालण्याचा क्षीण प्रयत्न पाहून डोळे पाणावले! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

छ्या, ज्याचं नावच एवढं मजेशीर आहे त्याला काय इतरांची स्पर्धा असणारे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तप्तकोटीश्वर! मेलो!! _/\_

>>> हॅ हॅ, आमी काय इतके सेरा पेलिन नाय आहोत!!!!
--- सहमत आहे. काकांच्या परसदारातून रशिया दिसत नसल्याने त्यांना सेरा पेलिन म्हणणे चुकीचे आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय जरी काका शिकार करत असले, तरी ते हेलिकॉप्टरमध्ये बसून लांडग्यांची शिकार करत नाहीत त्यामुळे त्यांना सेरा पलिन म्हणणे अगदीचं चुकिचं आहे. Wink

http://www.youtube.com/watch?v=iGPFPBmzRrQ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आणि आम्हाला सेरा पेलिनसारखा कच्चकन डोळाही मारता येत नाही....
आम्ही जास्तीत जास्त Wink करणार...

(निळ्या, ती पण व्हिडियो टाक इथे!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डांबिसकाका मागतात एक डोळा.. पेलिन मारते चार!! Wink

हा अजून एक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मंगळावरचं काय ते लवकर सुरू करा हो ननि.

मंगळावर एव्हरेस्टच्या तिप्पट उंचीचा पर्वत आहे आणि पाणी वाहिल्याच्या खुणा आहेत म्हणजे ग्रँड कॅन्यनपण आहे. या पाश्चात्यांना असं काहीही सांगितलं, थोडी आकडेवारी दिली की लगेच येतील पहा पळतपळत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मंगळ ताब्यात घेतला की मी अमेरिकनांना बंदी घालणार आहे यायला.
ते आले तर मी रेड इंडियन नाही का होणार? आधीच मंगळ लाल आहे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि दुसरं म्हणजे अजून झालं नसेल तर तुमचं लगीन मात्र उरकून घ्या आधी...
एकदा 'मंगळाचे' म्हटल्यानंतर मग कोण मुलगी देणार तुम्हाला?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शनीचा बंदोबस्तही सुरू करू की आपण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता काय सांगायचं तुम्हाला. आमच्या घरी वृश्चिकेचा मंगळ आहे हो (म्हणूनच वादविवादाची आणि भांडणाची खुमखुमी आम्ही इथे जिरवतो हे त्या धाग्यावर सांगू का?).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रीक लोकांचं काहीच नको ब्वॉ. आणखी तिसरीकडेच गहाण टाकलेला प्लॉट विकतील ते. कोण निस्तरणार नंतर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्लॉट दिसणार्‍या बाजूला आहे का विरूद्ध बाजूला? दिसत नसेल तर जपून, कब्जा सच्चा वादा झूठा असं म्हणत नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रीन येतील लगेच मालकी हक्क सांगत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या प्लॉट दिसणार्‍या बाजूला आहे का विरूद्ध बाजूला?
एकदम बॉर्डरलाईनवर आहे. म्हणजे कसं की लिव्हिंग रूम आणि किचन उजेडाच्या बाजूला आणि सगळ्या बेडरूम्स अंधाराच्या बाजूला!!!
आमचं प्लानिंग म्हणजे कसं एक्दम परफेक्ट असतंय!!!!!
Wink

कब्जा सच्चा वादा झूठा असं म्हणत नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रीन येतील लगेच मालकी हक्क सांगत!
नील आणि बझचं काही नाही पण मला तुमचाच जास्त संशय येतोय. सॉल्लिड इंटरेस्ट दाखवतांय हां आमच्या प्लॉटमध्ये!!!
पण काळजी नसावी. राखण करायला नेपाळमधून दोन एच-१ स्पॉन्सर करतोय!!!
शिवाय "ही जागा खाजगी मालकीची आहे. अतिक्रमण केल्यास कायदेशीर अपमान केला जाईल" अशी मराठीत पाटीही लावणार आहे खास तुमच्यासाठी!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण काळजी नसावी. राखण करायला नेपाळमधून दोन एच-१ स्पॉन्सर करतोय!!!

जपून हो, काका. अलीकडे कोकणात आमरायांची राखण करायला आणलेले काही गुरखे चक्क कविताबिविता करतात म्हणे, आणि सकाळवाले द्याल त्या बातम्या छापत असल्याने त्याचीही बातमी छापतात.

आता जोजोकाकू प्लॉटवर डल्ला मारायल्या आल्या आणि तिथे जर त्यांना एखादा गुरखा कवी सापडला, तर संकेतस्थळांवर नेपाळी कविता वाचाव्या लागतील. (आता नेपाळी कवींना 'जे न देखे रवी' ही म्हण शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेही लागू होत असल्याने त्यांच्या कविप्रतिभेला 'मोकलाया दाही दिशा' असणार, ह्याबद्दल आमच्या मनात तीळमात्रही संशय नाही ;)).

शिवाय, पाककृतींचा विभागही ते नक्कीच गाजवतील. तशीही त्यांची 'कुकरी' जीवघेणी असते म्हणतात Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चूक चूक चूक!

पिडांकाका, चंद्रावर सगळीकडे उजेड पडतो, माझा नाही सूर्याचा! पण तुमच्या बेडरूमा दुसर्‍या बाजूला असतील तर दुर्बीणीचा फायदा होणार नाही एवढंच. पण चंद्रावरही दुर्बिणी बांधायचा विचार सुरू झालाय आधीच; त्याची कल्जि घेने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमचा गिंगरीच निवडून आला तर येत्या चार वर्षांत अमेरीकेचं एक्कावन्नावं राज्य चंद्रावर स्थापन होईल. ते व्हायच्या आत काय करायचं ते करून घ्या नायतर युद्धाला सज्ज व्हा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नुसती इंटरनेटवर चर्चा करून काही साध्य होत नसते. प्रत्यक्षात कामाला लागा. मुळात धंद्यासाठी एवढ्या दगडांची गरजच काय? बुद्धिमान माणसे एका दगडातही भागवू शकतात! हे पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुद्धीमान नाही ना! आमच्या डोक्यात शेवटी नर्मदेतले गोटेच भरलेले!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छ्या! एक भारतीय म्हणून शरम वाटली आज. आयड्या ढापायला बुद्धी लागते का?
थोडे फेरफार केले म्हणजे झालं.
चला आपण नाशिकची द्राक्षं आणि लोणारचं पाणी घेऊन "लोणारेट कायकीनू" नावाची वाईन करून विकू या. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि, आजकाल तुमचा मंगळ वाईट झालाय. कधीही, कशीही लाज वाटते तुम्हाला! अहो, शिका जरा आमच्याकडून काहीतरी.

असो, तुमच्या वायनीची आयड्या आवडली आहे. शिवाय लोणारचं पाणी वापरलं की 'मिनरल वॉटर' वापरलं आहे असं आपसूकच म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही चर्चा चंद्राच्या दगडांवरून अमेरिकेतल्या राजकारणातल्या दगडांपर्यंत कशी उतरली कोण जाणे. डोळे मारणं काय, तप्तकोटीश्वर काय, चंद्राच्या बाउंडरीवर घर बांधणं काय... मजा चाललीय. मजा करायला काहीच हरकत नाही. उलट गमतीदार विषयावर चर्चा करताना थोडी गम्मत करावी असंच आमचं मत आहे. मात्र आम्हाला मनापासून पडलेल्या प्रश्नाला मात्र कोणी शिरेसली घेतलं नाही. खरोखरच चंद्रावरचे दगड पृथ्वीवर विकण्यात काही लीगल, पोलिटिकल अडचण आहे का? कारण टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने ते सहज शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----
आम्ही चर्चा करणारे ... चर्चिल!

अहो ही दगडं विकत कोण घेणार? आणि शिद्द कसं करणार तुम्ही ही दगडं चंद्रावरचीच आहेत ते? लोकं काय, जर्मनीतून चार दगडं उचलून आणतील, सोनेरी पिशवीतून काढतील आणि म्हणतील आहेत चंद्रावरची! घेणार का तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

का नाही घेणार?

तांब्याच्या शीलबंद गडूतून गंगेचं पाणी घेतात ना? तसे सोनेरी पिशवीतून चंद्रावरचे दगड घेतील.

नव्या मुंबईतल्या दगडखाणसम्राटांना अजून कळलं नाही का? त्यांना कळलं तर काही वर्षांनी पौर्णिमेलाही चंद्र वाटोळा दिसत नाही असा अनुभव येऊ शकेल. आणि अजून काही वर्षांनी समुद्राला भरती येत नाही असाही अनुभव येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शीलबंद गडूतून गंगा? म्हणजे गंगेचा चॅस्टिटी बेल्ट का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाय वो.... ते सीलबंद शब्दाचं शुद्ध मराठी रूप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते शिंचं अंमळ कडेकडेने अवांतरच झालं!!!!
हां आता शिरेसली....
खरोखरच चंद्रावरचे दगड पृथ्वीवर विकण्यात काही लीगल, पोलिटिकल अडचण आहे का?
बहुतेक नसावी कारण चंद्रावर कोणा एका देशाची मालकी नाहिये...
कारण टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने ते सहज शक्य आहे.
होय.

पण बिझीनेसच्या दॄष्टीने फारशी ग्रेट संधी नसावी. ती दगडं गोळा करून इथवर आणण्यात जितका खर्च होईल तो भरून काढून वर आणखी नफा मिळवायला तितका सेल झाला पाहिजे तो होईल असं वाटत नाही. तुम्ही जगातली टॉप १% माणसं, त्यांना १ लाख डॉलर म्हणजे काही जास्त नाही, वगैरे जे लिहिलंय ते जरी खरं असलं तरी त्यांना हे दगड विकत घेण्यात इंटरेस्ट असावा हे तुमचं गृहितक तितकसं साऊंड नाही.
ते लोकं काय बौद्धिक धोंडे नाहियेत उगाच दगडांवर पैसे उधळायला!!:)
आणि जर आरओआय चांगला पडणार नसेल तर काय उपयोग केवळ टेक्नॉलॉजिकल फीझीबिलिटीचा?
हे आमचे आपले दोन पैसे! चूभूद्याघ्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार पुढेपुढे जाऊ नका बरं का बाळांनो, कुणीतरी युरॅनस वर मालकी हक्क सांगेल आणि भांडवल खिळखिळं करून बसाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती तो खवचटपणा!

(भांडवलदार) मराठे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

व्हीसी मराठे, आम्ही एक नवीन मिशन काढत आहोत. शुक्रावरचा तेजस्वी वायू आणण्याचं. हा वायू आम्ही अरोमाथेरपीत वापरणार आहोत. भांडवल देणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.